Sunflower Information In Marathi सूर्यफूल तुम्ही पाहिले असेलच कारण शाळेमध्ये किंवा रिकाम्या वेळामध्ये तुम्हाला सुद्धा सूर्यफुलाच्या बिया खाण्याचा वेगळाच आनंद मिळतो. सूर्यफूल हे कसे दिसते तर सूर्यफूल पिवळ्या रंगाचे आणि टपोरे तसेच गोलाकार व सूर्यासारखे दिसणारे असते आणि हे सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळताना आपल्याला दिसते. सूर्यफुलाचा सर्वात प्रथम उपयोग हा अमेरिकेमध्ये करण्यात आला. म्हणजेच सूर्यफुलाचा उगम सुद्धा अमेरिकेतच झाला असे मानले जाते.
सूर्यफुलाची संपूर्ण माहिती Sunflower Information In Marathi
अमेरिकेतील मेक्सिको आणि दक्षिण संघराज्य या भागांमध्ये सर्वप्रथम सूर्यफुलाची लागवड करण्यात आली होती. सूर्यफूल हे 2100 मध्ये सापडले होते. त्यानंतर 16 व्या शतकात सर्वप्रथम सूर्यफूल या जातीचे रोपटे अमेरिकेतून युरोप खंडात पाठवण्यात आले आणि पुढे युरोपातून सूर्यफुलाचे रोपटे हे रशिया कडे पाठवण्यात आले. त्यानंतर 20 व्या शतकाच्या मध्यात रशियातून पुन्हा उत्तर अमेरिकेमध्ये हे बियाणे उत्पादनासाठी आणि व्यावसायिक दृष्टीच्या स्वरूपात पाठवण्यात आले.
सूर्यफुलाची रचना कशी असते :
सूर्यफुलाचे उत्पादन भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सूर्यफूल हे वर्तुळाकार असलेले आणि मध्यभागी त्यांच्या बियांच्या संख्येमुळे ते खूपच मोठे दिसते. सूर्यफुलाची लागवड ही उष्ण प्रदेशात आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशात केली जाते. सूर्यफूल या रोपांची उंची 300 सेंटीमीटर पर्यंत असते. सूर्यफुलाच्या पाकळ्या या नारंगी पिवळ्या रंगाच्या असतात तसेच त्या बाहेरच्या दिशेला निमुळत्या स्वरूपात वाढलेले असतात.
या पाकळ्यांच्या मधोमध दिवस सर व तपकिरी रंगाचे वर्तुळ असते. सूर्यफुलाची वाढ होत असताना ते सूर्याच्या दिशेलाच आकर्षित होत असते. त्यामुळेच त्याचे नाव सूर्यफूल असे पडले असेल. असे म्हणण्यास वांगी ठरणार नाही हे फुल जेव्हा फुलते तेव्हा ते सूर्याच्या दिशेने आकर्षित होत असते. संपूर्ण दिवसभरात सूर्याच्या हालचालीनुसार किंवा सूर्याच्या फिरण्याच्या दिशेनेच सूर्यफुलाचे मुख सुद्धा ओळख असते. या प्रक्रियेला हेलीएट्रोपीस्मो असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते.
सूर्यफुलाचे देठ हे खडबडीत स्वरूपाचे आणि केसाळ असतात. वरच्या दिशेला बऱ्याच विभागातील विभागलेले दिसते. सूर्यफुलाच्या पाकळ्या खालच्या बाजूने असलेली पाने ही कात्री सारखी असून सहसा ती चिकट असतात. त्यांच्याही खालची पानेही हिरव्या रंगाची असून बदामाच्या आकाराची ती पाने असतात सूर्यफुलाच्या मध्यभागी गोलाकार सक्ती असून ती असंख्य सूक्ष्म फुलांनी भरलेले असते. त्यामधील पुष्पक हे चक्राकार पद्धतीने तयार झालेले असतात.
सूर्यफुलाचे उपयोग :
सूर्यफुलाचा आणि त्याच्या पानांचा तसेच त्याच्या बियांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. सूर्यफुलांचा वापर मानव तर करतोच त्याचप्रमाणे दुबत्या जनावरांसाठी, कोंबड्यांसाठी सुद्धा ते एक खाद्यपदार्थ आहे. सूर्यफुलांच्या बियांमध्ये उपयुक्त असे पोषक घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी सूर्यफूल फायदेशीर ठरते. त्यामध्ये फेनोलीक आम्ल, फ्लाविनोईड, जीवनसत्व अ ब क आणि मोठ्या प्रमाणात मिएसीन असते.
सूर्यफुलाच्या बिया ह्या अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात. फायटर केमिकल्स बरोबर कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण सुद्धा सूर्यफुलामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते छातीतील जळजळ उच्च रक्तदाब, मधुमेह, यावर सूर्यफूल गुणकारी असते.
शरीरावरील जखमा भरून काढण्यामध्ये सूर्यफूल फायदेशीर ठरते. फुलापासून तेल मिळवले जाते. अनेक कंपन्या सूर्यफुला पासून सौंदर्य उत्पादने सुद्धा तयार करतात. सूर्यफुलाचे तेल हे खाद्यतेल म्हणून वापरले जाते. सूर्यफुलांच्या सुधारित बियांची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. दरवर्षी सूर्यफुलाला खूप मोठी मागणी असते.
सूर्यफुल उत्पादनासाठी लागणारे हवामान कसे असावे :
सूर्यफूल हे पीक सर्व प्रकारच्या हंगामामध्ये येऊ शकते. त्यामुळे हे पीक महाराष्ट्रात खरीप रब्बी व उन्हाळी हंगामात सुद्धा घेऊ शकता. सूर्यफुलाच्या सर्वाधिक उत्पन्नासाठी रब्बी हंगाम हा सर्वात चांगला असतो. कारण या पिकाच्या वाढीसाठी त्यांना भरपूर वेळ मिळतो. पीक काढणी सुद्धा जास्त कालावधी लागतो तसेच खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये अधिक तापमानामुळे पीक लवकर काढावी लागते, त्यामुळे उत्पादनात सुद्धा फरक पडतो.
सूर्यफूल लागवडीसाठी जमीन कशी असावी :
सूर्यफूल लागवडीसाठी वाळू मिश्रित जमीन सर्वात चांगली असते. सूर्यफुलाच्या मोर्चा वाढीसाठी पाण्याचा निसरा होणे गरजेचे असते. निचरा होणाऱ्या जमिनीत अन्नद्रव्यांचे शोषण चांगली होऊन पिकाची वाढ जोरात होते व जास्तीत जास्त उत्पन्न मिळते.
सूर्यफूल लागवडीसाठी बियाणे :
सूर्यफूल हे एक सुंदर व आकर्षक फुल दिसते. सहसा सूर्यफूल हे पिवळ्या रंगात आपल्याला दिसते; परंतु त्यांच्या विविध प्रजाती आहेत. ज्या वेगवेगळ्या रंगात आढळतात. सूर्यफुलाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी सूर्यफुलाच्या प्रजाती संकरित करण्यात आलेले आहे. त्या बियांपासून सूर्यफूल वनस्पती वाढण्यास सुरुवात होते.
जर तुमच्याकडे एखादी रोपवाटिका असेल तर ते तुम्ही बियाणे टाकून त्यापासून रोपटे तयार करू शकता. त्या रोप त्यांना गांडूळ खत कॉपीट आणि बागेची माती मिसळून टाकली तरी चालेल. जर तुम्हाला सूर्यफूल भांडत लावायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे झाड पूर्णपणे वाढवू शकता.
सूर्यफुलाच्या बियांचे फायदे व तोटे :
सूर्यफुलांच्या बियांमध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लमेटरी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरातील हानिकारक जिवाणू मारण्यास मदत करतात. फुलाच्या बियांमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याची शक्ती आहे. त्यामुळे सूर्यफुलाच्या बियांचे आपण सेवन करणे, फायदेशीर ठरते त्यामुळे शरीर निरोगी राहते.
बऱ्याच लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असते. त्यांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असते. त्यामुळे त्यांना विविध रोगांचा धोका असतो; परंतु तुम्हाला जर ह्या सर्व गोष्टी टाळायचे असतील तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाणे, हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास या बिया मदत करतात.
मधुमेह रुग्णांना नाष्ट्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे त्यांचे आरोग्यावर कोणतेही नुकसान होत नाही. त्यांचे शरीर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहते, वय वाढेल तेव्हा हाडे सांधे दुखतात; परंतु तुम्ही जर पोषक अन्नाचा आहार घेत असाल तर त्यामध्ये सुद्धा सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा दिसून येईल.
शरीरातील हाडे मजबूत होतील. कॅल्शियम लोह आणि जास्त असे पोषक घटक सूर्यफुलांच्या बियांमध्ये असते. त्यामुळे सूर्यफुलांच्या बिया हाडांसाठी योगदान आहे. सूर्यफुलांच्या बियांमध्ये शरीरातील जळजळ कमी करण्याची शक्ती असते. त्यामुळे तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता.
उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडते, त्यामुळे या समस्या तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही सूर्यफुलाच्या बियांची सेवन केले पाहिजे.त्यामध्ये लिओनिक ऍसिड असते. जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शरीराची किंवा त्वचेची चमक सुधारून मुलायम बनते.
सूर्यफुलाची खाल्ल्यामुळे होणारे तोटे :
सूर्यफुलाच्या बिया नेहमी सोडून खाल्ल्या पाहिजे कारण सूर्यफूल हे विषारी असते. नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
ज्या व्यक्तींची त्वचा ही संवेदनशील असते, त्या लोकांसाठी सूर्यफुलाच्या बिया आणि तेलाचा जास्त वापर करणे हानिकारक असू शकते. त्यामुळे शरीराच्या त्वचेवर एलर्जी सुद्धा होऊ शकते.
सूर्यफुलाच्या बिया दररोज 30 ग्रॅम पेक्षा जास्त खाऊ नये तसेच सूर्यफुलाच्या बिया खाण्यापूर्वी नेहमी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.
एखाद्या गोष्टीचा जास्त वापर केला तर त्याचे नुकसान आपल्या शरीरावर होते तेव्हा अतिप्रमाणात घेतल्यास ते आपल्यासाठी हानिकारक सुद्धा ठरू शकतात.
FAQ
सूर्यफुलाच्या बिया मध्ये कोणते पोस्ट घटक असतात?
सूर्यकुलाच्या बियांमध्ये विटामिन ई, कॅल्शियम तसेच खनिजे सुद्धा असतात.
सूर्यफुलाचे पीक हे किती दिवसात तयार होते?
सूर्यफुलाचे पीक हे 90 ते 100 दिवसात पूर्ण होते.
सूर्यफुलाचे वैज्ञानिक नाव काय आहे?
सूर्यफुलाचे वैज्ञानिक नाव हेलिॲथस आहे.
सूर्यफुलाची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता आहे?
मार्च ते मे हा काळ सुरू केल्याची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
सर्वप्रथम सूर्यफुलाचा उगम कोठे झाला?
अमेरिकेत