प्रजासत्ताक दिवसाची संपूर्ण माहिती Republic Day Information In Marathi

Republic Day Information In Marathi येणारा प्रत्येक दिवस हा खासच असतो, मात्र काही दिवस हे अतिशय खास असतात. त्यामध्ये स्वातंत्र्यदिन, गणराज्य दिन यासारखे दिवस तर नक्कीच समाविष्ट असतात. मित्रांनो, भारत दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी आपला गणराज्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस साजरा करत असतो.

Republic Day Information In Marathi

प्रजासत्ताक दिवसाची संपूर्ण माहिती Republic Day Information In Marathi

भारत हा देश जरी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वतंत्र झाला असला, तरी देखील भारताची राज्यघटना बनवण्यामध्ये काही कालावधी जावा लागला. आणि त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना बनवून तयार झाली. मात्र ती अमलात आणण्यासाठी एक विशिष्ट चांगला दिवस निवडावा असे सर्वांचे म्हणणे आले, त्यानुसार लाहोर अधिवेशनामध्ये घोषणा केल्याप्रमाणे २६ जानेवारी हा दिवस भारत स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असे.

मात्र भारताला १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्याने १५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिन साजरा केला जाऊ लागला, त्यामुळे हा २६ जानेवारी दिवस मागे पडू लागला. त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून सर्वांमते राज्यघटना ही २६ जानेवारी १९५० या दिवशी लागू करावी असे ठरले. आणि त्या दिवसापासून भारतामध्ये भारतीय नागरिकांचे अर्थात प्रजेचे राज्य सुरू झाले. म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक दिवस असे म्हटले जाते.

प्रजा म्हणजे नागरिक आणि सत्ताक म्हणजे सत्ता होय. तसेच या दिवसाला गणराज्य दिवस असे देखील म्हटले जाते. त्यामागचे कारण म्हणजे भारत देशाचा प्रमुख हा कुठल्याही वंशपरंपरेने येणारा नसून निवडणुकीद्वारे निवडला जातो. त्यामुळे भारतामध्ये राजेशाही नसून गणराज्य आहे, हे सुचित होते.

आजच्या भागामध्ये आपण भारतीय प्रजासत्ताक दिवस अर्थात २६ जानेवारी या दिवसाबद्दल माहिती बघणार आहोत.

26 जानेवारी च्या दिवशी संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राजधानी दिल्ली या ठिकाणी सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम केला जातो. त्यानंतर लाल किल्ला या ठिकाणावरून भारतीय राष्ट्रपती भारतीय नागरिकांना उद्देशून भाषण करत असतात.

त्यानंतर भारताचे सगळे राज्य आपापल्या संस्कृतीनुसार मिरवणूक काढतात. या व्यतिरिक्त प्रत्येक गावागावात, जिल्ह्यात, तालुक्यात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला जातो. प्रत्येक शाळेमध्ये देखील ध्वजारोहण केले जाते.

प्रमुख पाहुण्यांचे भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी गोष्टी साजऱ्या केल्या जातात. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप देखील केली जाते. प्रत्येक सरकारी कार्यालय देखील या दिवशी ध्वजारोहण करत असतात. या दिवशी ठीकठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जातात.

प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. ठीक ठिकाणी भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, सत्कार, बक्षीस वाटप, यांसारख्या कार्यक्रमांनी भारत भूमी धन्य धन्य होऊन जाते. तसेच प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारची आतिषबाजी आणि रोषणाई देखील केली जाते. तसेच या दिवसाचे औचित्य साधून गुणवंत, आणि विविध क्षेत्रात धाडस केलेले धाडसी मुलांचा सत्कार देखील केला जातो.

शाळेमध्ये दोन दिवस आधीपासूनच जय्यत तयारी केली जाते. शाळेमध्ये विविध प्रकारच्या पताका लावून सजावट केली जाते, तसेच शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील पार पाडण्यात येतो. ध्वजारोहणानंतर एनसीसी विद्यार्थी ढोलताशाच्या सुरेल तालावर संचलन करताना दिसतात. तसेच लहान मुले घोषणा देत प्रभात फेरी देखील काढतात. अनेक विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करतात.

देशभक्तीपर गीते गातात. भाषणे करतात, तसेच राष्ट्रगीत, राष्ट्रगान, प्रार्थना इत्यादी गोष्टींचे तालासुरात गायन सुद्धा करतात. त्या दिवशी अनेक शाळेंमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांच्याकडून सत्कार देखील केला जातो. तसेच त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप देखील करण्यात येते.

