झाडांची संपूर्ण माहिती Trees Information In Marathi

Trees Information In Marathi पृथ्वीवर झाडे खूप महत्त्वाचे आहेत कारण जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे मुख्य कारण सुद्धा निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये वनस्पती झाडे यांना खूप महत्त्व आहे. सर्व ब्रम्हांडामध्ये आपण पाहिले तर पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे. जेथे वनस्पती किंवा जीवसृष्टी आहे तसेच त्यामुळेच आपली भरभराट सुद्धा होऊ लागली आहे. झाडे हे आपल्यासाठी वरदान आहे. आपल्याला या ग्रहावर जीवन प्रदान करणारी झाडेच आहे. आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा झाडांपासूनच मिळते, ज्यामुळे आपण जीवन जगू शकतो. झाडे मोठ्या प्रमाणात आपल्याला फळे सुद्धा खायला देतात.

Trees Information In Marathi

झाडांची संपूर्ण माहिती Trees Information In Marathi

झाडांपासूनच आपण राहण्याचे घर सुद्धा बनवू शकतो. तसेच दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवण तयार करण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे, फुले इत्यादी सुद्धा आपल्याला झाडेच प्रदान करतात. झाडांमध्ये विविध प्रकार असतात. झाडे आणि वनस्पतींना हिरवे सोना असे म्हटले आहे. कारण त्यांची तुलना कोणीही करू शकत नाही किंवा इतर ग्रहावर कोणाशीही त्यांची तुलना आपण करू शकत नाही.

झाडांची रचना :

झाडांची रचना ही उभी असते, त्यामध्ये पाणी, फुले, फळे एका ठराविक उंचीवर वाढतात. झाडांची वाढ सुद्धा एका ठराविक मर्यादेपर्यंत होत असते. काही झाड दीर्घायुष्य असतात. तर काही झाडे अल्पायुषी सुद्धा असतात. झाडांची रचना ही त्यांच्या प्रकारानुसार होत असते. पृथ्वीवर अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात. झाडांच्या वाढीसाठी महत्त्वाची तीन भाग असतात. ते म्हणजे मूळ, खोड आणि पाणी यावरच वनस्पतींचे जीवन अवलंबून असते. दीर्घायुष्य झाडांमध्ये वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब इत्यादी झाडे आहेत.

या झाडांना खूप आयुष्य असते. हे झाडे पृथ्वीवर खूप महत्त्वाचे आहेत. या झाडांपासून आपल्याला दाट सावली तसेच ऑक्सिजन मिळते व या औषधी वनस्पती गुण सुद्धा यामध्ये आहेत. त्यांची फळ आपल्यासाठी औषधी आहेत. कडुलिंबाचे झाड हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. त्यांची उंची शंभर फूट असते. तसेच या झाडांपासून आपल्याला अनेक फायदे व त्याची सावली सुद्धा मिळते.

या झाडाची लाकूड, फर्निचर तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे अशा झाडांची आपण विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये आपण झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांना पाणी घालावे. त्यांच्या बाजूला खत किंवा उकरी द्यावी. त्यामुळे मुळांना व्यवस्थित पाणी बसेल. झाडांच्या आसपास किंवा झाडांजवळ आग लावू नये.

झाडांचे महत्त्व :

मनुष्य जाती व इतर प्राणी सुद्धा संपूर्णपणे झाडांवरच अवलंबून राहतात. अनेक संस्कृतीमध्ये वृक्ष आणि वनस्पतींना देवाची निवास स्थान मानतात. त्यामुळे त्याची पूजा केली जाते त्यांना पाणी घातले जाते. मानवी जीवनामध्ये निसर्गाचे सर्वात मोठे योगदान आहे. अश्मयुगापासून ते आजपर्यंत अनेक सजीव प्राणी वनस्पती इतर वनस्पतींवर अवलंबून आहेत.

झाडांमध्ये अनेक मौल्यवान वस्तू सापडतात काही वनस्पती औषधी म्हणून काम करतात. तर काही वनस्पती बाजारात मौल्यवान किमतीला विकल्या जातात. त्यामध्ये तुळशी, आवळा, कडुलिंब इत्यादी सारखे वृक्ष तर अनेक आजारांवर उत्कृष्ट औषध म्हणून काम करतात. पृथ्वीवर पडणारा पाऊस सुद्धा झाडांमुळेच पडतो. त्यामुळे आपण शेती व इतर घरगुती कामे करू शकतो.

झाड व वनस्पतींचे फायदे :

वनस्पतींचा एकच फायदा आहे असे नाही वनस्पतींचे आपल्या मानवी जीवनामध्ये अनेक फायदे आहेत. आपल्याला वनस्पती पासून जगण्यासाठी प्राणवायू मिळतो. कारण आपण हे जग प्रदूषण निर्मित करून ठेवले आहे. त्यामध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा समावेश आहे. आजकाल आपण शेतामध्ये विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करून जमीन सुद्धा प्रदूषित केली आहे परंतु हे प्रदूषण कमी करण्याचे काम झाड करतात. झाडांपासून आपल्याला सावली मिळते.

झाडांच्या लाकडापासून आपण अनेक फर्निचर घरी तसेच खेळणी व सजावट सुद्धा करू शकतो देशाच्या विकासासाठी शिक्षण तर महत्त्वाचे आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे वाचण्यासाठी लागणारे पुस्तके किंवा कागद सुद्धा झाडांपासून तयार केला जातो. हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचप्रमाणे झाडे हे आर्थिक सामाजिक व शारीरिक तसेच भावनिक आणि विविध मार्गाने आपल्याला लाभ देत असतात. झाडांचे पाने गळून पडले की त्यापासून खत तयार होते. जे जमिनीवर मातीची सुपीकता वाढते.

झाड तोडण्याची तोटे :

  • निसर्गामध्ये झाडांना खूप महत्त्व आहे. जर आपण ते तोडले तर आपल्यासाठी ही पृथ्वी खूप घातक ठरेल.
  • निसर्गामध्ये आपण हस्तक्षेप करायला नको परंतु आजही अनेक लोक राहण्यासाठी जंगलाचे जंगले नाश करत आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे.
  • त्यामध्ये मानवी जीवनावर तर परिणाम होणारच परंतु इतर प्राणी, पशुपक्षी यांच्यावर सुद्धा झाडे तोडीचा परिणाम होणार आहे.
  • झाडे तोडल्यामुळे पशु-पक्षांना राहण्यासाठी घर राहत नाहीत तसेच पावसाळ्यामध्ये पाणी येणार नाही.
  • जमिनीची धूप होते, त्यामुळे पाऊस सुद्धा कमी पडतो. दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते.
  • नवीन उद्योग स्थापन करण्याकरता अनेक जमिनी तयार केल्या जातात. त्यामुळे ही झाडांची मोठ्या प्रमाणात केली जाते.
  • कारखान्यामधून निघणारा घातक धूर हा वनस्पतींशिवाय कमी होऊ शकत नाही कारण झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे वातावरण शुद्ध होत राहते.
  • वृक्षतोडीच्या वाढत्या प्रमाणामुळे सुपीक क्षेत्र सुद्धा वाळवंट होत आहे. हिरवीगार ठिकाण सुद्धा वाळवंटाचे स्वरूप घेत आहेत.
  • दैनंदिन होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील पाण्याची पातळी खालावली आहे.
  • हवामानाची अनिश्चित नैसर्गिक आपत्ती आणि इतर घटकांचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
  • नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर, त्सुनामी, भरती ओहोटी, दुष्काळ, भूस्खलन, कुपोषण इतर नैसर्गिक आपत्ती त्यांचे आयुष्य किंवा जीवन सुद्धा धोक्यात येते.
  • झाडे व वनस्पतींच्या कमतरतेमुळे मानवी आणि वन्य जीवनाचा नाश होतो, हे तर खरेच आहे.

झाडांचे पोषण कसे होते?

झाडे हे त्यांचे पोषण स्वतःच करतात. सर्व सजीव हे वनस्पतींवर जगतात किंवा झाडांवर अवलंबून असतात. ही झाडे काय खातात आपल्याला विचार पडतो. तर बहुतेकदा झाडे स्वतःसाठी प्रकाशाच्या मार्फत त्यांचे अन्न तयार करतात. झाडे त्यांची अन्न, पाणी, कार्बन-डायऑक्सिड व खनिजे यांचा वापर करून करतात.

झाड पूर्णतः सूर्यप्रकाशात राहू शकतात परंतु फुलण्यासाठी त्यांना थंड तापमानाची सुद्धा आवश्यकता असते प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया वनस्पती सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेला वापरू शकतील अशा ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. प्रकाश संश्लेषणादरम्यान वनस्पती कार्बन डायऑक्साइड पाणी आणि प्रकाश घेतात. त्याचे रूपांतर ग्लुकोज आणि ऑक्सिजन मध्ये करतात.

FAQ

झाडांचा उपयोग कसा केला जातो?

झाडांचा उपयोग इमारतीच्या बांधकामासाठी म्हणजेच लाकूड फर्निचर, फ्लोरिंग, इतर शोच्या वस्तू तसेच सर्व प्रकारचे कागद तयार करण्यासाठी केला जातो.

झाडे त्यांचे पोषण कसे करतात?

झाडे त्यांचे पोषण प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे करतात.

झाडांपासून कोणता प्राणी वायू मिळतो?

झाडांपासून ऑक्सिजन हा प्राणवायू आपल्याला मिळतो.

झाडे वातावरणातील कोणता वायू शोषून घेतात?

झाडे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड शोषण घेतात.

झाडांच्या बाहेरील सालाचे काय कार्य असते?

बाहेरील झाडाची साल ही बाह्य जगापासून संरक्षण करते तसेच आतून सतत नूतनीकरण करत राहते. ते पावसाळ्यामध्ये ओलावा बाहेर ठेवण्यास मदत करते आणि जेव्हा हवा कोरडे असते. तेव्हा झाडाला आद्रता गमावण्यापासून प्रतिबंधित करते.

Leave a Comment