सोलकढी रेसिपी मराठी Solkadhi Recipe in Marathi सोलकढी सर्वांनाच आवडते कारण घरामध्ये चिकन, मटण किंवा मासे यांची रेसिपी केली असेल तर त्याच्यासोबत पिण्यासाठी सोलकढी केली जाते.
सोलकढी म्हणजेच ताकासाठी असलेला पर्याय असे म्हटले तरी चालेल. सोलकढी कोकम आणि नारळाचं दूधा पासून तयार केली जाते. खरं तर सोलकढी ही आपण पिऊ शकतो किंवा मग भातासोबत खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सोलकढी हे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. कारण सोलकढी तयार करण्याकरता त्यामध्ये कोकम आणि नारळाचं दूध वापरलं जातं. त्यामध्ये निसर्गतः थंड हा गुणधर्म असतो उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी ही उत्तम अशी रेसिपी आहे. सोलकढी तयार करण्यासाठी अत्यंत सोपी व लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी आहे. तर आज आपण या रेसिपी विषयी माहिती जाणून घेऊया.
सोलकढी रेसिपी मराठी Solkadhi Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
सोलकढी ही मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये वापरण्यात येते. आज-काल बऱ्याच हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये सोलकढी सहज उपलब्ध आहे. परंतु आपल्याला जर घरच्या घरी ही रेसिपी करायची असेल तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. सोलकढी करताना अनेक जण त्यांच्या सोयीनुसार सोलकढीच्या चवीमध्ये फरक पडू शकतात. सोलकढी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला जाणवतील. तर आज आपण मालवणी पद्धतीची सोलकढी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी लागणारी सामग्री पुढील प्रमाणे.
किती जण करता ही रेसिपी आहे?
ही रेसिपी आपण दोन जणांंकरता करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
सोलकढी रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ हा केवळ 5 मिनिटे एवढा आहे.
कुकिंग टाईम :
सोलकढी दोन प्रकारे केले जाते. त्यामध्ये पडक्यामध्ये जर आपण सोलकडी केली तर तिला केवळ 10 मिनिटे एवढेच वेळ लागतो.
टोटल टाईम :
सोलकढी रेसिपी पूर्णता बनवण्यासाठी आपल्याला केवळ 15 मिनिटे एवढाच वेळ लागतो.
सोलकढी बनवण्याची पहिली पद्धत :
सामग्री :
1) कोकम
2) ताज्या नारळाचं दूध
3) हिरवी मिरची
4) कोथिंबीर बारीक चिरलेला
5) लसणाच्या पाकळ्या तीन
6) एक चमचा साखर
7) चवीनुसार मीठ
पाककृती :
- सर्वप्रथम एक कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि एक पाणी घालून मिक्सरमधून त्याची बारीक प्युरी करून घ्या.
- नंतर ती प्युरी सुती कपड्याने गाळून घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दूध तयार करून घ्या. त्यातून उरलेला चोथा बाहेर काढून टाका.
- तुम्ही रेडिमेट कोकोनट मिल्कचाही वापर येथे करू शकता.
- पाण्यामध्ये कोकम भिजत ठेवा, त्यामुळे कोकमचा अर्क पाण्यात उतरेल.
- अर्ध्या तासाने कोकमाचे पाणी नारळाच्या दुधामध्ये घालून कोकम बाजूला काढून ठेवावा. नंतर थोडीशी साखर आणि मीठ एकत्र करून हे मिश्रण ढवळून घ्यावे.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यामध्ये घालायचा आहे तसेच तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल.
- हिरव्या मिरचीचे तुकडे करून मिश्रणामध्ये करून टाका
- बारीक चिरलेला कोथिंबीर त्यामध्ये टाका व सोलकढी तयार आहे.
- नंतर ही सोलकढी थंड करण्यासाठी तुम्ही फ्रिज मध्ये ठेवू शकता.
सोलकढी बनवण्याची दुसरी पद्धत :
1) किसलेल्या ओल्या नारळाचा कीस
2) पंधरा ते वीस कोकम
3) चार लसणाच्या पाकळ्या
4) एक चमचा जिरे
5) तूप
6) कढीपत्ता
7) साखर
8) मीठ
9) मिरची पावडर अर्धा चमचा
पाककृती :
- सर्वप्रथम कोकममध्ये पाणी घालून ते उकडत ठेवा व उकळी आली की, पाच मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या.
- किसलेले नारळाच्या ककिसात लसूण पाकळ्या घालून थोडे पाणी टाकून मिक्सर मधून बारीक करून घ्या व नंतर एका भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने हे मिश्रण गाळून घ्या. मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी टाकत त्यातील पूर्ण दूध बाहेर काढून घ्या.
- आता तुम्हाला जर त्याला फोडणी द्यायची असेल तर तूप गरम करून त्यामध्ये कढीपत्ता व जिरे घाला. नंतर मिरची पावडर व ती फोडणी आता मिश्रणात सोडा. अशाप्रकारे झटकेपट सोलकढी तयार आहे.
पौष्टिक घटक :
सोलकढीमध्ये कोकम ऍड केले जाते. तसेच कोकमामध्ये अँटिऑक्सिडंट, डायटरी फायबर्स, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम तसेच कॅलरी वाढवणारे आवश्यक फॅक्ट्स कोलेस्ट्रॉल याचे प्रमाण सुद्धा खूप कमी असते. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय पदार्थ व क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सोलकढी आपल्या शरीरासाठी पोषक पदार्थ आहे.
फायदे :
सोलकढी मधील कोकम हा घटक पचनशक्ती सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे मासाहारांसारखे पदार्थ देखील पचायला जड जात नाहीत, तसेच ते पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास देखील होत नाही, म्हणून सोलकडीत पिणे फायद्याचे ठरते.
सोलकढी पिल्यामुळे जंताची समस्या कमी होते तसेच त्यामधील अँटिऑक्सिडंट घटक एलर्जीचा धोका देखील कमी करतो. तसेच रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करतो.
सोलकडी मध्ये आलं लसणाची फोडणी दिल्याने आपल्याला सर्दी मळमळ व अस्वस्थता हे प्रमाण कमी होऊन रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.
सोलकढी अपचनाचा त्रास तर कमी करतेच तसेच त्यामधील कोकम हे मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी देखील मदत करते.
सोलकढी डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी उत्तम ड्रिंक आहे. तसेच शरीरातील उष्णता व पित्त शमवण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये आहे. म्हणून जेवण झाल्यानंतर सोलकढीचा स्वाद घेणे फायद्याचे आहे.
तोटे :
सोलकढी खाण्याचे तसे कोणतेही तोटे नाहीत. परंतु प्रत्येक गोष्ट आपण सेवन करताना काही दक्षता घ्याव्या लागतात. अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्याला जाणून येतात.
तर मित्रांनो, सोलकढी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.