समाजऋण बद्दल माहिती | Samajrhun In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण समाजऋण म्हणजेच samajrhun in marathi बद्दल जाणून घेणार आहोत .

समाजऋण बद्दल माहिती | Samajrhun In Marathi

समाजऋण बद्दल माहिती | Samajrhun In Marathi

खरे तर या विषयावर खूप कमी बोलले आणि लिहिले जाते. त्यामुळे आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो हे विसरूनच चाललो आहे. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाज मात्र आपल्याकडे जणूकाही एकटक बघत असतो. त्यामुळे आपल्या जगण्या आणि वागण्यावर अनेकदा मर्यादाही येतात. आपण कुठेही-कसेही वागू शकत नाही.

सामाजिक जबाबदारी नावाची गोष्ट सतत आतून आवाज देत असते. त्यामुळे आपली वागणूक सामाजिक जीवनाला साजेशी असावी असावे लागते, कारण व्यक्ती जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावरच असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज म्हणजे आपण करत असतो. एक साधा दृष्टान्त असा आहे की, कोणतेही नीति शास्त्र पुस्तकांमधून शिकवल्यानंतर ते जेवढे लक्षात राहते त्यापेक्षा ते अधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, की अधिक परिणामकारक ठरते.

सध्या डॉक्टर, अभियंते, उद्योगपती, न्यायाधीश यांच्याकडेच आपले लक्ष अधिक असते. त्यामुळे स्वतःचे आचरण सामाजिकदृष्ट्या सुयोग्य असण्याकडे प्रत्येकाचा कल असायला हवा. कुणाचीही कॉपी असणे हे योग्य नाही; हे जरी सत्य असले, तरी गुणात्मकतेकडे लक्ष देऊन लोक पुढे जात राहतात हे तेवढे खरे. आजवर समाजाचे चलनवलन असेच होत आलेले आहे.

प्रत्येक पिढीत नवे काही करू इच्छिणारा जन्माला येतो असतो आणि तो चालू पिढीमध्ये असलेल्या मुद्द्यांमध्ये आणि ती आचरण करण्याच्या प्रक्रियेत फक्त प्रयोग करत राहतो. त्यामुळे, पिढीप्रमाणे नवा विचार जन्माला येतो, असे जे म्हटले जाते त्याचे कारण या प्रक्रियेतच आहे. आपले समाजाशी असणारे नाते हे जरी आपल्याला सुखावह, आनंद देणारे वाटत असले, तरी आपण अंतर्यामी नेहमी एकटेच असतो. तो एकटेपणा साधनेत परिवर्तित करून जे जे काही आत्मसात करता येईल ते करणे आणि त्याचा उपयोग पुन्हा समाजहितासाठी करणे, हे एक चक्र आहे. या चक्रात जो बसतो त्याला समाजामध्ये नेहमी मनाचे स्थान मिळत असते.

यश ही प्रक्रिया काही सोपी नाही. त्यात खाचखळगे हे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परीक्षेत पास होण्याची इच्छा बाळगून असतो त्याचीच तर खरी परीक्षा घेतली जाते. ज्यांचा परीक्षा या विषयावर विश्वासच नाही ते शाळेपासून आणि शिक्षणापासून तर दूरच असतात. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परीक्षा पास झालात, की पुढची परीक्षा तयार असते. अशी ही न संपणारी एक शृंखलाच असते. जीवन जगात असताना प्रत्येक टप्प्यावर सुखात आणि दु:खातही अशा अगणित परीक्षा येत असतात. त्यात पास व्हायचे की फेल हे आपले आपणच ठरावाचे असते. जो हरला तो संपला, हा नैसर्गिक नियम आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजहित कार्यात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र प्रथम आत्मसात करणे आणि नंतर त्यात प्रावीण्य मिळविणे. तसेच त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधणे ही सुरुवातीला मुद्दाम केलेली आणि नंतर अंगवळणी पडल्याने घडणारी प्रक्रिया आहे. यातुनच मग समाजऋण फेडले जाते.

हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरुषाच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसतच नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्यभाव येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी असतात. अशीच माणसे प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ती अल्पसंख्येतच असतात. भराभर वाढणाऱ्या तणाप्रमाणे त्यांचे पीक नसते. एखादा असा समाजहितचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे खरे लक्षण आहे. आज सर्वत्र फक्त एकच ओरड असते, की मोठी, कर्ती धर्ती माणसे राहिली नाहीत. मला तर वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी.

आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग हा समाजहितासाठी व्हावा आणि असे झाले तरच समाजऋण फेडले जावून सामाजिक बांधिलकी कायम जोपासण्यास उपयोग होईल. त्यामुळे लोकाना एकमेकांबद्दलचा बंधुभाव वाढेल आणि आपल्या देशाचा विकास होण्यासही हातभार लागेल.

नक्की वाचा – Nadiche Atmavrutta Essay In Marathi

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण समाजऋण म्हणजेच samajrhun in marathi बद्दल जाणून घेतले .

Leave a Comment