साक्षर भारत, समर्थ भारत | मराठी निबंध

    जसे म्हटले जाते ना “स्वच्छतेकडून, समृद्धीकडे” अगदी तसेच “साक्षर भारत, समर्थ भारत” कसे म्हटले जाऊ शकते ते आपण बघूयात. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि भारत देश हा लोकशाही राष्ट्र म्हणून सर्व जगात ओळखला जाऊ लागला. पारतंत्र्यातून मोकळा होताच भारतासारखा बलाढ्य सक्षम देशाला प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्या आणि प्रगतीच्या वाटेकडे देशाची पावले वेगाने पडू लागली. उद्योगधंदे, शिक्षण, शेतीव्यवसाय, विज्ञान क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रे या सर्वच क्षेत्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न होऊ लागले, परंतु या सर्व प्रयत्नांचे भरघोस यश आपल्याला अजूनही मिळालेले नाही.

साक्षर भारत, समर्थ भारत | मराठी निबंध

साक्षर भारत, समर्थ भारत | मराठी निबंध

    देशाची वाढती लोकसंख्या, प्रचंड दारिद्रय, बेरोजगारी, अनारोग्य या सर्व गोष्टी प्रगतीच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. या सर्वांच्या मुळाशी आहे अज्ञान आणि निरक्षरता.

    भारतातील आदिवासी व गरीब समाज ज्ञानापासून/शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. हा समाज अजूनही रूढी, परंपरा, अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकला आहे. त्याच्या विकासासाठी अनेक योजना असूनही त्या योजनांचा लाभ निरक्षरतेमुळे व अज्ञानामुळे ते घेऊ शकत नाही. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तरीही, वैज्ञानिक सुखसोयींचा लाभ त्यांना घेता येत नाही. समाजातील अज्ञान नष्ट करून समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे, त्याशिवाय आदिवासींचा विकास साध्य होऊ शकणार नाही.

    महात्मा फुलेंसारख्या सारख्या थोर समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. स्त्रीशिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले आज एक स्त्री शिकली तर ती एका नाही तर दोन कुटुंबाला सुसंस्कृत करू शकते. ही विधाने फक्त फलकापुरतीच मर्यादित आहेत, कारण आजही खेड्यातील खालच्या जातीतील स्त्रिया उच्च शिक्षणापासून वंचितच आहेत. आपली भावी पिढी सुसंस्कृत कार्यक्षम सुजाण नागरिक बनायला हवी असेल तर या देशातील प्रत्येक स्त्री साक्षर व्हायला पाहिजे, तर आणि तरच प्रगतीतील अडथळे दूर होतील आणि त्यासाठी सरकारनेच कडक कायदाही करणे गरजेचे आहे.

    भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा आत्मा आहे. पण अजूनही इथला शेतकरी निरक्षर आहे. त्या निरक्षरतेचा फायदा सावकार घेत आहेत. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आज शेतकरी खूप कष्ट करूनही दरिद्री आहे. त्याची सर्व शक्ती दारिद्र्याशी झगडण्यात नष्ट होत आहे. शेतीविकासाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला आहे, परंतु हे नवीन तंत्रज्ञान अजूनही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. निरक्षर शेतकरी त्यांच्या निरक्षरतमुळे व अज्ञानामुळे हे तंत्र  अजूनही आत्मसात करू शकला नाही.

    लोकसंख्या ही राष्ट्रीय संपती आहे, पण शिक्षणाच्या अभावाने हीच लोकसंख्या राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा होत आहे. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तरीही, अज्ञानामुळे अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. आज आपल्या प्रगत विज्ञानाने आपले यान अंतराळात पाठवून विज्ञानाचे महत्व पटवून दिले आहे. तरीही बहुजन समाज अजूनही नवस करून बळी देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालून आपले अज्ञान वाढवित आहे. वैद्यकीय उपचारांबाबतही अजूनही समाज अज्ञानी आहे. जादूटोणा, लागणा, करणी यासारख्या भोंदू कल्पनावर विश्वास ठेवून ते आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करीत आहेत.

भारतात लोकशाही राज्यपद्धती आहे म्हणजेच आपल्या लोकप्रतिनिधीची निवड सारासार विचार करून त्यांना आपल्या लोकशाहीचा पायाभरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु येथील निरक्षर लोक प्रलोभनाला बळी पडतात व आपला लोकप्रतिनिधी निवडताना चूक करतात. यातूनच भ्रष्टाचार वाढत आहे. परिणामी देशाची प्रगती खुंटत आहे. तेव्हा भारतासारख्या बलाढ्य देशाच्या प्रगती मार्ग सुरळीत करण्यासाठी साक्षरता प्रसाराची अत्यंत आवश्यक आहे. सर्वच स्तरावर शिक्षण सक्तीचे झाल्यास एक साक्षर भारत समर्थ भारत तयार वेळ लागणार नाही.

    “साक्षरता” केवळ रोजगार मिळविण्याचा मार्ग नाही तर  हे मानवाधिकार जाणून घेण्यास प्रोत्साहन देते जेणेकरून प्रत्येकजण जे पात्र असेल ते प्राप्त करू शकेल. निरक्षरता असल्यामुळे बरेच लोक दररोज निराश होतात. याव्यतिरिक्त, ते स्वतःच्या आयुष्यात संघर्षापुढे भरभराट करतात. म्हणून स्थानिक आणि शाळेच्या वाचनालयांमधील माहिती मिळविण्यासाठी एक उत्तम जग निर्माण करण्यासाठी आणि सामुदायिक संसाधनांचा वापर करण्यासाठी, साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच म्हटले जाते “साक्षर भारत, समर्थ भारत”.

इतर निबंध-

महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी

पंडित जवाहरलाल नेहरू वर निबंध

Leave a Comment