Rohit Sharma Information In Marathi रोहित शर्मा हा एक भारतीय लोकप्रिय असा क्रिकेट खेळाडू आहे, ज्याचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा असे आहे. रोहित शर्मा यांच्या विषयी खूप ऐकलं असेल. क्रिकेट या खेळामध्ये त्याने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. हा खेळाडू उजव्या हाताचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. तसेच उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी सुद्धा तो करतो. त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघामध्ये क्रिकेट खेळ खेळला आहे तसेच इंडियन प्रीमियर लीग मध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार होता.
रोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi
त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पाच वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकलेला आहे. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये हॅट्रिक आणि शतक सुद्धा आहे असा करणारा तो आयपीएल मधील पहिलाच खेळाडू आहे. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. आज आपण रोहित शर्मा या खेळाडूविषयी सविस्तर माहिती पाहूया.
रोहित शर्मा यांचा जन्म व बालपण :
रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूरमधील बनसोड या शहरांमध्ये झाला रोहित शर्माचे वडील गुरुनाथ शर्मा हे आहेत तसेच ते ट्रान्सपोर्ट कंपनीचे साठवणगृहाचे केअरटेकर होते आणि त्यांची आई पूर्णिमा शर्मा ही एक गृहणी आहे. रोहित शर्माला एक लहान भाऊ आहे, ज्याचे नाव विशाल असे आहे. रोहित शर्माचे कुटुंब डोंबिवलीमध्ये एका खोलीच्या घरामध्ये राहत होते आणि त्यांच्या वडिलांचे उत्पन्न सुद्धा खूप कमी असल्यामुळे त्यांच्या आजी आजोबा आणि काका जवळ बोरवलीला ते राहत होते.
1999 मध्ये काकांनी रोहित शर्मा यांना एका क्रिकेट शिबिरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना त्या शिबिरामध्ये सुद्धा सामील करून घेतले. त्या शिबिरातील प्रशिक्षक दिनेश लाड हे होते. त्यांनी रोहित शर्मा यांच्या काकांना त्यांची शाळा बदलण्यास सांगितली आणि तेथे लाड क्रिकेट प्रशिक्षण आहे. त्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेण्यास सांगितला. तेथूनच रोहित शर्मा यांच्या क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.
रोहित शर्मा यांचे शिक्षण :
रोहित शर्मा यांचा जन्म नागपूर झाला परंतु रोहित शर्मा हे दीड वर्षाच्या असताना, त्यांचे कुटुंब मुंबईतील डोंबिवलीमध्ये स्थलांतरित झाले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पाहिजे तेवढी चांगली नव्हती, त्यामुळे रोहित शर्माला त्याचे काका व आजी-आजोबांकडे राहायला पाठवण्यात आले. तिथे तो क्रिकेट खेळू लागला.
रोहित शर्माने त्याचे शिक्षण स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर महाविद्यालय मुंबई आणि अवर लेडी ऑफ वेलंकन्नी हायस्कूल मुंबई येथे पूर्ण केले. बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे, त्यानंतर तो कॉलेजला गेला नाही. कारण त्याला क्रिकेट या खेळामध्ये रुची होती आणि क्रिकेट या खेळाला वेळ देण्यासाठी त्याने कॉलेजचे पुढचे शिक्षण घेतले नाही.
रोहित शर्मा यांची करिअरची सुरुवात :
रोहित शर्माने 1999 मध्ये काकांच्या म्हटल्यानुसार एका क्रिकेट शिबीरामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या शिबिरामध्ये सामील करून घेतले आणि जेथे लाड क्रिकेट प्रशिक्षण आहे, त्या शाळेमध्ये रोहित शर्माला प्रवेश घेण्याचा सांगितला. आणि इथूनच रोहित शर्माच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली.
रोहित शर्माने 2005 मध्ये असणाऱ्या देवधर करंडकामध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये त्यांनी आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यावेळी दक्षिण संघाला त्यांनी विजय मिळवून दिला कारण तो पश्चिम गटाच्या गटामध्ये खेळला. त्यानंतर त्याच स्पर्धेमध्ये त्यांनी 123 चेंडूमध्ये 142 धावा काढून सर्वांची मने जिंकली होती. तेथूनच तो खूप प्रसिद्ध झाला.
त्यामुळे या स्पर्धेमध्ये निवड करताना त्यामध्ये निवडकरांचे लक्ष आपल्याकडे वळून घेतले व रोहित शर्मा यांना भारतीय अ च्या दुबई आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बोलविण्यात आले. 2006-07 मध्ये रोहित शर्मा यांनी मुंबई कडून खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडकमध्ये प्रवेश घेतला आणि रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.
