सतलज नदीची संपूर्ण माहिती Sutluj River Information In Marathi

Sutluj River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या नदीप्रणाली या पोस्टमध्ये आपण ‘सतलज’ या नदीची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. ही नदी भारतीय उपखंडातील पंजाब प्रांतातून वाहणारी प्रमुख नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी असून तिची लांबी सर्वात जास्त आहे. ही उत्तर भारतात वाहणारी सदाहरित नदी आहे.

Sutluj River Information In Marathi

सतलज नदीची संपूर्ण माहिती Sutluj River Information In Marathi

सतलज नदीचे वर्णन अनेक ऐतिहासिक साहित्यात आढळून येते. सतलज नदीचा उल्लेख ऋग्वेदातही केलेला आहे .वाल्मिकीनी लिहिलेल्या रामायणातही या नदीचा उल्लेख ‘शतद्रु’ असा केलेला आहे. तसेच ह्या नदीचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे .

या नदीचे पौराणिक नाव शतुर्डी असे आहे. सतलज नदीचे मूळ नाव शताद्री, शतद्रू असे आहे .पंजाब मध्ये या नदीला हैमावती असे संबोधले जाते. तर टॉलेमी ने केलेल्या  वर्णनात झाराद्रॉस असा उल्लेख आहे.

तसेच सतलज या नदीसाठी  संपू, सुतद्र, मुकसंग, सुमुद्रांग, जंगटी इत्यादी नावेही वापरली गेलेली आहेत. सतलज या नदीची एकूण लांबी 1450 किलोमीटर असून सतलज नदीची  भारतातील लांबी 1050 किलोमीटर आहे. सतलज नदीचे क्षेत्र हे पंजाब राज्यात जास्त आहे.

दक्षिण पश्चिम मध्ये समुद्रासपाटीपासून 4600 किलोमीटर उंचीवर राक्षसताल सरोवरातून सतलज नदीचा उगम होतो. तेथे तिला लांग्केन झांग्बो   (हत्ती नदी)  या नावाने ओळखले जाते. सतलज नदी प्रमाणे सिंधू नदी ही हिमालया कडील तिबेटच्या भागातून उगम पावते.

ही नदी उगम पावल्या नंतर प्रथम वायव्य दिशेने शिपकी खिंडीपर्यंत तिबेटमधून वाहत जाते तेथुन ती समुद्रसपाटीपासून 3000 किलोमीटर पर्यंत खाली येते .

या भागात तिबेट लोक सतलज नदीला ग्लांगचेन खबाब (गज मुखोद्‌भूत अथवा झिआंक्वान म्हणतात. सतलज नदी प्रमाणे सिंधू नदी ही नंतर हिमालयाकडे तिबेटच्या भागात उगम पावते. नंतर सतलज नदी भारतातून हिमाचल प्रदेश राज्यातून नेऋत्यदिशेने वाहत जाते व पंजाब मधील मैदानी प्रदेश नानगल येथे येते नंतर शाहिद भगतसिंग जिल्हा ,लुधियाना, जालिंदर मोगा, फिरोजपुर फजिल्का या शहरांमधून वाहत जाते .

पंजाब मध्ये प्रवेश केल्यानंतर हि नदी आग्नेयेकडे रोपर जिल्ह्यातील शिवालीक टेकड्यांमधून वाहत जाऊन डोंगरावरून मैदानावर उतरते आणि नंतर पश्चिमेकडे वळून पंजाब राज्याच्या मध्यभागातून वाहते व तेथे ती दोआब(उत्तर ) व माळवा (दक्षिण ) विभाजित करते.

नंतर पश्चिमेकडून 250 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर सतलज नदी शिपकीला येथे भारतात येते. पश्चिम आग्नेयस 360 किलोमीटर हिमाचल प्रदेश मधून वाहत जाते व तेथे तिचा संगम बियास नदिशी होतो व संगम झाल्यानंतर ती पाकिस्तानात शिरते. नंतर चिनाब या नदीला जाऊन मिळते .चिनाब मध्ये सतलज नदीला “पंचनद” या नावाने ओळखले जाते. नंतर पश्चिमेस 100 किलोमीटर वाहत जाऊन बहावलपूर शहराजवळ हि नदि सिंधू नदीस मिळते.

सतलज नदी ला उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे व पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे पाण्याचा पुरवठा हा जास्त होत असतो. त्यामुळे या नदीला पावसाळ्यात अनेक वेळा महापूर येतो. 1955 मध्ये झालेल्या सर्वात मोठा महापुर आला होता त्या वेळी या नदीपात्रातून सेकंदाला 16900 घ.मी. पाणी वाहत होते. हिवाळ्यात मात्र जेथे या नदीचा उगम होतो त्या  प्रदेशातील  हिमनद्या गोठल्यामुळे या नदीचा पाणी पुरवठा कमी होतो व तिच्या प्रवाहाचा वेगही कमी होतो.

ही नदी जेव्हा मैदान भागातून वाहते तेव्हा सतलज नदीने अनेक वेळा पात्र बदलल्याचे सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. काही तज्ञांच्या मते तिचा एक फाटा काही काळ कच्छच्या रणामधून वाहत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. इसवीसन दहावे शतक ते सोळावे शतक या कालावधीमध्ये तिने  तीन ते चार वेळा प्रवाह बदलल्याचे पुरावे आढळून येतात.

सतलज नदी खोरे याची जमीन ही सुपीक असते वरच्या भागातील जमीन खालच्या टप्प्यातील जमिनीपेक्षा जास्त सुपीक आहे राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील बहुतेक करून भाग हा खालच्या टप्प्यात मोडतो त्यामुळे या नदी किनारी राहणाऱ्या लोकांसाठी हि नदी एक जीवनवाहिनी मानली जाते.

त्याच्या मुख्य उपनद्या खालील प्रमाणे

स्पिती नदी

स्पिती नदी लाहौल – स्पिती येथील सोनापोणी हिमनदी पासून उगम पावते .उगम पावल्यानंतर एकूण 130 किलोमीटर अंतर वाहत जाऊन नंतर किंन्नौर मधील खाब या ठिकाणी सतलज नदीला जाऊन मिळते.ताबो,पोह ,कराटी,थुंपा,लुंपा,उलाह,सूरहल,गिमडो इत्यादी तिच्या उपनद्या आहेत.स्थिती नदीवर अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत

नोगली नदी-

नोगली नदी ही सतलजची दुसरी उपनदी असून ती रामपूर बुशहर जवळ सतळज ला येऊन मिळते .

हंस नदी-

ही नदी मुखतह हिमाचल मध्ये वाहते त्यानंतर हीनदी हिमाचल सोडून पंजाब मध्य एप्रवेश करते. व जेथे टी सतळज ची उपनदी बनते. भाक्रा नांगल प्रकल्पा जवळ सतलज नदीला जाऊन मिळते.

बियास नदी-

बियास नदी ही बियास कुंडपासून 470 किलोमीटर अंतर कापल्यानंतर पंजाब नंतर सतलज ला जाऊन मिळते.बियास नदी सतलजपेक्षा लहान असल्यामुळे ह्या दोघनच्या संगमाला तयार होणाऱ्या प्रवाहाला सतलज असे म्हणतात.

पंजाब राज्याला समृद्ध करण्याचे सर्वात मोठे योगदान हे सतलज नदीमुळे आहे.

या नदीचा मैदानी प्रदेशात बहुउद्देशीय प्रकल्पांसाठी उपयोग करून घेण्यात आलेला आहे. रुपार येथे उभारण्यात आलेल्या सरहिंद कालवा प्रकल्पामुळे तिच्या पाण्याचा शुष्क प्रदेशाला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

हिमाचल प्रदेशात नांगल पासून 6 किलोमीटर अंतरावर भाक्रा येथे सतलज नदीवर एक धरण बांधण्यात आले आहे व त्या धरण्याचा मागे मोठे जलाशय बांधण्यात आले आहे .त्याला “गोविंद सागर” जलाशय म्हणतात. भाक्रा नांगल प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते .

त्याचा उपयोग पंजाब  व त्याच्या जवळील लगतच राज्यांना होतो. ज्यामुळे या राज्यांना वीजपुरवठा केला जातो. सतलज नदी वरील भाक्रा धरण हे केवळ राज्याला वीज पुरवठा करत नाही तर राज्याच्या मोठ्या भागाला पुरापासूनही वाचवते.

नागल धरणाचा कालवा, सरहिंदचा कालवा आणि रोपर मधून निघणारा बेस्ट दोआब,  राजस्थान कालवा आणि हुसैनिवाला येथून उगम पावणाऱ्या बिकानेर कालवा या सर्व कालव्याना सतलज नदीपासूनच पाणी पुरवठा होतो. इंदिरा गांधी हा मुख्य कालवा असून या कालव्यातील पाण्याचा एकमेव स्त्रोत यास नदीतून आहे.

अप्पर सतलज प्रकल्प व लोवर्स प्लेस प्रकल्प या दोन प्रकल्पांमुळे वाळवंटी भागातील बहुतेक प्रदेश हा सिंचनाखाली आला आहे. त्यामुळे सतलज नदी ला राजस्थानची जीवनवाहिनी म्हणूनही ओळखले जाते. राजस्थानच्या समृद्धी मध्ये सतलज नदीचा ही मोठा वाटा आहे.

सतलज नदीवरील मोठे जलविद्युत प्रकल्प पुढीलप्रमाणे आहे-

  • भाक्रा-नांगल जलविद्युत प्रकल्प (बिलासपुर –पंजाब)
  • नाथपा – झाकरी जलविद्युत प्रकल्प (किन्नौर – शिमला)
  • रामपूर जलविद्युत प्रकल्प (शिमला)
  • लुहरी धरण जलविद्युत प्रकल्प (शिमला-कुल्लू)
  • कोल धरण जलविद्युत प्रकल्प (मंडी – बिलासपूर)
  • करचम वांगटू जलविद्युत प्रकल्प (किन्नौर)
  • खाब जलविद्युत प्रकल्प (किन्नौर)

रामपूर, बिलासपुर( हिमाचल प्रदेश), रुपनगर, लुधीयाना,अमृतसर,फिरोझपुर (पंजाब), बहावलपूर (पाकिस्तान) या नदीकाठावरील मोठी शहरे आहेत.

हिमाचलमध्ये सतलज नदी किन्नौर, शिमला, कुल्लू, सोलन आणि बिलासपूर जिल्ह्यातून वाहते. बिलासपूर जिल्ह्यातील सतलजमध्ये अली, गंभरोळ, गंभार, मोनी, शीर इत्यादी दऱ्याही आढळतात. कंदौर पूल बिलासपुर जिल्ह्यातील सतलज नदीवर बांधण्यात आला आहे. किब्बर चीचम हा पुल तयार होण्याआधी आशियातील सर्वात लांब पूल होता.

हवामानातील बदल,पुर,वाळू उत्खनन, औद्योगीक प्रदूषण ही सतलज नदी समोरील प्रमुख आव्हाने आहेत इत्यादि कारणांमुळे सतलज प्रवाहात बदल होत आहे. धारणांच्या बांधकामांमुळे जवळपासच्या वसाहतीचे स्थलांतर होऊन जमिनीची सुपीकता कमी होते. हिमाचल प्रदेश हा हिमालयाचा एक भाग असल्यामुळे ह्या भागात जास्त प्रमाणात धरण बांधल्यामुळे भूकंप सारख्या समस्याही निर्माण होत आहेत.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment