साबरमती नदीची संपूर्ण माहिती Sabarmati River Information In Marathi

Sabarmati River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या नदीप्रणाली या पोस्टमध्ये आपण ‘साबरमती’ या नदीची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. साबरमती नदी पश्चिम भारतातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी उत्तर दक्षिण वाहत जाते व शेवटी खबातच्या आखातास जाऊन मिळते .

Sabarmati River Information In Marathi

साबरमती नदीची संपूर्ण माहिती Sabarmati River Information In Marathi

गुजरात राज्याची साबरमती ही मुख्य नदी असून गुजरात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे .साबरमती नदी वाकल नदी म्हणूनही ओळखली जाते. सुरुवातीला साबर आणि  संयुक्त पणे वाहत असतात. त्यानंतर त्यांचा संगम होतो या संगमामुळे या  नदीचे नाव साबरमती पडले आहे. साबरमती नदीचा निचरा होतो तेव्हा सुरुवातीच्या प्रवाहाला वाकल असे म्हणतात.

साबरमती नदी ही राजस्थान व गुजरात या दोन राज्यातुन वाहते. साबरमती नदीच्या एकूण जलवाहन क्षेत्रापैकी सुमारे एक चतुर्थांश भाग हा राजस्थान राज्यात येत असून बाकीचा जलवाहन क्षेत्र गुजरात मध्ये येतो.

अहमदाबाद व गांधीनगर ही मोठी शहरे या नदीकाठी वसलेली आहेत. साबरमती नदी चे पाणी हे धराई धरण या योजनेद्वारे गुजरात राज्यात सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरले जाते.

या नदी विषयी एक पौराणिक कथा आहे. भगवान शंकराने गंगा नदी गुजरात मध्ये आणली. तेव्हा त्यातून साबरमती नदी चा जन्म झाला असे म्हटले जाते. साबरमती नदीचे प्राचीन नाव भोगावा असे आहे. तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे की, सुलतान अहमद शहा साबरमती नदीच्या काठी विश्रांतीसाठी थांबला होता.

तेव्हा एक ससा कुत्र्याचा पाठलाग करत होता. तेव्हा त्याचे धैर्य पाहून त्याला तेथे शहर स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हा त्याने  अहमदाबाद ची स्थापना केली.

साबरमती नदी चा उगम राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगांच्या दक्षिणेकडे असलेल्या धेबार तलावातून होतो. नंतर दक्षिण पश्चिम या दिशेने राजस्थान आणि गुजरात मध्ये 371 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ती अरबी समुद्राच्या खंबायतच्या आखातात जाऊन मिळते .

साबरमती नदीची एकूण लांबी 371 किलोमीटर आहे. राजस्थानमध्ये या नदीची लांबी 48 किलोमीटर असून गुजरात मध्ये या नदीची लांबी 323 किलोमीटर आहे .राजस्थान राज्याच्या दक्षिण भागात साबरमती नदी चे खोरे आहे. या खोऱ्याची एकूण लांबी 300 किलोमीटर असून रूंदी 105 किलोमीटर आहे.

साबरमती नदी खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र 21,674 चौरस किलोमीटर आहे. साबरमती खोरे दोन राज्यात विभागले गेलेले आहेत. गुजरात राज्याने 4,124 चौरस किलोमीटर व्यापलेला असून उर्वरित भाग म्हणजे 18,550 चौरस किलोमीटर गुजरात राज्यात व्यापलेला आहे.

साबरमती नदी खोऱ्याचा भाग पूर्वेला बनास व माही नदी खोऱ्याने ,उत्तरेला लुनी खोऱ्याने,पश्चिमेला पश्चिम बनास खोऱ्याने वेढलेला आहे .साबरमती खोऱ्याची दक्षिण सीमा गुजरात राज्याला लागून आहे. उदयपूर, सिरोही, पाली व डुंगरपुर या जिल्ह्याच्या काही भागात साबारामती नदीचे खोरे पसरलेले आहे.

डोंगराळ भागातून ही नदी 130 किलोमीटर वाहत असताना चिंचोळ्या उंच काठ दरीतून जाते वाहत जाते .धराई धरणापासून अहमदाबादपर्यंत या नदीचे पात्र रुंद व सपाट उताराचे आहे .अहमदाबाद पासून नदीच्या मुखापर्यंत ही नदी नागमोडी व संथ वाहत जाते व तिचे पात्र खूप विस्तृत व मोठे आहे.

ही नदी राजस्थान राज्यात उदयपूर व गुजरात राज्यातील सांबरकाठा, मेहसाना, गांधीनगर ,अहमदाबाद आनंद या जिल्ह्यातून दक्षिणेकडून पश्चिमेकडे वाहत जाते.बकाल नदी ,   सेई नदी, हममती नदी, मेश्वा नदी, वेतारक नदी, माझम नदी, मोहर नदी, खारी नदी, गुई नदी, हरणाव नदी, वैतक नदी, मधुमती नदी इत्यादी तिच्या उपनद्या आहेत.

