शाही तुकडा मराठी Shahi Tukda Recipe In Marathi

शाही तुकडा मराठी Shahi Tukda Recipe In Marathi शाही तुकडा हा पदार्थ ब्रेड, दूध आणि काजू, बदाम पासून बनवला जातो. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. शाही तुकडा हा पदार्थ सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी शाही तुकडा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. शाही तुकडा हा एक पौष्टिक पदार्थ आहेत, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. रमजान, ईद सणाला शाही तुकडा रेसिपी जास्त प्रमाणात बनवली जाते.

शाही तुकड्यांचा उपयोग मिष्ठान्न म्हणून केला जातो. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट शाही तुकडा पदार्थ मिळते. काही लोकांना शाही तुकडा खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट शाही तुकडा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट शाही तुकडा कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण शाही तुकडा रेसिपी पाहणार आहोत.

शाही तुकडा मराठी

शाही तुकडा मराठी Shahi Tukda Recipe In Marathi

शाही तुकड्याचे प्रकार :

शाही तुकडा हा पदार्थ खूप स्वादिष्ट आणि गोड आहे, शाही तुकडा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे शाही तुकडा, खीर खुर्मा, रबरी, दूध लस्सी, शाही दूध हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
शाही तुकडा रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

शाही तुकड्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

शाही तुकडा रेसिपी तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो. यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

शाही तुकडा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

शाही तुकडा रेसिपी बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतो.

शाही तुकड्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 5 ते 6 ब्रेड.
2) 4 चमचे तूप.
3) अर्धा लिटर दूध.
4) 3 वाट्या साखर.
5) 1 चिमूट केसर.
6) 10 ते 12 बदाम.
7) थोडे काजू, पिस्ता.
8) थोडा खवा.
9) 2 चमचे गुलाबजल.

पाककृती :

  • सर्वात पहिले रेसिपी बनवण्या अगोदर 3 तास बदाम भिजू घाला, आणि नंतर त्याची साल काढा.
  • नंतर गॅस वरती एका खोल भांड्यात दूध उकडू घाला, आणि ढवळत रहा.
  • नंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या बदाम, एक चिमूट केसर, आणि इलायची टाका, यामध्ये थोडे पाणी टाकून.
  • बारीक पातळ पेस्ट तयार करून घ्या, आणि एका भांड्यात काढून घ्या,
  • नंतर दुधाला उकळी आली की, त्यामध्ये बदामचे मिश्रण टाकून चांगले मिक्स करा.
  • दूध खाली लागायला नको, ते सतत चमच्याने ढवळत रहा, नंतर यामध्ये थोडा खवा टाकून मिक्स करा.
  • काही मिनिट नंतर दूध घट्ट होणार, आणि सुगंधित वास तेव्हा दूध खाली काढून घ्या.
  • आता ब्रेडचे त्रिकोणी तुकडे तयार करा, आणि थोडा वेळ हवेत ठेऊन सुकू घ्या.
  • नंतर गॅस वरती एका भांड्यात थोडी साखर, आणि गुलाबजल टाकून घट्ट पाक तयार करा, आणि खाली काढून थंड होय द्या.
  • नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून, ब्रेडचे तुकडे लालसर तपकिरी होये पर्यत भाजून घ्या.
  • नंतर हे तुकडे पाकात टाकून चांगले भिजवून घ्या, आणि एका खोल प्लेटमध्ये एका बाजूला एक ठेवा.
  • नंतर या ब्रेडवर आपण तयार केलेले शाही दूध टाका, त्यावर थोडे काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे टाका.
  • अशा प्रकारे ब्रेडचे तुकडे सजवा, ब्रेडचे तुकडे थोड दूध शोषून घेणार 5 मिनिट हे तसेच राहू घ्या.
  • आता आपली स्वादिष्ट आणि गोड शाही तुकडा रेसिपी खाण्यासाठी तयार आहे, आपण एका छोट्या वाटीत घेऊन शाही तुकडा खायाचा आनंद घेऊ शकतो.

शाही तुकडामध्ये असणारे घटक :

शाही तुकडा बनवण्यासाठी दूध, काजू, बदाम, पिस्ता, या सारख्या पौष्टिक पदार्थचा उपयोग करतात.
यामुळे यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जसे कॅल्शियम, कॅलरी, व्हिटॅमिन, चरबी, फॅट, शुगर, कर्बोदके, फायबर, प्रथिने, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

शाही तुकडामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जसे कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

आणि आपले हाड, शरीर मजबूत राहते, यातील घटक आपल्या शरीराची वाढ करतात.

यामध्ये असणारे घटक चरबी, फॅट कर्बोदके हे आपल्या मासपेशी वाढवात.

शाही तुकड्यात असणारे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

शाही तुकडा पदार्थ आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला मळ-मळ आणि उलटी होय शकते.

यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात, हे आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून शाही तुकडा आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला शाही तुकडा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment