संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

Sant Janabai Information In Marathi संत जनाबाई ह्या संत नामदेव यांच्या घरच्या दाशी होत्या तसेच त्या समकालीन वारकरी संत होऊन गेले आहेत. त्या व्यतिरिक्त त्या एक कवयित्री सुद्धा होत्या. संत जनाबाई ह्या विठ्ठलाची भक्ती करत होत्या. जे भगवान श्रीकृष्णाचे एक रूप आहे तसेच वारकरी परंपरेमधील श्री विठ्ठल हे एक प्रमुख देवता म्हणून त्याची पूजा केली जाते. जनाबाईच्या कवितांमधून आपल्याला तिची तळमळ तसेच देवाविषयीची भक्तिभाव आपल्याला दिसून येतो.

Sant Janabai Information In Marathi

संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

जनाबाई या महाराष्ट्रातील संत नामदेव संत ज्ञानेश्वर विठोबा खेचर यांच्या समकालीन संत होत्या. त्या एक कवयित्री सुद्धा होत्या, त्यामुळे त्यांनी अनेक अभंग गायले आहेत. त्यांच्या अभंगातून देवाविषयी असलेली त्यांची भाव आपल्या सहज लक्षात येतो. संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते तसेच त्या संत नामदेवाच्या घरामध्ये काम करत असत अंग तुळशी वृंदावन, शेण, गौवऱ्या वेचत असत तसेच कोठार, मांजर, घर इत्यादी कामे सुद्धा त्या करत होत्या.

संत जनाबाई यांचा जन्म व बालपण :

संत जनाबाई यांचा जन्म परभणी येथील गंगाखेड या गावांमध्ये 1258 मध्ये दमा या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला होता. संत जनाबाईच्या एका अभंगांमध्ये म्हटलेले आहे, माझ्या वडिलांचे दैवत असतो. हा पंढरीनाथा या ओळीवरच लक्षात येते की, त्यांचे वडील दमा हे सुद्धा वारकरी होते. त्यांच्या आईचे नाव करून असे होते.

त्या सुद्धा भागवत भक्त होत्या संत जनाबाई ह्या एक संत कवयित्री होऊन गेल्या आहेत. तसेच त्यांच्या आजही अभंग कविता लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना किंवा कांडतांना त्यांचे अभंग म्हणतात व त्यांच्या ओव्या आजही गायल्या जातात.

जनाबाईचे बालपण हे गोदावरी नदीच्या तीरावरील गंगाखेड या गावांमध्ये गेले. हेच जनाबाईचे गाव होते. जनाबाई पाच ते सहा वर्षाच्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या वडिलांनी त्यांना नामदेवाचे वडील दामा यांनी संत नामदेव शिंपी यांच्याकडे काम करण्यासाठी पाठवले होते.

नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी चार मुले व चार सुना तसेच एक मुलगी व संत जनाबाई आणि संत नामदेव असे पंधरा माणसांचे त्यांचे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांमध्ये लहानपणापासूनच एक सदस्य बनल्या होत्या. तसेच त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणून घेत होत्या.

संत जनाबाई यांची विठ्ठल भक्ती :

संत जनाबाई ह्या नामदेवांच्या घरी दासी होत्या. त्यांचे कुटुंब खूप मोठे होते, त्यामध्ये संत जनाबाई सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होता. दळण दडताना, कांडतांना संत जनाबाई ह्या नेहमी विठ्ठला भक्तीमध्ये लिन राहत होत्या.
दळीता कांडिता तुझं गाईन अनंता..! नेहमी असं त्या म्हणत होत्या. तसेच संत नामदेव हे त्यांचे परमार्थिक गुरु होते.

श्री संत ज्ञानेश्वर, विठोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या काळातील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. यापेक्षा आणखीन काय पाहिजे..? विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा…. संत जनाबाईंना संत नामदेवामुळेच सत्संग घडला असे त्या मानत होत्या. संत ज्ञानदेवांविषयी सुद्धा त्यांचा भक्तिभाव हा खूप अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले होते. त्यांनी शेणाच्या गौर्या वेस्ताना तसेच घरातील इतर कामे करताना सुद्धा सतत विठ्ठलाचे नामस्मरण करीत असत.

संत जनाबाई विषयीचा चमत्कार :

संत जनाबाई पंढरपुरामध्ये संत नामदेवाच्या घरी राहून त्यांच्या घरची सर्व कामे करत होत्या. तसेच त्या विठ्ठलाच्या अनन्यसाधारण भक्ती करत होत्या म्हणून त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. अशाच एकदा संत जनाबाईंची कीर्तीही संत कबीर महाराजांच्या कानावर पडली. हे कळल्यावर संत जनाबाई कुठे राहतात, त्यांनी विचारले व त्यांना नामदेवाच्या घरी माहित पडले परंतु जनाबाई तेव्हा गोऱ्या आणण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी त्या येत नाहीत कशा आहे.

पाहायला स्वतः कबीर तिकडे विचारत विचारत गेले. तेव्हा तिकडे दोन बायका गौवऱ्यासाठी भांडत होत्या. त्यांनी त्या पाहिल्या तू माझ्या गोऱ्या चोरी केल्यास असं त्या एकमेकींना म्हणत भांडण करत होत्या. हे सर्व पाहत असताना कबीर त्या दोघींना विचारू लागली की,, जनाबाई कोण आहेत? त्या आल्या का इकडे त्यावर दुसरी बाई म्हणाली “अहो, हीच ती जनी जी माझ्याशी भांडत आहे”. व त्यावर क्षणभर कबीर महाराजांना वाटलं की, या भांडणाऱ्या जनाबाई असू शकत नाही म्हणून ते परत तेच विचारू लागले की, जनाबाई कोण आहेत?

जनाबाई त्यांना म्हणाल्या, “हो मी जनी आहे, तुम्ही काय कराता इकडे आणि आमच्या भांडणात न्याय निवाडा करा.” त्यावर क्षणभर काहीही न बोलता संत कबीर म्हणाले, या गौवऱ्या तर सारख्याच आहे. तर कोणाच्या कोणत्या? हे कसं ओळखणार. त्यावर जनाबाईंनी सांगितलं की, “ज्या गौवरितून माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकू येईल. त्या गौवऱ्या माझ्या.” तेव्हा कबीरांनी गोवऱ्या हातात घेऊन कानाला लावून पाहिले.

तेव्हा बऱ्याच गौवऱ्यांमधून विठ्ठल नाम ऐकू आले. हा सर्व चमत्कार पाहून संत कबीर आश्चर्यचकित झाले व त्यांचा संत जनाबाई वर पक्का विश्वास बसला आणि त्यांनी जनाबाईंना त्यांच्या गौवऱ्या घरी नेऊन दिल्या. आपल्या घरी त्यांना बोलावून पाहुणचार सुद्धा केला.

संत जनाबाई यांची अभंग रचना :

संत जनाबाईच्या नावावर असलेले 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रीत झालेले आहे. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग हे नामदेवगाथा मध्ये सुद्धा आहे, त्यांचे अभंग कृष्णजन्म थाडीपाक प्रल्हाद चरित्र बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्र ध्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंनी थाडीपाक व द्रोपती स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना स्फूर्ती मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवतांच्या प्रेमाने उत्कृथ भरलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी पूर्ण निष्काम होऊन अलौकिक ऐतिहासिक भावना विसरून विठ्ठलाला स्वतः अर्पण केले होते. त्यांना आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनातून रेखाटले आहेत.

हे आपल्याला दिसते, संत नामदेवावरील भक्ती प्रेमभाव संत ज्ञानेश्वर वरील असलेला त्यांचा उत्कट भाव तसेच संत चोखोबा समर्थाचे अनुसरून विठ्ठलाची भक्ती भाव त्यांच्या या काव्यामध्ये आपल्याला ओतपोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला सुद्धा त्या कमी नव्हत्या.

  • ये ग ये ग विठाबाई.
  • विठू माझा लेकुरवाळा.
  • धरिला पंढरीचा चोर.

त्यांच्या अभंग रचनेमध्ये आपल्याला कोमल ऋतुजा सहनशीलता वाचल्यावर त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना आपल्याला दिसून येतात.

संत जनाबाई यांची समाधी :

संत जनाबाई यांची समाधी श्री क्षेत्र पंढरपूर येथील महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी या दिवशी त्या समाधीस्थ होऊन पांडुरंगामध्ये विलीन झाल्या आहे.

FAQ

संत जनाबाई कोणाच्या भक्ती करत होत्या?

संत जनाबाई ह्या विठ्ठलाची भक्ती करत होत्या.

संत जनाबाईची गुरु कोण होते?

संत नामदेव महाराज.

संत जनाबाईचा जन्म कोठे झाला?

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे.

संत जनाबाई यांचा मृत्यू कधी झाला?

आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

संत जनाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते?

दमा.

Leave a Comment