शाळा नसती तर…मराठी निबंध Shala Nasti Tar… Marathi Nibandh

Shala Nasti Tar… Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो, कोरोणाच्या महामारी मुळे सर्व जगातील लोकांना डाऊन या संकटाला सामोरे जावे लागले. त्यात आपणही होतो! अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ऑफिस, शाळा, कॉलेज बंद होती. मुले घरात होती शाळा बंद होत्या.

Shala Nasti Tar... Marathi Nibandh

शाळा नसती तर…मराठी निबंध Shala Nasti Tar… Marathi Nibandh

तेव्हा या विचारात असताना मला एक विचार मनात आला की, शाळा नसती तर ! मी विचारात दंग होऊन गेलो. तेव्हा मला आठवले की, आपण लहान असताना ‘उद्या शाळेला सुट्टी आहे’ किंवा ‘अर्ध्या दिवसाने शाळा लवकर सुटेल’ अशी नोटीस वर्गात आली की, वर्गात  आरडाओरडा सुरू होतो.

आम्हाला सर्वांना खूप आनंद व्हायचा. काही मुले तर शाळेत जाऊ नये म्हणून काहीतरी कारणे शोधून काढायची. काही मुले तर शाळेत जायचे नाही म्हणून चक्क रडायची असे असायचे. असे वाटायचे की शाळा बंद का करत नाही? शाळा नसत्या तर ….शाळा बंद झाली तर….अभ्यास नाही ,मनाला वाटेल ते खायचे, प्यायचे ,नाचायचे,बागडायचे नुसता आरडाओरडा करायचा. आम्हाला कोणीही अडवणार नाही.

परंतु नंतर असा विचार मनात आला की, त्याचा परिणाम काय होईल हे जाणून घेतले पाहिजे. आपल्याला शाळा कितीही आवडत नसली तरी त्या शाळेचे महत्त्व आपल्या जीवनात खूप आहे .मुलांची जडणघडण होण्यासाठी शाळा हे माध्यम खूप महत्त्वाचे आहे .

शिक्षणामुळे समाजात एक अस्थिरता निर्माण होते. शिक्षणामुळे व्यक्ती ,कुटुंब व पर्यायाने समाजाचा विकास होतो. शाळेतील काही गोष्टी कितीही त्रासदायक असल्या तरी ‘रम्य ती शाळा’ हेच खरे ! शाळेमध्ये जिवाभावाचे मित्र भेटतात. शाळा हे एक असे ठिकाण आहे की, ज्याला आपण विद्येचे मंदिर म्हणतो .

शाळा हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे .घराच्या चार भिंतीतून आईचे बोट सोडून प्रथम मुल बाहेरच्या जगात येते ते म्हणजे शाळा! शाळा हे एक असे माध्यम आहे हे मुलांना ज्ञान, संस्कार, शिस्त, एकता, बंधुता हे गुण आत्मसात करायला मदत करते. जर शिक्षण नसते तर ,आपल्याला भाषेचे ज्ञान आले नसते .

संवाद व चर्चेचे महत्व कळले नसते. गणिती व वैज्ञानिक संकल्पना कळल्या  नसत्या. आज या शिक्षणामुळे मानवाने कितीतरी शोध लावले आहेत. तंत्रज्ञान विकसित केले आहे .मुले अशिक्षित राहिली तर देशाची प्रगती होणार नाही. वैज्ञानिक क्षेत्रात, खेळाच्या क्षेत्रात, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात मानवाने प्रगती केली तर देशाची प्रगती होईल, पण त्या प्रगतीमागे शिक्षण हे महत्त्वाचे आहे .

विज्ञानामुळे माणूस रोज नवनवीन शोध लावत आहे. त्या शिक्षणामुळे आपण रोज मोबाईल ,कॉम्प्युटर ,टीव्ही, मिक्सर, वॉशिंग मशीन अशी उपकरणे आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो .यामुळे आपली कामे सोपी होऊन ,वेळही वाचतो.

पण या शिक्षणामुळेच विज्ञान व तंत्रज्ञान ची भेट आपल्याला मिळाली आहे .त्यामुळे मानवाच्या प्रगतीसाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. मानवी विकास व सामाजिक बदल यामध्ये सातत्य राखण्यासाठी शाळा नसून चालणार नाही ! शाळा ही खूप महत्त्वाची आहे.

आज अशी परिस्थिती आहे की आई-वडील दोघेही कामासाठी बाहेर जातात. तेव्हा शाळा हे असे ठिकाण आहे की, जेथे लहानपणीच मुलांवर संस्कार केले जातात .शाळेतील स्नेहसंमेलन, नाटक, शाळेत केलेली धमाल ,शाळेतील सहली, श्रमदानाचे कार्यक्रम आणि वनभोजन, क्रीडा स्पर्धा ,बक्षीस समारंभ या सार्‍या गोष्टी शाळा बंद पडल्या तर अनुभवायला मिळणार आहेत.

शाळेमुळे आपल्याला कबड्डी, खो-खो, क्रिकेट, वॉलीबॉल असे खेळ खेळले जातात . जर शाळा बंद पडल्या तर असे सामने रंगतील का ! शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक आई असते. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बऱ्याच कडू आणि गोड आठवणी असतात. शाळेमध्ये शिकताना फार मोलाचे संस्कार त्यांच्या मनावर उमटलेले असतात .

म्हणून माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या शाळेला कधीही विसरू शकत नाही .आता मी असे उदाहरण देतो की, आज  लॉक डाउन मध्ये मुले घरात होती. ऑनलाईन शिक्षण चालू होते, पण  शाळा ती शाळाच असते. जे आपल्याला शिक्षक फळ्याशेजारी शेजारी उभे राहून शिकवतात तेच खरे शिक्षण.

आज ऑनलाईन शिक्षणामुळे सगळ्यात चुकीचे म्हणजे मोबाईल हा मुलांच्या हातात गेला आहे .मोबाईल चांगला आहे तसा तो वाईटही आहे. परंतु या लोक डाऊन मुळे मुलांना आता शाळा ही किती महत्त्वाची आहे हे उमजले आहे !प्रथम मुलांना खूप छान वाटले की, आता शाळा बंद झाल्या आहेत.

आता आपण घरी मज्जा, मस्ती करू! पण कालांतराने जसेजसे दिवस पुढे  गेले तशी तशी मुलांनाही शाळेची आठवण येऊ लागली व मुलांनाही आपल्या शाळा कधी चालू होणार असे वाटू लागले. म्हणजे शाळा कितीही न आवडती असली तरीही त्या शाळेशिवाय आपण जगू शकत नाही हे खरे !!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment