Samarth Ramdas Swami Information In Marathi समर्थ रामदास स्वामी हे संत तुकाराम महाराज यांचे काळातील संत होऊन गेले आहेत. त्यांनी राजकारण धर्मकारण आणि पर्यावरणावर प्रबोधन लेखन करणारे हे त्या काळात एकमेव महाराष्ट्रीय संत होऊन गेले. त्यांनी मनाचे श्लोक रचना केले. हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाची संस्थापक होते, त्यांनी राम व हनुमानाला उपास्य मानत असे परमार्थ व धर्मनिष्ठ, राष्ट्रप्रेम यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन व संघटन केले .
समर्थ रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती Samarth Ramdas Swami Information In Marathi
समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म :
समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म 24 मार्च 1608 मध्ये हा जांब या गावी झाला हे गाव जालना जिल्ह्यात येते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीस झाला. राम जन्माच्या शुभ मुहूर्तावर त्यांचा जन्म झाला. रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याची पंथ कोसळ असे होते तसेच ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून जमदग्नी हे त्यांचे पुत्र होते, त्यांचे वडील सूर्य उपासक होते. त्यांच्या पत्नीचे नाव राणूबाई असे होते.
रामदास यांचे नाव नारायण असे होते जेव्हा नारायण सात वर्षाचे होते तेव्हाच त्यांचे वडील सूर्याजी पंत मरण पावले. त्यांच्या घरची संपत्ती स्थिती चांगली होती तसेच नारायण हे लहानपणापासूनच विरक्त होते, त्यांची बुद्धी अतिशय बुद्धिमान निश्चय व खोडकर होती .
बालपण :
लहानपणी नारायण खोडकर होता झाडावरून उड्या मारणे, पाण्यामध्ये पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज होता. त्यांचे आठ मित्र होते व एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसऱ्या गवंड्याचा तर एक लोहाराचा व दुसरा गवळ्याचा अशा मित्रांच्या सहवासामध्ये त्यांचे बालपण गेले. त्या त्या व्यवसायाचे ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतली. ज्या व्यवसायामध्ये त्यांचे मित्र राहत होते, मित्र नारायण प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करून ती गोष्ट त्यांनी अनुभवाने शिकून घेतली.
एकदा नारायण लपून बसला होता खूप शोधले पण सापडच नव्हता. नंतर एका फडताळात तो सापडला. त्याच्या आईने विचारलं तेव्हा त्याने सांगितले, “चिंता करतो विश्वाची” त्यांनी दिलेली उत्तर आईने ऐकले या मुलाला संसारात अडकविले तर तो तळ्यावर येईल म्हणून त्याच्या आईने बाराव्या वर्षी लग्न ठरवले नारायणाचे लग्न समारंभात गृहितांनी सावधान हा शब्द उच्चारतात ते ऐकून नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे अशा दोन वस्त्रांशी नारायण लग्न मंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला परंतु त्यांनी घाईने गावाबाहेरची नदी गाठली व नदीच्या खोल डोहात उडी मारली.
तपश्चर्या व साधना :
समर्थ रामदास यांनी लग्नाच्या मंडपातून पळून जाऊन पुढे चालत चालत ते पंचवटीत गेले व त्यांनी तेथे श्रीराम प्रभूचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घतपचर्या केली. तेव्हा त्यांचे वय बारा वर्षे होते, समर्थांनी स्वतःच्या प्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच घडवून घेतला होता.
नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी त्यांनी रामदास हे नाव धारण केले होते. टाकळी येथे ते 1621 ते 1633 असे बारा वर्षे राहिले व आपल्या या साधनेमध्ये त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे देखील नंदा नदीच्या काठावरील उंच टेकडीवरील घर किंवा गुहा असलेला एकांत हेच कारण होते.
ते त्यांच्या तपश्चर्याच्या कालावधीमध्ये रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून मध्यांना पर्यंत नदीच्या डोहात छाती एवढ्या पाण्यामध्ये उभे राहून गायत्री मंत्राचे पुनर्रचन करत असतात. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्रीराम जय राम जय जय राम यात्रयोदशी मंत्राचा जप करीत असत.
समर्थ रामदासांनी राम नामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले असे मानले जाते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रार्थना, करुणाष्टके, व्यायाम उपासना अध्ययन या गोष्टींना खूप महत्त्व दिलेले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये बारा वर्षे अत्यंत कडकडीत उपासना केली होती.
बारा वर्षाच्या तीव्र तपश्चर्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असेही म्हटले जाते. त्यावेळी समर्थाचे वय केवळ 24 वर्ष होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली आहे. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे, त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागील विचार होता.
जीवन व तीर्थयात्रा :
समर्थ रामदासांनी त्यांची तपश्चर्य संपल्यानंतर भारतभर ब्राह्मण केले आणि तीर्थयात्रा पार पाडल्या. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे त्यांनी निरीक्षण केले व पुढे ते फिरत फिरत हिमालयामध्ये आले. तेव्हा त्यांच्या मनामध्ये वैराग्य भाव जागा झाला आणि त्यांची देहाबद्दलची आसक्ती ही नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले आत्मसाक्षात्कार झाला.
भारतभर भ्रमण करीत असताना श्रीनगरमध्ये शिखांचे सहावी गुरू हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या धुरंधर स्थिती संबंधित दोघांची चर्चा झाली होती. हरगोविंद सिंगाबरोबर 1000 सैनिक असायचे, त्यांच्या कमरेला दोन तलवारी असायच्या त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले.
समर्थांनी हर गोविंदांना विचारले, “आपण धर्मगुरू आहात, या दोन तलवारी आपण का ठेवता?” तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले, ” एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शिलरक्षणासाठी..! समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले आणि हा सैन्यफाटा…! त्यावर हरगोविंद म्हणाले, “धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे. केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्र सज्ज झाले पाहिजे तेव्हा या दुर्बल जगात माणसाला काही किंमत नाही आपण शस्त्र बाळगले पाहिजे.” समान शिले व्यसनीशु सख्ख्या या न्यायाने दोघांमध्ये बोलणे झाले.
समर्थ गुरु हरगोविंद सिंग यांच्याबरोबर सुवर्ण मंदिरात आले आणि तेथे ते दोन महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. त्याला ते गुप्ती म्हणत बाहेरून दिसायला कुबडी जप करताना या कुबडीवर बगलमध्ये ठेवून चंदनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असतात. त्यात छोटी तलवार असे समर्थांची छोटी तलवार आजही सज्जनगडावर आपल्याला पाहायला मिळते.
समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्व :
समर्थ रामदास स्वामी हे मध्यम उंची मजबूत बांधा व गौर वर्ण, तेजस्वी कांती, कपाळावर लहानसे टेंगुळ असे स्वरूपाचे होते. कमरेला लंगोटी कधी कफनी किंवा पायात खांडवा असत. लांबदाढी, जटा गड्यांमध्ये जपाची माळ. यज्ञपवित हातामध्ये कुबडी काखेला झोळी अशा थाटात समर्थ रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती मंद दिसत होते.
सुखासारखे पूर्ण वैराग्य यांचे वशिष्ठ आपले ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला होता.
समर्थ रामदासांची काव्य व साहित्य रचना :
समर्थ रामदास हे एक निसर्गप्रेमी होते, त्यांनी आपल्या निवासाच्या जागा निसर्ग रम्य वातावरणा ठिकाणी निवडलेल्या होत्या. समर्थ रामदासांनी वेगवेगळ्या बागेमध्ये झाडे लावली तसेच ते झाडे कशाशी संबंधित आहेत, याचा सुद्धा त्यांना अभ्यास होता. याची कल्पना येते त्यांनी 350 वनस्पतींची नावे त्यांच्या कवितेमध्ये दिलेली आहेत. औषधी वनस्पती फळ यांची वर्गवारी त्यांनी केलेली आहे.
श्री समर्थ संप्रदायाचा श्रीमत् दासबोध हा मुख्य ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्यांनी मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र तसेच अनेक आरत्या सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती तसेच लवथळती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती त्यांच्या आहेत. समर्थ रामदासांच्या आरत्यांनी घराघरात स्थान मिळवलेले आहे.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे, त्यांच्या काळामध्ये मंदिरात आरत्या म्हटल्या जात होत्या. मुघलांच्या आक्रमणामुळे अनेक देवांचे उत्सव बंद पडले. अनेक मंदिरे उध्वस्त झाली परंतु आरती म्हणणे जन माणसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले. समर्थांनी या वाङ्मयाचे पुनर्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो त्यापैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहे.
समर्थ रामदासांचे समाधी :
समर्थ रामदास यांनी त्यांच्या जीवनातील शेवटचे काळ हा परळी किल्ल्यावर व्यतीत केला. हा किल्ला साताऱ्याजवळ आहे तसेच पुढे या किल्ल्याचे सज्जनगड असे नाव प्रसिद्ध झाले येथे त्यांची समाधी आहे. दास नवमीला येथे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
FAQ
रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव काय होते?
नारायण सूर्याजी ठोसर.
रामदास स्वामी यांचे जन्म कधी झाला?
24 मार्च 1608.
समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे?
सज्जनगडावर समर्थ रामदासांची समाधी आहे.
समर्थ रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला?
दासबोध.
मनाचे श्लोक यांची रचना कोणी केली?
समर्थ रामदास स्वामी.