Sant Chokhamela Information In Marathi संत चोखामेळा हे संत ज्ञानेश्वराच्या काळातील एक संत होऊन गेले आहे. ते संत नामदेव यांचे शिष्य होते. ते नामदेवांच्या संत मेळ्यामध्ये वारकरी आणि एक कवी सुद्धा होते. चोखोबांचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजा या तालुक्यातील मेहुना या गावी झाला होता. संत चोखोबाचे कुटुंब हे महार जातीचे होते. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सुद्धा सांगतात.
संत चोखामेळा यांची संपूर्ण माहिती Sant Chokhamela Information In Marathi
चोखोबा हे मूळ वऱ्हाळामध्ये वाढले. त्यांच्या पत्नीचे नाव सोयरा होते तसेच त्यांची बहीण निर्मला होती. त्यांच्या मेहुणीचे नाव बंका आणि त्यांना एक मुलगा कर्ममेळा नावाचा मुलगा झाला होता. सर्व प्रपंचाचे कबाळ कष्ट चालू होते. नित्यनेमाने व भक्ती भावाने चोखामेळा हे पांडुरंगाचे नामस्मरण सुद्धा करीत असत तसेच नित्यनियमाने गुणसंकीर्तन पांडुरंगाचेच करीत असतात. आज आपण अशा महान संतांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मूळ नाव | चोखामेळा महार |
संप्रदाय | वारकरी वैष्णव संप्रदाय |
पत्नी | सोयरा |
बहीण | निर्मळा |
अपत्य | कर्ममेळा |
गुरु | संत नामदेव |
उपास्यदैवत | विठ्ठल |
भाषा | मराठी |
साहित्यरचना | अभंग व भक्ती कविता |
समाधी स्थळ | पंढरपूर |
संत चोखामेळा यांचा जन्म :
संत चोखामेळा यांचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या तालुक्यामधील मेहुना या गावी झाला होता त्यांच्या जन्माविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही परंतु चोकोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याची सुद्धा मोहिपती सांगतात चोकोबा हे मूड वऱ्हाडात जन्माला आले असे म्हटले जाते. हे जातीने महार होते, त्यांना त्यांना एक बहीण होती. तिचे नाव निर्मळा असे होते. निर्मळाच्या नवऱ्याचे नाव बंका होते.
चोखोबा यांना सोयरा नावाची एक पत्नी होती. तसेच दोघांना करमेना नावाचा मुलगा होता. चोखामेळा हे सर्व प्रपंचाचे पालन करत असत तसेच नित्यनियमाने भगवान पांडुरंगाचे नामस्मरण करत होते. चोखामेळा ज्या समाजात जन्माला आले होते, तो समाज भक्तिसंप्रदायापासून अतिशय दूर होता. त्या लोकांना मंदिरात जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. मनोमन विठ्ठलाची भक्ती करत होते तसेच त्यांनी अनेक अभंग रचले.
हीन याती माझी देवा | कैसे घडे तुझी सेवा ||
मज दूर-दुर हो म्हणती | तुझे भेटू कवण्यारीती ||
या अभंगाच्या ओळीमध्ये संत चोखोबा हे विठ्ठलालाच विचारतात की, मला तुझी सेवा करायची आहे. परंतु ही सेवा कशी घडणार कारण मला सर्व हिणतात कारण माझी जात महार आहे. सर्वच ब्राह्मण मला दूर दूर हो असे म्हणतात. आता तुला मी कोणत्या मार्गाने भेटू आणि तुझी सेवा करू. त्यावर संत चोखोबा अजून म्हणतात.
चोख चोखट निर्मळ | तया अंगी नाही मळ ||
चोखा सुखाचा सागर | चोखा भक्तीचा आगर ||
संत चोखामेळा यांचे जीवन :
संत चोखोबा हे महान असे संत होते परंतु समाजामध्ये त्यांना हिनवत होते. त्यांची जात महार होती. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये समाजामध्ये भेदभाव केला जात होता. शूद्र अति शूद्र असे गाव वाडा समाज जीवन ते जगत होते. तेव्हा उंच निष्ठा वर्णव्यवस्था यांच्या विळख्यांमध्ये संत चोखोबा सुद्धा अडकले होते. संत चोखामेळा हे एक प्रपंचिक गृहस्थ होते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते मोलमजुरी करत असतात; परंतु हे सर्व काम करताना ते श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात सतत दंग राहत असत.
गाववाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा हा श्वास हा कोंडला जात होता. दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळे येथे लौकिक जीवनात त्यांना दारिद्र्य आल्यासारखे वाटत होते. परंतु त्यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठल यांनी जवळ केले आणि त्यांना संत परंपरा लाभली. त्यांच्या काळामध्ये त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. विठ्ठलाची सावळी मूर्ती गोजिरी रूप हे त्यांना तेथील महाद्वारातूनच पहावे लागत होते. ही खंत मात्र संत चोखोबा यांच्या मनात नेहमीच वाटत होते, त्यामुळे बाहेर उभे राहून संत चोखामेळा उभा राहुनी महाद्वारी चोखामेळा दंडवत करी…..
अशाप्रकारे संत चोखामेळा हे विठ्ठलाच्या दारी महाद्वारात उभे राहून विठ्ठलाला दंडवत घालत होते. संत नामदेव हे संत चोखोबाचे गुरु बनले. संत नामदेव यांच्याकडून चोखोबांना विठ्ठल भक्तीचे दीक्षा मिळाली खरी आणि त्यामुळे तुकोबाचे जीवनच बदलून गेले. एक नवीन मार्ग त्यांना मिळाला आणि त्यांचे आयुष्य हे कृतर्थ झाले. सर्वांनाच भागवत पंथाच्या ध्वजाखाली अतिशय निर्भयपणे उभे राहण्यासाठी जागा मिळाली.
त्यावर संत चोखोबा यांनी म्हटले, “धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा | माझा निरसिला भेवो, दाखविला पंढरी रावो…||
अशाप्रकारे संत चोखोबा यांचे जीवन कृतार्थ झाले. संत चोकोबा हे समाजाकडून मिळालेल्या हीन वागणुकीमुळे अस्वस्थ होत होते. चोखोबा मात्र स्वच्छ आणि निर्मळ मनाचे होते. त्यांच्या अभंगाचे फोड केल्यास आपल्या लक्षात येते. की त्यांची वाणी, व्याकरण, शब्द रचना, विवेचन अत्यंत स्पष्ट आणि सुंदर असे आहे.
संत चोखोबा यांच्या जीवनातील चमत्कार :
संत चोखोबा एकदा महाद्वारा बाहेर उभे असताना मंदिरामध्ये गर्दी झाली तसेच तेथील सर्व पंडित मंडळींनी चला चला लवकर निघा असे म्हणत पुढे निघाले आणि चोखोबा तेथून घरी आले आणि झोपले असताना, त्यांच्या स्वप्नामध्ये श्री पांडुरंग आले, त्यांचा हात धरून माझ्यासोबत मंदिरात चाल असे म्हटले तेव्हा क्षणातच चोखोबा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले. तेथे दोघांची वार्तालाप झाली आणि ते वार्ताला एका पुजाराला ऐकू आली.
विठ्ठलाचा आवाज त्याला समजला नाही परंतु चोकोबाचा आवाज त्यांना कळला. तो संवाद पुढीलप्रमाणे होता. विठ्ठलाने चोखोबाला तुझी आठवण येत नाही असा एकही क्षण जात नाही तसेच विठ्ठलाने त्यांना अधिक म्हटले की, नाम्याची खीर खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने मला उचकी येते. तुझ्या आठवणी मध्ये मी सुद्धा असतो. एवढे ऐकल्यावर सुखाचे डोळे भरून आले आणि चोखोबा विठ्ठलाचे पाय धरतो, एवढेच बोलू शकला विठ्ठला मायबापा तूच आहेस.
त्यानंतर तेथील पूजारी धावत पडत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितले. सर्व लोक तेथे जमा झाले आणि चोखोबा मूर्तीसमोर हात जोडून उभा होता. लोकांनी त्याला म्हटले, त्यावर चोखोबांनी कबूल केले. माझा यामध्ये काही दोष नाही. मला विठोबांनीच हात धरून इथपर्यंत आणले असे त्यांनी सांगितले. त्यावर लोकांनी पंढरपुरातून निघून जाण्यासाठी सांगितले. परंतु त्या ठिकाणी सांगितलेला घटनेमुळे सर्वच मंडळी थक्क झाली आणि हा चमत्कार सर्व मंडळींच्या जीवनातील चमत्कार होता.
संत चोखोबा यांचा मृत्यू :
असे म्हटले जाते की, संत चोखोबा हे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूर येथे गेले असता विठ्ठल भक्ती सदैव दंग राहत असत. त्यांच्या मुखातून नेहमी विठ्ठलाचे भजन आणि नामस्मरण सुरू असायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरीमध्ये भिशीच्या तटाची भिंत कोसळून तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी पंढरपुरी आले होते.
त्यामध्ये चोखामेळा सुद्धा आले होते परंतु संत चोखामेळा हे एक मोलमजुरी करत असताना, त्यांच्या अंगावर ही दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता असे म्हटले जाते. त्यानंतर संत चोखोबा यांच्या हाडातून विठ्ठलाचा नामस्मरणाचा आवाज येत होता. संत नामदेवांनी चोखोबाच्या शरीराची सर्व हाडे गोळा केली आणि पंढरपूर येथे आणली. संत नामदेव पायरी समाधी जवळ त्यांची समाधी बांधलेली आहे.
FAQ
संत चोखामेळा हे कोणाचे भक्ती करत होते?
संत चोखामेळा हे विठ्ठलाचे भक्ती करत होते
संत चोखामेळा यांच्या मुलाचे नाव काय होते?
चोखामेळा यांच्या मुलाचे नाव कर्ममेळा असे होते.
संत चोखामेळा यांचा जन्म कोठे झाला?
संत चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील मेहुना या गावी झाला होता.
संत चोखामेळा यांचे गुरु कोण होते?
संत नामदेव.
चोखामेळा यांची समाधी कोठे आहे ?
संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर येथे आहे.