सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sangali Information In Marathi

Sangali Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण अशा जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र राज्यात वसलेला आहे. जो जिल्हा कोल्हापूरच्या पूर्वेला कृष्णा नदीच्या काठावर वसलेला आहे तो जिल्हा म्हणजे सांगली !!!

Sangali Information In Marathi

सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sangali Information In Marathi

सांगली जिल्हा हा पश्चिम-मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे. सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्हा 24.51% शहरी आहे. सांगली आणि मिरज ही सर्वात मोठी शहरे आहेत.

किर्लोस्करवाडी हे औद्योगिक शहर सांगली जिल्ह्यातही आहे. उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी पहिला कारखाना येथे सुरू केला. ऊसाची उच्च उत्पादकता असल्यामुळे याला भारतातील साखरेचा वाडगा म्हणून ओळखले जाते.

सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात सुपीक आणि अत्यंत विकसित जिल्ह्यांपैकी एक आहे. राज्यातील राजकीय सत्तागृह म्हणून जिल्हा लोकप्रिय आहे. सांगली जिल्ह्याने आजवर अनेक लोकप्रिय राजकारणी आणि

नोकरशहा दिले आहेत. सांगलीला समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे. लोक सांगली जिल्ह्याला शेतकऱ्यांचे नंदनवन म्हणतात.

सांगली जिल्ह्याची स्थापना आणि नामकरण

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने १ ऑगस्ट १९४९ रोजी दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. पुढे दक्षिण सातारा जिल्ह्यात नवीन तालुक्यांची भर घालून २१ नोव्हेंबर १९६० रोजी सांगली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला

.सांगली जिल्हा हा 1949 च्या उत्तरार्धात तयार झालेला अलीकडचा भाग आहे. तेव्हा तो दक्षिण सातारा म्हणून ओळखला जात होता.पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर 21 नोव्हेंबर 1960 रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले.

इतिहास

सांगली जिल्हा ही अलीकडची निर्मिती आहे, जी १९४९ मध्ये निर्माण झाली. ते तेव्हा दक्षिण सातारा म्हणून ओळखले जात होते आणि 1961 पासून सांगली असे नामकरण करण्यात आले. हे अंशतः काही तालुक्यांचे बनलेले आहे

जे एकेकाळी जुन्या सातारा जिल्ह्याचा भाग बनले होते आणि अंशतः जहांगीरची राज्ये आणि पटवर्धन आणि स्वातंत्र्य काळात विलीन झालेले डफळे यांचा समावेश होतो. कुंडल, सांगलीच्या आसपासचा परिसर, चालुक्यांची राजधानी होती.

कुंडल हे 1,600 वर्षे जुने प्राचीन गाव होते. कौंडन्यापूर (त्याचे जुने नाव) हा कर्नाटकचा एक भाग होता. [३] पुलकेशीन मी माझी राजधानी म्हणून वातापी (कर्नाटकातील बदामी) निवडले.

नाना पाटील, श्यामराव लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, जी.डी. लाड, शंकर जंगम आणि हुसाबाई जंगम यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांची कुंडल क्रांतीशिगा होती.

नरसिंगपूर हे प्राचीन गाव सांगली जिल्ह्यात आहे. लक्ष्मी-नरसिंहाचे प्राचीन मंदिर सुमारे ११० काळापासूनचे आहे. संत नामदेव, सिद्धेश्वर महाराज, तात्या टोपे हे प्राचीन काळी गावात राहत असत.

हा गाव इतिहास “गुरु चरित्र” मध्ये देखील आढळतो. सांगली जिल्ह्यात किर्लोस्करवाडी म्हणून भारतातील दुसरे सर्वात जुने औद्योगिक शहर आहे.

सांगली जिल्ह्याचा भूगोल

सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८ हजार ५७८ चौ. कि. मी. इतके आहे. राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या २.८० टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे.

सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्यात दक्षिण भागात आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्याचा भाग येतो. कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगाव हे जिल्हे लागून आहेत.

जिल्ह्याच्या उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, उत्तरेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, जिल्ह्याच्या पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, जिल्ह्याच्या नैऋत्येस व दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा वसला आहे. जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार उत्तरेला १७.५ ते १८.११ अक्षांस आणि रेखावृत्तीय विस्तार पूर्वेला ७३.३३ ते ७४.५४ रेखांश असा आहे. जिल्ह्याची पूर्वपश्चिम लांबी २०५ कि. मी. व उत्तर-दक्षिण लांबी ९६ कि. मी. आहे.

जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेत बरीच विविधता आढळते. भूरचनेनुसार सांगली जिल्ह्याचे

(१) पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

(२) कृष्णा खोऱ्यातील सुपीक व सखल मैदानी प्रदेश

(३) पूर्वेकडील प्रदेश असे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग पडतात. सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे.

यात शिराळा तालुक्याचा बराचसा भाग आणि वाळवा तालुक्याचा काही भाग येतो. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर सह्याद्रीची मुख्य श्रेणी असून त्याची उंची सुमारे १,४६३ मी. आहे. याच भागात प्रचितगड किल्ला व त्याच्या दक्षिणेस ‘दक्षिण तिवरा घाट’ आहे.

या घाटातून कोकणात जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सह्याद्रीपासून आग्नेय दिशेत पसरलेल्या भैरवगड-कांदूर डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांपासून आग्नेयीस, पूर्वेस व ईशान्येस अनेक कटक गेलेले आढळतात.

सह्याद्रीपासूनच्या या संपूर्ण डोंगराळ प्रदेशाला आष्टा डोंगरमाला असेही संबोधले जाते. या डोंगरमालांच्या आग्नेय भागात मल्लिकार्जुन डोंगर व संतोषगिरी आहेत. या प्राकृतिक विभागाचा उतार आग्नेयीकडे आहे.

सांगली जिल्ह्यातील दक्षिण व पश्चिमेकडील काही भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे. दक्षिणेकडील भाग सपाट मैदानाचा आहे.

जिल्ह्याच्या मध्य भागात शुक्राचार्य डोंगर, बेलगबाड डोंगर, आडवा डोंगर तसेच रामगड, मुचंडी इत्यादी टेकड्या आहेत. पश्चिमेस काळभैरव डोंगर, आष्टा डोंगररांग आहे. जिल्ह्याच्या मध्य भागात होनाई डोंगर, दंडोबा डोंगर आहेत. हा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे.

नद्या

कृष्णा नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी जिल्ह्यातून साधारणत: १०५ कि. मी. प्रवास करते. ही नदी जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. सांगली हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कृष्णा नदीकाठी वसले आहे.

याशिवाय बहे, औदुंबर, नरसिंगपूर ही पवित्र स्थळे कृष्णा नदीच्याकाठी वसली आहेत. उत्तरेकडून येरळा व पश्चिमेकडून वारणा या नद्या कृष्णा नदीस येऊन मिळतात. या कृष्णेच्या उपनद्या आहेत.

कृष्णा व येरळा नद्यांचा संगम ब्रह्मनाळजवळ होतो. तसेच हरिपूर येथे वारणा व कृष्णा नद्यांचा संगम झाला आहे. जिल्ह्यातून माण, बोर, अग्रणी या प्रमुख नद्या वाहतात. जिल्ह्याच्या उत्तर भागात आटपाडी तालुक्यातून माण किंवा माणगंगा नदी वाहते. पूर्व भागात बोर ही नदी जत तालुक्यातून नैऋत्य-ईशान्य अशी वाहते. अग्रणी ही नदी कवठेमहांकाळ तालुक्यातून वाहते. अग्रणी नदी बलवडीजवळ खानापूर पठारावर उगम पावते. या उगमस्थानी अगस्त्य ऋषींचे मंदिर आहे.

पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशाच्या पूर्वेस कृष्णा, वारणा व येरळा या नद्यांच्या खोऱ्यांचा सखल व सुपीक मैदानी प्रदेश आहे. या प्रदेशात वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यांचे काही भाग येतात. या भागांतून वाहणारी कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. येथे तिचा प्रवाह सामान्यपणे वायव्य-आग्नेय असा आहे.

शिराळा व वाळवा तालुक्यांच्या दक्षिण सरहद्दीवरून पूर्वेस वाहत येणारी वारणा नदी, तसेच उत्तरेकडून वाहत येणारी येरळा नदी या विभागात कृष्णेला मिळतात. या नद्यांमुळे हा प्रदेश बराच सुपीक बनला आहे.

सांगली जिल्ह्याचे हवामान

हे सामान्यपणे उष्ण व कोरडे आहे. येथील डोंगराळ भागातील हवामान थंड असून जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान जास्त असते. तसेच पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाऊस जास्त पडतो.

पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. जिल्ह्याच्या मध्यभागी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो. मिरज, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्यांचा समावेश अवर्षण प्रवण क्षेत्रात होतो.

मृदा

कृष्णा नदीच्या खोऱ्यात जिल्ह्याचा बराच भाग येतो. येथील जमीन सुपीक व मैदानी आहे. मध्य भागातील व पश्चिमेकडील डोंगराळ भागात जमीन खडकाळ आहे.

सांगली जिल्ह्यात जांभी, पिवळसर, तांबूस, तपकिरी, करडी, काळी अशा विविध प्रकारच्या मृदा आढळतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः शिराळा तालुक्यातील जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी, पिवळसर-तांबूस, तपकिरी मृदा, कृष्णा, येरळा व वारणा नद्यांच्या खोऱ्यांत काळी कसदार मृदा; वाळवा, मिरज व तासगाव तालुक्यांच्या काही भागांत करड्या रंगाची, तर पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशात हलक्या पोताची व क्षारयुक्त मृदा आढळते.

खनिज संपदा

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईडचे साठे आहेत. या जिल्ह्यात काही ठिकाणी चुनखडक आढळतो.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या २८,२२,१४३ आहे. या लोकसंख्येमध्ये स्त्रियांची लोकसंख्या १३,८६,४१५ म्हणजेच ४९.१३ % इतकी आहे तर पुरुषांची लोकसंख्य १४,३५,७२८ म्हणजे ५०.८७ % इतकी आहे.

अंदाजे जमैका राष्ट्र किंवा अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या बरोबरीची आहे. ते भारतात १३७ व्या क्रमांकावर आहे (एकूण ६४० पैकी). जिल्ह्याची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटर (८५०/चौरस मैल) ३२९ रहिवासी आहे.

२०१० ते२०११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ९.१८ % होता. सांगलीचे लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९६४ स्त्रियांचे आहे आणि साक्षरता दर ८२.६२% आहे. जिल्ह्यातील ८६.४७% लोक हिंदू धर्माचे पालन करतात. इस्लाम हा सांगली जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म असून जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या ८.४९% लोक आहेत. सांगलीत लक्षणीय जैन अल्पसंख्याक आहेत.

भाषा

महाराष्ट्राची राज्यभाषा, जिल्ह्यात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. सांगीमध्ये कन्नड ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, त्यानंतर मराठी आहे.

सांगली जिल्हा महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असल्याने येथील जास्त व्यवहार कानडी भाषेतून होतात.

सांगली जिल्ह्याची राजकीय व प्रशासकीय रचना

सांगली जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात व पश्चिम महाराष्ट्र या प्राकृतिक विभागात मोडतो. सांगली जिल्ह्यामध्ये १ महानगरपालिका, ६ नगरपालिका, ४ नगरपंचायती, १० तालुके, १० पंचायत समित्या, ५ महसूल उपविभाग, ७२८ गावे व ६९९ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात सांगली व हातकणंगले असे २ लोकसभा मतदार संघ व ८ विधानसभा मतदार संघ आहेत.सांगली जिल्ह्यातील तालुके

सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत. यामध्ये तासगाव, कडेगाव, मिरज, पलूस, खानापूर (मुख्यालय विटा), कवठेमहांकाळ, जत, वाळवा (मुख्यालय इस्लामपूर), आटपाडी, शिराळा यांचा समावेश होतो. २६ जून १९९९ रोजी पलूस या तालुक्याची निर्मिती करण्यात आली आणि एप्रिल २००२ रोजी कडेगाव हा तालुका अस्तित्वात आला.

सांगली जिल्ह्यातील शेती

या जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस भरपूर प्रमाणावर पडतो. तर पूर्व भागाकडे पाऊस कमी कमी होत जातो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तांदूळ तर पूर्व भागात ज्वारी, बाजरी व मका ही पिके महत्त्वाची आहेत.

रब्बी ज्वारीला या जिल्ह्यात ‘शाळू’ असे म्हणतात. “मालदांडी’ ही शाळुची जात येथे प्रसिद्ध आहे. गहू हे पीक मुख्यत: जिल्ह्याच्या मध्य भागात घेतले जाते. याशिवाय सूर्यफूल, ऊस, हळद, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, ही पिकेही घेतली जातात.

हळदीसाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. हळद व बेदाणा उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंबे, पपई, पेरू बोरे, लिंबू, केळी, चिकू, आंबा इत्यादी फळांचे उत्पादने घेतली जातात.

अलिकडे द्राक्षे उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध झाला आहे. तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. मिरज तालुक्यातील विड्याची पाने प्रसिद्ध आहेत. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते.

अलिकडील काळात फुलांची शेतीही केली जाते. काही भागात विशेषत: कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात तंबाखुचे पीक घेतले जाते. सांगली जिल्हा हळद, गुळ, द्राक्ष व बेदाणे यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. मिरज येथील तंतुवाद्ये प्रसिद्ध असून ही उत्पादने इतर ठिकाणी पाठविली जातात.

भिलवडी येथील दुग्धव्यवसाय प्रसिद्ध आहे. तसेच सांगली व मिरज येथे गुरांचा मोठा बाजार भरतो.जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सु. २५% क्षेत्र ओलिताखाली आहे. त्यापैकी ७२ % क्षेत्र विहिरीखाली व २८% क्षेत्र पृष्ठभागीय ओलिताखाली आहे.

सांगली वनसंपदा व वन्यजीव

जिल्ह्यातील वनक्षेत्र फारच कमी म्हणजे जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अवघे ६% इतके आहे. एकूण वनक्षेत्राच्या सुमारे एक चतुर्थांश वनक्षेत्र एकट्या शिराळा तालुक्यात आहे.

सांगली जिल्ह्यात ४२०.८० चौ. कि. मी. इतके वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी ही टक्केवारी ४.९ इतकी आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असून या ठिकाणी दाट वने आहेत.

वनामध्ये साग, खैर, करंज, हिवर, बेहडा इत्यादी वृक्ष आढळतात. काही भागात बाबूंची बेटेही आहेत. दंडोबाच्या डोंगरावर वनखात्याने अनेक झाडे लावली आहेत.

जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने घायपात, गवत, बाभूळ, कडुलिंब इत्यादी वनस्पती आढळतात. या वनांतून बांधकामासाठी व इंधनासाठी लाकूड मिळते. याशिवाय मध, डिंक, कात, मेण, हिरडा, बेहडा इत्यादी वनोत्पादने मिळतात.

जिल्ह्यातील वनांमध्ये हरिण, ससा, माकड, साळिंदर, साप, बिबट्या, तरस, कोल्हे इत्यादी प्रकारचे प्राणी तसेच पोपट, मोर, ससाणा, कोकीळ इत्यादी प्रकारचे पक्षीही आढळतात. चांदोली आणि कोयना अभयारण्याचा भाग मिळून ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ जानेवारी २०१० रोजी निर्माण करण्यात आला.

उद्योगधंदे

प्रसिद्घ उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी आपल्या किर्लोस्कर उद्योगसमूहाचा पहिला कारखाना सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे उभारला. या उद्योगात कृषी अवजारांची निर्मिती केली जाते.

जिल्ह्यात ८ औद्योगिक वसाहती असून त्यांमध्ये छोटे-मोठे उद्योग कार्यरत आहेत.जिल्ह्यात विटा, माहुली व नेलकरंजी येथे हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उद्योग आहेत. बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्घ आहे. तासगाव येथे द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग नव्याने विकसित होत आहे.

माधवनगर व मिरज येथे कापडगिरण्या, तर सांगली येथे सूतगिरणी आहे. जत, आटपाडी व कवठे महांकाळ तालुक्यांत मेंढपाळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे मेंढ्यांच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा व्यवसाय मोठा आहे.

जिल्ह्यात १७ सहकारी साखर कारखाने असून त्यांतील एकूण साखर उत्पादन ५८०८ हजार मे.टन होते.ऊस व द्राक्षे ही जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. या जिल्ह्यात साखर कारखाने व मनुका तयार करणे हे महत्त्वाचे उद्योग आहेत.

सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा कारखाना आहे व आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग चालतो.

रस्ते व वाहतूक

जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी ९,९२५ किमी. असून त्यात राष्ट्रीय महामार्ग ३० किमी.,राज्य महामार्ग ९३१ किमी., जिल्हा रस्ते ५,२०७ व ग्रामीण रस्ते ३,७५७ किमी.लांबीचे होते (२००७).पुणे- महामार्ग  हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४जिल्ह्यातून जातो. कासेगाव, नेर्ले, पेठ, कामेरी ही जिल्ह्यातील प्रमुख गावे या महामार्गावर आहेत. सांगली या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून सर्व दिशांना रस्ते गेलेले आहेत.

सांगली – पेठ (आष्टा व इस्लामपूरमार्गे), सांगली – कोल्हापूर (आष्टामार्गे), सांगली – कोल्हापूर (जयसिंगपूर,हातकणंगलेमार्गे), सांगली – विटा (कवलापूर, तासगाव, विसापूरमार्गे), सांगली – विजापूर (मिरज, बेडगमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आहेत. मिरज– पुणे, मिरज– कुर्डुवाडी, मिरज– कोल्हापूर व मिरज– बेळगाव हे जिल्ह्यातून जाणारे लोहमार्ग आहेत. मिरज हे जिल्ह्यातील प्रमुख प्रस्थानक आहे.

सांगली जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळे

लोकांना नेहमीच आकर्षित करतात. सांगली जिल्ह्यात गणेशदुर्ग किल्ला, गणेश मंदिर, कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम, मिरज, सागरेश्वर अभयारण्य, चांदोली धरण, औदुंबर, प्रचीतगड, बानुरचा भोपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठेएकंदचे सिद्धरामाचे मंदिर, दंडोबा येथील उंच टेकडीवरील शंकराचे प्राचीन मंदिर, विटा तालुक्यातील रेवणसिद्ध प्रसिद्ध मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत.

सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.

ख्वाजा मीरासाहेब दर्गा हा 500 वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.

औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.

दंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment