संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती Sant Muktabai Information In Marathi

Sant Muktabai Information In Marathi संत मुक्ताबाई या संत होऊन गेले आहेत तसेच त्या कवयित्री सुद्धा होत्या. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत तसेच या संतांबरोबर श्री संतांचा सुद्धा समावेश आहे. ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य असा वाटा उचललेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी त्यांच्या निस्वार्थ भक्ती परंपरेने भक्तीचा मळा फुलविला आणि मराठी साहित्याची दालन भाव संपन्न केले. ज्यांना अशी बुद्धिमत्ता लाभली, अलौकिक भावंडांच्या वयात वाढल्या भक्तियोग मार्ग त्यांनी आत्मसात केला. अशा संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी म्हणजे संत मुक्ताबाई. यांनी संत परंपरेविषयी लहानपणी अभ्यास केला.

Sant Muktabai Information In Marathi

संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती Sant Muktabai Information In Marathi

मुक्ताबाई यांचा जन्म व बालपण :

महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला त्यांचा जन्म 1279 मध्ये झाला. ह्या महाराष्ट्रातील एक संत कवी होऊन गेल्या आहेत. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे होते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे मोठे भाऊ आहेत.

मुक्ताबाई दोघांमध्ये सर्वात लहान आहेत. खरे पाहता, विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मृतिमंद स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई जन्माला आले आहे. साक्षात दिव्यत्वाची ही चार रुपे रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारे आहेत. परंतु हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पोर वयातच निवृत्तीनाथ व त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून वाडीत टाकण्यात आले होती.

लोक त्यांची विटंबना करू लागले होते परंतु हे सगळे भोग शोषक या चारही भावंडांनी ब्रह्म विद्येची अखंड उपासना केली आणि त्यानंतर आपली मुलं सुखी राहावी. विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देह प्रायचित्त सुद्धा स्वीकार केला आणि देहत्या केला परंतु माता पितांच्या या देह त्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची जबाबदारी मात्र मुक्ताबाई यांच्यावर आली. त्यांनी ती पूर्ण सुद्धा केलेली आपल्याला दिसून येते, मुक्ताबाई लहान वयातच प्रौढ गंभीर शोषित समजदार बनले.

संत मुक्ताबई यांचे कार्य :

संत मुक्ताबाई यांच्या हातून विश्वविधानाचे कार्य घडलेले आहे. योगी चांगदेव खूप मोठा तपस्वी होता परंतु त्यांनी सुद्धा मुक्ताबाईला गुरू केला कारण जरी हा 1400 वर्षाचे आयुष्य जगला असला तरी त्याने आतापर्यंत त्याच्या जीवनात गुरु केलेला नव्हता.

मुक्ताबाईंनी योगी चांगलेवाला पासष्टीचा अर्थ उघडून दाखविला. मुक्ताबाईचा अनुग्रहणे चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्याचे चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले. आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची आध्यात्मिक भरून बनल्या. पुरतार्थ देणे चांगले म्हणतात मुक्ताई करे….

चमत्कार:

ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यासाठी सांगितले होते. याकरिता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभार वाड्यात गेल्या. विसोबा खेचर हा त्या गावचा प्रमुख होता. जो या चार भावंडांचा द्वेष करीत असे. त्यांना हीनवत असे, कोणीही खापर देऊ नये अशी गावात टाकीत देऊन ठेवली होती.
त्यामुळे मुक्ताबाईंना रिकाम्या हाताने परत यावे लागले होते.

तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योग बळाणे त्यांचे पाठ तापावली आणि मुक्ताईला पाठीवर मांडे भाजण्यासाठी सांगितले. तो चमत्कार पाहून इसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले, त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडले प्रसाद म्हणून खाण्यासाठी हवं तर झडप घातले. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले, तेव्हापासून विसोबा खेचर तेच नाव धरण केले. ईश्वर हे खेचर बनले. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्त झाली होती.

मुक्ताबाई यांचे साहित्य :

मुक्ताबाई यांनी ताटीचे 42 अभंग रचले आहेत तसेच ते खूप प्रसिद्ध आहे. त्या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेषामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला ज्ञानदेव भाऊ यांनी ताटी उघडावी म्हणून विनवणी केलेली आहे. तिने ज्ञानेश्वरांना अभिनेता पासून बहिणींनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण सुद्धा करून दिले.

ज्ञानदेवांना मोठा योगी कसा असतो याचे स्मरण करून दिले. जो जनांचे अपराध सहन करतो, तो योगी अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी ज्याला सारखे थंडपण घेऊन त्या क्रोधागणीला भिजवायचे असते. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चालेल, उपदेश मान्य करायचा असा शब्द समजावताना मुक्ताबाईच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग होय.

योगी पावन मनाचा | साहे अपराध जणांचा .
विश्वरागे झाले वन्ही | संती सुखी व्हावे पाणी .
शब्द शस्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश .
विश्वपट ब्रम्हदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा.

आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख मानू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून आपण आपले स्वतःचे दात पाडून घेत नाही. ब्रह्म पदाला पोहोचायचे असेल तर लोखंडाचे चणे सुद्धा खावे लागतात. अपेक्षा सहन कराव्या लागतात. त्यासाठी त्यांनी अभंग मध्ये ज्ञानेश्वराची समजूत काढली आहे.

हात आपला आपणा लागे त्याचा करू नये राग जीभ दातांनी चावली कोणी बत्तीशी पाडली
चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदि नाचे

ताटी उघडण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप मार्गांनी अभंग गाऊन समजूत घातली. परंतु ज्ञानोबाराया ताटीचेदार उघडेच ना…. तेव्हा हळवी झालेली मुक्ताबाई म्हणते, लडिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दायी जेठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा….

ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक असे कार्य घडले. ज्ञानदेवरायांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होते. समाजामध्ये अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंच्या या अभंग रचना आहे. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले, त्याचप्रमाणे त्यांनी हरिपाठ याचे सुद्धा अभंग लिहिले आहे. जे आजही देवापाशी म्हटले जाते.

अखंड जायला देवाचा शेजारी अहंकार नाही दिला मान अपमान वाढविण्याची हेवा, दिवस असता दिवा हाती घेशी.

संत मुक्ताबाई यांचे विचार खूप परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून देखील आज त्यांचा उल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ज्ञान बोध या ग्रंथाचे हे लेखन केले आहे. या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथाने मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे.

संत मुक्ताबाई यांची समाधी :

संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन दीर्घ यात्रा करण्याकरता निघाले. ते 12 मे 1297 ला तापी नदीवर आले असता, अचानक वीज कडाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे.

FAQ

संत मुक्ताबाई यांचा जन्म कोठे झाला?

संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव येथे 1297 मध्ये झाला.

मुक्ताबाई यांची समाधी कोठे आहे?

जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे.

मुक्ताईनगरचे जुने नाव काय होते?

आदिलाबाद/ एदलाबाद

संत मुक्ताबाई यांचे कोणते अभंग प्रसिद्ध आहेत?

संत मुक्ताबाई यांचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत.

मुक्ताबाई यांच्या तीन भावंडांची नावे काय आहेत?

निवृत्ती ज्ञानदेव सोपान असे आहे.

1 thought on “संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती Sant Muktabai Information In Marathi”

Leave a Comment