शेजवान चटणी मराठी Schezwan Chutney Recipe in Marathi

शेजवान चटणी मराठी Schezwan Chutney Recipe in Marathi  महाराष्ट्रीयन थाळी असो किंवा भारतीय थाळी असो त्यामध्ये चटणीला खूप महत्त्व असते. ग्रामीण भागात तर जेवणामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल चटणी, कोल्हापुरी चटणी, किंवा मग टोमॅटो चटणी अशा विविध पद्धतीने चटणी बनवून खाल्ली जाते. आज आपण शेजवान चटणी रेसिपी विषयी बोलणार आहोत. शेजवान चटणी ही चायनीज रेसिपी असून खायला अप्रतिम लागते. रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये आजकाल शेजवान चटणीला खूपच मागणी असते. रेस्टॉरंट पेक्षाही स्वादिष्ट चटणी आपण आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

 Schezwan Chutney

शेजवान चटणी मराठी Schezwan Chutney Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

चटणी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, शेजवान चटणी, हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेची चटणी टोमॅटो चटणी अशा कित्येक प्रकारच्या चटणी रेसिपी बनवल्या जातात. परंतु शेजवान चटणी ही चवीला अप्रतिम लागते म्हणून या चटणीला बाजारपेठेत खूप मागणी असते बाजारपेठेत मिळणाऱ्या चटणी पेक्षाही स्वादिष्ट चटणी आपण आपल्या घरी बनवू शकतो आणि तेही अल्पसामग्रीमध्ये तसेच त्याचा येणारा खर्चही खूप कमी असतो. तर चला मग जाणून घेऊया शेजवान चटणीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही चटणी किती व्यक्तींकरता बनवणार आहे ?
शेजवान चटणी ही रेसिपी आपण 8 व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

शेजवान चटणी तयार करण्याकरता आपल्याला पूर्वतयारी करता केवळ 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

शेजवान चटणी कुठून करण्याकरता आपल्याला केवळ 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

शेजवान चटणी रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला फक्त 15 मिनिटे एवढाच वेळ लागतो.

शेजवान चटणी तयार करण्याकरता लागणारे साहित्य :

1) 20 काश्मिरी लाल मिरच्या
2) एक चमचा आले पेस्ट
3) तीन चमचे व्हिनेगर
4) एक चमचा सोया सॉस
5) 20 लसूण पाकळ्या
6) चवीनुसार मीठ
7) एक वाटी तेल

शेजवान चटणी बनवण्याची पाककृती :

  • रसमलाई रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम कोरड्या लाल मिरचीचे देठ काढून टाका. जर तुम्हाला चटणी जास्त मसालेदार नको असेल तर तुम्ही मिरचीच्या आत असलेल्या बिया काढून टाकू शकता.
  • आता मिरच्या अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. अर्ध्या तासानंतर मिरच्या फुलल्यानंतर मऊ होतात.
  • आता लाल मिरचीची पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची हलकी बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यामध्ये पाणी घालू नका.
  • आता आमची बारीक पेस्ट तयार आहे. पाण्यात भिजवल्यामुळे ती अगदी सहज बारीक होते. आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया.
  • एक पॅन मंद आचेवर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाका ही चटणी बनवण्यासाठी तेल थोडे जास्तच वापरा.
  • तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेले लसूण घाला. आले लसूण ची पेस्ट बनवली तरीही चालेल. आले लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
  • आले आणि लसणाचा रंग बदलला की त्यात मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा.
  • दोन ते तीन मिनिटे ढवळत राहा आणि ती तेलाने चांगली शिजवणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा मिरचीचा चटपटीतपणा कमी होणार नाही.
  • ढवळत असताना दोन-तीन मिनिटे शिजवा, आता झाकून ठेवा आणि 5 मिनिटे शिजवा आणि 5 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की चटणी चांगली शिजत आहे.
  • आता त्यात 4 ते 5 चमचे पाणी टाका, जर तुम्हाला ही चटणी थोडी घट्ट व्हायची असेल तर तुम्ही त्यात कमी पाणी घालू शकता आणि जर तुम्हाला ही चटणी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही त्यात थोडे जास्त पाणी घालू शकता.
  • पण जास्त पाणी घातल्याने चटणी जास्त वेळ बरोबर राहत नाही, त्यामुळे त्यात कमीत कमी पाणी वापरावे.
  • आता ही चटणी 10 मिनिटे शिजवा आणि 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की चटणी चांगली शिजली आहे.
  • आता त्यात व्हिनेगर आणि एक चमचा सोया सॉस टाका आणि चटणीसोबत चांगले मिसळा.  व्हिनेगर आणि सोया सॉसमुळे या चटणीला चायनीज फूडची चव येते, सोया सॉस घातल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • मीठ घातल्यावर चटणी एकदा नीट मिसळा आणि आता पुन्हा एकदा झाकून ठेवा आणि चटणी 5 मिनिटे शिजवा.  जेणेकरून सॉसची चव येते.
  • पाच मिनिटानंतर चटणी पूर्ण शिजली की गॅस बंद करून घ्या. आता गरमागरम चटणी तयार आहे. ही चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. तुम्ही ही चटणी पराठ्यासोबत भातासोबत खाऊ शकता.
  • या चटणीची चव अतिशय स्वादिष्ट असते बाजारात मिळणाऱ्या चटणीपेक्षाही घर बनवलेली शेजवान चटणी खूप छान लागते बाजारामध्ये खूप महागडे रेट ची शेजवान चटणी आहे त्यामुळे घरी बनवलेली चटणी स्वस्तही पडते. तुम्ही रेसिपी बनवून बघावा आम्हाला नक्की कमेंट करुन सांगा.

पोषक घटक :

शेजवान चटणी ही लाल मिरची पासून तयार केले जाते त्यामुळे त्या मिरचीमध्ये जीवनसत्व अ ब क आणि ई असतात तसेच त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस ही खनिजे देखील असतात. तसेच मिरचीमध्ये कॅप्सायसीन नावाचे ऍसिड असते. त्यामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.

फायदे :

शेजवान चटणी खाल्ल्यामुळे तुम्हाला जर श्वसनाचा त्रास होत असेल तर तो त्रास कमी होतो, तसेच पोट दुखीचा त्रास असेल तर ही चटणी खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास देखील कमी होतो.

जेवनात तिखटाचे प्रमाण वाढले असता, आपल्याला जेवण चांगले जाते व जेवणाची इच्छा होते.

तुम्हाला जर कॉलर सारख्या आजाराची भीती असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये लाल मिरचीचा वापर करावा परंतु त्यासाठी त्याच्या बिया वेगळ्या काढाव्यात.

लाल मिरची नेहमीच खाल्ल्यामुळे शरीराचे चयापचय क्रिया सुधारते तसेच शरीराला भरपूर प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात आणि कॅलरी नियंत्रित करण्यासाठी देखील मिरची चटणी खाल्ल्याने मदत होते.

तोटे :

कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच तिचा शरीराला फायदा होतो. चटणी ही मिरची वर अवलंबून असते जर मिरची तिखट असेल तर ती चटणी खूप तिखट असते. आणि अति तिखट चटणीची आपण सेवन केले तर ते आपल्याकरता धोकादायकच असते.

अतिचटणी खाल्ल्यामुळे पोटदुखीचा त्रास आपल्याला जाणवू शकतो. तसेच ऍसिडिटीचा त्रासही आपल्याला जाणवू शकतो. म्हणून आपण योग्य त्या प्रमाणात शेजवान चटणी खाल्ली पाहिजे.

तर मित्रांनो शेजवान चटणी रेसिपी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment