Tajmahal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पर्यटन कोणाला आवडत नाही? अनेक ठिकाणी फिरणे हा मानवाचा जन्मजातच असलेला छंद आहे, अगदी लहान मुल देखील मोठ्या माणसांच्या पाठीमागे लागत असते. अशाच एका पर्यटनाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ताजमहाला बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
ताजमहालची संपूर्ण माहिती Tajmahal Information In Marathi
मित्रांनो, आग्रा म्हटलं की आपल्याला पांढरा शुभ्र ताजमहाल आणि मधुर चवीचे पेठे या दोनच गोष्टी आठवतात. संपूर्णतः पांढऱ्या संगमरावरी दगडामध्ये तयार केला गेलेला, ताजमहल हा शहाजहान या मुघल शासकाने उभारला होता. ज्याला जागतिक साथ आश्चर्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. युनेस्को या संस्थेने देखील याला एक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
आज अगदी परदेशातून देखील या ताजमहालाचे दर्शन करण्यासाठी पर्यटक येत असतात. आणि त्याची प्रशंसा करत असतात. असे म्हटले जाते की या ताजमहाला सारखी वास्तू पुन्हा कोणीही बनवू नये, म्हणून शहाजहान यांनी सर्व कारागीरांचे हात कलम केले होते.
चला तर मग आजच्या भागामध्ये या ताजमहाला विषयी संपूर्ण माहिती घेऊया…
नाव | ताजमहाल |
प्रकार | ऐतिहासिक वास्तू |
ठिकाण | आग्रा, UP |
क्षेत्रफळ | ४२ एकर |
उंची | २४० फूट |
बांधकाम कालावधी | १६३१ ते १६५३ |
प्रतीक | प्रेमाचे |
स्मरणार्थ | मुमताज |
वास्तुकार | उस्ताद अहमद लाहौरी |
सध्या ताबा | भारत सरकार |
स्थापत्यकला | मोगल स्थापत्य शैली |
ताजमहालाचा इतिहास:
मित्रांनो इसवी सन १६३१ यावर्षी शहाजहान या मुघल शासकाने ताजमहाल बांधण्याची घोषणा केली. मात्र या कामाला खरी सुरुवात १६३२ या वर्षापासून झाली. सुमारे २० वर्षांच्या कालावधीनंतर १६५३ यावर्षी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.
काही संदर्भानुसार २० वर्ष तर काही संदर्भानुसार २२ वर्ष सांगितले जातात. मित्रांनो, या प्रचंड मोठ्या वास्तूच्या उभारणी करिता त्याकाळी सुमारे ३० दशलक्ष रुपये खर्च आला असल्याचे सांगितले जाते. त्याची किंमत आज कित्येक अब्जा मध्ये आहे.
ताजमहल का बांधला गेला:
मित्रांनो, त्याकाळी मुघल बादशहांना अनेक पत्नी असत. त्याचप्रमाणे शहाजन याला देखील अनेक पत्नी होत्या. मात्र यातीलही पार्शियन राजघराण्यातील मुमताज ही त्याची अतिशय आवडीची पत्नी होती. काही संदर्भानुसार ३० एप्रिल १६१२ या दिवशी शहाजहान आणि मुमताज यांचा विवाह पार पडला होता,
जो त्याचा दुसरा विवाह होता. या आवडत्या मुमताज पासूनच शहाजहानला १४ अपत्य झाली, मात्र चौदाव्या अपत्याच्या जन्मावेळी असह्य प्रसूदे वेदना झाल्यामुळे १७ जून १६४१ या दिवशी मुमताज चा अंत झाला. ज्यावेळी ती मध्यप्रदेशच्या झाईनाबाद या ठिकाणी होती.
या पत्नीच्या मृत्यूनंतर शहाजहान नेहमी उदास राहत असे, आणि तिच्या आठवणी काढत असे. तिच्या स्मरणार्थ त्याने काहीतरी करण्याचे ठरविले, आणि तिच्या आठवणींना उजाळा मिळावा याकरिता ताजमहल या वास्तूची निर्मिती केली. त्यामुळे शहाजान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून या ताजमहाला ओळखले जाते. त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रेमाखातील जगात अद्वितीय म्हणजेच कोणीही दुसरा न बनवू शकणारी ताजमहल ही वस्तू बनवलेली आहे.
आत मधून ताजमहल बघताना:
मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी ताजमहाला भेट दिली असेल, मात्र ज्यांनी अजूनही ताजमहल आला भेट दिली नाही त्यांच्यासाठी ताजमहल एक कुतूहलाचा विषय असतो. बाहेरील बाजूने आकर्षक दिसणारा हा ताजमहल आतून देखील खूपच सुंदर आहे.
या ताजमहालामध्ये मुमताज आणि शहाजहान या दोघांच्या कबरी आहेत ज्याला आजच्या घडीला ताजमहालाचा केंद्रबिंदू मानले जाते. मुमताजच्या मृत्यूनंतर ताजमहाल बनवला असला, तरी देखील या शहाजहान बादशहाने बागेमध्ये पुरलेली मुमताज ची कबर पुन्हा ताजमहल बांधून पूर्ण झाल्यानंतर ह्यात स्थापन केली होती.
या संगमरावापासून बनवण्यात आलेल्या ताजमहाला एक भव्य असा घुमट असून ताजमहाला चार मिनार देखील आहेत.
ताजमहालाच्या बांधकाम विषयी काही वैशिष्ट्ये:
मित्रांनो, आज अतिशय आकर्षक दिसणारा हा ताजमहल बांधकाम करण्यामागे काही वैशिष्ट्ये देखील आहेत. जसे की या ताजमहालाच्या बांधकामा करिता भारतासह मध्य आशिया, रशिया, तुर्की, इराण, या आणि इतरही राज्यांमधून सुमारे ३७ तज्ञ व्यक्तींना भारतामध्ये पाचारण करण्यात आले होते. तर वीस हजार कामगार या बांधकामा करिता लागले होते.
ताजमहल बांधकामांमधील बराचसा वेळ हा केवळ घुमट बांधण्यासाठीच गेला, ज्याला बांधण्याकरिता सुमारे पंधरा वर्षे आणि कित्येक हजार हत्तींची मदत लागली.
या ताजमहालामध्ये वापरण्यात आलेले दगड हे देखील खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ज्यांना गुलाबी, पांढरा व सोनेरी इत्यादी रंग वेगवेगळ्या वेळेनुसार प्राप्त होत असतो. या ताजमहलाला इराण, तिबेट, रशिया, इजिप्त, अफगाणिस्तान यांसारख्या अनेक २८ वेगवेगळ्या देशातील दगड वापरण्यात आलेले आहेत.
ताजमहालातील विविध वैशिष्ट्यपूर्ण इमारती:
मित्रांनो, ताजमहालाचा मुख्य घुमट हा ताजमहालाचे खरे आकर्षण आहे. ज्याला अतिशय पांढरे शुभ्र दगडांनी बनवण्यात आलेले आहे. तसेच या पांढराशुभ्र संगमरवरावर थुलाथू या लिपीमध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत.
तसेच या ठिकाणी चारबाग नावाची बाग देखील आहे. सोबतच बाहेरच्या बाजूला झुकलेली मिनार देखील आहेत, आणि ताजमहाला कडे जाणाऱ्या वाटेवर अनेक कारंजे देखील बसविलेले आहेत.
मित्रांनो, ताजमहाला भेट देण्यासाठी तुम्ही विमान, ट्रेन, बससेवा, किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने देखील जाऊ शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो, आज भारतासह संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणारा ताजमहल अनेक गोष्टींना उपमा देण्यासाठी वापरला जातो. शहाजहान या मोगल सम्राटाने मुमताज बेगमसाठी या ताजमहल वास्तूची निर्मिती केली होती. ज्याला प्रेमाचे प्रतिक म्हणून देखील ओळखले जाते. अगदी पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडापासून बनलेला हा ताजमहल बघण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येत असतात.
आजच्या भागामध्ये आपण या ताजमहाला विषयी माहिती बघितलेली आहे, ज्यामध्ये ताजमहालाचा इतिहास, त्याचा बांधकाम उद्देश, प्रेमाचे प्रतीक का म्हटले जाते, आतून कसा दिसतो, त्यातील विविध मनोरंजक तथ्य, दगडाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती, रचना, तसेच आणखी जवळील ठिकाणे इत्यादी गोष्टीबद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच काही प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.
FAQ
ताजमहाल ही वास्तु कोणा द्वारे व केव्हा बांधण्यात आली होती?
ताजमहाल ही वास्तु उस्ताद अहमद लाहोरी या वास्तुविशारदाने शहाजहान सम्राटाच्या सांगण्यावरून निर्माण केली होती. तो कालावधी १६३१ ते १६५३ यादरम्यानचा होता.
ताजमहालाचे क्षेत्रफळ व उंची किती आहे?
मित्रांनो, ताजमहालाचे क्षेत्रफळ सुमारे १७ हेक्टर अर्थात ४२ एकर इतके असून, त्याची उंची देखील ७३ मीटर इतकी आहे. फुटामध्ये ती २४० फूट इतकी येते.
ताजमहालाला सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कारण काय आहे?
ताजमहाल कित्येक वर्षांपासून तसाच स्थित असून त्यामध्ये स्थापत्य शैलीचे अनेक नमुने वापरण्यात आलेले आहेत. शिवाय हा लाकडावर बांधण्यात आलेला आहे, आणि प्रत्येक वर्षी सहा दशलक्ष पेक्षाही अधिक लोक येथे भेट देत असतात. त्यामुळे याला सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.
ताजमहाल या वास्तूचे खासियत काय आहे?
पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेला हा ताजमहल सुंदर कलाकारितेचे एक लक्षण आहे. शिवाय शेजारून जाणारी अथांग नदी या ताजमहालाच्या दगडांवर परिणाम करत असते. या ताजमहालावरून आग्रा किल्ला दिसत असे इत्यादी. या ताजमहालाची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
ताजमहालाच्या दगडाचे काय वैशिष्ट्य आहे?
मित्रांनो, ताजमहालाचे दगड हे तीन वेगवेगळ्या रंगांचे रूप घेऊ शकतात. जे सकाळी गुलाबी, दिवसभर पांढरा, आणि केवळ पौर्णिमेच्या रात्रीच सोनेरी रंगांमध्ये दिसून येतात.
याशिवाय संपूर्ण ताजमहालाच्या बांधकामात २८ प्रकारचे वेगवेगळे दगड वापरले गेले होते. जे विविध देशांमधून आयात केले गेले होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जगातील सात आश्चर्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ताजमहल या वास्तू बद्दल माहिती घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवतानाच या लेखाला मोठ्या प्रमाणावर शेअर देखील करा.
धन्यवाद…