Sindhutai Sapkal Information In Marathi सिंधुताई सपकाळ या भारतातील समाज सुधारक महिला आहेत. यांना अनाथांची आई म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये त्यांनी अनाथ मुलांचे संगोपन केले, त्याची काळजी घेतली. सिंधुताईंनी 2016 मध्ये डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च मधून साहित्यातील मिळवली होती. त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. समाजामध्ये काही लोक वाईट विचारसरणीचे असतात, त्यामुळे महिलांना बराच त्रास सहन करावा लागतो व महिलांची स्थिती दयनीय स्थिती होते परंतु सिंधुताई सपकाळ यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःला सिद्ध केले व कित्येक अनाथ मुलांच्या आई झाल्या.

सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi
सिंधुताई यांचा जन्म व बालपण :
सिंधुताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्र राज्यातील जिल्हा वर्धा येथील एका पशुपालक कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे कुटुंब खूपच गरीब होते. जन्माला आल्यानंतर त्यांना चिंधी घालावी लागत होती. त्यामुळे त्यांचे टोपण नाव चिंधी असे पडले होते. सिंधुताईच्या वडिलांचे नाव अभिमान्यु असे होते.
त्यांनी इयत्ता चौथी उत्तीर्ण केल्यानंतर शाळा सोडून दिली तसेच त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लग्न सुद्धा झाले. सिंधुताई यांच्या वयाच्या बारावी वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले. जे त्यांच्यापेक्षा वीस वर्षापेक्षा मोठे होते. लग्नानंतर त्या वर्गातील सेलू येथील नवरगाव येथे राहायला गेल्या.
वैयक्तिक जीवन :
सिंधुताई यांचे लग्न त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांचे झाले. त्यांच्या घरी त्यांना प्रचंड सासुरवास भोगाव लागला तसेच त्यांच्या कुटुंबात शैक्षणिक वातावरण सुद्धा नव्हते. त्यांना जंगलात लाकूड फाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे त्या घरी आणत होत्या आणि उंदराच्या बिळात लपवून ठेवून जेव्हा वेळ मिळेल एकट्या असल्यास त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतात. अठराव्या वर्षापर्यंत सिंधुताईंना तीन मुले झाली.
त्या चौथ्यावेळी गर्भवती असताना, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा गुरेही शेकड्यांनी असायचे. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरड मोडले जायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या परंतु त्यांना ते काम करावेच लागेल कारण त्याविषयी त्यांना कोणतीही मजुरी मिळात नव्हती.
रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्या मजुरी पण शेण काढणाऱ्यांना नाही या शेणाचा लिलाव फॉरेस्ट वाले करायचे तिथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावामध्ये ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर रोग आली. हा लढा जिंकल्या परंतु त्यांना या लढ्याची मोठी किंमत चुकवावी लागली. सिंधुताईंच्या या धैर्यामुळे गावातील जमीनदार दंमडाजी असतकार मोठे दुखावले गेले.
सिंधुताई यांच्या जीवनातील संघर्ष :
गावातील जमीनदार दुखावला गेला व त्याने सिंधुताईच्या पोटातील मुल आपले आहे म्हणून असा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनामध्ये तिच्या चरित्राबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना तिच्या नवऱ्याने खूप मारहाण केली आणि घराबाहेर काढून दिले. गुरांच्या लाथा बसून मर म्हणून अशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची मुलगी जन्माला आली.
नवऱ्याने हकल्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा तिला हाकलले. सिंधुताई माहेरी आल्या परंतु सख्या आईने सुद्धा पाठ फिरवली परभणी, नांदेड, मनमाड, रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एक चतकोरभर भाकरीसाठी तसेच उष्टवलेले एखादे फळ हाती लागेल म्हणून त्या रात्रभर रेल्वे रुळाच्या कडेने फिरत राहायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल, यामुळे त्या मागे फिरल्या आणि पुन्हा भीक मागत पोट भरायला त्यांनी सुरुवात केली.
सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या परंतु तिथे त्यांनी मिळालेले अन्न किंवा भिक्षा एकट्याने खाल्ले नाही. स्टेशनवरच्या इतर भिकाऱ्यांना बोलवायच्या आणि मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. 21 वर्षाच्या ताईंना त्या भिकाऱ्यांनी संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने, त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही ती जागा सोडली. स्मशान मध्ये जाऊन राहू लागल्या.
जन्म | 14 नोव्हेंबर 1948. |
पुरस्कार | 750 |
अनाथांसाठी संस्था | ममता बाल सदन. |
मृत्यू | 4 जानेवारी 2022. |
सिंधुताईंचे सामाजिक कार्य :
सिंधुताईंना माई म्हणून आज ओळखले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे अनाथ मुलांच्या मदतीसाठी घालवले आहे तसेच त्यांच्या अनाथालयामध्ये 1050 अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या मुला मुलींना चांगले शिक्षण दिले. त्यांची मुलगी एक वकील आणि मोठ्या संख्येने अनाथ मुलांना दत्तक घेतले.
ते आता डॉक्टर इंजिनिअर, वकील सुद्धा आहे. त्यांच्यापैकी बरेच जण अनाथालय चालवत आहेत आणि सिंधुताईंना 273 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषके सुद्धा मिळाले आहेत. त्यांचा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून सन्मान झालेला आहे. पुरस्कारामध्ये मिळालेली सर्व रक्कम त्या अनाथ आश्रमाला दान करतात.
त्यांचे पती 80 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्यासोबत आले, तेव्हा सिंधुताईंनी त्यांच्या पतीचे पुत्र म्हणून स्वागत केले आणि सांगितले की ती पत्नी आता नाही. ती अभिमानाने आज त्यांना त्यांचा मोठा मुलगा घोषित करते. सिंधुताई या समाजसेविका तर आहेत तसेच त्या कवयित्री सुद्धा आहेत. त्यांच्या कविता सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईने तिला हाक लावून लावले त्याबद्दल ती त्यांच्या आईचे आभार मानते. जर तिने घरात तिला साथ दिली असती तर तिला आता एवढी मुले नसती.
ममता बाल सदन :
सिंधुताईंनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. त्यांनी ही स्थापना 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावांमध्ये ही संस्था सुरू केली. त्यांनी स्वतःच्या मुलीला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे पाठवले. त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना सुद्धा आधार दिला तसेच लहान मुलांना सर्व शिक्षण त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये देणे सुरुवात केली.
त्या व्यक्तीरिक्त त्यांना भोजन, कपडे व इतर सुविधा सुद्धा संस्थेकडूनच दिले गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर तेथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंब होतील यासाठी त्यांना मार्गदर्शन सुद्धा त्या संस्थेमध्ये दिले गेले. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्य सुद्धा संस्थेकडूनच केले जाते.
मदर ग्लोबल फाउंडेशन संस्था:
सिंधुताईंनी आपल्या संस्थेचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा केला आहे. यांच्या कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने त्यांनी अनेक दौरे केले होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले होते तसेच परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे, त्यामुळे त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशनची सुद्धा स्थापना केली होती.
सिंधुताईंना मिळालेला पुरस्कार व गौरव तसेच सन्मान :
- सिंधुताईंना 750 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
- त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा डॉक्टर लेखक समाज भूषण पुरस्कार 2012 मध्ये त्यांना मिळाला.
- अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुरस्कार 2012 मध्ये मिळाला .
- महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार त्यांना 2010 मध्ये मिळाला.
- मूर्तीमंद आईचा राष्ट्रीय पुरस्कार 2013 मध्ये मिळाला.
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार 1996 मध्ये मिळाला.
- सोलापूरचा डॉक्टर निर्मळकुमार खडकुले स्मृती पुरस्कार राजाही पुरस्कार.
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- 2008 मध्ये दैनिक लोकसत्ताचा सह्याद्री हिरकणी पुरस्कार.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार.
- पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला.
सिंधुताई सपकाळ यांचे निधन :
सिंधुताई सपकाळ यांचे निधन 4 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये झाले. त्यांना हृदयविकाराच्या झटका आला होता, एक महिन्यापूर्वी त्यांचे हरण्याचे ऑपरेशन झाले होते, त्यांना महानुभव पंथाचा अनुग्रह होता. त्यामुळे महानुभव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांची शेवटची विधी पार पडली गेली.
FAQ
सिंधुताई सपकाळ यांना किती पुरस्कार मिळाले?
750 पुरस्कार त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म कधी झाला?
14 नोव्हेंबर 1948.
सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी कोणती संस्था चालवली?
ममता बाल सदन.
सिंधुताई सपकाळ यांचे शिक्षण काय?
इयत्ता चौथी.
सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू कधी झाला?
4 जानेवारी 2022.