उडीद डाळ पापड मराठी Udid Dal Papad Recipe In Marathi

उडीद डाळ पापड मराठी Udid Dal Papad Recipe In Marathi  उडीद डाळ पापड हे उडीद डाळ आणि रामबंधू पापड मसाला पासून बनवले जातात. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी उडीद डाळ पापड वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. उडीद डाळ पापड हे सणाला मोठ्या प्रमाणात बनवले जातात. पापड हा एक शुध्द शाकाहारी आणि लोकप्रिय पदार्थ आहे. यांचा उपयोग जेवणासोबत तोंडी लावायला केला जातो.

पापड रेसिपी ही आपण कमी वेळात घरीच बनवू शकतो, आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट वरती पाहिले असेल किती स्वादिष्ट पापड खायाला मिळतात. काही लोकांना उडीद डाळ पापड खूप आवडतात. पण त्याचा परिसरात स्वादिष्ट पापड मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने चवदार पापड कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण उडीद डाळ पापड रेसिपी पाहणार आहोत.

Udid Dal Papad

उडीद डाळ पापड मराठी Udid Dal Papad Recipe In Marathi

उडीद डाळ पापडचे प्रकार :

उडीद डाळ पापड हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, विविध ठिकाणी पापड वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. यामध्ये उडीद डाळ पापड, उडीद डाळ भजे, उडीद डाळ वडे, उडीद डाळ पकोडे, उडीद डाळ मसाला पापड हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
उडीद डाळ पापड रेसिपी ही आपण 10 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

उडीद डाळ पापडच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

उडीद डाळ पापड तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर पापड बनवू शकतो, यासाठी आपल्याला 40 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

उडीद डाळ पापड कुकिंग करण्यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

उडीद डाळ पापड बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 50 मिनिट वेळ लागतो.

उडीद डाळ पापडसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 किलो उडीद डाळ सोलेले.
2) 50 ग्रॅम मिरे.
3) 1 रामबंधू पापड मसाला पुडी.
4) थोडी लहान मिरची.
5) तेल, मीठ.
6) थोडा हिंग.

पाककृती :

 • शेंगोळे रेसिपी मराठी
 • सर्वात प्रथम उडीद डाळ चांगली निसून घ्या. नंतर बारीक दळून आणा.
 • नंतर मिरे मिक्सर मधून बारीक करून घ्या, आणि लहान मिरची ज्याला आपण चनमिरची सुध्दा म्हणतो.
 • ही चवीला खूप तिखट असते, त्यामुळे थोडी मिक्सर मधून बारीक करून घ्या, आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
 • आता उडीद डाळ पीठ घ्या, त्यामध्ये रामबंधू मसाला, थोडा हिंग, मिरे, तिखट, आणि चवीनुसार थोडे मीठ टाकून.
 • व्यवस्थित मिक्स करून घ्या, आणि थोडे-थोडे पाणी टाकून चांगले मळून घ्या, याचा एक नरम गोळा तयार करा.
 • नंतर थोडे तेल घ्या, आणि पुन्हा गोळा चांगला मळून घ्या, गोळा चांगला नरम तयार झाला की, एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवा.
 • गोळा कमीत-कमी 2 तास चांगला मुरू द्या, यामुळे आपले पापड खूप छान तयार होतील.
 • नंतर थोडे हाताला तेल घेऊन या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करा, गोळ्याला तेल लाऊन गोल लाटून घ्या.
 • लाटताना थोडा पीठाचा वापर करा, म्हणजे आपले पापड फाटणार नाहीत, एकदम गोल आणि पतले पापड तयार करा.
 • नंतर पापड सुकण्यासाठी एका बाजूला एक कागदावर ठेवा आणि थोडा वेळ चांगले सुकू द्या.
 • अशा प्रकारे सर्व गोळ्याचे पापड तयार करून घ्या, आणि थोडे कडक झाले की एका डब्यात भरून ठेवा.
 • आता आपले स्वादिष्ट आणि मसालेदार उडीद डाळ पापड खाण्यासाठी तयार आहेत. आपण पापड भाजून किंवा तळून उडीद डाळ पापड खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

उडीद डाळ पापडमध्ये असणारे घटक :

उडीद डाळ पापड हे एक पौष्टिक धान्य पासून बनलेले आहेत. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जसे कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्निशियॅम, अमिनो ऍसिड, फायबर, प्रथिने, कर्बोदके, फॅट हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

उडीद डाळ पापड सेवन केल्याने आपल्याला ॲमिनो एसिड, फायबर सारखे घटक मिळतात.

हे घटक लहान बाळच्या मेंदूच्या विकासासाठी काम करतात, आणि त्यांना शारीरिक मजबूत ठेवतात.

यामध्ये असणारे कॅल्शिअम, पोटॅशियम, फॅट, प्रोटीन हे घटक आपले शरीर निरोगी ठेवतात.

उडीद डाळ पापड सेवन केल्याने आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

उडीद डाळ पापड आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

पापड हा एक तिखट आणि मसालेदार पदार्थ आहे, यामुळे आपल्याला जळ-जळ होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून उडीद डाळ पापड आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला उडीद डाळ पापड रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment