उपमा रेसिपी मराठी Upma recipe in Marathi सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज काही नवीन नवीन पदार्थ करावेसे वाटतात. म्हणून आम्ही तुमच्याकरता खास उपमा ही रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्हाला नाश्त्यामध्ये काहीतरी हलके चवदार खावेसे वाटत असेल तर तुम्ही रव्याचा उपमा करू शकता. रवा उपमा ही रेसिपी बनवत असताना, आपल्याला बऱ्याच काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. जेणेकरून रवा उपमा हा स्वादिष्ट व्हावा. तर चला मग जाणून घ्या, रवा उपमा ही रेसिपी कशाप्रकारे करायची आहे. रवा उपमा बनवण्यासाठी कोण कोणती सामग्री लागते. ते आपण पाहूया.
उपमा रेसिपी मराठी Upma recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
उपमा ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारात बनवली जाते. प्रत्येकाची उपमा करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच त्याकरता वापरण्यात येणारे पदार्थ घटक देखील वेगवेगळे असतात. जसे की, आपण पाहतो ओट्स उपमा, रवा उपमा, टोमॅटो उपमा, ओनियन उपमा इत्यादी आहेत.
ही रेसिपीकिती लोकांकरिता बनवणार आहोत?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
उपमा बनवण्याच्या पूर्वतयारीकरता आपल्याला 15 मिनिटे वेळ लागतो
कुकिंग टाईम :
उपम्यासाठी रवा भाजावा लागतो, त्याकरिता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
उपमा रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
उपमा बनवण्यासाठी लागणारी सामग्री :
1) एक कप रवा
2) दोन कप पाणी
3) दीड कप बारीक चिरलेला कांदा
4) दोन ते तीन चमचे तेल
5) पाव चमचा मोहरी
6) पाव चमचा जिरे
7) पाव चमचा हिंग
8) दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक
9) कढीपत्त्याची चार-पाच पाने
10) चवीनुसार मीठ
11) एक चमचा साखर
12) एक चमचा लिंबू चा रस
13) बारीक चिरलेला कोथिंबीर
उपमा बनवण्याची पाककृती :
- थालीपीठ रेसिपी मराठी
- उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन-तीन चमचे तेल घाला व त्यामध्ये रवा भाजून घ्या.
- मध्यम आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल टाकून मोहरी, हिंग, आले, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे टाका.
- नंतर ते परतून झाले की, त्यामध्ये चिरलेला कांदा परतून घ्यावा. आपल्याला हवे असल्यास एक टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घातला तरी चालेल.
- नंतर परतलेला रवा त्यामध्ये घालावा. हे मिश्रण दोन ते 3 मिनिट मध्यम आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ व एक चमचा साखर घालावी.
- उपम्यामध्ये मीठ चांगले पाहिजे म्हणून मिठाचे प्रमाण व्यवस्थित असावे.
- नंतर त्यामध्ये गरम पाणी घालावे आणि ढवळून त्यावर दोन मिनिट झाकण ठेवावे.
- नंतर त्यावर लिंबू पिळून कोथिंबीर सजावट करून ठेवावा.
- अशाप्रकारे आपला गरमागरम उपमा रेसिपी तयार आहे.
- उपमा स्वादिष्ट होण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे :
- उपमा बनवण्यापूर्वी रवा चांगला भाजून घेणे गरजेचे असते.
- आपण आपल्या आवडीप्रमाणे तडक्यासाठी जिरे किंवा मोहरी घालू शकता.
- उपमा करीत असताना भाज्या चांगल्या परतून शिजवून घेणे आवश्यक आहे.
- उपमा बनवताना तो सतत ढवळत राहणे गरजेचे असते.
- आपण आधी रवा आणि नंतर हलवत हलवत पाणी घालू शकता.
उपम्यातील पोषक घटक :
उपम्यामध्ये आपण भाज्यांचा तसेच कोथिंबीर आणि रव्याचा उपयोग केलेला असतो, त्यामुळे त्यातील पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. रव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स आणि विटामिन ई, मिनरल्स इत्यादी असतात.
फायदे :
रव्यातील पोषक घटक तत्वांचा विचार करता, रवा शरीरासाठी पोषक अन्नपदार्थ आहे. तसेच त्यापासून बनवलेले पदार्थ देखील शरीरासाठी आवश्यक आहे. ते शरीराला ऊर्जा पुरवतात.
रव्याचा आहारामध्ये समावेश केल्याने हृदय आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. हाड मजबूत होतात तसेच मज्जातंतू आणि स्नायूंना देखील निरोगी ठेवतात.
हार्ट अटॅकचा धोका कभी होतो व रक्तप्रवाह देखील सुरळीत चालतो.
मधुमेह रोगींसाठी देखील रव्यापासून बनवलेले पदार्थ उत्तम आहार आहे. रव्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो मैद्यापेक्षा रवा रक्तात शोषण्यात वेळ घेतो. त्यामुळे शुगर लेवल कमी जास्त होण्याची भीती वाटत नाही.
तोटे :
रवा जेवढा शरीरासाठी पोषक आहे तेवढाच तो कधीकधी हानिकारकही असू शकतो, तर रवा खाण्यामध्ये जास्त आल्यास शरीरामधील फायबरचे प्रमाण वाढते, आळवते आणि आपल्याला पोट दुखीचा त्रास होऊ शकतो.
रव्यामध्ये फायबर चे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचे सेवन जास्त प्रमाणात झाले तर शरीरामध्ये फॉस्फरस वाढते आणि किडनीचा त्रास असणाऱ्या लोकांना याचा खूपच त्रास होतो.
तर मित्रांनो, तुम्हाला उपमा ही रेसिपीची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.