गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

Rose Flower Information In Marathi गुलाबाचे फुल आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये Rose रोज असे म्हणतो हे फुल दिसायला अतिशय सुंदर व आकर्षक तसेच सुगंधी असते. या फुलांना जगामध्ये सर्वात सुंदर फुल मानले जाते तसेच या फुलाला प्रेमाचे प्रत्येक म्हणून सुद्धा ओळखले जाते. परंतु या फुलांमध्ये विविध रंग, गंध आपल्याला पाहायला मिळतात.

Rose Flower Information In Marathi

गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

गुलाबाच्या झाडांना अनेक काटे असतात परंतु तरीही फुल दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असते. यावरून आपल्याला काही गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. गुलाबाच्या फुलाविषयी अनेक कवींनी कविता रचलेले आहेत तसेच त्यातील गोडवा व सुंदरता अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडले आहे. गुलाबाच्या फुलाचे वर्णन तसेच गुलाबाचे फुल कसे दिसते, याविषयी आपण सविस्तर माहिती.

गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

गुलाबाच्या फुलाचा इतिहास :

गुलाबाचे फुल हे इतर फुलांमध्ये सर्वात सुंदर फुल मानले जाते तसेच त्याला स्वतःचा सुगंध आहे. आपण जर गुलाबाच्या फुलाचा इतिहास पाहिला तर या फुलाचे झाड पृथ्वीतलावर 33 करोड वर्षा आधीपासूनच उपलब्ध आहे असे मानले जाते. हे फुल जगातील सर्वात जुन्या फुलांमधून जुने फुल आहे. गुलाबाचे फुल हे एक हजार वर्षे जुने आहे असे मानले जाते. हे फुल जर्मनीमध्ये एका चर्चच्या भिंतीवर लिहिले आहे की, ते त्या ठिकाणी इ.स. 815 पासून उपलब्ध होते.

गुलाबाच्या फुलांच्या इतिहासावर असे मानले जाते की, चीनमध्ये पाच हजार वर्षाआधी गुलाबाची शेती करण्यात आली होती. त्यावेळी गुलाबाची फुले एक प्रकारचे सुंदर व निळ्या रंगाचे होते. जे काही काळानी विलुप्त झाले आणि इराकच्या एका राज्यांमधील राणी पिवळ्या रंगाच्या गुलाबाच्या फुलाला सर्वाधिक पसंत करायची असेही म्हटले जाते.

मुगल साम्राज्याच्या वेळी मुघल सम्राट यांची बेगम नुरजहा हिला लाल रंगाचे गुलाब सर्वात प्रिय होते. त्यामुळे प्राचीन काळातील सम्राटान द्वारे अनेक गुलाबांचे रोपटे तेथे स्थापित करण्यात आले. युरोपच्या दोन देशांचे राष्ट्रीय फूल सुद्धा गुलाब हे आहे. एका देशाचे राष्ट्रीय फूल हे पांढरा गुलाब तर दुसऱ्या देशाचे राष्ट्रीय फूल हे लाल गुलाब होते.

प्राचीनकाळी गुलाबाला सुगंधी द्रव्य बनविण्यासाठी नुरजहाँ यांनी वापर केला होता. यांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सुद्धा गुलाब आवडीचे होते, त्यामुळे ते आपल्या खिशाला गुलाबाचे फुल लावत होते.

गुलाबाच्या झाडाचे व फुलाचे वर्णन :

गुलाबाचे झाडाची उंची ही चार ते सहा मीटर असते तसेच काही प्रजातींमध्ये उंची ही दहा फुटांपर्यंत सुद्धा असते. गुलाबाचे झाड हे पूर्णतः काटेदार असते. तसेच गुलाबाच्या झाडाची पाने रठ व काटेरी असतात. गुलाबाच्या प्रजाती जगभर 100 पेक्षा जास्त आढळून येतात. गुलाबांच्या शेती फुलांच्या शेती या जगभर केल्या जातात. तसेच भारतात सुद्धा गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

गुलाबाचे झाड भारतात तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये आपल्याला लावलेले दिसतात. तसेच आपल्या भारत देशामध्ये 7 फेब्रुवारीला रोज डे हा दिवस साजरा केला जातो. गुलाबाचे फुल हे विशिष्ट रंगाचे गंधाचे असते. तसेच त्याचा आकर्षक रंग हा प्रत्येकाचे मन मोहित करून घेते व त्याचा सुगंध हा तर मन प्रसन्न करतो तसेच गुलाबाचे फुलांच्या पाकळ्यापासून गुलाब जल तयार केले जाते. गुलकंद तयार केला जातो, गुलाब हे एक औषधी वनस्पती फुल आहे.

गुलाबाच्या फुलांचे प्रकार :

जगभरात गुलाबाच्या फुलांचे शंभर पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला निश्चित त्यामध्ये काही प्रकार खालील प्रमाणे जाणून घेऊया.

लाल गुलाब : लाल गुलाब हा दिसायला अतिशय आकर्षक व प्रेमाचे प्रतीक मानले जाते भारतामध्ये या फुलाला सर्वात जास्त मागणी असते. गुलाबाच्या या झाडांवर सुद्धा काटे असतात. या प्रकारच्या फुलांची झाडे भारतातील घराघरांच्या दारात आपल्याला वाढलेली दिसतील.

पांढरा गुलाब : पांढरा गुलाब हा सुद्धा लाल गुलाबाप्रमाणे सुंदर दिसतो तसेच या फुलांची झाडे जास्तीत जास्त पृथ्वीच्या उत्तर भागांमध्ये आपल्याला दिसून येतो. पांढऱ्या गुलाबामध्ये बदामी गुलाब सुद्धा शोभून दिसतो. या फुलांचा उपयोग सुगंधित अत्तर बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.

काळा गुलाब : काळ्या गुलाबाचे फुल हे पूर्णपणे काळे नसते तर ते फुल म्हणजे त्यावर हलक्या प्रमाणात काड्या रंगाच्या छटा आपल्याला दिसतात. पाढे गुलाब जास्त करून तुर्की या देशांमध्ये आढळून येतात.

शेंद्रा गुलाब : शेंद्राय गुलाबाचे फुल दिसायला सुंदर दिसते तसेच त्या फुलाला सुगंध सुद्धा असतो. हे फुल आपल्या घरामध्ये सजावटीसाठी वापरण्यात येतात.

हिरवा गुलाब : हिरव्या गुलाबाचे फुल तुम्ही पाहिले आहे का? हिरवा गुलाब सुद्धा गुलाबाच्या फुलांप्रमाणेच असतो. मात्र त्याच्या पाकळ्या ह्या त्यांच्या पानासारख्या असतात. हे गुलाबाचे फुल झाडांवर पानांप्रमाणेच दिसतात .

गुलाबी गुलाबी : गुलाब हे लाल गुलाबाप्रमाणेच सुंदर दिसते. याशिवाय हे फुल सुगंधित सुद्धा असते. या फुलांचा जास्तीत जास्त उपयोग सुगंधित रसायन तयार करण्यासाठी केला जातो तसेच गुलाबी फुलांची माळा देवीला सुद्धा खूप प्रिय असते. त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये सुद्धा या फुलांचा उपयोग केला जातो.

गुलाब या फुलांचा उपयोग :

फुलांचा उपयोग हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांना माळा तयार करून वाहिल्या जातात तसेच मंदिराच्या सजावटीसाठी किंवा इतर प्रोग्रॅमच्या वेळेस सजावटीसाठी त्या गुलाबाचे फुलांना आपल्या केसांमध्ये सुद्धा लावतात तर काही पुरुष हे गुलाबाचे फुल आपल्या शर्टच्या खिशाला लावतात.

ते शोभून दिसते गुलाब या फुलापासून गुलाब जल, शरबत, गुलकंद, तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. तसेच गुलाबाच्या फुलापासून मोठ्या प्रमाणात अगरबत्ती सुद्धा बनवण्यात येतात. बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो.

गुलाबाच्या फुलाचे फायदे :

गुलाबाच्या फुलांचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये काही फायदे आपण जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा उपयोग होतो : गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये आढळणारे घटक हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. शरीरातील चयापचे प्रक्रिया वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

हाडे मजबूत होतात : गुलाबाच्या फुलांमध्ये विटामिन सी आणि एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात, त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. गुलाबाच्या पाकळ्या पासून बनवलेला गुलकंद खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात.

मुळव्याधावर फायदेशीर : फायदेशीर गुलाबाच्या फुलांचा उपयोग ज्या लोकांना मूळव्याध आहे, त्यांनी फुलाच्या पाकळ्या खालल्यास मूळव्याधला आराम मिळतो कारण गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करण्याची शक्ती असते. त्यामुळे पचन सुधारते व मूळव्याध दरम्यान रक्तस्त्राव किंवा वेदना असेल तर या समस्या दूर होतात.

तणाव थकवा दूर होण्यास मदत होते : जर एखाद्या व्यक्तीला थकवा तणाव किंवा झोपेचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने आपल्या पलंगावर गुलाबाच्या काही पाकळ्या टाकून गुलाबाच्या सुगंधाने मन शांत होते व तणाव सुद्धा दूर होतो.

FAQ

गुलाबाच्या फुलांच्या किती जाती आहेत?

गुलाबाच्या फुलांच्या शंभर पेक्षा जास्त जाती आढळून येतात, त्यामध्ये लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा, पांढरा व काळा ह्या प्रजाती भारतात.

गुलाबाचे फुल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे?

इराण.

गुलाबाच्या फुलांपासून काय बनवले जाते?

गुलकंद, सुगंधी द्रव्य, गुलाबजल , अत्तर अगरबत्ती इ.

रोज डे हा कधी असतो?

7 फेब्रुवारी.

गुलाब वाढण्यास किती काळ लागतो?

तीन ते चार वर्षात पूर्ण वाढ होते.

Leave a Comment