शाही काजू करी मराठी | shahi kaju curry recipe

शाही काजू करी मराठी | shahi kaju curry recipe

नमस्कार खवय्ये मंडळी आपल्यातील अनेक जण हे काजू प्रेमी असतील मग त्यांना शाही काजू करी ( shahi kaju curry recipe ) आवडतच असेल.
पण सध्या लॉकडाऊनच्या काळात हॉटेल मध्ये जाऊन खाणे खूप कठीण काम झाले आहे आणि हॉटलच्या जेवणाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत.
त्यामुळे आज ह्या लेखात आपण शाही काजू करी कशी बनवायची हे पाहणार आहोत.

काजू करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ( shahi kaju curry recipe ingredients ) :

  • 3 मोठे कांदे.
  • 2 मोठे टोमॅटो.
  • 5 ते 6 काजू(वाटणासाठी)
  • 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या
  • आल्याचा तुकडा
  • खडे मसाले (2 ते 3 लवंगा, 2 तमालपत्र, दालचिनीचा बारीक तुकडा)
  • 2 ते 3 चमचे तेल किंवा बटर
  • अर्धा चमचा हळद
  • 2 मोठे चमचे दही
  • अर्धा चमचा जिरे
  • एक चमचा गरम मसाला
  • एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर
  • एक मोठी वाटी काजू(हे काजू भाजून घ्यावेत)
  • चवीनुसार मीठ
  • धने पूड


काजू करी बनवण्यासाठी लागणारे कृती ( shahi kaju curry recipe ingredients ) :

काजू भाजीत घालण्याआधी तुम्ही कढईत थोडं तेल घालून ते भाजून घेऊ शकता किंवा काही वेळ गरम पाण्यात भिजवून ही ठेऊ शकता. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण,5 ते 6 काजू यांची मिक्सर मधून बारीक पेस्ट वाटून घ्याची आहे.
एका कढईत तेल किंवा बटर गरम करून घ्यावे. त्यात जिरे टाकून चांगले तडतडू द्यावे.जिरे तडतडले की त्यात 2 3 लवंगा,2 3 तमालपत्र, एक दालचिनीची तुकडा घालवा.ह्यांच चांगला सुगंध सुटला की मिक्सर मधून बारीक केलेले वाटण त्यात घालावे (वाटण करताना पाण्याचा वापर करू नये कारण जर पाण्याचा वापर केला तर वाटण तेलात टाकताना शिंतोडे उडू शकतात.)

मसाल्याला तेल सुटेसपर्यंत चांगला तेलात भाजून घ्यावे. मसाल्याला तेल सुटले की तेल आणि मसाला काही प्रमाणात वेगळा दिसू लागेल. त्या मसाल्यात अर्धा चमचा हळद घाला.

एक चमचा गरम मसाला व एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घाला.(तुम्हाला जिकत तिखट हवा त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता.) मसाला चांगला परतून घ्या. या परतलेल्या मसाल्यात 2 मोठे चमचे दही, टोमॅटोचा आंबट पणा कमी व्हावा म्हणून साखर घालावी. व चवीनुसार मीठ घालावे.

हे सर्व जिन्नस घालून मसाला एकजीव करून घ्यावा. मसाल्यात 2 ते 3 कप गरम पाणी घालावे.व उकळी काढून घ्यावे.पाण्याचे प्रमाण हे तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी ह्यावर ठरवा. तुम्हाला हवा तितका दाटसर पणा आल्यावर त्यात काजू घाला व 5 मि. उकळी काढून गॅस बंद करा.

भाजी सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर घालून गारनिशिंग करावे व आवडत असेल तर थोडी क्रिम देखील घालू शकता.

Leave a Comment