स्वातंत्र्यदिनाइतकाच भारतीयांना गणराज्य दिनाच्या दिवशी देखील आनंद होत असतो. प्रत्येकजण हातामध्ये तिरंगा घेऊन एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती घेत असतो. लहान असो की मोठा प्रत्येकाला या दिवशी उर भरून आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र तेवढेच खरे. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक जण तेवढ्याच उत्साहाने आणि ऊर्जेने भारतीय गणराज्य दिवसाची वाट बघत असतो, आणि साजरा देखील करत असतो.

निष्कर्ष:

या जगामधील बहुतांशी सर्वच देश स्वातंत्र्य आहेत, मात्र या प्रत्येकच देशामध्ये गणराज्य व्यवस्था असेलच असे नाही. मात्र भारताने इंग्लंडकडून संसदीय शासन व्यवस्था घेतली असली, तरी देखील इंग्लंड प्रमाणे राजेशाही व्यवस्था स्वीकारलेली नाही. तर भारत हा एक गणराज्य देश आहे.

ज्याचा प्रमुख अप्रत्यक्षरीत्या निवडणुकी द्वारे निवडला जातो. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतामध्ये प्रजेचे अर्थात जनतेचे राज्य आहे. आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा आम्ही भारताचे लोक या अमेरिकेप्रमाणे घेतलेल्या ओळीने आणि संविधान स्वतः प्रत अर्पण करत आहोत या ओळीने जनता हीच भारताची सर्वोच्च मालक आहे असे दिसून येते.

केवळ देश स्वतंत्र असून चालत नाही, तर प्रजासत्ताक देखील असावा लागतो. ज्यामुळे तेथील जनतेची कल्याण साधले जाऊ शकते. या राज्यघटना लागू करण्याच्या दिवसाची आठवण म्हणून भारतामध्ये प्रत्येक 26 जानेवारी च्या दिवशी प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन साजरा केला जातो.

त्या दिवशी संपूर्ण देशभर अगदी आनंद आणि उल्हासाचे वातावरण असते, मात्र केवळ हर्षोल्हास साजरा करणे हेच आपले प्रजासत्ताक दिनी कर्तव्य नसून, लोकशाही पद्धतीचा आदर करत योग्य उमेदवारांना निवडून देणे, निवडणुकीमध्ये कुठल्याही गैरप्रकाराला खतपाणी न घालणे, अशी प्रतिज्ञा घेणे हे सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची पद्धत म्हणता येईल.

ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक हा जबाबदार नागरिक म्हणून उदयास येईल. आणि परिणामस्वरूप भारत देश उत्तरोत्तर प्रगती करत जाईल यामध्ये कुठलीच शंका नाही. तसेच या सर्वांमुळे प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस देखील लागेल.

FAQ

भारताचा प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन किती तारखेला असतो?

भारतीय प्रजासत्ताक दिन ज्याला गणराज्य दिन म्हणून देखील ओळखले जाते तो प्रत्येक वर्षाच्या 26 जानेवारी या दिवशी असतो.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या दिवशीच का साजरा केला जातो?

२६ जानेवारी १९५० या दिवशी भारताने आपली राज्यघटना लागू केली होती, त्या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच स्वीकारली असून देखील २६ जानेवारी या दिवशी का लागू केली गेली?

काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनानुसार २६ जानेवारी हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते, मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या दिवसाची आठवण पुसली जाऊ नये म्हणून २६ जानेवारी या दिवशी राज्यघटना अंमलात आणण्यात आली.

प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ काय होतो?

प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या किंवा जनतेच्या हातामध्ये असलेली सत्ता होय. भारतामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत भारताची सत्ता ही जनतेच्या हातात असते.

गणराज्य या शब्दाचा अर्थ काय?

गणराज्य या शब्दाचा अर्थ असा देश ज्याच्या देशप्रमुखाची निवड ही वंशपरंपरागत पद्धतीने न करता निवडणुकीच्या आधारे केली जाते.

आजच्या भागामध्ये आपण रिपब्लिक डे अर्थातच भारतीय गणराज्य दिनाच्या बद्दल माहिती पहिली. ही माहिती प्रत्येक भारतीय नागरिकाला मनापासून आवडली असेलच, त्यामुळे ती इतरही भारतीय नागरिकांपर्यंत शेअर करणे ही तुमची जबाबदारीच आहे. तसेच लहानपणी तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनी घडलेल्या गमती जमती आम्हाला कमेंट मध्ये वाचायला देखील आवडतील.

धन्यवाद.

Leave a Comment