शेंगोळे रेसिपी मराठी Shengole Recipe In Marathi शेंगोळे हा पदार्थ गहू, ज्वारीचे पीठ आणि बेसन पासून बनवला जातो. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. विविध ठिकाणी शेंगोळे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, शेंगोळे ही एक पारंपरिक रेसिपी आहे. जे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात बनवली जाते. अगदी कमी वेळात आपण घरीच शेंगोळे बनवू शकतो, हा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध पदार्थ आहे.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट वरती पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार शेंगोळे खाण्यासाठी मिळतात. काही लोकांना शेंगोळे खूप आवडतात, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट शेंगोळे मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने चवदार शेंगोळे कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण शेंगोळे रेसिपी पाहणार आहोत.
शेंगोळे रेसिपी मराठी Shengole Recipe In Marathi
शेंगोळेचे प्रकार :
शेंगोळे हा एक पौष्टिक आणि चवदार पदार्थ आहे, विविध ठिकाणी शेंगोळे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. जसे मसाला शेंगोळे, तिखट शेंगोळे, गोड शेंगोळे, सुक्के शेंगोळे हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
शेंगोळे रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
शेंगोळेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
शेंगोळे तयार करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
शेंगोळे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
शेंगोळे बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावे लागतात, यासाठी आपल्याला टोटल टाईम 55 मिनिट वेळ लागतो.
शेंगोळेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 वाट्या गव्हाचे पीठ.
2) 2 वाट्या ज्वारीचे पीठ.
3) अर्धी वाटी बेसन.
4) 1 चमच हळद.
5) 3 चमचे लसूण-अद्रक पेस्ट.
6) 1 चमच हिरवी मिरची पेस्ट.
7) 1 चमच मिरची पावडर.
8) थोडी कोथिंबीर.
9) 1 चमच अजवान.
10) थोडी मोहरी.
11) तेल, मीठ.
पाककृती :
- सुंठवडा मराठी
- सर्वात प्रथम बेसन, गव्हाचे आणि ज्वारीचे पीठ चांगले गाळून घ्या, आणि नंतर एका प्लेटमध्ये काढा.
- नंतर यामध्ये थोडी हळद, अजवान, मीठ, लसूण-अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून चांगले मिसळून घ्या.
- नंतर यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाकून, थोडे-थोडे पाणी टाकून चांगले मळून घ्या.
- चांगले घट्ट मिश्रण तयार करा, मिश्रण जास्त पातळ होयाला नको, मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करा.
- नंतर 10 मिनिट बाजूला ठेऊन घ्या, म्हणजे चांगला मुरेल आणि आपले शेंगोळे छान तयार होतील.
- आता गॅसवरती एक खोल तळाची कढई ठेऊन त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, यामध्ये थोडी मोहरी आणि जिरे टाका, आणि चांगले तळ-तळ होऊ द्या.
- नंतर यामध्ये लसूण-अद्रक पेस्ट टाका, आणि कच्चा वास निघे पर्यत पेस्ट चांगला भाजून द्या, तो पर्यत परतवत रहा.
- नंतर गरम मसाला आणि थोडी मिरची पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्या, आणि 1 मिनिट शिजवू द्या.
- नंतर यामध्ये थोडे पाणी टाकून मसाला चांगला होऊ द्या, वरून थोडी बारीक कोथिंबीर टाका.
- आता आपले पिठाचे मिश्रण घ्या, त्याचे लहान-लहान गोळे तयार करून घ्या, नंतर गोळे गोल लाटून घ्या.
- नंतर मध्यभागातून फोल्ड करून, दोन्ही टोके जोडून घ्या, अशा प्रकारे सर्व शेंगोळे तयार करून घ्या.
- सर्व शेंगोळे तयार झाले की, उकळत्या मसाल्यात टाका, एकदा चांगले मिक्स करून घ्या.
- नंतर यामध्ये चवीनुसार थोडे मीठ टाकून, झाकण ठेऊन चांगले 15 मिनिट शिजवू द्या, नंतर यावर थोडी बारीक कोथिंबीर टाका.
- आता आपले स्वादिष्ट आणि मसालेदार शेंगोळे खाण्यासाठी तयार आहेत, आपण एका प्लेटमध्ये घेऊन याबरोबर थोडा कांदा, लिंबू घेऊन शेंगोळे खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
शेंगोळेमध्ये असणारे घटक :
शेंगोळे हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे, हा विविध प्रकारचे साहित्य पासून बनवला जातो. यामुळे यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन, अल्कोहोल, प्रोटीन, चरबी, फॅट, कॅलरी, पोटॅशियम हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
शेंगोळे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन सारखे घटक मिळतात.
यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, आणि आपण निरोगी राहतो.
यामध्ये असणारे चरबी, फॅट, कॅलरी अल्कोहोल हे घटक आपला हाडाची आणि शरीराची वाढ करतात.
शेंगोळेमध्ये असणारे सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
शेंगोळे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, आपण हा पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.
म्हणून शेंगोळे आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला शेंगोळे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.