उकडीचे मोदक रेसिपी मराठी Ukdiche Modak Recipe in Marathi मोदक ही रेसिपी महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. गणपती उत्सव जवळ आला की, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करून बाप्पांना अर्पण करतात तसेच प्रसाद म्हणूनही मोदकच वाटतात. मोदक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये व वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात.
तर आज आपण जाणून घेऊया उकडीचे मोदक ही रेसिपी कशी बनवायची. बऱ्याच जणांना उकडीचे मोदक बनवणे म्हणजे फार अवघड वाटते परंतु तसे काही नाही. एकदा ही रेसिपी पाहिली की, उकडीचे मोदक करायलाही खूप सोपे आहेत. तसेच खायलाही खूप चविष्ट लागतात.
उकडीचे मोदक रेसिपी मराठी Ukdiche Modak Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
मोदक हा महाराष्ट्रातील लोकप्रिय गोड एक पदार्थ आहे. तसेच तो गणेश चतुर्थीच्या दिवशी केला जातो. मोदक श्री गणेशाला खूपच प्रिय आहेत. म्हणून जेव्हा गणपती विराजमान होतात, तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी मोदक बनवले जातात. मोदक हे वेगवेगळ्या प्रकारात बनवले जातात. तसेच मोदक बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. जसे की रव्याचे मोदक, मैद्याचे मोदक, खव्याचे मोदक, उकडीचे मोदक, कणकेचे मोदक, पुरणाचे मोदक इ. तर उकडीच्या मोदकासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे.
ही रेसिपी 21 मोदकांसाठी करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
उकडीचे मोदकांची पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
उकडीचे मोदक कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
उकडीचे मोदक रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) मोठा नारळ किसलेला
2) गुड बारीक केलेला
3) दोन कप तांदळाचे पीठ
4) वेलची पूड
5) मीठ चवीनुसार
6) तांदुळाच्या उकडीत घालण्यासाठी तूप
उकडीचे मोदक बनवण्याची पाककृती :
- काजू करी मराठी
- उकडीचे मोदक तयार करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला सारण तयार करावे लागते त्याकरिता आपल्याला सर्वप्रथम नारळ किसून घ्यावे लागेल.
- जितक्या वाट्या आपण किसलेले नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गुळ घ्यावा.
- पातेल्यात किसलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गुळ वितळला की वेलची पूड घालावी. नंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
- नंतर आवरणासाठी आपल्याला तांदुळाचे पीठ दोन वाट्या घ्यायचे आहे. जेवढे पीठ असेल तितकेच पाणी असे प्रमाण घ्यावे लागेल.
- दोन वाट्या तांदुळाचे पीठ असेल तर दोन वाट्या पाणी घ्यावे लागेल.
- एका पातेल्यात दोन वाट्या पाणी टाकून ते गरम करण्यासाठी ठेवावे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा तूप घालावे.
- तसेच चवीसाठी थोडे मीठ घालावे गॅस मंद करून त्यामध्ये पीठ घालून कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळत राहावे.
- थोड्यावेळाने पिठाचे गोळे होत राहतात. मध्यम आचेवर दोन दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी. नंतर हे गॅसवर उतरून पाच मिनिटे झाकून ठेवावे.
- तयार झालेली उकड ही एका परातीत काढून घ्यावी नंतर व्यवस्थित मळून घ्यावी. व्यवस्थित मळण्यासाठी बाजूला एका वाटीत कोमट पाणी व तेल घ्यावे.
- उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर अशी उकड मळून घ्यावी.
- उकड व्यवस्थित मळून झाली की, त्यांचे सुपारी पेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
- अशाप्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावे नंतर मोदक पत्र असेल तर त्यामध्ये पाणी उकळीला ठेवावे नंतर चाळणी स्वच्छ धुऊन सुती कापड ठेवून त्यामध्ये प्लास्टिकची जाड शीट ठेवून मोदक ठेवावेत.
- तसेच वरून झाकण लावून 15 मिनिटे वाफ काढून घ्यावी.
- जर मोदक पात्र उपलब्ध नसेल तर दुसऱ्या मोठ्या गंजात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून मोदक वापरून घेऊ शकता एकावर एक मोदक ठेवू नयेत. मोदक फुटण्याचा धोका असतो.
- अशाप्रकारे तुमची गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत उकडीचे मोदक काढल्यानंतर त्यावर तूप टाकून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
पौष्टिक घटक :
उकडीचे मोदक तयार करताना आपल्याला तांदूळ खोबरे, गूळ व साजूक तूप यांचा उपयोग होतो त्यामुळे हे सर्वच पदार्थ शरीरासाठी आरोग्यदायी आहेत.
मोदकाचे आवरण तांदुळाचे असते त्यामध्ये फॉलिक ऍसिड, विटामिन बी 12, विटामिन ए, तर खोबऱ्यामध्ये प्रथिन, जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नीज आणि सेलेनियम इत्यादी पोषक घटक असतात.
फायदे :
उकडीचे मोदक खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होते तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.
उकडीचे मोदक खाल्ल्यामुळे गुडघ्याचे दुखणे देखील कमी होते, कारण त्यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे आणि संधे दुखीसाठी तूप हे गुणकारी आहे.
उकडीचे मोदक खाल्ल्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांचा त्रास असेल तर उकडीचे मोदक फायद्याचे आहे.
तोटे :
उकडीचे मोदक खाणे तसे आरोग्यासाठी चांगलीच आहे. परंतु अतिरिक्त मोदक खाल्ले तर शरीरामध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो.
त्यामुळे वाजवी प्रमाणातच आपण उकडीचे मोदक खाल्ले पाहिजे.
उकडीचे मोदक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट, करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.