सर्व्हर म्हणजे काय? | server meaning in marathi

सर्व्हर म्हणजे काय? (server meaning in marathi)

मित्रांनो तुम्ही अनेक वेळा सर्व्हर हा शब्द ऐकला असेल. खासकरून बँकेत. काही वेळेला आपल्याला बँकेत गेल्यावर सांगितले जाते की Server Down झालंय किंवा Server Error येतोय. मग तुम्हाला अनेक वेळा प्रश्न पडला असेल की मग हे सर्व्हर काय आहे. तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सर्व्हर विषयी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये सर्व्हर काय आहे, सर्व्हर काम कसं करतो, सर्व्हर डाऊन का होत, सर्व्हरचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत हे आज आपण जाणून घेऊया. चला तर मग पाहुयात.

सर्व्हर काय आहे (What is server in marathi):

सर्व्हर एक प्रकारचा कॉम्प्युटर असतो जो दुसऱ्या कॉम्प्युटरला किंवा वापरकर्त्याला सेवा देतो. तो एक प्रकारचा hardware device, एखादा कॉम्प्युटर किंवा
एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम असू शकतो जो कॉम्प्युटर मध्ये load केलेला असतो. त्यामुळे तो दुसऱ्या कॉम्प्युटरला डाटा आणि माहिती पाठवू शकतो.

सर्व्हरच कामचं आहे की इंटरनेटवरील युजर्सना सेवा देणं. म्हणजेच युजरला ती सगळी माहिती देणं जी त्याला गरजेची आहे किंवा जी तो जाणून घेणार आहे. जसं की आपण यूट्यूब वर व्हिडिओ पाहतो किंवा ब्राऊझर वर जाऊन काही सर्च करतो तेव्हा आपल्यासमोर जे परिणाम येतात ते व्हिडिओ किंवा माहिती कोठे ना कोठे अगोदरच साठवलेली असते. जी आपण सर्व्हरला request केल्यावर दाखवली जाते.

गूगल जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. जेथून आपण आपल्याला जी माहिती जो डाटा लागणार आहे तो सर्च करत असतो. तेव्हा गूगल आपल्याला तो सर्व डाटा वेगवेगळया वेबसाईटच्या सर्व्हर वरून आपल्याला दाखवतो. सर्व्हर एका कॉम्प्युटर प्रमाणे असतो आणि जगामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे सर्व्हर उपलब्ध आहेत.

सर्व्हर काम कसं करतो (how server works)

हे आपण एका उदाहरणादाखल समजून घेऊ. समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ पहायचा आहे, मग तुम्ही तो यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये त्या व्हिडिओच नाव सर्च करणार. आपण सर्च केलेले नाव एका विनंती मध्ये रूपांतर होते. आणि ही विनंती इंटरनेट च्या माध्यमातून यूट्यूबच्या सर्व्हर वर जाते. जेथे हा सर्व डाटा साठवलेला असतो. तेथे सर्व्हर आपण विनंती केलेल्या व्हिडिओला शोधून तुमच्यासमोर दाखवतो. ज्यामुळे तुम्ही व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.

इंटरनेट वर आपण जितकी काम करतो ईमेल पाठवणे, फाईल डाऊनलोड करणे, ब्राउझिंग करणे, सोशल मीडिया या आणि अश्या सर्व कामासाठी सर्व्हरचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे आपल्या समोर डाटा उपलब्ध होतो.

सर्व्हर डाऊन का होत? (why server goes down?)

Client server architecture मध्ये एका सर्वरच काम असतं की आपल्या क्लायंटला सेवा पुरविणे. पण जेव्हा हे काम करण्यामध्ये सर्व्हर असफल होतो तेव्हा सर्व्हर डाऊन झालं असं म्हणतात.
याचाच अर्थ की server not found आणि server not responding असे संदेश आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा त्या सर्व्हरच्या युजरला तिथं पर्यंत पोहचता येत नाही. परंतु सर्व्हर डाऊन होण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यामधील मुख्य कारणे Network problem, Application crash, operating system crashes, power failure, DOS attack ही असतात.

सर्व्हरचे वेगवेगळे प्रकार (Types Of Server):

कॉम्प्युटर नेटवर्किंगच्या दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर आहेत. सर्व्हर एक प्रकारची मशीन आहे, ज्यांना वेगवेगळ्या मशीन बरोबर जोडण्यासाठी केला जातो.

1) फाईल सर्व्हर (File Server):

फाईल सर्व्हर एक असं सर्व्हर असतं ज्यामध्ये फाईल स्टोअर आणि नियंत्रित केली जाते. याबरोबरच फाईल सर्व्हर युजरला फाईल शेअर करण्याची परवानगी देतो.

2) डाटाबेस सर्व्हर (Database Server):

डाटा बेस सर्व्हर एक कॉम्प्युटर सिस्टीम आहे ज्याच कार्य डाटाबेस मधील डाटा ॲक्सेस करणे आणि त्या संबंधीत कामासाठी केला जातो. काही कंपन्या डाटा स्टोअर करण्यासाठी या सर्वरचा उपयोग करतात.

3) वेब सर्व्हर (Web Server):

वेब सर्व्हर आहे जे वेबसाईटला चालवते. याला कॉम्प्युटर प्रोग्राम अससुद्धा म्हणतात. याच मुख्य कार्य युजरला Web page Store, Process आणि Delivar करणे हे आहे. यामध्ये Communication करण्यासाठी HTTP (Hyper Text Transfer Protocol) चा उपयोग केला जातो. इंटरनेट वर जितक्या वेबसाइट्स आहेत त्या सर्वांचा डाटा वेब सर्व्हर वर साठवला जातो. वेब सर्व्हर, वेब ब्राउजरच्या माध्यमातून वेब पेज युजरला दाखवते.

4) प्रॉक्सी सर्व्हर (Proxy Server):

Proxy Server याला Proxy असं सुद्धा म्हणतात. हे युजर आणि इंटरनेट यांच्या मध्ये एका गेटवेच काम करतो. हे Network Connection Sharing, Network Data Filtering आणि Data Catching करण्यासाठी Client Program आणि External Server यांच्या मध्ये एका Mediator च काम करतो.

5) मेल सर्व्हर (Mail Server):

Mail Server म्हणजेच ईमेल सर्व्हर एक कॉम्प्युटर सिस्टीम आहे जी ईमेल पाठवते आणि ईमेल रिसिव्ह करते. Mail Server ला Mail Server Transfer Agent (MTA) किंवा Internet Mailer सुद्धा म्हणतात. यामुळेच आपण ईमेल पाठवल्या पाठवल्या लगेच पोहचतो.

6) ॲप्लिकेशन सर्व्हर (Application Server):

यामध्ये असं वातावरण असतं की जेथे ॲप्लिकेशन रण केले जातात. ॲप्लिकेशन सर्व्हर एक सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आणि एक सर्व्हर hardware च असतं. सर्व ॲप्लिकेशन विकसित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी ॲप्लिकेशन सर्व्हरचा वापर केला जातो.

7) FTP सर्व्हर (File Transfer Protocol Server):

इंटरनेट वर दररोज हजारो फाइल्स एका कॉम्प्युटर पासून दुसऱ्या कॉम्प्युटर वर पाठवल्या जातात. यामधील जास्त करून फाइल्स File Transfer Protocol च्या माध्यमातून transfer केल्या जातात. यालाच संक्षिप्त मध्ये FTP असं म्हणतात. FTP जगातील कोणत्याही कॉम्प्युटर बरोबर फाईल transfer करण्याची एक पद्धत आहे.

निष्कर्ष:

आशा करतो की सर्व्हर म्हणजे काय? ( server meaning in marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला यामधून नवीन काही माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment