रसमलाई रेसिपी मराठी Rasmalai Recipe in Marathi

रसमलाई रेसिपी मराठी Rasmalai Recipe in Marathi  रसमलाई ही रेसिपी एक बंगाली मिठाईचा प्रकार आहे. ती भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. खायला अतिशय स्वादिष्ट लागते. धार्मिक सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला आपण रसमलाई या रेसिपीच्या आयोजन करीत असतो. रसमलाई ही रेसिपी आपण बऱ्याचदा बाजारातून विकत आणतो. परंतु त्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ किंवा घटक मिश्र केल्याचे आपल्याला जाणवते आणि ती आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील असतात. परंतु आपण जर हीच रेसिपी आपल्या घरी स्वतः केली तर त्यामध्ये भेसळ होण्याची चान्सेस नसतात व आपल्या आरोग्यासाठी देखील हेल्दी असते.
तर चला मग आज जाणून घेऊया रसमलाई या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

Rasmalai

रसमलाई रेसिपी मराठी Rasmalai Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

रसमलाई ही रेसिपी पनीर पासून तयार केली जाते. तसेच ही बंगाली मिठाई रेसिपीचा प्रकार आहे. गुलाब जामुन, रसगुल्ले, काला जाम, यांपेक्षा रसमलाई ही थोडी वेगळी असते, मात्र चवीला गोड असते. रसमलाई करण्याची ही अतिशय साधी, सोपी पद्धत आहे. तर चला मग तुम्हीही रेसिपी करून बघा व आम्हालाही कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती पाहूया.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता बनणार आहे ?
तर ही रेसिपी पाच व्यक्तींकरता बनणार आहे.

पूर्वतयारी करता लागणार वेळ :

रसमलाईच्या पूर्वतयारी करता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

रसमलाई तयार करण्याकरिता आपल्याला 45 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

रसमलाई रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण एक तास एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) अर्धा लिटर दूध
2) दोन चमचे लिंबाचा रस
3) तीन ग्लास पाणी
4) 400 ग्रॅम साखर

क्रीम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) अर्धा लिटर दूध
2) पाव वाटी बदामाचे तुकडे
3) पाव वाटी काजूचे तुकडे
4) केशर
5) वेलची पावडर एक चमचा

रसमलाई बनवण्याची पाककृती :

 • भेळ रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम एका कढाईमध्ये थोडे पाणी गरम करून घ्या. नंतर त्यामध्ये दूध टाकून त्याला उकळी येऊ द्या.
 • नंतर त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाका आणि थोडे पाणी घाला दुधाला चांगली उकळी येऊ द्या.
 • दुधाला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये थोडा थोडा लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
 • काही वेळाने तुम्हाला दिसेल की, दुध फाटायला सुरुवात झाली दोन ते तीन मिनिटांमध्ये दूध पूर्णपणे फाटेल.
 • नंतर आपल्याला एक सुती कापडाच्या सहाय्याने फाटलेले दूध काढून घ्यायचे आहे. यानंतर फाटलेल्या दुधापासून आपल्याला पनीर वेगळे करायचे आहेत.
 • नंतर ते थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. जेणेकरून त्यातील सर्व आंबटपणा निघून जाईल.
 • नंतर हे पनीर एका कापडात दोन तास बांधून उंच जागेवर टांगून ठेवा. जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल.
 • दोन तासानंतर पनीर मोठ्या पातेल्यात किंवा प्लेटमध्ये काढा. आता त्यातून तूप निघेपर्यंत चांगले मिसळून घ्या.
 • नंतर पनीरचे छोटे छोटे गोळे करून हलके दाबून घ्या.
 • तोपर्यंत गॅसवर कढई ठेवा त्यामध्ये पाणी आणि 400 ग्रॅम साखर घालून उकळी येऊ द्या.
 • साखर पूर्णपणे पाण्यात विरघळून त्याचे पाकात रूपांतर झाल्यावर त्यामध्ये तयार केलेली रसगुल्ले टाका.
 • नंतर झाकून ठेवा व 20 मिनिटे मोठ्या आचेवर शिजवून घ्या.
 • आता गॅसवर दुसरा पॅन ठेवावा त्यामध्ये दूध उकळण्यासाठी ठेवा दुधाला उकळी आली की गॅस मध्यम करावा आणि दूध घट्ट होईपर्यंत उकळू द्यावे.
 • नंतर त्यामध्ये पंधरा मिनिटानंतर रसगुल्ला वरील झाकण काढून पाहा.
 • रसगुल्ले झाले असतील तर गॅस बंद करा. दूध अर्धे राहिल्यावर त्यामध्ये उघडलेली साखर आणि वेलची पूड घालून दोन मिनिटे शिजवून घ्या.
 • गॅस बंद करा आणि नंतर दूध घट्ट होण्यासाठी ठेवा.
 • आता यामध्ये रसगुल्ले टाका तसेच चिरलेले बदाम, काजू, पिस्ता टाका त्यानंतर साधारण चार तास थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता तुमची थंडगार रसमलाई तयार आहे.

पोषक घटक :

रसमलाई मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फोरस, ग्लुकोज, विटामिन बी कॉम्प्लेक्स, जास्त आणि सेलेनियम यांसारख्या विविध खनिजांचा स्त्रोत असतो. तसेच नियासिन, रिबोफ्लेविन, थायमिन इत्यादी जीवनसत्त्वे आढळून येतात.

फायदे :

रसमलाई खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच हेल्दी वाटते.

रसमलाई खाल्ल्यामुळे आपण आजारांपासून दूर राहता. व एनर्जी भरल्यासारखी वाटते. थकवा निघून जातो.

रसमलाई खाल्ल्यामुळे भुकेवर नियंत्रण राहते. वजन कमी होण्यास मदत होते.

तोटे :

रसमलाईमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रसमलावी खावी अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

रसमलाई जास्त खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा देखील धोका वाढते.

तर मित्रांनो, विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment