ताजमहल विषयी संपूर्ण माहिती Taj Mahal Information In Marathi

Taj Mahal Information In Marathi ताजमहल हा आग्रा या शहरांमध्ये स्थित आहे. तसेच आपण आग्रा हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या मनामध्ये ताजमहल ही आकृती निर्माण होते. ताजमहल हा पांढऱ्या संगमवर दगडाने बांधलेला आहे. हे एक प्रेमाचे प्रतीक असून मुगल शासक शहाजान यांनी बांधला होता. हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहालला जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे आणि हे उत्कृष्ट मानवीकृती म्हणून सुद्धा त्याला जागतिक वारसा मिळालेला आहे. या ताजमहलची संपूर्ण जगाने प्रशंसा केलेली आहे.

Taj Mahal Information In Marathi ताजमहल विषयी संपूर्ण माहिती Taj Mahal Information In Marathi

ताजमहल विषयी संपूर्ण माहिती Taj Mahal Information In Marathi

ताजमहल ही कलाकृती तयार केल्यानंतर शहाजहानने आपल्या सर्व कारागिरांचे हात कापले होते. जेणेकरून या ताजमहांसारखे दुसरी कलाकृती रचना कोणीही करू नये असे त्याला वाटत होते. ताजमहल ही एक खूप मोठी वास्तू आहे, जे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात तसेच ताजमहाला भेटी देत असतात. ताजमहल हा जगभरामध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे. दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त परदेशी पर्यटक आग्रा येथे येऊन ताजमहाला भेटी देतात तसेच देशभरातून सुद्धा 20 ते 40 लाख लोक ताजमहाल पाहण्यासाठी जात असतात.

ताजमहल बनवण्यासाठी किती कालावधी लागला :

ताजमहल हा मुगल शासक शहाजानने उभारलेला होता. ताजमहल 1631 मध्ये उभारला गेला. ताजमहल चे बांधकाम 1653 मध्ये पूर्ण झाले म्हणजेच 22 वर्षाचा कालावधी ताजमहल बांधण्यासाठी लागला. ताजमहालच्या खर्चाचा विचार केला तर इतक्या मोठ्या कालावधीत इमारतीच्या खर्चाचा अंदाज बांधणे आपल्यासमोर खूपच कठीण होईल कारण त्यावेळेस तीस दशलक्ष रुपये खर्च हा अपेक्षित होता. ज्याची किंमत आता अनेक अब्जावधी रुपये आहे आणि तशी कलाकृती बनवणे अशक्य आहे.

ताजमहल बांधण्यामागचा उद्देश ताजमहल बांधण्यामागे एक कथा आहे, जी प्रेमाची आहे. शहाजानची आवडती पत्नी मुमताज महल ही होती त्यामुळे मुमताज ही पार्शियन राज घराण्यातील असल्यामुळे 39 एप्रिल 1612 रोजी शहाजानने मुमताजशी लग्न केले आणि मुमताज ही शहाजानची दुसरी पत्नी होती. मुमताज बेगम 16 जून 1661 प्रस्तुती दरम्यानच्या वेदनामुळे मरण पावली.

तेव्हा मुमताजने शहाजान यांच्या चौदाव्या मुलाला तिने जन्म दिला. ज्याचे नाव गौहरा होते. तिचा मृत्यू हा मध्य प्रदेशातील झेनाबाद येथे झाला. त्यामुळे मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजान खूप उदास राहू लागला आणि मुमताजची त्याला खूप आठवण येत होती. कारण मुमताज त्याची आवडती बेगम होती शहाजान यांनी तिच्या स्मरणार्थ किंवा तिच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी ताजमहलची निर्मिती केली असे म्हटले जाते.

ताजमहलची रचना कशी आहे :

ताजमहलची रचना कशी आहे आपण जाणून घेऊया. ताजमहल हा संपूर्ण पांढऱ्या संगमवर बांधलेला आहे. ताजमहलची रचना ही अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आली होती आणि ताजमहलचा प्रत्येक विभाग हा खूपच अद्भुत आहे. ताजमहलच्या रचनेचा आपण विचार केला तर सर्वप्रथम ताजमहालचा घुमट याची रचना अतिशय वशिष्ठ पूर्ण आहे.

तसेच ती खूपच आकर्षक व सुंदर आहे. ज्यामध्ये सात मीटर उंच दंड गुणाकार खांबांचा आधार आहे. हा घुमट मुमताच्या थडग्यावर आहे. ज्याचा आकार उलटा कलश किंवा नशपातीसारखा आपल्याला दिसतो. पार्शियन आणि हिंदू स्थापत्य कलेचे दर्शन घडवणाऱ्या या घुमटावर किरीट कलश आहे.

ताजमहलची छत्री : या घुमटा भोवती चार घुमत छत्र बांधण्यात आलेला आहे. या घुमटाला आधार देण्यासाठी ह्या छत्र्या बांधलेल्या आहेत. छत्रीचा स्तंभ आधार अंतर्गत शेतावरील प्रकाश आतमध्ये येण्यासाठी उघडला आहे. ताजमहलच्या छत्र्यामुळे समाधिवर उजेड पडतो.

ताजमहलची टॉवर्स : ताजमहल बाहेर चार भव्य मिनार उभारण्यात आलेला आहे, ज्यामुळे ताजमहलच्या वैभवमध्ये आणखीनच भर पडते. भूकंप किंवा पूर अशा आपत्तीच्या वेळी ताण इमारतीवर पडू नये म्हणून हे चार मिनार ताजमहलच्या बाहेर असतात. ताजमहलचे चारही कोपरे चारमिनारने वेडलेले आहेत. त्यांची उंची कमीत कमी 40 मीटर एवढी आहे. ताजमहलचे मिनार दोन बालकनींनी तीन समान तुकड्यांमध्ये विभागले आहे. हे टावर्स अतिशय आकर्षक आहेत .

ताजमहल चे प्रवेशद्वार : ताजमहलमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन दरवाजा आहेत. हे दरवाजे पूर्व पश्चिम आणि दक्षिण दिशांना बांधलेले आहे. ताजमहलमध्ये प्रवेश करण्यासाठी या तीन पैकी कोणतेही दरवाजे वापरता येऊ शकतात.

ताजमहल चे काही मनोरंजक तथ्य :

ताजमहल येथे अनेक ठिकाणी पुराण ग्रंथ सापडतात तसेच ताजमहलच्या शुभ भव्यतेवरील कॅलिग्राफी थू लिपीमध्ये कोरलेली आहे. लेख आणि ब्लॅक मारवल वापरून लिहिले गेलेले आहेत. ताजमहालच्या लिखाणासाठी पार्शियल कॅलिग्राफीसाठी अब्दुल अल हक यांनी अतिशय सुंदर अशी कॅलिग्राफी मांडलेली आहे. शहाजानी त्याला अमानत खान असे नाव दिले होते.

ताजमहल येथे चारबाग आहे, त्या बागेचे नाव असे का पडले कारण या बागेतून चार नद्या वाहतात तसेच चार भागापासून गार्डन पासून प्रेरित होऊन त्याला हे नाव प्राप्त झाले.

ताजमहल येथे चारबागच्या मधोमध करंजी आहे. दोन हौद आणि पाण्याची टाकी मध्ये ठेवलेली आहे. करंज्यामुळे राजमहलचे सौंदर्य अधिकच वाढते.

ताजमहल येथे कसे जावे?

ताजमहल हा यमुना नदीच्या उजव्या तीरावर बांधण्यात आलेला आहे. तसेच हा ताजमहल भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा या शहरांमध्ये स्थित आहे. दिल्लीवरून आग्रा येथे जायचे असेल तर केवळ दोन किलोमीटर अंतरावर आग्रा हे शहर आहे. आग्रा येथे बस ट्रेन किंवा विमानाने तुम्ही सहज जाऊ शकता.
आणि ताजमहल पाहू शकता.

जर तुम्हाला विमानाने जायचं असेल तर तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय विमानतळ हे आग्र्याच्या विमानतळाचे नाव असून देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेलेले आहे. तसेच तुम्ही दिल्लीला सुद्धा जाऊ शकता आणि तेथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आल्यानंतर तुम्ही बस किंवा ट्रेनने सुद्धा आग्र्याला पोहोचू शकता.

जर तुम्हाला ट्रेनने यायचे असेल तर आग्रा येथे दोन रेल्वे स्टेशन आहेत. आग्रा कॅट आणि आग्रा फोर्ट ताजमहल आग्रा फोर्ट स्टेशनच्या सर्वात जवळ आहे. त्यामुळे तुम्ही आग्रा फोर्ट येथेच उतरावे तेथून तुम्हाला कॅब किंवा बसेस सुद्धा असतात तेथून तुम्ही ताजमहल पाहण्यासाठी जाऊ शकता.

जर तुम्हाला कारणे जायचे असेल तर तुम्ही उत्तर प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी आग्रा हे शहर प्रसिद्ध आहे. तेथेच अनेक उत्कृष्ट असे रस्ते आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कारने सुद्धा तेथे जाऊ शकता व ताजमहल पाहू शकता.

ताजमहल पाहण्याची वेळ :

तुम्हाला ताजमहल पहायचा असेल तर ताजमहल हा पाहण्यासाठी केव्हा खुला असतो तर ताजमहल पहाटे 6 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. तसेच ताजमहल पौर्णिमेच्या दिवशी रात्री साडेआठ वाजेपर्यंत उघडे असतात. तसेच इतर दुपारी 12.30 वाजेपर्यंत खुला असतो परंतु शुक्रवारी ताजमहल बंद असतो कारण तेथे नमाज अदा केली जाते. सामान्य माणसांसाठी ताजमहल शुक्रवारी बंद असतो.

FAQ

ताजमहल बांधण्यासाठी किती वर्ष लागले?

1632 ते 1653 म्हणजेच 22 वर्ष लागले.

ताजमहलची वास्तुशाली कशी आहे?

मुघल स्थापत्य शैली.

ताजमहल कोठे स्थित आहे?

भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील आग्रा या शहरांमध्ये ताजमहल स्थित आहे.

ताजमहल ची उंची किती आहे?

73 मीटर.

ताजमहल हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे?

यमुना नदी.

Leave a Comment