मोबाइल चे प्रकार । Types of Mobile Devices in Marathi

types of mobile devices in marathi मोबाईल सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. कुणी केवळ कॉल साठी घेतो कुणी सोशल मीडिया साठी तर कुणी संगीत किवा फोटो साठी घेतो. मोबाईल,स्मार्ट फोन,सेलफोन,विंडोज फोन हे शब्द दररोज आपल्या कानावर पडतात पण मोबाइल चे किती प्रकार आहेत mobile types in marathi आणि कोणते असा प्रश्न परीक्षेत विचारला तर ….जाऊद्या डोके नका खाजवू…..वाचा मोबाइल चे १३ प्रकार mobile devices in marathi आणि त्यांचे वैशिष्ट्य काय असते ते…..

types of mobile devices in marathi
types of mobile devices in marathi

मोबाइल चे प्रकार । Types of Mobile Devices in Marathi

‌१) बजेट फोन : 

हा शब्द अनेकवेळा तुमच्या कानावर पडला असेल पण बजेट फोन म्हणजे साधा आणि सरळ अर्थ आहे आणि तो म्हणजे असा फोन की जो तुमच्या खिशाला परवडेल.पण यामध्ये पण एक गंमत आहे आणि ती म्हणजे हा फोन दहा हजारांचा पण राहू शकतो आणि बारा हजारांचा पण राहू शकतो.मात्र बारा हजार  किमतीच्या आत जे फोन येतात त्यांचा उल्लेख प्रामुख्याने बजेट फोन असा केला जातो.  

२) फीचर फोन:

याच्या नावावर तुम्ही जाऊ नका.कारण फिचर फोन नाव डोळ्यासमोर आले की अनेक फीचर असलेला फोन असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे.कारण फीचर फोन म्हणजे तुम्हाला कॉल आणि मेसेज या प्रमुख वापर करण्याकरिता सुविधा ज्या फोन मध्ये असतील असा फोन.पण थांबा यामध्ये रेडिओ पण असू शकतो पण हा जास्तीत जास्त कॉल आणि मेसेज साठी वापरला जातो .आज अनेक लोक  दोन फोन वापरताना दिसतात त्यापैकी एक फिचर फोन नक्की असतो .कारण इतर फोन च्या मानाने याचा बॅटरी बॅक अप जास्त असतो आणि त्याचे कारण म्हणजे यामध्ये ना फेसबुक साठी बॅटरी खर्च होते ना व्हॉटसअप साठी त्यामुळे बॅटरी जास्त वेळ चालते.                                  

३) स्मार्ट फोन :

या प्रकारच्या फोनचे नाव तुम्ही खूप ठिकाणी ऐकले असेल.तुम्हाला प्रश्न पडेल हा स्मार्ट कसा ..पण हा खरोखरच नावाप्रमाणे स्मार्ट असतो.यामध्ये कॉल,मेसेज सोबत फोटो आणि असंख्य फिचर असतात आणि हा बरेच काही करू शकतो म्हणूनच त्याला स्मार्ट फोन असे म्हटले जाते.                                                

नक्कि वाचा: संगनकाचा इतिहास

 ४) विंडोज फोन:

विंडोज फोन म्हणजे काय खूप साऱ्या खिडक्या असलेला फोन नाही तुम्ही चुकलात कारण वींडोज ही एक  ऑपरेटिंग सिस्टम आहे.जी एका फोन मधे या टाकलेली दिसते.ज्यामधे मायक्रोसॉफ्ट ची ऑपरेटिंग सिस्टिम असते.मात्र ही प्रणाली लोकप्रिय न झाल्याने काळाच्या ओघात याचा वापर कमी झाला आहे असे नक्की म्हणता येईल. 

५) प्रायमरी फोन :

प्रायमरी फोन म्हणजे जो आपल्या सगळ्यात गरजेचा आहे असा फोन .आपण दिवसातली सर्व कामे त्यावर करतो.मग ते मेल असो की व्हॉटसअप . यामध्ये असणारा नंबर शक्यतो खूप वर्षे जुना असतो.                          

६) सेकंडरी फोन :

याचा शब्दश: अर्थ दुय्यम फोन असा होत असला तरी हा देखील तितकाच महत्वाचा असतो.तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमचा व्यक्तिगत मोबाइल नंबर द्यायचा नसेल तर तुम्ही त्याला सेकंडरी फोन नंबर देता.यावरून कॉल किंवा मेसेज असे मर्यादित स्वरूपाचे काम होत असल्याने याशिवाय तुमचे जास्त काम अडत नाही.                                                               

७) क्वार्टी पॅड फोन : 

यामध्ये जे की पॅड असते जे बटन वर पण चालते आणि टच स्क्रीन वर पण चालतो.ब्लॅकबेरी चे फोन या प्रकारात होते.मात्र सध्या तरी सगळीकडे टच पॅड चाच जमाना आहे.                                               

८)ड्युअल सिम फोन :

ज्या फोन मध्ये दोन सिम बसतात तो ड्युअल सिम फोन…दोन नंबर पाहिजेत पण दोन फोन सांभाळन्याचा तान नको त्यासाठी हा उत्त्तम पर्याय आहे.

९)कॅमेरा फोन :

या नावाने तुम्हाला अनेक जाहिराती झळकताना दिसतात. कारण याचा युनिक सेलींग पॉईंट कॅमेरा हाच असतो.फोटोग्राफीची आवड आहे किंवा चांगल्या दर्जेदार फोटोंसाठी जास्त मेगापिक्सल  असलेला कॅमेरा फोन खरेदी केला जातो.                                  

नक्की वाचा: माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय ?

१०) म्युझिक फोन :

जसे कुणी खास कॅमेरा साठी फोन खरेदी करते तसे ते संगीता साठी देखील करतात.त्याच फोनला म्हणतात म्युझिक फोन.प्रामुख्याने संगीताची आवड असणारे याला प्राधान्य देतात.म्युझिक फोन म्हणजे ज्यामध्ये सुमधुर संगीत वाजते.उत्तम बास, स्पीकर असतो.

११) सेल फोन :

क्लासिक फोन ला सेल फोन असे म्हणतात.अनेकदा स्मार्ट फोनचा उल्लेख देखील सेल फोन असा केला जातो पण तो चुकीचा आहे.                     

१२) फोर जी फोन :

ज्या फोन मध्ये फोर जी सिम कार्ड चालते त्याला आपण फोर जी फोन म्हणतो.                                            

१३) फॅब्लेट :

टॅब्लेट तुम्ही ऐकले असेल पण फॅब्लेट म्हणजे टॅब्लेट आणि फोन यांचे मिश्रण असते.याचा वापर लॉक डाऊन काळात खूप होताना दिसतोय.ऑफिस कामासाठी किवा ऑनलाईन शिक्षणासाठी याचा वापर होताना दिसतो.फोन पेक्षा थोडी मोठी आणि टॅबलेट पेक्षा छोटी स्क्रीन असल्याने हा वापर करताना सुटसुटीत वाटतो.

Leave a Comment