रवा डोसा रेसिपी मराठी Rava Dosa Recipe In Marathi

रवा डोसा रेसिपी मराठी Rava Dosa Recipe In Marathi रवा डोसा हा एकदम स्वादिष्ट आणि कुरकुत पदार्थ आहे.  भारतात याचा उपयोग नाश्ता म्हणून केला जातो.  रवा डोस्याला सूजी रवा डोसा म्हणून सुध्दा ओळखले जाते, आणि हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे.  जो सर्वाना खूप आवडतो, हा डोसा रवा व तांदुळापासून बनवला जातो.  इतर डोस्याच्या बाबतीत रवा डोसा हा एकदम लवकर बनतो.  आपण पाहिले असेल हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये रवा डोसा स्वादिष्ट आणि मसालेदार मिळतो.  रवा डोसा हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे.

रवा डोसा हा शहरी भागात जास्त प्रमाणात मिळतो.  परंतु ग्रामीण व काही शहरी भागात रवा डोसा मिळत नाही.  काही लोकांना रवा डोसा खूप आवडतो, पण त्यांच्या परिसरात मिळत नाही, आणि काही लोकांना रेसिपी माहीत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे.  एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने हॉटेल सारखा स्वादिष्ट व कुरकुरीत रवा डोसा कसा बनवतात यांची रेसिपी, आता आपण रवा डोसा रेसिपी पाहणार आहोत.

Rava Dosa

रवा डोसा रेसिपी मराठी Rava Dosa Recipe In Marathi

रवा डोस्याचे प्रकार :

रवा डोसा हा खायाला एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत आहे.  विविध ठिकाणी रवा डोसा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो.  रवा डोस्याचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी साधा रवा मसाला डोसा, कांदा रवा मसाला डोसा, ड्राय फुड्स रवा डोसा हे सर्व प्रकार स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

रवा डोसा ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

रवा डोस्याच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

रवा डोसा तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते.  नंतर आपण लवकर डोसा बनवू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

रवा डोसा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

रवा डोसा बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करावे लागते.  नंतर कुकिंग करावा लागतो.  यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

रवा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 2 वाटी रवा.

2) 2 वाटी ताक.

3) 1 वाटी तांदुळाचे पीठ.

4) 4 ते 5 हिरवी मिरची.

5) कोथिंबीर.

6) 1 लहान कांदा.

7) चवीनुसार मीठ.

8) थोडे तेल.

पाककृती :

  • साबुदाणा वडा रेसिपी मराठी
  • सर्वात प्रथम हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • नंतर एका भांड्यात रवा आणि ताक व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिट भिजू घाला.
  • 10 मिनिट नंतर रवा आणि ताक भिजले असेल तर, त्यामध्ये तांदूळाचे पीठ मिक्स करा, आणि आवश्यक तेवढे पाणी टाका.
  • यांचे पूर्ण मिश्रण तयार करा, आता यामध्ये बारीक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक कांदा टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करा.
  • यामध्ये आवश्यक तेवढे मीठ टाका, आणि रवा डोस्यात मिक्स करा, आता आपले डोस्याचे मिश्रण तयार आहे.
  • एक सपाट पॅन किंवा डोसा तवा घ्या.  गॅस चालू करून गॅस वरती ठेवा, आणि त्यामध्ये पूर्ण तव्याला लागेल असे तेल टाका.
  • गॅस मध्यम आसेवर ठेवा, आणि तवा गरम झाला की, त्यावर एक वाटी डोस्याचे मिश्रण टाका,
  • आणि हलक्या हाताने लवकर मध्यम आकाराचा गोल डोसा बनवा.  डोस्याच्या बाजूने थोडे तेल सोडा.
  • आणि डोसा पूर्ण लालसर होइपर्यत चांगला भाजून घ्या.  एका बाजूने भाजून झाला की, दुसऱ्या बाजूने उलटा आणि व्यवस्थित होऊ द्या.
  • दोन्ही बाजूने लालसर झाला की, डोसा एका प्लेटमध्ये काढून घ्या.  अशा प्रकारे सर्व डोसे तयार करून घ्या.
  • आता आपला कुरकुरीत व स्वादिष्ट रवा डोसा खाण्यासाठी तयार आहेत.  आपण यांच्यासोबत थोडी गोड खटाई किंवा नारळाची चटणी घेऊन खाऊ शकतो.

रवा डोस्यात असणारे घटक :

रवा डोसामध्ये आपण ताक, बेसन असे पदार्थ वापरतो.  यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात.  जसे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेड, चरबी असे अनेक पौष्टिक घटक यामध्ये आहेत.  हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

रवा डोस्यामध्ये ताकाचा उपयोग केला जातो.  ज्यामुळे आपले पोट थंड राहते, व पचनक्रिया चांगली राहते.

यामध्ये असणारे कॅल्शियम, लोह, चरबी, व्हिटॅमिन हे सर्व पौष्टिक घटक आपल्यासाठी फायद्याचे आहेत, यामुळे शरीर निरोगी राहते.

तोटे :

रवा डोसा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून आपण रवा डोसा योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला रवा डोसा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment