Sant Kabir Information In Marathi संत कबीर हे एक संत परंपरेतील महान संत होते तसेच संत कबीर हे उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 1440 झाला असे मानले जाते. हे एक महान संत होते तसेच कवी सुद्धा होते आणि त्यांनी समाज सुधारणा केली. संत कबीर हे भारतीय भूमीमध्ये जन्मलेले आणि धार्मिक अनिष्ट रूढी परंपरा यांना तोडणारे संत होते. त्यांनी हजारो ग्रंथांचे पंडित ते खुजे करण्याच्या प्रेमाच्या अडीच अक्षरांचा मंत्र सांगितला. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा यांवर दोघांच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांचे दोहे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणामुळेच अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा पसरणारे भोंदू बाबा आणि बुवा सनातनी यांचे भांडे फोडले.
संत कबीर यांची संपूर्ण माहिती Sant Kabir Information In Marathi
संत कबीर यांनी सत्य विज्ञान आणि कर्म सिद्धांत यावर लिखाण केले आहे. या लिखाणामुळे संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध झाले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संत कबीर यांना गुरु मानले होते असे हे संत कबीर युवा विज्ञानवादी शिकवण सतत जगाला देऊन प्रेरणा देत राहिले.
संत कबीर यांचा जन्म :
संत कबीर यांचा जन्म 1440 मध्ये एका गरीब विधवा ब्राह्मणाच्या पोटी झाला होता असे म्हटले जाते. त्यांच्या जन्माची तारीख आणि स्थान यामध्ये बरेच तफावत आढळून येते. त्यांचा जन्म हा काशी येथे झाला होता. एका कथेनुसार निरू आणि निमा नावाच्या मुस्लिम कुटुंबामध्ये कबीराचे पालन पोषण झाले होते.
संत कबीर यांची शिकवण :
संत कबीर यांना शिक्षणामध्ये वाचनात तसेच लेखनात आणि खेळण्यात सुद्धा अजिबात रस वाटत नव्हता. त्यांचे आई वडील श्रीमंत नव्हते त्यामुळे त्यांना मदरशात जाण्याची सुद्धा अट नव्हती. दिवसभर जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कबीर हे घरोघरी फिरत होते. त्यामुळे कबीर यांना पुस्तकी शिक्षण घेताच आले नाही. आजही कबीर यांचे अनेक दोहे आपण वाचले असतील त्यांनी स्वतः रचलेले हे दोघे आहेत.
संत कबीर हे सर्व धर्माच्या पलीकडे असलेले परब्रम्ह स्वरूप परमेश्वराला मानत होते. ते मानव जातीचे पुजारी होते, कोणत्याही प्रकारचा धर्मभेद पंतभेद आणि जातीभेद हे कबीरांना मान्य नव्हते. भारत समाज एक मताने चालावा व एकजुटीने वागावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मते, तुम्हाला जर ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्हाला गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला साधना गरजेची आहे तसेच गुरु हे ज्ञान देणारे आहेत.
गुरु ज्ञानाचे भांडार आहे, सर्वप्रथम तुम्ही गुरु करा आणि तुमच्या अति चंचल व असयमित मनावर ताबा ठेवा. संत कबीर यांनी अनेक कार्य केले आहेत. संत कबीर यांनी त्यांच्या काव्यामध्ये विष्णू कृष्ण गोविंद खुदा, अल्ला, करीम, गोरख, महादेव, नाथादी सर्व ईश्वरांची नावे आलेली दिसतात. त्यांच्या मते, ईश्वर हा निराकार आहे. ईश्वर हा सर्वच गोष्टीपासून अलिप्त असा आहे.
संत कबीर यांचे विचार :
संत कबीर हे भारतीय भूमीमध्ये जन्मलेले आणि धार्मिक अनिष्ट रूढी परंपरा यांना तोडणारे संत होते. त्यांनी हजारो ग्रंथांचे पंडित ते खुजे करण्याच्या प्रेमाच्या अडीच अक्षरांचा मंत्र सांगितला. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा यांवर दोघांच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांचे दोहे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणामुळेच अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा पसरणारे भोंदू बाबा आणि बुवा सनातनी यांचे भांडे फोडले.
संत कबीर यांचे विचार जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होते. ते भारतातील एक महान कविता होतेच तसेच ते एक समाज सुधारक सुद्धा होते. त्यांनी भारतातील सर्वच लोक एकमताने राहावे तसेच एकतेने वागावे व सर्वच लोक सुखी व्हावे. या विचाराने नेहमी उपदेश केले आहे तसेच लोकांनी एकमेकांसोबत भांडू नये उचनिष्ठा आणि भेदभाव करू नये असा त्यांनी दोह्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. समाजामध्ये अंधश्रद्धा, वाईट रूढी आणि भेदभाव यांना दूर करण्यासाठी त्यांनी अनेक कार्य केले.
संत कबीर यांनी निंदक किंवा आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण जेवढं जवळ ठेवता येईल तेवढं ठेवायला पाहिजे. कारण माणूस आपले दोष दाखवून बिना साबण पाण्याने आपल्याला स्वच्छ करीत असतो. कबीरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे की, त्यांनी निंदकांना सुद्धा स्वतःचे हितचिंतक मानले आहे.
निंदक नियरे राखीए, अवगुण कुटी छवाय, बिन पाणी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय…
संत कबीर यांनी म्हटले आहे की, मनुष्य जन्म खूपच दुर्लभ असते. त्यामुळे मानवाने आपले हित साधून घेणे गरजेचे आहे. कारण मानव शरीर हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. ज्याप्रमाणे झाडावरून गडलेलं पान पुन्हा झाडाला जोडता येत नाही, त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे असते.
दुर्लभ माणूस जन्म है,
देह न बारम्बार.
तरुवर ज्यो पत्ता झडे,
बहुरी न लागे डार ..
संत कबीर यांनी सर्वांचं चांगलं व्हावं आणि कोणीही कोणाशी भांडू नये या विचाराचे संत कबीर होते.
संत कबीर यांचे दोहे :
- संत कबीर यांनी दोहाच्या माध्यमातून लोकांना शिकवण व आपले विचार व्यक्त केले आहेत.
- पोथी पडे पडे जगवा, पंडित भया न कोय , ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..
- साधू ऐसा चाहिये , जैसा सुप सुभाये , सार-सार हो गई रहे थोथा देई उडाय..
- धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सिंचे सोगडा ऋतू आए फल होय….
- दुर्लभ माणूस जन्म है, देह न बारम्बार, तरुवर ज्यो पत्ता झडे, बहुरी न लागे डार…
- अशाप्रकारे त्यांनी अनेक दोन्हींची रचना केली आहे आणि त्यांचे दोहे खूप काही अर्थ सांगून जातात. जे मानवी जीवनाशी निगडित आहे.
संत कबीर यांचा मृत्यू :
संत कबीर यांनी आयुष्यभर लोकांना उपदेश केले तसेच त्यांनी अनेक दोहे रचले. त्यानंतर आयुष्यभर काशीमध्ये राहिले. संत कबीर यांचा मृत्यू 1518 साली झाला असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार जेष्ठ पौर्णिमेला संत कबीर जयंती मानली जाते.
संत कबीर ज्या ठिकाणी साधना करीत होते, त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव कोणी घ्यावे यावरून लोकांमध्ये भांडण झाली होती. जेव्हा त्यांच्या समाधीचे दार उघडले तेव्हा तेथे फक्त दोन फुले होती. जी त्यांच्या हिंदू-मुस्लिम शिष्यामध्ये अंतिम संस्कारासाठी वाटली गेली.
FAQ
संत कबीर हे का प्रसिद्ध होते?
संत कबीर यांनी त्यांच्या लेखनातून हिंदू धर्माच्या भक्त चळवळीवरील प्रभाव पडला. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात अशी त्यांना वाटत होते.
कबीर यांचा मृत्यू कधी झाला?
कबीर यांचा मृत्यू 1518 झाला.
कबीर हे कोणत्या देवाची पूजा करत होते?
कबीरांच्या मते ईश्वर हा निराकार, गुणविरहित आहे. जो काळ आणि स्थळाच्या पलीकडे आहे. कबीर यांनी ज्ञान आणि आनंद यांनाच आपले देव मानले होते.
संत कबीर यांनी त्यांच्या दोहेमध्ये कोणती भाषा वापरलेली आहे?
अरबी भाषेमध्ये संत कबीर यांनी दोहे लिहिले आहे.
संत कबीर यांचे गुरु कोण होते?
संत कबीर यांचे गुरु रामानंद होते.