सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Savitribai Phule Information In Marathi

Savitribai Phule Information In Marathi क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. कारण भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असल्याचा मान त्यांना दिला जातो. त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले हे श्रेय त्यांना जाते. दोघांनी मिळून 1848 मध्ये मुलींसाठी शाळा स्थापन केल्या. स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये महिलांना द्वितीय श्रेणीमध्ये गणले जात होते.

Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Savitribai Phule Information In Marathi

आजच्याप्रमाणे त्यांना शिक्षणाचा अधिकार किंवा इतर स्वतंत्र नव्हते. त्या काळामध्ये महिला चूल आणि मुल एवढेच कार्य करत होते. त्या काळामध्ये स्त्रिया जर शाळेत गेल्या तर ते एक पाप मानले जात होते. अशा काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले. ते कार्य सामान्य नव्हते, त्या शाळेत जायच्या तेव्हा त्यांच्यावर लोक दगडफेक करायचे, शेण फेकून मारायचे परंतु यामुळे त्या विचलित न होता मुली व महिलांना शिक्षण देण्यासाठी सतत कार्यरत राहिल्या व आज आपण पाहतो की, सर्वच मुली किंवा महिला सुशिक्षित आहेत.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म :

सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा 3 जानेवारी 1831 साली महाराष्ट्र मधील सातारा जिल्ह्यात नायगाव येथे दलित कुटुंबात झाला होता. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील होते. हे गावचे पाटील होते. सावित्रीबाईला सिद्धी, सखाराम आणि श्रीपती असे तीन भाऊ होते. कुटुंबामध्ये सावित्री मोठ्या असल्यामुळे आपल्या भावंडांचा भरभरून प्रेमाने सांभाळत व आईला सुद्धा घर कामात मदत करत असतात.

सावित्रीबाई जेव्हा नऊ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचा विवाह करण्यासाठी त्यांचे वडील चांगले स्थळ शोधू लागले. तेव्हा सावित्री साठी पुण्याचे स्थळ आले असता, पुण्यामध्ये भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव फुले यांचे सुपुत्र ज्योतिबा खंडोजी नेवासे पाटीलकडे सावित्रीची मागणी घालण्यासाठी आले. तेव्हा यांचा लग्नाचा होकार झाला व लग्न सोहळा 1840 मध्ये पार पडणार सावित्री सासरी पुण्यामध्ये गोविंदराव फुले यांच्या घरी नांदायला आल्या.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण :

सावित्रीबाई फुले यांचा विवाह बालवयात झाला होता कारण त्याकाळी बालविवाह करण्याची प्रथा रूढ होती. त्यामुळे नवव्याच वर्षी सावित्रीबाई सासरी आल्या. त्या काळात शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा शाळा नव्हती. त्यामुळे सावित्रीबाईला शिक्षणा शिवाय राहावे लागले. त्यांनी शाळा कधी पाहिली नव्हती.

इंग्रजांनी शाळा सुरू केल्यामुळे ज्योतिबांना तीन वर्ग पर्यंत शिक्षण देऊन ब्राह्मणांच्या दबावामुळे शाळा सोडावी लागली. परंतु गोविंदरावांचे मित्र आणि सगुनाबाई यांनी आग्रह केल्यामुळे ज्योतिबांना पुढचे शिक्षणासाठी स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेमध्ये टाकण्यात आले होते. तेव्हा ज्योतिराव शिक्षण घेत होते, सोबतच वडिलांना शेतातील कामांमध्ये सुद्धा मदत करत होते.

तेव्हा दुपारच्या वेळेला आपण शाळेमध्ये काय शिकतो. हे सावित्रीला ज्योतिबा वाचून दाखवत होते व समजावून सांगत होते. ज्योतीरावांना वाटले की, आपली पत्नी सुद्धा शिकली पाहिजे तेव्हा इंग्रजांनी मुलींची शाळा काढण्यासाठी पुण्यात भरपूर प्रयत्न केले परंतु पुण्यातील धर्म मार्तंड ब्राह्मणांनी मुलींचे शाळा काढण्यास विरोध केला.

त्यामुळे इंग्रजांना हे शक्य झाले नाही या कारणाने ज्योतिराव यांची मोठी पंचायत झाली, त्यांनी सावित्रीबाईला शिकवायचे ठरवले होते परंतु घरात पती- पत्नीला बोलायला सुद्धा मनाई होती. अशावेळी परिस्थिती जोतिबांनी सावित्रीला शिकवण्याचा दृढ निश्चय केला आणि सावित्रीला शिकावायला शेतामध्ये सुरुवात केली.

दररोज शाळा सुटल्यानंतर जोतिबा मळ्यामध्ये जाऊ लागले आणि सावित्रीबाई व त्यांची मावस बहीण सगुनाबाई यांना जमिनीची पाटी करून गाडीचे पेन करून बाराखडी शिकवायला सुरुवात केली तेव्हा झाडांची पाणी तोडून एक-दोन मोजणी करून त्यांच्याकडून उजळणी करून घेऊ लागले जमिनीच्या पाठीवर शंभर पर्यंत पाढे आणि संपूर्ण मराठी बाराखडी शिकवली.