रोहित शर्मा याची एक दिवशी कामगिरी :
रोहित शर्मा यांना एक दिवस सामन्यामध्ये 2007 या काळात आयर्लंड विरुद्ध खेळण्यासाठी बोलवण्यात आले होते. परंतु त्यावेळी त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नाही. त्यावेळी भारताने आठ गडी राखून विजय मिळवला होता. ज्यावेळी रोहित शर्मा यांना दक्षिण आफ्रिके विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मिळाली.
त्यावेळी ते आपले कौशल्य चांगल्या प्रकारे सादर करू शकले नाहीत व त्यावेळी फक्त आठ धावांवरच बाद झाले यानंतर 2007 मध्ये पाकिस्तान युद्ध झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी त्यांच्या एकदिवशीय सामन्यातील पहिले अर्धशतक बनवले होते. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 धावा श्रीलंके विरुद्ध 70 धावा केल्या होत्या. यशाच्या नंतर त्यांनी एक दिवशी सामन्यामध्ये जिम बॉम्बे विरुद्ध 114 धावा करून आपले शतक पूर्ण केले आणि श्रीलंके विरुद्ध आणखीन एक शतक बनवले होते
क्रिकेटमधील त्याच्या मेहनतीने व केलेल्या कामगिरीमुळे निवड कर्त्यांनी भारत आणि आयर्लंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये सुद्धा रोहित शर्माची निवड केली होती. बेलफास्ट मधील सामन्यात रोहितला फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नव्हती. रोहितने सप्टेंबर 2007 मध्ये एका T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजी विरुद्ध शानदार पन्नास धावा केल्या होत्या.
या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाद्वारे संघाला विजय सुद्धा त्यांनी मिळून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला दुसऱ्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली होती. रोहित शर्मा आणि पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक झळकवली होते. रोहित शर्माची सर्वोत्तम एकदिवशीय कामगिरी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झाली आणि तिथूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव इतिहासात छापले.
रोहित शर्मा यांनी बनवलेली शतके :
रोहित शर्मा या खेळाडूने आपल्या क्रिकेट खेळाच्या प्रवासामध्ये जवळजवळ 40 शतके बनवले आहेत आणि हा खेळाडू सर्वाधिक शेतकी बनवण्यात खेळाडूंच्या यादीमध्ये पंधराव्या क्रमांकावर येतो. या खेळाडूने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 शतके बनवली तर श्रीलंकेविरुद्ध 6 शतके बनवली होती.
रोहित शर्मा हा खेळाडू एकदिवशी सामन्यांमध्ये जेव्हा खेळला तेव्हा त्याने 29 शतकी बनवली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर शतक बनवणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. याच्या अगोदर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे खेळाडू पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.
रोहित शर्मा यांचे वैयक्तिक जीवन :
रोहित शर्मा यांचे लग्न रितिका सजदेह हिच्या सोबत झाले तसेच त्या दोघांना एक मुलगी आहे. जिचा जन्म 30 डिसेंबर 2018 मध्ये झाला होता तिचे नाव समायारा असे ठेवले.
रोहित शर्मा यांना मिळालेले पुरस्कार :
रोहित शर्मा यांना भारत सरकारने 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आणि जो भारताचा राष्ट्रीय खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी दिला जातो.
ESPN निरोगी शर्मा यांना 2013 आणि 14 मध्ये एक दिवसीय सामन्यामध्ये दोन दिशेतक झळकवल्यानंतर 2013 व 14 मध्ये सर्वोत्तम एकदिवशीय फलंदाजी परफॉर्मन्स म्हणून सुद्धा घोषित केले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात रोहितला त्याच्या शतकांसाठी 2015 मधील सर्वोत्तम टी ट्वेंटी फलंदाजी कामगिरी म्हणून सुद्धा घोषित केले.
FAQ
रोहित शर्मा यांचा जन्म कोठे झाला?
रोहित शर्मा यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील बनसोड या शहरात झाला.
रोहित शर्मा यांची पूर्ण नाव काय आहे पूर्ण
रोहित गुरुनाथ शर्मा.
रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे
क्रिकेट.
रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ किती वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकला?
सलग पाच वेळा.
रोहित शर्मा यांचे शिक्षण किती पर्यंत झाले आहे?
बारावीपर्यंत.