तिळाची वडी रेसिपी मराठी Tilachi vadi Recipe in Marathi तिळाची वडी ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते आपल्याला बऱ्याचदा काही नवीन विशेष पदार्थ करून खाण्याची इच्छा होते. तर अशावेळी तुम्ही तिळाची वडी ही रेसिपी तयार करून खाऊ शकता. तीळ खाणे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत. तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला बरेच पौष्टिक घटक मिळतात. तसे तर तिळाचे पदार्थ आपण मकर संक्रांतीलास बनवत असतो. बऱ्याच जणांना तिळाचे पदार्थ तयार करून खाण्याची आवड असते; परंतु त्यांना त्या रेसिपी विषयी ज्ञान नसते. आजकाल बाजारामध्ये देखील तिळाचे लाडू, तिळाची वडी इत्यादी पदार्थ मिळतात. तर चला मग आज जाणून घेऊया. तिळाची वडी व तीळ पापडी या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
तिळाची वडी रेसिपी मराठी Tilachi vadi Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
तिळापासून विविध पदार्थ तयार केले जातात. तीळ हा एक महत्त्वपूर्ण घटक असून आपल्या शरीरासाठी देखील आवश्यक आहे. तिळापासून तीळ वडी, तीळ पापडी, तिळाचे लाडू, तिळाची चटणी तसेच तिळाचा उपयोग विविध पदार्थांमध्ये केला जातो. तर आज आपण येथे तीळ पापडी व तीळ वडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती पाहूया.
तिळाची वडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
1) 3 वाटी तीळ
2) 2 वाटी साधा गूळ
3) अर्धी वाटी चिक्कीचा गूळ
4) एक पाव वाटी सुखे खोबरे
5) पाव वाटी शेंगदाचे कूट
6) वेचली पूड
7) जायफळ पूड
8) तूप
तिळाची वडी तयार करण्याची पाककृती :
- सर्वप्रथम तिळाची वडी तयार करण्याकरता एका कढईमध्ये तीळ टाकून ते छान भाजून घ्या.
- नंतर हे तीळ एका ताटामध्ये काढून घ्या व कढईमध्ये साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवा त्यामध्ये गुड वितळुन घ्या.
- गुड वितळला म्हणजे त्याचा पाक तयार होईल. त्यामध्ये भाजलेले तीळ, खोबऱ्याचे किस, शेंगदाणे कूट, वेलची पूड, जायफळ पूड टाकायची आहे.
- हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- आता गॅस बंद करा व एका स्टीलच्या डब्यात ताबडतोब तुम्ही घेऊन तिळाचे मिश्रण त्यामध्ये टाका.
- मिश्रणाचा ठोसा चाकूच्या सहाय्याने आखून घ्या व नंतर तिच्या वड्या पाडून घ्या.
- अशाप्रकारे गरमागरम तीळ वडी तयार आहे. तुम्ही हे कधीही खाऊ शकता. एक महिनाभर देखील ह्या तीळ वड्या टिकू शकतात.
तीळ पापडी :
तीळ पापडी तयार करण्यासाठी तयार साहित्य :
1) एक वाटी पांढरे तीळ
2) 3/4 वाटी साखर
3) वेची पूड
4) जायफळ पूड
पाककृती :
- सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तीळ टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या. हे तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घ्या.
- नंतर हे तीळ एका बाऊलमध्ये काढून घ्या व कॅरमल तयार करण्यासाठी तव्यावर साखर टाका साखर सतत हलवत रहा.
- साखर वितळले की, त्यामध्ये वेलची पूड व थोडसं जायफळ टाका तसेच तीळ तीळ टाकून ते हलवून घ्या.
- आता एका चमच्याच्या सहाय्याने काढून लाटून घ्या.
- नंतर चाकूने त्याच्या छोट्या छोट्या पापळ्या तयार करून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत तीळ पापडी तयार होईल.
पोषक घटक :
तिळामध्ये अनेक पोषक घटक आहेत जसे फायबर, प्रोटीन, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस जे आपल्या हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय लावल्यास हाड किंवा सांधेदुखीचा त्रास आपल्याला होत नाही म्हणून तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
फायदे :
तीळ खाल्ल्यामुळे आपल्याला सांधेदुखी किंवा इतर त्रास होत नाही. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. म्हणून दिवसभरातून एकदा तरी मोठा चमचाभर तीळ खाणे आपल्या हिताचे आहे. त्यामुळे आपले दातही मजबूत राहतात.
त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपले रोगप्रतिकार क्षमता वाढते.
तीळ खाल्ल्यामुळे कर्करोगाच्या पेशी कमी होतात तसेच फुफ्फुस, पोट, गर्भाशय स्थान रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. तीळ खाणे फायदेशीर आहे.
ज्यांना स्वच्छ लघवी होत नाही, त्यांनी तीळ दूध खडी साखर खाल्ल्यामुळे त्यांचे मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते व लघवी साफ होते.
तोटे :
तिळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी होते, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असते.
ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, त्यांनी देखील तीळ कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे किंवा खाणे टाळावे.
गर्भवती महिलांना देखील तीळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण तिळामध्ये उष्णता असते. त्यामुळे गर्भवती महिलांचे गर्भपात होण्याची शक्यता असते.
तर मित्रांनो, तुम्हाला तिळाची वडी व तीळ पापडी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.