Ten Birds Information In Marathi अनेक लोकांची सकाळ सुंदर करणाऱ्या पक्षांच्या किलबिलिटाने सर्वांनाच आनंद होत असतो. मात्र आपल्या आसपास असणाऱ्या मोजक्याच पक्षांविषयी आपल्याला माहिती असते. इतर पक्षांविषयी माहिती व्हावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. अचानक अनाहूत नवीन प्रकारचा पक्षी आपल्या आसपास आला, तर आपण त्याच्याकडे कुतूहालाने बघत असतो. मात्र या पक्षाच्या बद्दल माहिती जाणून घेणे प्रत्येकालाच आवडत असते. आजच्या भागामध्ये आपण सुमारे दहा वेगवेगळ्या पक्षांविषयी माहिती बघणार आहोत…

दहा पक्षांची संपूर्ण माहिती Ten Birds Information In Marathi
पोपट:
अनेक लोकांद्वारे पाळला जाणारा पक्षी म्हणजे पोपट होय. हा अतिशय आकर्षक रंगांमध्ये आढळून येणारा पक्षी असून, मानवाच्या भाषेमध्ये बोलू शकण्यासाठी या पक्षाला ओळखले जाते. कळपाने राहणारे हे पक्षी मानवा द्वारे पाळल्यास एकटे घरट्यामध्ये देखील राहत असतात. मात्र बंदिस्त केल्यानंतर या पक्षांचे जीवनमान अतिशय खालावत असते. नेहमी कळपाने राहणे आवडणारा हा पक्षी एकटा पिंजरामध्ये ठेवल्यास दुःखाने लवकर मृत्यू पावत असतो.
कावळा:
आपल्या असामान्य काळसर रंगासाठी ओळखला जाणारा पक्षी म्हणून कावळ्याला जगभरात ओळखले जाते. सुमारे ४० प्रजातीमध्ये आढळणारा हा पक्षी आकाराने बऱ्यापैकी मोठा किंवा मध्यम स्वरूपाचा असतो. भारतामध्ये सहा प्रकारच्या कावळ्याच्या प्रजाती आढळत असून, त्यामध्ये घरगुती कावळा ही प्रजाती सर्वत्र आढळून येत असते. कावळा हा पक्षी धार्मिक दृष्ट्या देखील फार महत्त्वाचा असून, पित्र बोलावण्याकरिता या कावळ्यांचा वापर केला जातो.
कबूतर:
एक अतिशय सुंदर आकर्षक रंगाचा हुशार आणि देखना पक्षी म्हणून कबुतराला ओळखले जाते. उत्तम संदेश वाहक असणारा हा पक्षी मानवाशी अतिशय सलोख्याचे नाते निर्माण करू शकतो. अगदी प्राचीन काळामध्ये मुख्य संदेश वाहनाचे साधन म्हणून या कबुतरांना ओळखले जात असे.
एकदा बघितलेला पत्ता किंवा रस्ता आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी ओळखले जाणारे कबूतर, अनेक ठिकाणी पाळली देखील जातात. कबुतराला धान्य खाऊ घातल्यामुळे बरकत येते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर धनधान्याची भरभराट होते असा समज समाजामध्ये असून, अनेक लोक कबुतराला अन्नधान्य खाऊ घालताना देखील दिसून येत असतात.
चिमणी:
भारतामध्ये अगदी कुठेही आढळून येणारा पक्षी म्हणून चिमणीला ओळखले जाते. अतिशय साधारण असणारा हा छोटासा पक्षी त्याचा आवाजासाठी ओळखला जातो. घराशेजारी चिमण्यांचा किलबिलाट झाला, की वातावरणामध्ये एक वेगळेच संगीत गुंजत असते. काही अंतरावर उडू शकणारा हा पक्षी धनधान्य खाण्याकरिता ओळखले जातो. त्यावेळी शेतकऱ्यांद्वारे याची नेहमी शेतातून हकलपट्टी केली जात असते.
मात्र जगभरात वाढत्या मोबाईल फोन टावर मुळे या चिमण्यांची संख्या धोक्यात आलेली असून, या चिमण्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी अनेक संस्थांची देखील स्थापना करण्यात आलेली असून, अनेक संस्था देखील यासाठी कार्यरत आहेत.
घुबड:
निशाचर प्राणी म्हणून ओळखला जाणारा घुबड दिवसा निष्क्रिय राहत असल्यामुळे सहसा कोणाला दिसून येत नाही. विविध प्रकारच्या प्रजाती असणारा घुबड पक्षी बुबो बुबो या शास्त्रीय नावाने ओळखला जात असतो. या घुबड प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मादी घुबड आकाराने नर घुबडापेक्षा बरेचसे मोठे दिसून येत असते. अगदी विरुद्ध दिशेला मान फिरवण्यामध्ये सक्षम असलेला हा पक्षी, नेहमी रात्री शिकारीसाठी बाहेर पडत असतो.
मोर:
भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जाणारा मोर इंग्रजीमध्ये पीकॉक या नावाने ओळखला जात असतो. भारतामध्ये या मोराच्या साधारणपणे तीन प्रजाती आढळत असून, भारतामध्ये आढळणारा निळा रंगाचा मोर सर्व परिचित व सर्वत्र प्रसिद्ध आहे. मुख्यतः हा पक्षी जमिनीवर आढळून येत असतो.
कारण त्याच्या मोठ्या पिसाऱ्याने त्याला फार उंचीवर उडता येत नाही, मात्र झोपण्याकरिता किंवा आराम करण्याकरिता हा पक्षी झाडाचाच आश्रय घेत असतो. मुख्यतः उष्णकटिबंधीय परिसरामध्ये आढळणारा हा मोर लांबीला सुमारे दीड मीटर पर्यंत देखील होऊ शकतो.
हंस:
पाण्यामध्ये राहणारा पक्षी म्हणून हंसाला ओळखले जाते. धार्मिक दृष्ट्या देखील फार महत्त्व असलेला हा पक्षी सिग्नस सिग्नस हे शास्त्रीय नाव धारण करत असतो. काही अख्यायिका नुसार दुधातील पाणी वेगळे करण्यासाठी देखील हा ओळखला जात असतो. या हंस पक्षाच्या जवळील प्रजाती म्हणून बदकाला देखील ओळखले जाते.
हा बदक देखील जास्त वेळ पाण्यामध्येच आढळून येत असतो. या पक्षाच्या जवळ जवळ ४० प्रजाती जगभरात आढळलेल्या असून, सुमारे दहा वर्षे जगणारा हा पक्षी बर्फाळ प्रदेशांमध्ये देखील जिवंत राहू शकतो. या पक्षाची अंडी देण्याची क्षमता देखील प्रचंड असून, एका वर्षात सुमारे ३०० अंडी देखील या पक्षाद्वारे दिली जात असतात.
कोकिळा:
सुंदर आवाजाचे वरदान लाभलेला पक्षी म्हणून कोकिळा या पक्षाला ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती असणारा हा पक्षी त्याच्या गाण्यासाठी ओळखला जातो. कावळ्यांच्या घरट्यामध्ये अंडी घालण्यासाठी ओळखला जाणारा हा पक्षी अतिशय उत्कृष्ट स्वरूपाचा असून, लता मंगेशकर यांना देखील या पक्षाच्या नावावरून उपाधी देण्यात आलेली आहे.
कोंबडी:
अनेक मांसप्रेमींसाठी सर्वात आवडीचा पक्षी म्हणून कोंबडी या पक्षाला ओळखले जाते. अनेक ठिकाणी या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळत असून, काही प्रजाती या अंडी देण्यासाठी ओळखल्या जातात तर काही प्रजाती या केवळ मांस उत्पादनाकरिता ओळखले जातात.
महाराष्ट्रामध्ये मुख्यतः गावरान प्रजातीच्या कोंबडीला मोठी मागणी असून, या मागणीची पूर्तता करण्याकरिता अनेक ठिकाणी बॉयलर प्रकारच्या कोंबडीची देखील मोठ्या प्रमाणावर पैदास केले जात आहे. अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त मांस उत्पादनाकरिता ओळखली जाणारी बॉयलर ही कोंबडीची प्रजाती मुख्यतः मांस उत्पादनासाठीच बनवण्यात आलेली असून, अंडी उत्पादनाकरिता सर्वोत्कृष्ट कोंबडी ही गावरान समजली जाते.
ग्यालस डोमेस्टिकस असे शास्त्रीय नाव असलेली कोंबडी महाराष्ट्रसह भारताच्या जवळपास सर्वच ठिकाणी पाळली जात आहे. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून या कोंबडीच्या मांसाला प्रचंड मागणी असून, अनेक लोक आवडीने हे मांस खात असतात.
निष्कर्ष:
पक्षी हे अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय असले, तरी देखील शहरातील लोकांना पक्षी बघण्याचे भाग्य फार क्वचित लाभत असते. कारण वेगवेगळ्या शहरातील सिमेंटच्या जंगलांमध्ये पक्षांना खायला अन्न तर मिळतच नाही, त्याचबरोबर त्यांना वास्तव्य करण्यासाठी घरटे बांधता येत नाहीत.
कुठल्याही घराच्या बोगद्यामध्ये किंवा खिडकीमध्ये जर घरटे बनवले, तर माणूस असे घरटे पाडून टाकत असतो. त्यामुळे पक्षी सहसा खेडेगावांमध्ये किंवा रानावनामध्ये राहणे पसंत करत असतात. आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या दहा प्रकारच्या पक्ष्यांविषयी माहिती बघितलेली असून, यामध्ये मोर, हंस, कावळा, गरुड, कबूतर, बदक, सुतार, पोपट यांसारख्या पक्षांची माहिती बघितलेली आहे.
FAQ
आपल्या आसपास आढळणाऱ्या काही मुख्य पक्षांची नावे काय सांगता येतील?
आपल्या आसपास अनेक पक्षी आढळून येतात. ज्यामध्ये मुख्यतः कावळा, पोपट, चिमणी, कबूतर, मोर, घुबड, कोकिळा, हंस, कोंबडी, बदक, इत्यादी पक्षांची नावे सांगता येतील.
पक्षी उडण्यासाठी कशाचा वापर करत असतात?
पक्षी उडण्याकरिता त्यांच्या पंखांचा वापर करत असतात.
पक्षांना खाण्याकरिता कशा प्रकारच्या दातांची रचना केलेली असते?
पक्ष्यांच्या खानापानाच्या व राहणीमानाच्या प्रकारावरून त्यांचे दातांचे रूपांतर चोचीमध्ये झालेले असते.
पक्षांचे मुख्य अन्न म्हणून कशाला ओळखले जाते?
पक्षी अनेक प्रकारचे अन्न खात असतात, ज्यामध्ये मुख्यतः तृणधान्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्याचबरोबर विविध गवतांच्या काड्या, गवतांची बियाणे, लहान अळ्या, इत्यादी देखील या पक्षांद्वारे खाल्ले जात असतात.
मानव कोणकोणत्या प्रकारच्या पक्षांना पाळत असतो?
मुख्यतः पक्षी हे निसर्गामध्ये स्वच्छंदपणे फिरण्यासाठी ओळखले जातात. मात्र काही पक्षांना मानवाद्वारे पाळले देखील जाते. ज्यामध्ये पोपट, कबूतर, मोर, हंस, बदक, आणि कोंबडी यांसारख्या पक्षांचा समावेश होतो.