क्षयरोग आजाराविषयी संपूर्ण माहिती TB Disease Information In Marathi

TB Disease Information In Marathi साधारणपणे आपल्याला खोकला आला की तो दोन किंवा चार दिवसांपर्यंत राहत असतो. त्यानंतर पुन्हा पूर्व पदावर आपला आवाज येत असतो. मात्र अधिक काळासाठी खोकला राहिला तर त्याला ट्यूबर्क्युलोसिस किंवा टी बी या नावाने ओळखले जाते. मराठीमध्ये क्षयरोग या नावाने ओळखला जाणारा हा रोग प्राणघातक स्वरूपाचा देखील समजला जातो. यामुळे कित्येक लोकांचा बळी देखील जात आहे.

TB Disease Information In Marathi

क्षयरोग आजाराविषयी संपूर्ण माहिती TB Disease Information In Marathi

या आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती असण्यापेक्षा भीती जास्त पसरलेली आहे, त्यामुळे अनेक लोक टीबी आजार झाल्यानंतर घाबरून जातात, आणि या भीतीमुळेच ते अर्धे गळून जात असतात. टीबी झाल्यानंतर घाबरण्यापेक्षा त्यावर योग्य उपचार केल्यास टीबी रोग नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

त्यामुळे कोणीही फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. टीबी हा रोग केवळ फुफुसांनाच हानी पोहोचवतो असे नाही, तर यामुळे तोंड, यकृत, मेंदू, गर्भाशय, मूत्रपिंड, घसा इत्यादी प्रकारच्या अवयवांवर देखील मोठा परिणाम दिसून येत असतो. मुख्यतः भारतामध्ये फुफुसाचा टीबी जास्त प्रमाणात आढळतो. आणि हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खोकल्याच्या माध्यमातून देखील पसरू शकतो.

त्यामुळे शक्यतो टीबी झालेल्या रुग्णांनी आणि इतरांनी देखील खोकताना किंवा शिंकताना नाकावरून रुमाल धरण्याचा सल्ला आरोग्य विभागाद्वारे दिला जातो. टीबी झाला आहे असे थोडेसे जरी भासले तरी देखील लवकरात लवकर इलाज करणे गरजेचे ठरते. जेणेकरून टीबी आटोक्यात आमला जाऊ शकतो. आजच्या भागामध्ये आपण टीबी या आजाराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावक्षयरोग
प्रकारआजार
इंग्रजी नावट्यूबर्कलोसिस अर्थात टीबी
मुख्य प्रकारघशाचा किंवा फुफुसांचा ट्यूबर्क्युलोसिस
इतर प्रकारमेंदू, यकृत, गर्भाशय, मूत्रपिंड इत्यादींचा क्षयरोग

क्षयरोग म्हणजे काय:

हा एक खोकल्याचा प्रकार असून, जिवाणूमुळे या आजाराचे संसर्ग दिसून येत असतात. मुख्यतः पुरुष व्यक्तींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. हा आजार अतिशय घातक असून, योग्य काळजी घेतली नाही किंवा औषध उपचार केले नाही, तर रुग्णाचा मृत्यू देखील संभाव्य असतो. दरवर्षी २४ मार्च या दिवशी क्षयरोग दिवस साजरा केला जात असतो, जेणेकरून क्षयरोग विरोधी संपूर्ण समाजामध्ये जनजागृती केली जाऊ शकेल.

क्षय रोगाची लक्षणे:

क्षयरोग या नावातच शक्तीचा क्षय होणे असल्यामुळे माणसाला नेहमी थकल्यासारखे वाटत असते. त्याचबरोबर छातीमध्ये मोठ्या प्रमाणावर चमक दिसून येते. हा क्षयरोग अतिशय घातक स्वरूपाचा असून, या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कुठलीही लक्षणे दिसत नाही.

त्यामुळे हा आजार शरीरामध्ये बळावत जात असतो. तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी खोकला राहिला तर क्षय रोगाची चाचणी करून घेणे गरजेचे ठरते. कारण एकदा शरीरामध्ये लागण झाल्यानंतर हा क्षयरोग काही महिने किंवा अगदी काही वर्षानंतर देखील लक्षणे दाखवत असतो.

त्यामुळे तोपर्यंत शरीराचे आतून प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असते. या आजाराच्या लक्षणांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोकला येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे, त्याचबरोबर श्वास घेण्यासाठी त्रास जाणवणे, थकवा जाणवल्यासारखा वाटणे, इत्यादी लक्षणे दिसून येत असतात.

या आजाराच्या मुख्य लक्षणांमध्ये प्रचंड थकवा, ताप येणे, रात्री उष्णता जाणून घाम येणे, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे, छातीमध्ये चमक भरणे किंवा दुखणे, भूक मंदावणे, आणि खोकला, तसेच खोकला मधील रक्त, इत्यादी लक्षणांचा देखील समावेश होत असतो.

त्याचबरोबर काही रुग्णांच्या पोटामध्ये दुखू शकते, किंवा अतिसार देखील जाणवू शकतो. हाडे आणि संपूर्ण शरीरामध्ये वेदना जाणवण्याबरोबरच पाठीला रग लागू शकते, आणि नेहमी डोकेदुखीची समस्या देखील जाणवत असते.

क्षयरोगाचा धोका:

क्षयरोग कोणत्या स्वरूपाच्या रुग्णांना होईल हे सांगता येत नसले, तरी देखील काही रुग्ण असे असतात ज्यांना क्षयरोग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. ज्यामध्ये एचआयव्ही बाधित लोक, जे नाकातील औषधे घेतात, किंवा क्षयरोग झालेल्या व्यक्तीच्या सहवासामध्ये वावरत असतात, अशा लोकांना क्षयरोग होण्याची शक्यता दाट असते.

क्षयरोग आजारावरील उपचार:

ज्या रुग्णाला क्षयरोग झालेला आहे, अशा रुग्णांनी इतर निरोगी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर शक्यतो चार आठवड्यापर्यंत बंदिस्त खोलीमध्ये वेळ घालवला पाहिजे. इतर लोकांनी देखील क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या सहवासामध्ये जाण्यापूर्वी तोंडाला मास्क लावला पाहिजे.

क्षयरोग आजाराची साथ आली असता एकत्र येण्याच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर केला पाहिजे. क्षय रोगाचे निदान झाल्यानंतर योग्य तो उपचार घेतला पाहिजे, व या कालावधी दरम्यान किमान चार आठवडे इतरांशी फार जवळचा संपर्क करणे टाळले पाहिजे.

सोबतच घरगुती उपचारांमध्ये अनेक पदार्थांचे सेवन करणे सांगितले जाते. यामध्ये केळी, दूध, लसूण, करवंद, पेपरमिंट, आवळा, काळी मिरी, आणि संत्री यांचा समावेश होतो.

निष्कर्ष:

आपल्यातील अनेक लोकांना खोकला झाला असेल. मात्र हा खोकला जास्त दिवस पर्यंत राहिला की प्रत्येक जण चिंतेमध्ये पडत असतो. कारण टीबी या रोगाबद्दल समाजाला बऱ्याच प्रकारची माहिती झालेली असली, तरी देखील या माहितीने जनजागृती होण्यापेक्षा समाजामध्ये भीतीचे वातावरण जास्त पसरलेले आहे.

टीबी हा रोग खूप घातक असून त्यामुळे मृत्यू होतो असाच समज बऱ्याच लोकांचा झालेला आहे, मात्र या टीबी आजारावर लवकरात लवकर उपचार घेतले, आणि त्याचा इलाज केला तर हा टीबी आटोक्यात आणला जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी सर्वप्रथम कुठलाही प्रकारे न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे वर्तन केल्यास टीबी या आजाराशी लढण्यास मदत मिळू शकते.

भारत सरकारच्या आरोग्य विभागाने देखील या संदर्भातील जनजागृती करण्याकरिता अनेक मोहिमा आखलेल्या असून, टीबीसाठीच्या विविध आरोग्य मोहिमा देखील मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात असतात. आजच्या भागामध्ये आपण याच टीबी आजाराबद्दल किंवा क्षयरोगाबद्दल माहिती बघितली असून, त्यामध्ये या आजाराचे प्रकार, विविध लक्षणे, चिन्ह, पोहचणारे नुकसान, डॉक्टरांचा सल्ला, क्षयरोग होण्याची कारणे, व क्षयरोग शोधण्याची पद्धत, त्याचप्रकारे क्षय रोगावर केले जाणारे विविध उपचार, आणि घरगुती उपायांची माहिती इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितलेली आहे.

FAQ

क्षयरोग या आजाराला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

क्षयरोग या आजाराला इंग्रजी मध्ये ट्यूबर्क्युलोसिस असे म्हणून ओळखले जाते. ज्याला सर्वसामान्य बोली भाषेमध्ये टीबी या नावाने ओळखले जाते.

टीबी आजाराविरुद्ध जनजागृती करता यावी याकरिता जागतिक पातळीवर क्षयरोग कोणत्या दिवशी साजरा केला जातो, व त्याचे कारण काय?

टीबी आजराविरुद्ध जनजागृती करता यावे, याकरिता दिनांक २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो. कारण २४ मार्च १८८२ या दिवशी जर्मनीतील एका फिजिशियनला अर्थातच रॉबर्ट कोच यांना क्षयरोगाचा जिवाणू सापडला होता.

क्षयरोगाचे कोणकोणते प्रकार आहेत?

क्षयरोगाचे मुख्य चार प्रकार पडतात, ज्यामध्ये सुप्त क्षयरोग, ऍक्टिव्ह क्षयरोग, फुफ्फुसांचा क्षयरोग, आणि अतिरिक्त फुफुसांचा क्षयरोग यांचा समावेश होतो.

क्षयरोगाच्या मुख्य लक्षणांमध्ये कोणती लक्षणे ओळखली जातात?

क्षय रोगाची अनेक लक्षणे असली, तरी देखील मुख्य लक्षण म्हणून तीन आठवड्यांपेक्षा जास्त टिकणारा खोकला ओळखला जातो. त्याच बरोबर खोकताना रक्त येणे, छातीमध्ये दुखणे, आणि थकवा जाणवणे, सोबतच काही ठराविक अंतराने ताप येणे ही सर्व लक्षणे क्षयरोगाचे असतात.

कोणत्याही व्यक्तीला टीबी किंवा क्षयरोग होण्यामागे कोणती कारणे मुख्य समजली जातात?

क्षयरोगाची अनेक कारणे असतात. ज्यामध्ये मुख्यतः मधुमेही व्यक्तींना हा क्षयरोग होण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर ज्यांची प्रतिकारक शक्ती क्षीण झालेली आहे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, किंवा कुठल्याही प्रकारचा जिवाणू संसर्ग झालेला आहे, आणि जे व्यक्ती कुपोषित आहेत, अशा लोकांना क्षयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवत असतो.

Leave a Comment