त्यानंतर त्यांनी गणित, वनस्पती, प्राणी व शब्दरचना यांची सुद्धा त्यांना ओळख करून दिली. सावित्रीबाईला शिक्षणाची खूप जिज्ञासा होती, त्यामुळे अशा पद्धतीने त्या पुस्तकाचे लागल्या बेरीज, वजाबाकी समजू लागल्या. सावित्रीचे शिक्षण किती झाले हे कसे ठरणार? यासाठी एखादी शाळा हवी त्यामुळे सगुनाबाई मिस्टर जॉन नावाच्या मिशन याच्या मुलांना सांभाळत असतात. त्यामुळे तिचा पुण्यातील इंग्रज महिलांशी संपर्क होता.

मिसेस मिसेल यांनी पुण्यातील छबीलदास यांच्या वाड्यामध्ये एक नॉर्मल स्कूल चालवली होती. त्यामुळे नॉर्मल स्कूल म्हणजेच आजच्या अध्यापक विद्यालयासारखाच एक प्रकार होता. सगुनाबाईने जोतिबांना सांगून मिसेलची तेथे भेट घेतली आणि सावित्री व सगुनाबाईंना नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश देण्याची त्यांना विनंती केली. ज्योतिबा दुसरे दिवशी सावित्री आणि सगुनाबाईंना घेऊन नॉर्मल स्कूलमध्ये गेले. त्यांना परीक्षा देण्याविषयी सांगितले, त्या दोघीही त्यांच्या परीक्षेत पास झाल्या. त्या दोघींनाही तिसऱ्या वर्गात प्रवेश मिळाला. त्या दोघीनी जिद्दीने अभ्यास करून अध्यापिकेची पदवी सुद्धा संपादन केली.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य :

सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देणे हे महत्त्वाचे कार्य केले आहे कारण या देशांमध्ये दोन हजार वर्षापासून दोन ते तीन टक्के लोकच शिक्षण घेत होते किंवा त्यांना अधिकार होता. शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. त्यांच्या स्त्रियांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्यांच्या या कर्मठ धर्माच्या दृष्टिकोनातून त्यांचीही स्त्री ‘चूल आणि मुल’ यासाठी वापरण्याची वस्तू होती. तिला सन्मानाने जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. अशा काळात आणि पेशवाईच्या पुण्यात फुले दांपत्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले होते.

ज्योतिरावांनी पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने गंजपेठ येथील जागेमध्ये मुलीची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली. हा दिवस भारतातील लोकांसाठी शिक्षणाचा क्रांती दिवस ठरला. महिला शिक्षकेचा प्रथम मान हा सावित्रीबाई फुले यांना मिळाला. सावित्रीबाई फुले या शाळेमध्ये शिक्षका म्हणून काम केले असे नाही तर त्यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवावरून व निरीक्षणावरून अनेक शिक्षण शास्त्र विषयक निष्कर्ष काढून ते अंमलात आणून मागासवर्गीय मुलांचा शैक्षणिक विकास केला तसेच समाजातील दुर्बल घटकांना दूर केले पाहिजे असा त्यांचा दृढ निश्चय होता.

स्त्रियांना किंवा मुलींना शिक्षण देणे हे त्यांचे प्राथमिक कार्य होते. तेव्हा सावित्रीबाईंनी ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुले मुली येतात. त्यांचा बरा वाईट परिणाम संबंधित मुला-मुलींच्या शिक्षणावर होत असतो. त्यामुळे उच्च वर्णातील शिक्षके शूद्र जातीतील मुलांना जवळ करणार नाहीत आणि उच्च जातीतील मुलांनाच जवळ करीत असतील तर त्यांचा परिणाम समाजातील मुलांच्या मुलांवर होतो.

त्यामुळे यांचे खच्चीकरण होते असा सिद्धांत सावित्रीबाई फुले यांनी काढला. या व्यतिरिक्त विधवा विवाह महिला संघाची त्यांनी स्थापना सुद्धा केली तसेच अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला. फुले यांनी वस्तीगृह सुरू केले त्यामध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी आईप्रमाणे शिक्षणाची दारे खुली केली. गरीब परिस्थितीमुळे शहरांमध्ये येऊन शिक्षण घेणे सोपे नव्हते, तरी सुद्धा अशा मुला मुलींसाठी आपल्या घरातच त्यांनी वस्तीगृह सुरू केले होते.

सावित्रीबाई फुले यांचे साहित्य :

सावित्रीबाई फुले ह्या उत्तम लेखिका व कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी काव्य, फुले आणि बावनकाशी ‘सुबोध रत्नाकर’ प्रकाशित केले तसेच ‘जा शिक्षण मिळवा’ नावाची कविता देखील त्यांची प्रकाशित झालेली आहे.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू :

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 10 मार्च 1897 मध्ये झाला. बुबोलिक प्लेगची साथ जगभर पसरली होती. तेव्हा गायकवाड यांच्या मुलाला महार वस्तीत प्लेट झाला होता या जगात सावित्रीबाई फुले यांनी त्यांना पाठीशी धरून रुग्णालयात नेले, तेव्हाच सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती व त्यांचा मृत्यू झाला.

सन्मान :

सावित्रीबाई फुले यांचा पुणे येथील शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने खुले पती-पत्नीचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला होता. शाळांना सरकारी अनुदान सुद्धा देऊ केले होते. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालिका दिन’ म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

FAQ

सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते?

खंडोजी नेवसे पाटील.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

3 जानेवारी 1831.

सावित्रीबाई फुले यांचे लग्न कोणत्या वयात झाले?

1840 मध्ये वयाच्या नव्या वर्षी.

भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे?

सावित्रीबाई फुले.

महिला सेवा मंडळ कोणी सुरू केले?

सावित्रीबाई फुले.

Leave a Comment