उंधीयू रेसिपी मराठी Undhiyu Recipe in Marathi

उंधीयू रेसिपी मराठी Undhiyu Recipe in Marathi  उंधियू ही एक गुजराती रेसिपी असून ती बऱ्याच लोकांना माहिती नाही. परंतु गुजरात मधील ही पारंपारिक डिश असून ती दिवाळी किंवा मकर संक्रांतीला विशेषतः बनवण्यात येते. उंधियू या रेसिपी मध्ये विविध भाज्यांचा वापर करून तसेच विविध मसाले वापरून ही रेसिपी तयार केली जाते. खाण्यासाठी ही रेसिपी अत्यंत चविष्ट व टेस्टी लागते.
तर मित्रांनो, तुमच्या करिता खास ही रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. या रेसिपी करिता लागणारे साहित्य व पाककृती खालील प्रमाणे जाणून घेऊया.

Undhiyu Recipe

उंधीयू रेसिपी मराठी Undhiyu Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

उंधीयू ही रेसिपी गुजराती रेसिपी आहे. ही रेसिपी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये घालण्यात येणारे पदार्थ कमी जास्त असू शकतात. आज-काल उंधीयू ही रेसिपी महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खाण्यासाठी अप्रतिम व चविष्ट तसेच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी सर्वांनाच आवडेल. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

ही रेसिपी किती व्यक्ती करता तयार होणार आहे?
ही रेसिपी आठ जणांंकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 30 मिनिट एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

उंधियू ही रेसिपी पूर्ण तयार करण्याकरिता आपल्याला एक तास वेळ लागतो.

साहित्य :

1) बारीक चिरलेली कोथिंबीर
2) अर्धी वाटी बारीक केलेले ओले नारळ
3) अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पावडर
4) तीन चमचा तीळ
5) 1 चमचा काजू
6) 1 चमचा मनुका
7) चवीनुसार मीठ
8) चवीनुसार साखर
9) बारीक चिरलेली हिरवी मिरची
10) लिंबाचा रस
11) 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
12 ) 1 चमचा लसूण पेस्ट
13) अर्धा चमचा आले पेस्ट
14) 1 चमचा लाल तिखट
15) 1 चमचा धने पावडर
16) 1चमचा जिरे
17) पाव चमचा हिंग
18) 1 चमचा गरम मसाला
19) अर्धा चमचा हळद पावडर

उंधियू रेसिपी बनवण्यासाठी लागणारा भाजीपाला :

1) एक वाटी वालपापडी
2) अर्धा पाव सुरत
3) एक बटाटा
4) एक रताळे
5) 1 केळ
6) पाणी
7) मेथी मुठीया

तडका देण्यासाठी लागणारे सामग्री :

1) पाव चमचा अजवान
2) एक चमचा जिरे
3) चिमूटभर हिंग
4) तेल

पाककृती :

  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये खोबरे, भाजलेले शेंगदाणे पावडर, तीळ, धने पावडर, लसूण पेस्ट, आले पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, काजू, बेदाणे, धने पावडर, साखर, लाल तिखट, गरम मसाला, जिरे हळद घ्या.
  • नंतर हिंग, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि तेल हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या. तुमच्याकडे ओले नारळ नसेल तर तुम्ही कोरड्या नारळाचा किस देखील घेऊ शकता.
  • वालपापडीच्या शिरा काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. हे कुकरच्या भांड्यात ठेवा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून घ्या.
  • भरली वांगी करण्यासाठी जसे आपण वांगी कापतो तसेच आपल्याला चाकूने काप करून घ्यायचे आहे.
  • तुम्ही हे वांगी तळुन देखील घेऊ शकता.
  • कुकरच्या भांड्यामध्ये वांगी आणि वालपापडी वाफवून घ्यायचे आहे. कुकरला दोन शिट्ट्या येईपर्यंत छान होऊ द्या.
  • आता रताळे आणि बटाटा तसेच सुरण यांचे मोठे मोठे तुकडे करून घ्या.
  • मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा रताळे गरम तेलात टाका आणि सर्व बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • नंतर तळून झाले की, एका ताटामध्ये काढून घ्या. अशाप्रकारे बटाटा आणि सुरण देखील सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • नंतर पुन्हा कढाईमध्ये तेल टाकून थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, अजवाइन, हिंग आणि मसाला घाला.
  • हे सर्व मिश्रण छान दोन-तीन मिनिटे परतून घ्या.
  • नंतर वापरलेली पापडी तळलेली रताळे, सुरण व बटाटे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
  • नंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून नीट ढवळून घ्या.
  • नंतर त्यामध्ये मेथी मोहतिया शिजवलेले पदार्थ घालून छान मिक्स करून घ्या. तसेच तीन ते चार मिनिटे परतून घ्या.
  • नंतर केळी सालीसहित बारीक चिरून त्या भाजीमध्ये घाला. हे मिश्रण छान परतून घ्या.
  • हे सर्व मिश्रण सात ते आठ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या आणि नंतर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालून उंधियु सजवा.

अशाप्रकारे उंधियु ही रेसिपी तयार आहे. तुम्ही पुरी किंवा पराठा, पोळी सोबत खाऊ शकता.

पोषक घटक :

उंधियु या रेसिपी मध्ये जीवनसत्वे तसेच खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. ही रेसिपी एक पौष्टिक आहार आहे. त्यामध्ये जीवनसत्वे अ, क, पोटॅशियम, कॅल्शियम, कर्बोदके, बीटा केरोटीन, प्रथिने, तांबे, जस्त आणि सुपरऑक्साइड नावाचे अँटिऑक्सिडेंट असते.

फायदे :

उंधियु ही रेसिपी एक पौष्टिक रेसिपी आहे. ही रेसिपी खाल्ल्यामुळे आपल्या हाडांची झालेली झीज भरून निघते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि कॅल्शियम शरीरातील हाडे, सांधेदुखी यावर कार्य करतात. त्यामुळे शरीराला एनर्जी प्राप्त होते.

शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील ही रेसिपी महत्त्वाची आहे. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते.

तोटे :

उंधियू ही रेसिपी अति प्रमाणात खाल्ल्यामुळे त्यातील जीवनसत्व खनिजांचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढते. त्यामुळे आपल्याला मळमळ किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही रेसिपी प्रमाणातच खाल्ली गेली पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला उंधीयू ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment