रसगुल्ला रेसिपी मराठी Rasgulla in Marathi रसगुल्ला ही मिठाई सर्वांच्या परिचयाचे आहेत तसेच भारतामध्ये सर्वत्र ही मिठाई उपलब्ध आहे. परंतु रसगुल्ला ही रेसिपी पश्चिम बंगाल व ओडिसा मधील लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालमध्ये तिला रोसोगोल्ला किंवा रोशोगुल्ला म्हणून ओळखले जाते. तर उडीसा मध्ये याला रसगोला म्हणून ओळखले जाते. रसगुल्ला ही मिठाई वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. रसगुल्ला तयार करण्यासाठी पनीर हा पदार्थ आवश्यक असतो. तर चला मग जाणून घेऊया रसगुल्ला ही रेसिपी कशी बनवायची याविषयी सविस्तर माहिती.\
रसगुल्ला रेसिपी मराठी Rasgulla in Marathi
रेसिपी प्रकार :
रसगुल्ला ही रेसिपी पश्चिम बंगाल व उडीसा मधील प्रमुख असून ती पनीर पासून तयार केली जाते. पनीर दुधापासून तयार केले जाते. दुधामध्ये लिंबाचा रस, दही, विनेगर इत्यादी आंबट पदार्थ खालून ते नासवण्याची प्रक्रिया केले जाते व त्यापासून दुधातील पाणी वेगळे काढून त्यातील शिल्लक राहिलेला चोथा एका फडक्यात घट्ट बांधून त्यावर वजन ठेवले जाते. त्यातील सर्व पाणी निथळले की, उरलेल्या चोथ्याचे पनीर तयार होते. पनीरचे गोळे करून ते साखरेच्या पाकात सोडले जातात. त्यालाच रसगुल्ला असे म्हणतात.
ही रेसिपी किती जणांंकरता बनणार आहे?
ही रेसिपी आपण 10 जणांंकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
रसगुल्ले रेसिपी बनवण्याकरता आपल्याला जी पूर्वतयारी करावी लागते, त्याकरता 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
रसगुल्ले कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
रसगुल्ले रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ हा 40 मिनिटे एवढा लागतो.
रसगुल्ले रेसिपी तयार करण्याकरता लागणारी सामग्री खालील प्रमाणे :
1) दूध एक लिटर
2) दीड कप साखर
3) दोन कप पाणी
4) लिंबाचा रस
5) एक चमचा मक्याचे पीठ
6) इलायची पूड
पाककृती :
- सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवा. दूध गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर दुधाला चांगली उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस पिळून टाका.
- लिंबू पिल्यानंतर दूध फाटेल. जर तुमच्याकडे लिंबू अवेलेबल नसेल तर त्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता.
- त्याला अजून दोन ते तीन मिनिट शिजवून घ्या त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या. त्याचे पनीर आता बनवून घ्यायचे आहे.
- त्यामुळे थोडे थंड पाणी घालून स्वच्छ करून घ्या. जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.
- आता हे सर्व पनीर कॉटनच्या एका कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहे. पनीर चांगले सेट होईल व सर्व पाणी निघून जाईल.
- आता एक कढाई घ्या, त्यामध्ये दोन कप पाणी घालून साखरेचा पाक करण्यासाठी ठेवा. पाण्याला चार ते पाच मिनिटे उकळी आल्यानंतर साखर घालून त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे.
- आता कपड्यातून पनीर बाहेर काढून त्यामध्ये थोडासा मैदा, एक चमचा मक्याचे पीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे.
- हे मिश्रण चांगले हाताने मळून सॉफ्ट करून घ्यायचे आहे. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून तयार करायचे आहेत.
- आता या सर्व गोळ्यांना शुभेच्छा सिरपमध्ये सोडायचे आहेत. त्यामध्ये इलायची पूड देखील टाकायचे आहे.
- रसगुल्ले साखरच्या पाकामध्ये किमान दहा ते पंधरा मिनिटे उकडून घ्यायचे आहेत.
- जोपर्यंत रसगुल्ले फुलत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे.
- रसगुल्ले शिजल्यानंतर त्यांचा आकार पूर्वीपेक्षा वाढलेला दिसतो, म्हणजेच छान शिजलेले आहेत असे समजावे.
- साखरेचा पाक पूर्णपणे त्यामध्ये मुरेल व अशाप्रकारे पांढराशुभ्र असा रसगुल्ला तयार होईल, खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असलेले रसगुल्ले तुम्ही कोणत्याही मौसममध्ये खाऊ शकता.
तर अशा रसगुल्ला ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता.
पोषक घटक :
रसगुल्ला केवळ स्वादिष्ट नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर अशी रेसिपी आहे. फेसबुकला मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लॅक्टोअॅसिड आणि केसिन मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे रसगुल्ला खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात व रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.
फायदे :
रसगुल्ले खाण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहे.
जर एखाद्याला कावीळ झाला असेल तर अशा रुग्णांसाठी रसगुल्ला खूपच फायदेशीर आहे. रोज पांढरे रसगुल्ले खाल्ल्याने कावीळचा त्रास खूपच लवकर बरा होतो.
ज्याला यूरिन इन्फेक्शनचा त्रास आहे, त्यांनी सकाळ संध्याकाळ रसगुल्ला खाणे फायद्याचे आहे.
रसगुल्ल्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यातील जळजळ कमी होते. डोळ्यांचा त्रास असल्यास रसगुल्ले खाणे खूप फायदेशीर ठरते.
जर एखाद्याला थकवा जाणवत असेल तर त्याने रसगुल्ला खाल्ले तर तात्काळ थकवा निघून जातो व फ्रेश वाटते.
रसगुल्ला दुधापासून तयार केला जातो, त्यामुळे त्यामध्ये कॅल्शियम घटक शरीरातील हाडांना मजबूत करतो व रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.
तोटे :
रसगुल्ला हा गोड मिठाईचा प्रकार असल्यामुळे बरेच लोकांना मिठाईची पथ्य असते, अशा लोकांनी मिठाई ठाणे हानिकारक असते. तसेच गोड खाल्ल्याने वजन वाढण्याचा देखील धोका असतो.
दुधापासून ज्यांना एलर्जी आहे, अशांनी सुद्धा रसगुल्ला खाणे टाळावे.
तर मित्रांनो, रसगुल्ला रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा