Sant Gadgebaba Information In Marathi संत गाडगेबाबा हे एक समाज सुधारक थोर संत होऊन गेले आहेत. हे महाराष्ट्र या राज्यातील कीर्तनकार होते तसेच ते कीर्तनकार सोबतच समाज सुधारक सुद्धा होते. त्यांनी नेहमी आपल्या कीर्तनातून लोकांना स्वच्छते विषयी माहिती दिली तसेच लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी इथे विविध गावी भटकत राहिले. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयांमध्ये सुद्धा जास्त रुची होती. त्यामुळे त्यांना विसाव्या शतकातील समाज सुधारक आंदोलनांमध्ये या महापुरुषांचा सहभाग आहे. इतर महापुरुषांमध्ये सुद्धा संत गाडगेबाबा यांचा एक महत्त्वाचे स्थान आपल्याला दिसून येते.
संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती Sant Gadgebaba Information In Marathi
माणसात देव शोधणारा असा हा समाजसेवक संत गाडगे महाराज आहे. भुकेल्यांना अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या. गोरगरीब व दिन दलितांची मदत करा अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता मिटवून किंवा त्याचे उच्चार करण्यासाठी नेहमी त्यांनी कार्य केले. दगडाचा देव रोकडा सज्जनी असे ते सांगत होते.
अपंगांची सेवा करणे तसेच देव देवळात नसून माणसात आहे. देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका, सावकारांची कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराने मंत्र तंत्र देव देवस की चमत्कार असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका अशी त्यांनी आयुष्यभर लोकांना शिकवण दिली. त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी रंजल्या गांजले अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम विद्यालय सुरू केले.
संत गाडगेबाबा यांचा जन्म व बालपण :
संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1886 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव झाला. संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव हे डेबुजी झिंगारजी जानोरकर असे होते. ते त्यांच्या आईसोबत माहेरी म्हणजेच मामाच्या घरी मुहूर मूर्तिजापुर तालुक्यातील दापुरी येथे राहत होते. त्यांचे बालपण सुद्धा त्यांच्या मामाकडेच दिले त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासून त्यांना शेती करण्यामध्ये विशेष रस होता, त्यामुळे ते गुरांची निग्रणी राखत असत तसेच त्यांना गुरांची राया निगराणी करायला खूप आवडत असेल त्यांच्या वडील झिंगराजी हे परीट होते.
त्यांची आईचे नाव सखुबाई असे होते परंतु त्यांना प्रेमाने डेबुजी असे सुद्धा म्हणत होते. डेबुजी लहान असताना त्यांचे वडील दारूच्या व्यसनाबाई मृत्युमुखी पडले व त्यांच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची झाल्यामुळे लहानपणापासून त्यांना भुरे राखणे नागर चालवणे शेतीवाडी करणे अशी विविध कामे जमत होती व त्यांना कामाची सुद्धा खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा एक विशेष गुण होता तसेच लहानपणापासूनच ते स्वच्छता ठेवायला लागले.
संत गाडगेबाबा यांचे वैयक्तिक जीवन :
संत गाडगेबाबा यांचे वैयक्तिक जीवन आपण पाहिले तर संत गाडगेबाबा यांचा विवाह हा लहानपणी झाला होता. त्यांचा विवाह हा 1892 मध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कमलापूर तरोडा या गावातील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी झाला होता. यांना चार मुली होत्या, परंतु गाडगेबाबांना संसारामध्ये फार रस वाटत नव्हता. त्यामुळे त्यांनी लवकरच घराचा त्याग केला व घरदार सोडून समाजाच्या संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले व त्यांनी त्यांच्या संसाराचा त्याग केला तसेच ते तीर्थयात्रा करीत सर्वत्र भ्रमण करू लागले.
संत गाडगेबाबा यांनी घराचा त्याग केला व संन्यास पारमार्थिक मार्गाचा स्वीकार केला. त्यांनी आपली जीवन अतिशय साधी जगण्यासाठी सुरुवात केली, त्यांचा वेश म्हणजे त्यांच्या अंगावर फाटकी तुटकी गोधडी व हाती एक फुटके मातीचे गाडगे होते. या गाडगे हाती असल्यामुळे त्यांना गाडगेबाबा गोधडी बुवा या नावांनी सुद्धा लोक ओळखत असतात. त्यानंतर मात्र त्यांना गाडगेबाबा असे नाव महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले. हे एक संत पुरुष होऊन गेले आहे.
संत गाडगे महाराज यांचे कीर्तन :
संत गाडगेबाबायांनी संसाराचा त्याग केल्यानंतर ते गावोगावी कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत असत. ते लोकांना कीर्तनांमधून प्रबोधन करीत असत. वयाच्या 29 व्या वर्षी गाडगेबाबांनी जेव्हा घरदाराचा व सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. तेव्हा सगळी माणसेही आपली सगळी सोयरे व सर्व विश्व हे आपलेच घर असे मानून ते सर्वत्र तीर्थयात्रा करू लागले.
गावोगावी भजन कीर्तने ते करत करत लोकांमधील अज्ञान अंधश्रद्धा व भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी दूर करण्यासाठी प्रयत्न केले गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले लोकांना भजन कीर्तनांमधून उपदेश दिला. किर्तन झाल्यानंतर लोक गाडगे महाराजांच्या पाया पडायला येत असतात.
गाडगे महाराज कोणालाही पाया पडू देत नव्हते. ते आरती होण्याच्या अगोदर गर्दीतून निघून जात होते. लोकांनी त्यांच्याकडून सद्गुण शिकावा. माझ्या पाया पडून काही उपयोग नाही असे ते नेहमी म्हणत असत. कीर्तनामध्ये सांगायचे तसेच त्यांच्या कीर्तनामधून लोकांना प्रश्न विचारायचे. त्यामुळे लोकांचे मनोरंजन सुद्धा होत होते. त्यांचे आवडते, भजन हे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे होते. त्यांच्या हातामध्ये दोन दगड घेऊन ते या कीर्तनामधून किंवा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन म्हणत होते.
संत गाडगेबाबा यांचे कार्य :
संत गाडगेबाबा सर्वप्रथम ज्या गावांमध्ये जायचे. ते गाव स्वतःच खरट्याने स्वच्छ करायचे संध्याकाळी स्वच्छता करायचे व लोकांना सुद्धा स्वच्छता करण्यासाठी आवर्जून सांगत होते. संध्याकाळी दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर संध्याकाळी डोक्यातील घाण दूर करण्यासाठी ते कीर्तन करत असतात व त्यातून लोकांचे मनोरंजन करत असत.
माणसात देव शोधणारा असा हा समाजसेवक संत गाडगे महाराज आहे. भुकेल्यांना अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या. गोरगरीब व दिन दलितांची मदत करा अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता मिटवून किंवा त्याचे उच्चार करण्यासाठी नेहमी त्यांनी कार्य केले. दगडाचा देव रोकडा सज्जनी असे ते सांगत होते.
अपंगांची सेवा करणे तसेच देव देवळात नसून माणसात आहे. देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका, सावकारांची कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराने मंत्र तंत्र देव देवस की चमत्कार असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, अशी त्यांनी आयुष्यभर लोकांना शिकवण दिली तसेच त्यांच्या कीर्तनामध्ये लोकांना अनेक उपदेश सुद्धा करत असत.
त्यांचे उपदेश हे अतिशय सोप्या शब्दांमध्ये होते. त्यांनी नेहमी सांगितले चोरी करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाडू नका, तसेच देव दगडात नसून माणसांमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सर्वसामान्यांच्या मनावर प्रेम करा.
त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी रंजल्या गांजले अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम विद्यालय सुरू केले. संत गाडगेबाबा यांनी विसव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालेसे कळस असे म्हटले जाते. तरी त्यांच्या कार्यामुळे भागवत धर्माच्या कळसावर त्यांनी कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले.
पुरस्कार :
आजही गाडगे महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र मधील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार दिला जातो.
संत गाडगेबाबा यांचा मृत्यू :
संत गाडगेबाबा यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव जवळ झाला. शेगाव अमरावती जिल्ह्याजवळ आहे, त्यामुळे संत गाडगे महाराज यांची समाधी अमरावती येथे आहे. हे एक सत्पुरुष व समाज करते झाले तसेच अमरावती विद्यापीठाला सुद्धा संत गाडगे अमरावती विद्यापीठाचे नाव दिले आहे.
FAQ
संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय आहे?
डेबुजी झिंगारजी जानोरकर.
संत गाडगेबाबा यांचा जन्म कधी झाला?
23 फेब्रुवारी 1876 रोजी.
संत गाडगेबाबा हे कोण होते?
एक थोर समाज सुधारक होते.
संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून कोणता संदेश दिला?
स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेचा.
संत गाडगेबाबा यांच्या आईचे नाव काय होते?
सखुबाई.