झटपट नाश्ता रेसिपी मराठी Snacks Recipe in Marathi रोज सकाळी उठल्यानंतर मुलांच्या टिफिन मध्ये किंवा ऑफिसमध्ये जाताना टिफिनमध्ये कोणते पदार्थ झटपट तयार करून द्यावे असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. परंतु आता आम्ही तुमच्या करता झटपट दोन रेसिपीज घेऊन आलो आहोत. त्यामध्ये मटार चाट रेसिपी आणि शेवया उपमा या दोन्ही रेसिपीज झटपट तयार होतात. अगदी काही मिनिटात. कामाचा ताण देखील कमी होतो. तसेच ही रेसिपी खाण्यासाठी स्वादिष्ट व लहान मुलांना देखील आवडेल अशीच आहे. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
झटपट नाश्ता रेसिपी मराठी Snacks Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
आपण येथे स्नॅक्स रेसिपी विषयी बोलणार आहोत जी झटपट तयार करता येते. त्यामध्ये जास्त घटकांची देखील आवश्यकता नाही. ब्रेड बटर, चहा, कॉफी आणि टोस्ट अशा प्रकारचा नाश्ता करून लोक घराबाहेर पडणे पसंत करतात. परंतु तुम्ही जर भर पोटभर नाश्ता केला तर दिवसभर तुम्ही उत्साही राहू शकता. शरीराला एनर्जी मिळते. ऑफिसला जाण्याची धावपळ असूनही झटपट रेसिपी तुम्ही तयार करू शकता. नाश्त्यामध्ये तुम्ही झटपट रेसिपीज बऱ्याच बनवू शकता जसे कांदा पोहे, उपमा, सँडविच, डोसा इ. चला मग जाणून घेऊया मटर चाट रेसिपी व शेवया उपमा या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरिता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण चार व्यक्तींकरता तयार करणार आहोत .
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता केवळ पाच मिनिट एवढा वेळ आपल्याला लागतो.
कुकिंग टाईम :
ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला केवळ 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
ही रेसिपी 15 मिनिटांमध्ये पूर्ण तयार होते.
1) मटर चाट रेसिपी (matar chat recipe) :
मटर चाट रेसिपी सर्वांनाच आवडते. तसेच ही रेसिपी पौष्टिक देखील आहे. सकाळच्या नाष्टामध्ये किंवा संध्याकाळच्या नाष्टामध्ये देखील तुम्हीही रेसिपी किंवा ही चाट तयार करू शकता. घरातील सर्वांनाच ही चाट खूप आवडेल. ही रेसिपी झटपट अगदी सोप्या पद्धतीने तयार होते तेही कमी वेळामध्ये. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य :
साहित्य :
1) एक वाटी भिजलेले वाटाणे
2) एक वाटी उकडलेले बटाटे
3) एक वाटी बारीक चिरलेला कांदा
4) दोन चमचे बारीक चिरलेला कोथिंबीर
5) चवीनुसार मीठ
6) अर्धा चमचा जिरे पावडर
7) अर्धा चमचा धने पावडर
8) एक चमचा तिखट
9) दोन चमचे लिंबाचा रस
मटर चाट बनवण्याची पाककृती :
- आप्पे रेसिपी मराठी
- सर्वप्रथम आपल्याला रात्री वाटाणे पाण्यात भिजवून ठेवायचे आहे नंतर दुसऱ्या सकाळी ते उपयोगात आणायचे आहेत.
- नंतर बटाटे व वाटाणे वेगवेगळ्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये शिजवून घ्या बाहेर काढल्यानंतर व्यवस्थित बटाटे कुस्करून घ्या.
- वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसं मीठ घालायला विसरू नका. याने चव छान येईल.
- त्यानंतर वाटाणे आणि बटाटे मिक्स करा.
- नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट, लिंबाचा रस, धने आणि जिरे पावडर आणि चाट मसाला घाला.
- हवं असल्यास, पापडाचा चुरा आणि गोड अथवा तिखट चटणीदेखील तुम्ही मिक्स करू शकता. अशाप्रकारे मटर चाट रेसिपी तयार आहे. हे खायला अतिशय अप्रतिम लागते.
2) शेवयाचा उपमा रेसिपी (shevyacha Upma recipe)
तुम्ही कधी शिवयाचा उपमा टेस्ट केलाय का ? ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि हेल्दी आहे. तसेच बनवायला ही अतिशय सोपी व कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य.
साहित्य
1) शेवया
2) कांदा
3) टॉमेटो
4) सिमला मिरची
5) वाटाणे
6) फरसबी
7) गाजर
8) कोथिंबीर
9) मिरची
10) चवीनुसार मीठ
शेवयांचा उपमा बनवण्याची पाककृती :
- सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपल्याला मटार उकळायला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यामध्ये चार थेंब तेल घाला.
- पाण्याला उकळी आली की, त्यामध्ये शेवया घाला. त्यातील पाणी बाहेर काढून घ्या. नंतर दुसऱ्या
कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. - नंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घालून बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्या.
- कांदा छान परतून झाला की, वरून शेवया घाला व सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. त्यामुळे थोडं पाणी घालून ते छान शिजवून घ्या.
- त्यानंतर वरून मीठ व कोथिंबीर घाला अशाप्रकारे गरमागरम उपमा तयार आहे.
पोषक घटक :
मटर चाट किंवा शेवया उपमा या दोन्ही रेसिपी मध्ये पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असतात. सकाळी नाष्टा केल्यामुळे आपल्या शरीराला जे विटामिन खनिज मिळतात त्यातून आपला पूर्ण दिवस उत्साहीत जातो. तर त्यामध्ये ऊर्जा, प्रथिने, चरबी, फायबर, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी प्रमुख घटक आढळतात.
फायदे :
मटर चाट किंवा शेवया उपमा खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आपले पोट लवकर भरते आणि भूकही लागत नाही.
मटारमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच मॅग्नेशियम आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते, म्हणून मटर चाट खाणे आरोग्यासाठी हिताच्या आहे.
मटार चाटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तसेच पाचन क्रिया ही मजबूत होते.
तोटे :
मटार चाट किंवा शेवया उपमाच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.
मटार चाट किंवा उपम्याच्या अति सेवनामुळे पोट फुगणे, ढेकर येणे यासारख्या समस्या ही उद्भवू शकतात.
मटारच्या चाटच्या अतिसेवनामुळे पोटात गॅसची समस्या देखील निर्माण होऊ शकते, म्हणून या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी मी चार जास्त प्रमाणात सेवन करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा. तसेच या रेसिपी तयार करून बघायला विसरू नका.