शेव रेसिपी मराठी Shev Recipe In Marathi

शेव रेसिपी मराठी Shev Recipe In Marathi शेव ही रेसिपी बेसनापासून तयार केलेला एक पदार्थ आहे.  जो खायाला खूप स्वादिष्ट आणि मसालेदार आहे.  हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, जो सर्वाना खूप आवडतो.  दिवाळी सणाला शेव मोठ्या प्रमाणात बनवली जाते.  याचा उपयोग नाष्टा म्हणून केला जातो.  शेव वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते.  जसे गोड शेव, गाठी शेव आणि उपवासासाठी आलू शेव बनवली जाते.

आपण हॉटेल किंवा बेकरीमध्ये पाहिले असेल किती चवदार आणि मसालेदार शेव मिळते.  काही लोकांना शेव खूप आवडते, पण त्यांच्या परिसरात स्वादिष्ट आणि मसालेदार शेव मिळत नाही.  आणि काही लोकांना रेसिपी माहीत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने शेव कशी बनवतात यांची रेसिपी, आता आपण शेव रेसिपी पाहणार आहोत.

Shev Recipe

शेव रेसिपी मराठी Shev Recipe In Marathi

शेवचे प्रकार :

शेव हा स्वादिष्ट पदार्थ आहे.  अनेक ठिकाणी शेव वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते.  शेवचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी जाडी शेव, बारीक शेव, मसाला शेव, गाठी शेव, गोड शेव, आलू शेव, तिखट शेव हे सर्व प्रकार खायाला खूप चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

शेव ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

शेवच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

शेव तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते.  सर्व साहित्य एकत्र केले की, आपण लवकर शेव तयार करू शकतो.  यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

शेव कुकिंग करण्यासाठी आपल्याला 35 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

शेव तयार करण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते.  नंतर कुकिंग करावी लागते.  यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास 5 मिनिट वेळ लागतो.

शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 3 वाट्या बेसन.

2) 1 चम्मच हळद.

3) अर्धा चम्मच अजवान.

4) 1 चिमूट सोरा.

5) थोडे मीठ.

6) तेल.

7) 1 चिमूट हिंग.

पाककृती :

  • सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये बेसन टाका, त्यामध्ये एक चमचा हळद, अजवान, थोडा सोरा आणि एक चिमूट हिंग टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर आवश्यक तेवढे मीठ घाला, आणि 3 ते 4 चमचे तेल गरम करून बेसनमध्ये टाका.  यामुळे शेव नरम तयार होते.
  • तेल टाकल्यावर बेसन थोडे हलक्या हाताने चोळून घ्या.  तेल गरम असल्याने काळजी घ्यावी.
  • नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत, पीठ मिसळत रहा.  बेसणाचा एकदम नरम गोळा तयार करा.
  • पीठ कोरडे असेल तर थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आणि एकदम नरम गोळा तयार करा.
  • गोळा तयार झाला की, 10 मिनिट ओल्या कापडात गुंडाळून बाजूला ठेवा.
  • 10 मिनिट नंतर ओलसर कापड काढा, आणि एक मिनिट पुन्हा मळून घ्या.
  • शेव बनवण्यासाठी तुम्हाला मध्यम छिद्रे असलेली चकलीचा साचा लागेल.  चकलीचा साचाला आतून थोडे तेल लावा.
  • आता गॅस चालू करा, आणि एक खोल तळाचा कढई घ्या, त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
  • आता सर्व साहित्य जवळ घ्या, बेसनाचा एक लहान गोळा तयार करा, गोळ्याला थोडे पाणी लाऊन गोळा चकली साचामध्ये टाका.
  • तेल पूर्ण गरम झाले की नाही तपासून घ्या, तेल गरम झाले असेल तर, गॅस मध्यम आसेवर ठेवा.
  • गरम तेलात शेव बनवण्यासाठी चकली साचा दाबा, शेव एकसमान बाहेर येणार, शेव टाकून झाली की, साचा बाजूला ठेवा.
  • शेव एका बाजूने लालसर किंवा सोनेर होये पर्यत तळा, नंतर दुसऱ्या बाजूला उलटा,
  • दोन्ही बाजूने शेव लालसर झाली की, एका पेपर वरती काढून घ्या.  म्हणजे त्यातील शिल्लक तेल निघून जाईल.
  • अशा प्रकारे आपण सर्व शेव काढून घ्या.  शेव एकदम कुरकुरीत व नरम तयार होणार.
  • आता आपली स्वादिष्ट आणि कुरकुरीत शेव खाण्यासाठी तयार आहे.  आपण शेव एका प्लेटमध्ये घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

शेवमध्ये असणारे घटक :

शेव हा कुरकुरीत पदार्थ आहे.  शेव बनवण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य लागते.  यामध्ये कॅल्शिअम, फॅट, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, चरबी, लोह, सोडियम, फायबर असे अनेक पौष्टिक घटक आहेत.  हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

शेव खाल्ल्याने आपल्याला फॅट, लोह, चरबी यासारखे घटक मिळतात.  हे घटक आपल्या शरीराची वाढ करतात.

यामध्ये असणारे कॅल्शियम, सोडियम, फायबर, कार्बोहायड्रेट हे शारीरिक थकवा दूर करतात.

शेवमध्ये जास्त प्रमाणात तेल असते, यामुळे आपल्या शरीरावर चरबी वाढवण्यास मदत होते.

तोटे :

शेव हा एक तेलकट पदार्थ आहे.  जो आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.

यामध्ये जास्त प्रमाणत बेसन वापरलेले असते.  यामुळे आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

म्हणून शेव आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला शेव रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment