शेवभाजी रेसिपी मराठी Shev Bhaji Recipe In Marathi

शेवभाजी रेसिपी मराठी Shev Bhaji Recipe In Marathi  शेव भाजी हे मसालेदार आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे.  जे सर्वाना खूप आवडते, शेव भाजी ही रेसिपी  पूर्णपणे शुध्द शाकाहारी आहे.  शेव भाजीसाठी आपण मसाला शेव किंवा साधी जाडी शेव वापरू शकतो.  शेव भाजी खायाला चवदार आहे, आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल खूप स्वादिष्ट शेव भाजी मिळते.  काही शहरात शेव भाजी मोठ्या प्रमाणात मिळते.  परंतु काही ग्रामीण भागात आणि शहरी भागात शेव भाजी सहज मिळत नाही.  काही लोकांना शेव भाजी खूप आवडते, पण त्यांना रेसिपी माहीत नाही, आणि काही लोक बाहेर जाऊन खाऊ शकत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे.  एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी स्वादिष्ट शेव भाजी कशी बनवतात यांची रेसिपी.  आता आपण शेव भाजी रेसिपी पाहणार आहोत.

Shev Bhaji

शेवभाजी रेसिपी मराठी Shev Bhaji Recipe In Marathi

शेव भाजीचे प्रकार :

शेव भाजी हे एक लोकप्रिय व मसालेदार खाद्य आहे.  जे विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली.  जसे शेव टोमॅटो भाजी, मसाला शेव भाजी, गावरान शेव भाजी, खान्देशी शेवभाजी, मटर पनीर शेव भाजी असे अनेक प्रकार शेव भाजीमध्ये येतात, आणि हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट प्रकार आहेत.

शेव भाजीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

शेवभाजी तयार करण्यासाठी पहिले साहित्य एकत्र करावे लागते.  नंतर आपण लवकर शेव भाजी बनवू शकतो, या पूर्वतयारीसाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

शेव भाजी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

शेव भाजी बनवण्यासाठी आपल्याला  पूर्वतयारी करावी लागते.  नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

शेव भाजी ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

शेव भाजीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 100 ग्रॅम जाडी किंवा गाठी शेव.

2) 2 मध्यम कांदा पेस्ट.

3) 2 चम्मच लसन अद्रक पेस्ट.

4) 50 ग्रॅम खोबरे खिस.

5) 1 चम्मच हळद.

6) 2 चम्मच धनिया पावडर.

7) 2 ते 3 चम्मच मिरची पावडर.

8) तेल.

9) चवीनुसार मीठ.

10) सुहाना मसाला.

11) कोथींबीर.

12) 1 चिमूट कस्तुरी.

13) 1 टोमॅटो.

14) 3 ते 4 शेशपान.

पाककृती :

  • शिरा रेसिपी मराठी
  • सर्वात प्रथम कांदा बारीक चिरून त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करा, नंतर कोथींबीर बारीक चिरून घ्या.
  • नंतर लसन अद्रक पेस्ट तयार करा आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा, आणि एक टोमॅटो पेस्ट तयार करा.
  • आता एक खोल तळाचा पॅन घ्या, गॅस चालू करून गॅस वरती ठेवा, आणि त्यामध्ये तेल टाकून गरम करा.
  • तेल गरम झाले की, त्यामध्ये शेशपान व लसन अद्रक पेस्ट टाका, आणि गॅस मध्यम आसेवर करा.
  • लसन अद्रक पेस्ट थोडी लालसर झाली की, त्यामध्ये कांदा पेस्ट टाका, कांदा पेस्ट लालसर होईपर्यत परतवत रहा.
  • कांदा पेस्ट मधील पूर्ण पाणी निघाले पाहिजे, आणि तेल वर आले की, कांदा पेस्ट मसाला झाला समजावे.
  • नंतर यामध्ये टोमॅटो पेस्ट टाका,  ते झाले की खोबरे खिस टाका, आणि व्यवस्थित होऊ द्या.
  • नंतर यामध्ये हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, कस्तुरी, गरम मसाला आणि सुहाना मसाला टाका.
  • यांचे व्यवस्थित मिश्रण करून घ्या, आणि थोडा वेळ परतवत रहा, मसाल्याचा सुंगंध यायला लागला की, यात थोडे पाणी टाकून, अजून थोडा वेळ होऊ द्या.  यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका.
  • पूर्ण तेल वर येऊन बुळ-बूळे येतील तेव्हा आपला मसाला झाला असे समजावे, नंतर यामध्ये 2 ग्लास पाणी टाका.
  • किंवा आवश्यतेनुसार पाणी टाका, व चवीनुसार थोडे मीठ घाला, आणि याला उकळी येऊ द्या.
  • उकळी आली की गॅस बंद करा, यामध्ये जाडी शेव टाका, आणि वरून थोडी कोथिंबीर टाका.

आता आपली स्वादिष्ट आणि मसालेदार शेव भाजी तयार आहे.  आता एका डिशमध्ये सर्व्ह करण्यासाठी  यासोबत थोडा कांदा, काकडी आणि भाकर घेऊन आपण स्वादिष्ट शेव भाजी खाऊ शकतो.

शेव भाजीत असणारे घटक :

शेव भाजी तयार करण्यासाठी आपण वेग वेगळ्या प्रकारचा भाजीपाला वापरतो, यामध्ये विविध घटक असतात.  कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन बी, फॅट, व्हिटॅमिन सी, प्रोटीन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

शेव भाजीमध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रथिने हे आपले शरीर चांगले व निरोगी ठेवते.

यामधील व्हिटॅमिन बी, आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

शेव भाजीतील प्रोटीन व फॅट आपल्या शरीराची वाढ करतात, आणि शारीरिक थकवा येऊ देत नाही.

तोटे :

शेव भाजीमध्ये गरम मसाले असतात.  आपण हे जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्याला पोट दुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे घटक आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर आपण आजारी पडू शकतो.  म्हणून आपण शेव भाजी योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला शेव भाजी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment