Shri Ghrishneshwar Temple Information In Marathi घृष्णेश्वर हे एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे तसेच हे एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध ठिकाण आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद या किल्ल्यापासून केवळ 11 किलोमीटर अंतरावर वेरूळ लेणीजवळ हे मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख शिवपुराण स्कंदपुराण रामायण व महाभारतात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. वेरूळ गावातील येलगंगा नदी जवळ हे मंदिर आहे.
श्री घृष्णेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती Shri Ghrishneshwar Temple Information In Marathi
शिवाजी महाराज यांचे आजोबा व शहाजी भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम 16 व्या शतकात जिर्णोद्धार केला असे म्हटले जाते. सध्याचे अस्तित्वात असलेले हे मंदिर 1730 मध्ये मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमी बाईंनी बांधलेले आहेत. त्यानंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला तसेच मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडांमध्ये करण्यात आलेले आहे. या मंदिराची नक्षीकाम ही खूप सुंदर व विलोभनीय आहे.
मंदिर | श्री घृष्णेश्वर मंदिर |
सण | महाशिवरात्री |
सलग्नता | हिंदू धर्म |
ठिकाण | छत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र |
श्री घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास :
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना केव्हा झाली याची तारीख माहीत नसली तरी सुद्धा हे मंदिर खूप प्राचीन आहे असे मानले जाते. कारण या मंदिराचा शिवपुराण, कंदपुराण, महाभारत, रामायण ते सुद्धा आहे. हे मंदिर तेराव्या शतकापूर्वीच बांधले गेले असावे असे मानले जाते.
हे मंदिर बेलूरच्या प्रदेशांमध्ये वसलेले होते. ज्याला आज एलोरा लेणी म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुगल साम्राज्यांमध्ये तेराव्या आणि चौदाव्या शतकामध्ये मंदिराच्या सभोवताच्या परिसरात अनेक विनाशकारी हिंदू-मुस्लिम लढाया झाल्या. त्यामुळे या मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
16 शतकात बेडूशेठ सरदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी या मंदिराची उभारणी केली तसेच मोगल सैन्याने 16 व्या शतकानंतर घृष्णेश्वर मंदिरावर वारंवार हल्ले केले. 1680 मध्ये व 1707 मधील मुगल मराठा युद्धामध्ये मंदिराचे पुन्हा नुकसान झाले. नंतर इंदूरची राणी राणी अहिल्याबाई यांनी 18 व्या शतकात या मंदिराची पुन्हा एकदा उभारणी केली व दुरुस्ती केली.
घृष्णेश्वर मंदिराची रचना :
घृष्णेश्वर हे एक बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध शंकरजीचे एक मंदिर आहे. येथे तुम्ही पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तू पाहू शकता. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरात तसेच अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहेत. या मंदिराचे बांधकाम हे 4400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले असून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये पाच स्थर येऊनच शिखर आणि अनेक खांब सुद्धा आहेत. जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपातील बांधलेली आपल्याला आढळून येतात. त्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे.
जे अतिशय सुषमा हे मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती आणि भगवान शिवशंकर तसेच भगवान विष्णू यांचे दहा अवतार आपल्याला पाहायला मिळतात. गर्भगृहांमध्ये पूर्वेकडे शिवलिंग आहे आणि तेथेच नंदीश्र्वराची मूर्ती सुद्धा आहे.
घृष्णेश्वर मंदिरा विषयीची आख्यायिका :
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विषयीची अशी एक आख्यायिका आहे. पती-पत्नी संघ सुधर्म आणि सुदेहाच्या कथेपासूनच सुरुवात होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अत्यंत सुखी समाधानी होते परंतु त्यांना मुले झाल्याचा आनंद नाकारण्यात आला आणि सुदेहा कधीही आई होणार नाही हे सांगण्यात आले. त्यामुळे सुधेहाने तिचा पती सुधर्म आणि तिची धाकटी बहीण घृष्णा यांचे लग्न जुळवण्याची व्यवस्था केली. काही काळानंतर एका सुंदर मुलाचा जन्म झाला.
घृष्माच्या आनंदासाठी तिचा जोडीदाराचे प्रेम, घर तसेच इज्जत हळूहळू तिच्याकडून हिरावून घेतली गेली. तेव्हा सुदेहाच्या विचारात मत्सरांची बीज अंकुरू लागले आणि एके दिवशी तिने त्या मुलाचा खून करून त्याच तलावात त्याचा मृतदेह फेकून दिला. घृष्णा भगवान शंकराच्या शिवलिंगाला ज्या पात्रात बसवायचा त्या पात्रात ठेवला. दररोज सकाळी घृष्णा सुधर्माची दुसरी पत्नी आणि भगवान शिवाजी एक निष्ठावान अनुयायी 101 शिवलिंगे तयार करायची आणि देवाची मनोभावे सेवा व पूजा करायची.
ती एका तलावामध्ये गेली तेथे बाळाची सूचना मिळाल्यावर सर्वत्र आक्रोश झाला परंतु घृष्णा ती दररोज करीत असे शिवलिंग तयार करून शांत मनाने भगवान शंकराची पूजा करण्यात ती मग्न झाली. ती तलावात शिवलिंग बुडवण्यासाठी पुढे गेली तेव्हा तिचा मुलगा पाण्यातून जिवंत बाहेर आला. त्याच वेळी भगवान शिवाने घृष्णा सुद्धा दर्शन दिले. कारण असू देहाच्या वागण्याने महादेवाला सुद्धा राग आला होता.
ज्याने सुदेहाला शिक्षा करायचा आणि घृष्णाला आशीर्वाद देण्याचा विचार केला परंतु घृष्णाने सुदेहाला दोष मुक्त करण्याची विनंती केली आणि भगवान शंकरांना लोकांच्या हितासाठी येथे निवास करण्याची विनंती केली भोलेनाथांनी घृष्णाची विनंती मान्य केली आणि तेथे शिवलिंग म्हणून राहण्यास सुरुवात केली आणि हेच स्थान घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून जगभरात प्रसिद्ध झाले आहे.
घृष्णेश्वर मंदिरा जवळील भेट देण्यासारखी ठिकाणे. :
अजिंठा गुहा : महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले छत्रपती संभाजी नगर याच परिसरात घृष्णेश्वर मंदिर आहे. तेथे तुम्ही अजिंठा गुहा पाहण्यासाठी सुद्धा जाऊ शकता. अजिंठा लेणीपासून हे मंदिर 105 किलोमीटर अंतरावर आहे तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक प्राचीन देण्या आहेत. येथे भारतीय गुहा कलेचे सर्वात मोठे जिवंत नमुने आपण पाहू शकतो. येथे अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. एका घोड्याच्या नालाच्या आकाराच्या पर्वतावर एकूण 36 गुहा आहेत.
एलोरा गुहा : तुम्ही घृष्णेश्वर मंदिराला भेट देत असाल तर त्याच्या जवळच एलोरा लेणी आहेत. ज्या छत्रपती संभाजी नगरच्या उत्तर पश्चिमेस 29 किलोमीटर अंतरावर आहेत. या जगातील सर्वात मोठ्या रॉक कट मोठ मंदिर गुंफा संकुलांपैकी एक आहेत. येथे बौद्ध, हिंदू आणि जैन संरचनांची वैशिष्ट्यांची नमुने तुम्ही पाहू शकता तसेच त्यांचे कलात्मक शैली येथे पाहू शकता.
बीबी का मकबरा : 1961 मध्ये मुगल सम्राट औरंगजेबाने आपल्या पत्नीच्या समर्थ विवेक बकरा उभारला होता. राबिया उद दौराणि या थडग्याचे नाव आहे. ताजमहल आणि राणीच्या थडग्याच्या सारख्याच डिझाईनमुळे ते एक अद्भुत दिसते.
घृष्णेश्वर मंदिर येथे कसे जाल?
हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगरपासून जवळच आहे तसेच छत्रपती संभाजी नगर या शहराला रस्ते रेल्वे व विमान मार्गे सुद्धा तुम्ही येऊ शकता. मुंबई-पुणे जवळून तुम्ही छत्रपती संभाजी नगरला येऊ शकता. तिथून घृष्णेश्वर मंदिराकडे जाऊ शकता व त्या मंदिराच्या जवळ असणारे पर्यटन स्थळे सुद्धा पाहू शकता.
FAQ
घृष्णेश्वर जवळ कोणते रेल्वे स्टेशन आहे?
घृष्णेश्वर जवळ सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे छत्रपति संभाजीनगरचे आहे.
घृष्णेश्वर हे मंदिर कोठे आहे?
घृष्णेश्वर हे मंदिर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये असून दौलताबाद किल्ल्यापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर आहेत.
घृष्णेश्वर हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
घृष्णेश्वर हे भगवान शिवाला समर्पित असून तेथे पौराणिक शिवमंदिर आहे.
महाराष्ट्र राज्यात किती ज्योतिर्लिंग आहेत?
महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औंढा नागनाथ आणि परळी येथील वैजनाथ ही पाच ज्योतिर्लिंग आहेत.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिरात जाण्यासाठी किती पायऱ्या लागतात?
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिरात जाण्यासाठी 500 उतरून जावे लागते.