स्पेशल कचोरीची रेसिपी | shegaon kachori recipe in marathi

स्पेशल कचोरीची रेसिपी | shegaon kachori recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो , शेगावची कचोरी हा शेगाव मधला प्रतिष्ठित पदार्थ आहे.
शेगावला रोज लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येत असतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक किंवा मनुष्य ही कचोरी खाणयाचा मोह आवरू शकत नाही. 
तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरीची रेसिपी बघणार आहोत.

शेगाव स्पेशल कचोरीची साहित्य ( shegaon kachori recipe ingredients ) :

  • २-३ कप मैदा
  • 1 कप तेल
  • 1/2 कप बेसन
  • 1/२ चमचा लाल तिखट
  • 1/4 चमचा हळद
  • 1/2 चमचा आमचूर पावडर
  • 1 चमचा  गरम मसाला
  • 1 चमचा कसुरी मेथी
  • 1 चमचा मोहरी
  • 2 चमचे जिरे
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 7-8 लसूण पाकळ्या
  • बारीक आल्याचा तुकडा
  • तळण्यासाठी तेल
  • 1 चमचा धने
  • 1 चमचा बडीशेप
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार पाणी

बनवण्यासाठी लागणारा वेळ : ३०-४० मिनिट

शेगाव स्पेशल कचोरीची कृती ( shegaon kachori recipe steps ) :

सर्वप्रथम एका वाटीमध्ये मैदा घ्यावा व त्यात तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यावे.

पिठाचा जर मुटका होत असेल तर समजून घ्या की आपण जेवढं तेल घातलं ते पिठाला पुरेस झालं आहे.
आता मैद्यामध्ये थोड पाणी घालावं त्याचा गोळा बनवून घ्यावा. हा तयार गोळा १५-२० मिनिट बाजूला झाकून ठेवावा असे केल्याने पीठ छान मऊ बनेल.

आत्ता आपण कचोरी च स्टफिंग बनवून घेऊयात.

त्यासाठी एक कढई घ्या व त्यात धने,जिरे आणि बडीशेप घालावी व ती छान भाजून घ्यावी.
धने,जिरे आणि बडीशेप व्यवस्थित भाजून झालं की त्याला मिक्सर च्या भांड्यात टाकावे व त्याची जाडसर पूड बनवून घ्यावी.

आता पूड डिश मध्ये काढून घ्यावी आणि त्याच भांड्यात हिरवी मिरची चे काप,लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घालावे व त्याची पेस्ट बनवून घ्यावी.

आता कढईमध्ये तेल घालावे व तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी,जिरे घालावे आणि छान तडतडू द्यावी.
जिरे,मोहरी छान तडतडली की त्यात आल,लसूण, मिरचीची पेस्ट घालावी आणि छान तेला मध्ये परतून घ्यावी.

पेस्ट छान परतून घायवी व त्यात लाल तिखट, हळद,गरम मसाला,आमचूर पावडर आणि कसुरी मेथी घालावी आणि सर्व मसाले तेला मध्ये परतून घ्यावे.

मसाले छान परतून घेतले की त्यात बेसन घालावे आणि बेसन छान भाजून घ्यावे व बेसनाचा छान खरपूस वास आला की की समजायचं की आपल बेसन छान भाजल आहे. आता त्यावर थोड थोड पाण्याचा हपका माराव व बेसन छान ओल होईल एवढं पाणी घालाव.

आता चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि बेसन २-३ मिनिट झाकून ठेवावे चांगले शिजवून घ्यावे. कचोरी च स्टफिंग तयार झालं की ते थंड करून घ्या.

आता पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे व आत्ता एक गोळा घ्या आणि त्याची पुरी बनवून घ्यावी .ही पुरी मध्ये जाड आणि त्याचे काठ पातळ राहुद्या .आता त्यात तयार स्टफिंग घालावे आणि स्टफिंग व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्या आणि कडा एकत्र कराव्या व कचोरी चा आकार देऊन घ्यावा.

आता कढई मध्ये तेल गरम करावे.
तेल गरम झाले की त्यात एक एक कचोरी घालावी व मध्यम आचेवर छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. अश्याप्रकरे सर्व कचोऱ्या तळून घ्या.
आपली शेगाव स्पेशल कचोरी तयार आहे.गरमागरम सर्व्ह करायला तयार आहे.

Leave a Comment