स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती Swami Vivekananda Information In Marathi

Swami Vivekananda Information In Marathi स्वामी विवेकानंद हे एक उत्तम वक्ते, उत्कृष्ट देशभक्त आणि एक महान असे विचारवंत होऊन गेले आहेत. स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी त्यांच्या स्मरणार्थ केली जाते तसेच राष्ट्रीय युवा दिन सुद्धा त्या दिवशी पाळला जातो. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण कार्य शिकवणी तत्त्वज्ञानाची पुस्तके लिहिली आहे. स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माची प्रतिनिधित्व करून संपूर्ण जगाला हिंदू धर्माचे प्रबोधन केले आहे आणि आज आपल्याला ज्याचा प्रभाव दिसत आहे. शिकागो येथील धर्म संसदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. भारतातील एका अज्ञात साधुने अचानक प्रसिद्धी मिळवली. हे एक आध्यात्मिक नीती आणि समाजसुधारक होते, त्यांनी जनजागृती केली.

Swami Vivekananda Information In Marathi

स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती Swami Vivekananda Information In Marathi

स्वामी विवेकानंद यांचा जन्म व बालपण :

स्वामी विवेकानंद यांचा जन्म मकर संक्रांत मुहूर्तावर म्हणजेच 12 जानेवारी 1863 रोजी झाला होता. त्यांचा जन्म हा कलकत्ता येथील एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी तर त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. त्यांची सुरुवातीचे नाव नरेंद्र असे होते. त्यांच्या आईची देवावर खूप भक्ती होती तसेच विश्वासही होता त्यामुळे स्वामी विवेकानंद सुद्धा त्याच मार्गावर गेले.

त्यांच्या बालपणी रामायण, महाभारत अशा ग्रंथांमधून त्यांच्या आईकडून त्यांना उत्तम असे ज्ञान मिळाले. त्यांची आई एक प्रतिभान स्त्री होती तसेच हुशार महिला सुद्धा होती. त्यांना इंग्रजी भाषा सुद्धा येत होती, त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्यावर त्या गुणांचा प्रभाव पडला. तसेच किशोरवयापासून त्यांना व्यायाम, खेळ इत्यादी क्रीडांमध्ये सुद्धा सहभागी होणे आवडत असे. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टीयुद्ध पोहणे, होडी वल्लवणे, घोडेस्वार, लाठी युद्ध, वादन गायन इत्यादी छंद होते.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण :

नरेंद्रांनी आपल्या लहानपणी घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1871 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला आणि 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची तेथील परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस ते या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंबलीज इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा प्रवेश घेतला होता. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास या विषयांवर अभ्यास केला.

1881 साली ते फाईन आर्टची आणि 1884 मध्ये परीक्षा पास झाले. त्या व्यतिरिक्त नरेंद्रनाथांनी अनेक विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. त्यामध्ये हरबर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांती वादाने ते खूप मोठे प्रभावित झाले होते. गुरुदास चतु उपाध्याय या बंगाली प्रकाशासाठी त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. तसेच त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही सखोल अभ्यास केला.

रामकृष्ण परमहंस यांची भेट :

रामकृष्ण परमहंस हे नरेंद्र नाथांचे गुरु आहेत. कोलकत्यात शिमला यामध्ये सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभामध्ये त्यांना बोलावले होते, त्यावेळी कोणी चांगला गायक न मिळाल्याने त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलावून आणले. 1881 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये श्री रामकृष्ण परमहंस पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्यांची गायन ऐकून ते संतुष्ट झाले. त्यांनी त्यांना दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले.

नरेंद्रची साधना :

रामकृष्ण परमेश्वर यांच्या पवित्र सहवासामध्ये नरेंद्र यांच्या जीवनात अनेक बदल झालेत. तसेच त्यांनी व अन्य तरुण साधकांनी सुद्धा रामकृष्ण यांच्या आदर्शंना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपस्या केली.

गुरु भेट व संन्यास दीक्षा :

रामकृष्ण परमहंस यांच्या आदर्शंना स्वीकारून स्वामी विवेकानंदांनी काशीपूरच्या उद्यानात तपस चर्चा केली तसेच रामकृष्ण परमहंस यांच्या सेवेमध्ये सतत राहिल्याने त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रेम संबंध जोपासले गेले होते. आणि येथील त्यांनी रामकृष्ण संघाची पायाभरणी सुद्धा केली. याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली आणि संन्यास ग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्याशी मंडळीचे जीवन आणि उपदेश याचे अनुशीलन करणे हेच त्यांचे ध्येय बनले.

रामकृष्ण नरेंद्र शिवाय राहू शकत नव्हते, त्यांना जवळ बसून अनेक उपदेश नेहमीच करत होते. ते दोघेही असताना त्यांच्या आपसात खूप चर्चा होत होत्या. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा नरेंद्रवार सोपवत होते. एके दिवशी रामकृष्णाने एका कागदाच्या कपड्यावर लिहिले, नरेंद्र लोक शिक्षणाचे कार्य करील. काहीसे ओढेवेढे घेत नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, “हे सारे माझ्याने होणार नाही” रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “होणार नाही..! अरे तुझं हाड हे काम करतील. पुढे रामकृष्णांनी स्वामींना संन्यास दीक्षा देऊन त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे सुद्धा केले होते.

धर्मप्रसार :

जय श्रीराम कृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. हे आपले गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकत्ता जवळील वऱ्हा नगर या भागामध्ये पडक्या इमारतीत ही स्थापना केली. पूर्वी त्या जागेमध्ये भूतांचा वावर आहे, असा गैरसमज तेथे पसरलेला होता.

विवेकानंदांनी रामकृष्णाने वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मस्तीचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त सुद्धा तेथे राहायला सुरुवात केली. रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद हे भारतभर फिरले तसेच कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले.

तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शीला खंडावर जाऊन ध्यानात बसले, त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासवीत झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी तेथील लोकांच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करावे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनवून झटावे, असा त्यांनी दृढ निश्चय केला. त्या दरम्यान त्यांनी त्यांचे वेदांत विचार जगभरात पोहचावे आणि माणसातील सुक्त मनुष्यत्व जागी करावे. यासाठी भारताच्या सीमा ओलांडून यांनी पश्चिमात जगात जाण्याचे ठरवले.

शिकागो येथील सर्व धर्म परिषद :

स्वामी विवेकानंद हे 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्व धर्मीय परिषद भरली असताना त्या सभेला तेथे गेले. त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी बोलून भाषणांनी सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकांनी टाळ्यांचा तेथे कडकडाट केला.

तू टाळ्यांचा कडकडाट दोन मिनिटे चालू होता, त्यामुळे जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण त्यांनी दिली. अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशाच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी या जगातील नवनिर्मित राष्ट्राचे स्वागत करतो. या शब्दात त्यांनी आपले पुढील भाषण चालू केले.

या परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृती यावर भाषण दिले. जगातील सर्व धर्माचे सार तत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मनी त्यांनी जिंकून घेतली. आपल्या छोट्याशा भाषणातून जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राण तत्व मांडले.

स्वामी विवेकानंद यांची समाधी :

स्वामी विवेकानंद यांनी कोलकत्या जवळील बेलूर या मठात 4 जुलै 1902 या दिवशी समाधी घेतली. ही समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठामध्ये परीराजकांना शुक्ल यजुर्वेदीचा पाठ दिला होता तसेच स्वामी प्रेमानंद या गुरुबंधू समवेत बराच काळ ते फिरत असताना, त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्याविषयी काही सूचना सुद्धा दिल्या ध्यान करत असताना रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. 40 वर्षापर्यंत जगणार नाही, ही स्वतःची त्यांची भविष्यवाणी खरी झाली.

आत्मसाक्षात्काराची ध्येय व ते पूर्ण करण्याच्या पद्धती :

स्वामी विवेकानंदांनी कर्मयोग, भक्तयोग, राजयोग आणि ज्ञानयोग यांच्या आधारावर ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न मार्ग आहेत. हे दाखवून दिले आहेत.

कर्मयोग : या पद्धतीने सर कर्म व कर्तव्य यांचे द्वारे मनुष्य दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेऊ शकतो.

भक्ती योग : यानुसार सगुनेश्वरावर प्रेम करून व भक्तिमार्गाचा अवलंब करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

राज योग : यानुसार मन संयमाच्याद्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेऊ शकतो.

ज्ञानयोग : ज्ञानाद्वारे सुद्धा मनुष्य साक्षात्कार करून घेतो. ही चारोळी ईश्वराकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

FAQ

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय?

नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?

12 जानेवारी 1883.

स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते?

भुनेश्वरी देवी दत्त.

स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?

रामकृष्ण परमहंस.

स्वामी विवेकानंद यांनी समाधी कधी घेतली?

4 जुलै 1902.

Leave a Comment