साबुदाणा वडा रेसिपी मराठी Sabudana Vada Recipein Marathi

साबुदाणा वडा रेसिपी मराठी Sabudana Vada Recipein Marathiआपण उपवासाला नेहमीच साबुदाण्याची उसळ, फराळी चिवडा, साबुदाणा खिचडी केली असेल परंतु साबुदाणा वडा ही रेसिपी देखील तुम्ही बनवून बघा.  खायला खूप कुरकुरीत आणि चविष्ट असे साबुदाणा वडे लागतात.  साबुदाणा वडा ही महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाआहार आहे.  महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे.  तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील साबुदाणा वडा ही रेसिपी करून खाऊ शकता.  साबुदाणा वडा ही रेसिपी तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता, त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी प्राप्त होते व दिवसभराची थकान भरून निघते.

Sabudana Vada

साबुदाणा वडा रेसिपी मराठी Sabudana Vada Recipein Marathi

रेसिपी प्रकार  :

साबुदाणा वडा ही एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध रेसिपी आहे. साबुदाणा वडा बनवण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत.  साबुदाणा वडा ही रेसिपी बनवायला खूप साधी व सोपी आहे यासाठी लागणारी सामग्री देखील पुरेशी आहे.  साबुदाण्यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात.  जसे साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, साबुदाणा वडा साबुदाणा उसळ तसेच साबुदाणा वडा तयार करण्याकरता जास्त वेळही लागत नाही.  तर चला मग आज आपण बघूया साबुदाणा वडा ही रेसिपी कशी बनवायची.  व त्यासाठी लागणारी सामग्री.

ही रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे ?

ही रेसिपी आपण चार व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारीकरता लागणारा वेळ  :

पूर्वतयारी करता लागणारा वेळ 15 मिनिटे आहे.

कुकिंग टाईम  :

साबुदाणा वडे तळण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

साबुदाणा वडे रेसिपी बनवण्याकरता एकूण टाईम आपल्याला 30 मिनिटे एवढा लागतो.

साबुदाणा वडा रेसिपी साठी लागणारे सामग्री  :

1)  2 उकडलेले बटाटे

2)  दोन वाट्या भिजवलेला साबुदाणा

3)  100 ग्राम शेंगदाणे भाजून (बारीक पावडर)

4)  दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून

5) एक चमचा साखर

6)  गरजेनुसार मीठ

7)  एक चमचा लिंबू रस

8)  बारीक चिरलेला कोथिंबीर

9) तळण्याकरिता तेल गरजेनुसार

साबुदाणा वडा बनवण्याची पाककृती  :

  • शेवभाजी रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम आपल्याला आलू उकडून घ्यावे लागेल तसेच आलू उकडल्यानंतर ते पूर्ण एकजीव करून त्याची पेस्ट बनवायची आहे.
  • नंतर रात्रभर भिजवून ठेवलेला साबुदाणा नरम झाल्याची त्याची तपासणी करून घ्यावी.
  • आता एका भांड्यात साबुदाणा आलूचा गर आणि मिरच्या कापून तसेच त्यामध्ये साखर मीठ, कोथिंबीर व शेंगदाण्याचे कूट एकत्रित टाकून मिश्रण तयार करून घ्या.
  • नंतर बाजूला एका कढाई गॅसवर तेल गरम करण्याकरिता ठेवा.
  • नंतर वड्याच्या आकारात आपल्याला त्या मिश्रणाची गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत.
  • तेल गरम झाले की, त्यामध्ये आपल्या तळ हाताला थोडे तेल लावून साबुदाण्याचे मिश्रणाचे बनवलेले गोळे दोन्ही तळ हाताच्या मध्यात दाबून वडे बनवून तेलामध्ये सोडा.
  • वडे तळताना गॅस मंद ठेवावा त्यामुळे वडे कुरकुरीत होतील तसेच वड्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत.
  • वड्यांचा रंग सोनेरी झाला की, वडे काढून टिशू पेपरवर ठेवावे.  त्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल.  व वडे तेलकट राहणार नाहीत.
  • अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्या व गरमागरम साबुदाणे वडे हे तुम्ही हिरव्या चटणी, शेंगदाण्याच्या चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

पोषक घटक  :

साबुदाणा वड्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह कार्बोहायड्रेट, फायबर, चरबी, आयर्न, विटामिन के, कोलेस्ट्रॉल, मॅग्नेशियम पोटॅशियम विटामिन ए, विटामिन सी, फॉलिक ऍसिड इत्यादी पोषक घटक असतात.

फायदे   :

साबुदाणा खाणे हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे.  साबुदाणा खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते व त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

साबुदाण्यातील पोटॅशियम हे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत चालू ठेवण्याचे काम करतो.  त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.  तसेच हृदयविकार असणाऱ्यांना झटका येण्याची शक्यता कमी होते.

साबुदाण्यांमध्ये पर्याप्त प्रमाणात असलेले कार्बोहायड्रेट जे शरीराला ऊर्जा मिळून देतात, यामुळे उपवासाच्या दिवशी येणारा अशक्तपणा देखील कमी होतो.

साबुदाण्यामधील कॅल्शियम आयर्न व व विटामिन के हे हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत करतात.  तसेच तुमचा दिवसभराचा थकवा देखील कमी होतो व शरीर उत्साही राहण्यास मदत होते.

जर साबुदाण्याचे सेवन करत असाल तर आपले मास पेशी दुखत असल्यास त्यासाठी देखील आपल्याला दीर्घ आराम मिळतो.

तोटे   :

साबुदाणा खाण्याचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे काही तोटे देखील आहेत.

साबुदाणा खाल्याने शरीरामध्ये स्टार्टच्या रूपात कॅलरी वाढते त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी साबुदाणा खाऊ नये.

तुम्हाला डायबिटीज असेल तर साबुदाणा खाणे तुम्ही टाळायला पाहिजे कारण साबुदाण्यांमध्ये ग्लायसनिक इंडेक्स जास्त नसतो, परंतु जर तुम्ही साबुदाण्याचे दररोज सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.  तुम्ही साबुदाणा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा खाऊ शकता.

जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर साबुदाणा जास्त प्रमाणात खाऊ नये.  कारण साबुदाणा खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.  साबुदाण्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात.  पण त्यात प्रथिने नसतात, त्यामुळे प्रथिनांच्या कमतरतेमुळे तुमच्या रोजच्या आहाराचे समावेश करू शकत नाही.

ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल अशा व्यक्तींनी देखील तळलेले साबुदाणा वडे जास्त प्रमाणात खाऊ नये.

तर मित्रांनो, तुम्हाला साबुदाणा वडा रेसिपी ही कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांना शेअर करा.  तसेच ही रेसिपी करून बघा हो आम्हाला कळवा.

Leave a Comment