शेपू भाजी रेसिपी मराठीत Shepu Bhaji Recipe in Marathi

शेपू भाजी रेसिपी मराठीत Shepu Bhaji Recipe in Marathi  शेपूची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. हिरव्या पालेभाज्याखाली कधीही आपल्या हिताच्याच असतात. परंतु बरेच लोक शेपूची भाजी खात नाहीत. किंवा त्यांना शेपूच्या भाजीची चव देखील आवडत नाही; परंतु शेपूची भाजी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच विविध आजारांपासून दूर राहतो. पचनक्रिया सुरळीत होते, पोट साफ होते. भाजी मधील खनिजे विटामिन्स देखील तेवढेच आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. म्हणून शेपूची भाजी आपण नियमित खायला पाहिजे किंवा तिचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. तर चला मग पाहूया शेपूची भाजी या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

Shepu Bhaji Recipe in Marathi

शेपू भाजी रेसिपी मराठीत Shepu Bhaji Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

शेपूची भाजी तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. शेपूची भाजी खाणारे खूपच कमी लोक आहेत. परंतु त्या भाजीची गुण लक्षात घेता आपण स्वतःची भाजी खायला पाहिजे शिपूची भाजी विविध पद्धतीने करतात उदाहरणार्थ मुंगडाळ शेपू, तुर डाळ शेपू, शेंगदाणे शेपू, मसाला शिपू, हिरवी मिरची शेपू इत्यादी प्रकार आहेत. चिकूची भाजी खाण्यासाठी अप्रतिम व सर्व गुणसंपन्न आहेत. आपण आहारामध्ये शेपूच्या भाजीचा समावेश करायला पाहिजे. तर चला मग आज जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती

ही रेसिपी आपण किती व्यक्तींकरता तयार करणार आहोत ?
ही रेसिपी आपण चार व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

शेपूच्या भाजिची पूर्वतयारी करत असताना धुवावी लागते, तसेच ती साफ करावी लागते. त्याकरिता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

शेपूची भाजी कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

शेपूची भाजी ही रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला टोटल 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

शेपूच्या भाजी करता लागणारे साहित्य :

1) शेपूची भाजीची एक जुडी
2) हिरव्या मिरच्या तीन
3) फोडणीसाठी तेल
4) पाव चमचा मोहरी
5) पाव चमचा हळद
6) मेथीदाणे
7) एक चमचा लसूण पेस्ट
8) पाव कप भिजवलेले शेंगदाणे
9) दोन ते तीन चमचे भिजवलेली तूर डाळ
10) अर्धा चमचा भाजणीचे पीठ
11) चवीपुरते मीठ.

शेपूची भाजी रेसिपी करण्याची पाककृती :

  • कांदा लसूण मसाला मराठी
  • सर्वप्रथम आपली शेपूची भाजी निवडून घ्यावी तसेच ती छान पाण्यामध्ये धुऊन घ्यावी नंतर बारीक चिरून घ्यावी. पालेभाज्या सर्वप्रथम धुऊन घ्यावे व नंतर चिरून घ्याव्यात कारण त्यामधील विटामिन निघून जातात.
  • नंतर कुकरच्या डब्यामध्ये शेपू व मिरच्या बारीक करून घालाव्यात कुकरमध्ये दोन-तीन शिट्ट्या होऊन ही भाजी छान शिजवून घ्यावी नंतर डब्यावर झाकण ठेवून शिजवलेले शेंगदाणे देखील शिजवून घ्यावेत.
  • भाजी शिजल्यानंतर एका कढईमध्ये गरम करण्यासाठी तेल ठेवून त्यामध्ये लसूण पेस्ट लालसर होईपर्यंत परतून घ्यावी. नंतर मेथी दाणे घालून घ्यावीत. नंतर मोहरी व हळद घालून फोडणी करून घ्यावे.
  • फोडणीत भिजवलेली तूरडाळ घालून मंद आचेवर वाफ काढावी. ही डाळ अर्धवट शिजली की शेंगदाणे घालावे नंतर थोडा वेळ परतून घ्यावेत.
  • ते छान परतून झाले की त्यामध्ये शेपूची भाजी घालून नीट मिक्स करून घ्यावे तसेच ही मंद आचेवर झाकण ठेवून काही वेळ होऊ द्यावी. नंतर थालीपीठाची भाजणीची पेस्ट तयार करून त्यामध्ये मिक्स करून घ्या वरुन चवीनुसार मीठ घाला. दोन मिनिट वाफ आल्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. अशाप्रकारे गरमागरम शिकू भाजी रेसिपी तयार आहे. आता ही भाजी तुम्ही भाकरी सोबत किंवा पोळी सोबत सर्व्ह करू शकता.

पोषक घटक :

शेपू भाजी विटामिन्सने भरपूर असून त्यामध्ये आणि जेव्हा प्रोटीन्स देखील असतात जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. शेपूमध्ये विटामिन सी व्हिटॅमिन ए लोह मॅग्नीज कॅल्शियम इत्यादी महत्त्वपूर्ण घटक असतात. आपण शेपूच्या भाजीचा आहारात नेहमी समावेश करायला पाहिजे.

फायदे :

शेपूची भाजी खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. टिपूची भाजी खाल्ल्यामुळे गॅस अपचन अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात.

शेपूच्या भाजीमध्ये फायबर असल्यामुळे अन्नपचन होण्याला वेळ लागत नाही. शेपूची भाजी नियमित खाल्ल्यामुळे पाचक प्रणाली देखील मजबूत होते.

जर एखाद्याला झोप लागत नसेल तर त्यांनी जर शेपूच्या भाजीचे नियमित सेवन केले तर हा आजार देखील दूर होतो. शेपूची भाजी नियमित खाल्ल्यामुळे शांत झोप लागते.

शेपूच्या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते.

शेपूच्या भाजीतील पोषक घटकांमुळे ब्लड शुगर देखील कंट्रोलमध्ये राहते. तसेच हृदयाचे कार्य सुधारते यामुळे नैसर्गिक रित्या घातक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते.

तोटे :

शेपूच्या भाजीमध्ये फायबर आढळते त्यामुळे आपण जर शेपूची भाजीचे अतिरिक्त सेवन केले तर त्यापासून आपल्या पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून ही भाजी खात असताना प्रमाणातच खायला पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांनाही शेअर करत असेच ही रेसिपी तयार करून बघायला विसरू नका.

Leave a Comment