साबरमती व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे बांधण्यात आली आहे. धरोई हे धरण साबरमती नदीवर गुजरात राज्यातल्या मेहसाणा जिल्ह्यातील धरोय गावात बांधले आहे .तसेच हथ मती,हरणाव धरण ,गुहई धरण, मेश्वो जलाशय, मेश्वो पिकअप वायर, माझम धरण. वात्रक धरण ही धरणे साबरमतीच्या उपनद्यांवर बांधण्यात आलेली आहेत.

साबरमती नदीच्या उपनद्यांची माहिती:-

सेई नदी :-

सेई नदीचा उगम उदयपूर जिल्ह्याच्या पश्चिमेला अरवली पर्वत रांगेतून होतो. नंतर साबरमती नदी बरोबर समांतर नैऋत्य दिशेला वाहत जाते. नंतर गुजरात राज्यात साबरमती ला जाऊन मिळते .या नदीची लांबी 95 किलोमीटर असून 946 चौरस किलोमीटर ड्रेनेज क्षेत्र आहे .

उदयपूर जिल्ह्यातील कोत्रा तहसील मधील सेई हे धरण सेई नदीवर बांधण्यात आले आहे. हे धरण मातीचे गुरुत्वाकर्षण धरण आहे. या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचा उपयोग जवाई धरणाला पाणी पुरवठा करण्यासाठी होतो.

हथमती धरण:-

हथमती नदीचा उगम अरवली पर्वत रांगातून होतो. या नदीवर हिंमतनगर जवळ हथमती धरण बांधण्यात आले आहे. तिची उपनदी गुहाई या नदीवर गुहाई हे धरण बांधण्यात आले आहे.

वाकल नदी :-

वाकल नदीचा उगम अरवली पर्वत रांगेत नेऋत्य दिशेला होतो. 158 किलोमीटर वाहत जाऊन ही नदी साबरमती नदीला जाऊन मिळते. मानसी व परवी या वाकल नदीच्या उपनद्या आहेत.

मेश्वा नदी:-

मेश्वा नदी ही डुंगरपुर जिल्ह्यात अरवली पर्वत रांगेतील पंचारा डोंगररांगेत उगम पावते व तेथून वाहत जाऊन शामलाजी  येथे गुजरात राज्यात प्रवेश करते. नंतर ही नदी गुजरात राज्यात आल्यावर उत्तर व मध्य भागात वाहत जाऊन साबरमती नदीला जाऊन मिळते.

या नदीवर गुजरात मध्ये शामलाजी येथे निकल  मेश्वा धरण बांधण्यात आले असून महेमदवाद तालुक्यातील रस्का गावाजवळ पाणलोट धरण बांधण्यात आले आहे.

वात्रक नदी:-

वात्रक नदीचा उगम राजस्थान राज्यात डूंगरपुर जिल्ह्यातील पंचारा डोंगरात होतो .या नदीची एकूण लांबी 243 किलोमीटर असून या नदीचे ड्रेनेज क्षेत्र 8,638 चौरस किलोमीटर आहे.

गुजरातच्या खेडा जिल्ह्याजवळ वर्तक या ठिकाणी शेढि व मेश्वो या नद्या वाहत जातात व नंतर ढोलका जवळील वुतहा येथे साबरमती नदीला जाऊन मिळतात. गुजरात राज्यात साबरकाठा येथे या नदीवर धरण बांधण्यात आले आहे .मेश्वो,माझव, शेढी या वात्रक नदीच्या उपनद्या आहेत.

धराई येथे धरण बांधण्यात आले आहे. त्या बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व विद्युत् निर्मितीसाठी केला जातो. तसेच शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो. साबरमती प्रकल्पामुळे 28,322 हेक्टर शेती पाण्याखाली आहे. अहमदाबाद-गांधीनगर या शहरांना सुद्धा पाणीपुरवठा केला जातो.

गुजरात व राजस्थान या राज्यांची साबरमती नदी ही एक प्रकारे जीवन वाहिनी आहे. नदीच्या पाण्यामुळे जो गाळा वाहून येतो. त्यामुळे मिश्रित माती गाळामुळे ही नदी खोऱ्यातील जमीन सुपीक झाली आहे .त्यामुळे याचा फायदा नदीकाठच्या शेती करणाऱ्या लोकांना होतो .त्यामुळे येथे नगदी पिके घेतली जातात. तसेच साबरमती नदी मुळे येथे मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी जी ने याच नदीच्या काठावर साबरमती आश्रम स्थापन केला व तेथेच त्यांचे वास्तव्य होते .तसेच साबरमती नदीच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. चंद्रभागा नदी ही साबरमती नदीला जेथे मिळते तिथे दधीचीने तपश्चर्या केली होती.

त्यामुळे ती जागा अधिक पवित्र मानली जाते. या नदीच्या काठी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीचे अधिपती  दुधेश्वर महादेव येथे विराजमान आहेत असे म्हटले जाते. वांथा येथील सांगमावर कार्तिक महिन्यामध्ये अनेक यात्रेकरू भेट देतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment