Usmanabad Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.
उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती Usmanabad Information In Marathi
साडे तिन शक्ती पिठांपैकी एक संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीचा हा जिल्हा!
शिवाजी महाराजांना ज्या देविनं वरदान दिलं, हाती लखलखती तलवार दिली (असे बोलल्या जाते) तिच्या कृपा आशिर्वादाने महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्यात! ती महाराष्ट्राची कुलस्वामीनी याच उस्मानाबाद जिल्हयात वास्तव्याला आहे.
मराठवाडा विभागात येणा.या उस्मानाबाद जिल्हयाच्या उत्तरेला बीड, पुर्वेला लातुर, पश्चिमेला सोलापुर जिल्हा, उत्तर पश्चिमेकडे अहमदनगर आणि दक्षिणेकडे कर्नाटक राज्याचे बिदर आणि गुलबर्गा हे जिल्हे आहेत.
उस्मानाबाद जिल्हयाचा अधिकतर भाग बालाघाट च्या पहाडांमधे स्थित आहे.
इतिहास
उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात येतो .या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे .उस्मानाबाद चा इतिहास रामायण काळापासून आढळतो .
वनवासात असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगतात .उस्मानाबाद शहरानजीक पापनाश येथे सीतेची न्हाणी आहे .उस्मानाबादला मौर्य ,सातवाहन, राष्ट्रकूट यांचे राज्य होते.तसेच यादवांचे देखील राज्य होते .
त्यानंतर उस्मानाबाद, बहामनी आणि विजापूर संस्थानात आले.1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात होते .हैदराबादच्या सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांच्या सन्मानार्थ उस्मानाबाद चे नाव देण्यात आले .
उस्मानाबाद चे पुर्वीचे नाव धाराशिव असे होते, शहराच्या नजिक साधारण आठ कि.मी. वर धाराशिव नावाच्या जैनांच्या लेण्या आहेत.
भूवर्णन
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).
उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. समुद्र सपाटीपासून जिल्ह्याची उंची ६०० mm इतकी आहे.
जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.
उस्मानाबाद जिल्हा मराठवाडा विभागाच्या पूर्व बाजूला उत्तरेस १७.३५ ते १८.४० डिग्री अक्षांश आणि पूर्वेस ७५.१६ ते ७६.४० डिग्री अक्षांश मध्ये स्थित आहे.
जिल्ह्याचे स्थूलमानाने दोन नैसर्गिक विभाग पडतात. तेरणा नदीच्या उत्तरेकडील बालाघाट डोंगराने व्यापलेला पठारी प्रदेश व नदीच्या दक्षिणेकडील सखल मैदानी प्रदेश.
बालाघाटची एक शाखा अहमदनगर जिल्ह्यातून येते भूम, औसा, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यांतील काही भाग या शाखेने व्यापलेला आहे. बालाघाट डोंगराची दुसरी शाखा अहमदपूर व उदगीर तालुक्यांतून वायव्येकडून आग्नेयीकडे जाते.
तुळजापूर व उदगीर तालुक्यांमध्ये आणि भूम महालामध्ये पर्वतरांगांना विभागणारी मोठी खोरी आहेत. पठारी प्रदेश समुद्रसपाटीपासून सरासरी ६०९ मी. उंच आहे.
चुनखडी, वाळू, दगड व माती ही या जिल्ह्यात आढळणारी खनिजे आहेत. तुळजापूर, कळंब व उदगीर तालुक्यांत थोडी जंगले असून त्यांचे एकूण जमिनीशी प्रमाण ०·१ टक्क्यापेक्षाही कमी आहे.
नदया
मांजरा व तेरणा या जिल्ह्यातील मुख्य नद्या आहेत. बोरी, बाणगंगा, मन्याड, तावरजा आणि सीना या इतर नद्या आहेत. मांजरा ही गोदावरीची उपनदी असून जिल्ह्यातील तिच्या प्रवाहाची लांबी १०८·६ किमी. आहे.
तेरणा उस्मानाबादजवळ उगम पावते व पूर्व सीमेजवळ मांजरा नदीस मिळते. मन्याड व तावरजा या मांजराच्या उपनद्या अनुक्रमे अहमदपूर व लातूर तालुक्यांतून वाहतात. सीना पश्चिम सीमेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते.
परांडा व भूम भागातील चांदणी व इतर छोट्या नद्या आणि तुळजापूर तालुक्यातील बोरी व हरणी या सीनेच्या उपनद्या होत. जिल्ह्यात पाटबंधार्याकरिता अहमदपूर, परांडा, औसा व तुळजापूर तालुक्यांत तलाव असून अनेक विहिरीही आहेत. चांदणी, हरणी इ. नद्यांवरील पाटबंधार्यांच्या योजना कार्यान्वित आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात 8तालुके आहेत ते पुढीलप्रमाणे
1 तुळजापूर 2. परांडा 3.उमरगा 4.लोहारा 5. उस्मानाबाद 6. कळंब 7.भूम 8.वाशी .
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ही १६,५७,५७६ एवढी आहे. उस्मानाबादमध्ये १००० पुरुषांमागे ९२० स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते आणि साक्षरता दर ७६.३३% होता.
जिल्ह्यातील डोंगराळ भागात परधान, भिल्ल, गोंड, कोलम, आंघ, कोया या अनुसूचित जमाती राहतात.
भाषा
उस्मानाबाद जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी आहे.·९७ टक्के लोक मराठी, ९·९९ उर्दू, २·७८ कन्नडभाषिक आहेत. याशिवाय जिल्ह्यात वंजारी, गुजराती, हिंदी, कैकाडी, पारधी, तेलुगू ह्या भाषा बोलल्या जातात.
माती व खनिजे
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपीक व काळी कापसाची जमीन असून मधूनमधून लाल, पांढरी किंवा वालुकामय जमिन आढळते.
अहमदपूर व उदगीर तालुक्यांतील जमिनी हलक्या दर्जाच्या, निलंगा तालुक्यांतील जमीन काळी कापसाची, औसा व लातूर तालुक्यांतील मांजराखोर्यातील अतिशय सुपीक आणि तुळजापूर, उमरगा, परांडा व भूम यांमधील सकस व ओलावा टिकवून धरणारी आहे.चुनखडी, वाळू, दगड व माती ही या जिल्ह्यात आढळणारी खनिजे आहेत.
हवामान
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे हवा कोरडी व सौम्य आहे. पठारी प्रदेशातील तालुक्यांचे हवामान दक्षिणेकडील सपाट प्रदेशातील तालुक्यांपेक्षा अधिक थंड व दमट असते.
परांडा व भूम महाल या घाटापलीकडील प्रदेशात पाऊस सु. ६० सेंमी. उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर या तालुक्यांमध्ये सु. ९० सेंमी. औसा, उमरगा व निलंगा तालुक्यांत सु. ८० सेंमी. आणि कळंब तालुक्यात सु. ७o सेंमी. पडतो. कमी पावसामुळे परांडा व भूम महाल या भागांत दहा वर्षांतून एकदा तरी दुष्कळ पडतो.
पावसाळ्याचे वातावरण हे जुन महिन्याच्या मध्यापासून सुरु होऊन सप्टेबरच्या शेवटी संपते.ऑक्टोबर पासून नोव्हेंबर पर्यंत दमट वातावरण असते.
नोव्हेंबरच्या मध्यापासून ते जानेवारी पर्यंत हिवाळा असतो. फेब्रुवारी पासून ते मार्च पर्यंत वातावरण कोरडे असते. एप्रिल पासून ते जून पर्यंत उन्हाळा असतो. मराठवाड्यातील दुसऱ्या जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यामधील उन्हाळ्यातील तापमान कमी असते.या जिल्ह्यातील सरासरी पाऊस ७६५.५ mm इतका असतो.
शेती
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्य पिके- ज्वारी,तांदूळ, गहू, बाजरी, इतर तृणधान्ये, एकूण तृणधान्ये, हरभरा, तूर, इतर डाळी, ऊस, कापूस, सोयाबीन,कार्डी, भुईमूग.जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग शेती असून कामकरी लौकांपैकी ८०·१३ टक्के लोक शेतीव्यवसायात आहेत.
१९६८-६९ मध्ये पेरणीचे निव्वळ क्षेत्र ७७·३ टक्के व ओलिताखालील ५·५ टक्के होते ओलितापैकी ८९·६२ टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याखाली होते. खरीप व रब्बी यांच्या पिकांखालील क्षेत्राचे प्रमाण ६३ : ३७ इतके होते. भूम महाल, परांडा व तुळजापूर तालुक्यांत पिके अधिक होतात.
ज्वारी, कापूस, ऊस, भूईमूग, तूर, मूग, गहू, हरभरा, अळशी ही येथील मुख्य पिके असून भात, मका, बाजरी, इतर कडधान्ये व गळिताची धान्ये, तंबाखू, मसाल्याची पिके व फळे आणि भाजीपाला यांचेही उत्पादन होते. पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीने ३७·२८ टक्के आणि गळिताच्या धान्याने १/५ क्षेत्र व्यापले असून गळितांपैकी ५४ टक्के भुईमुगाने व्यापलेले आहे.
उद्योगधंदे
वाहतुकीच्या अपुर्या सोई व स्वस्त विजेचा अपुरा पुरवठा ह्यांमुळे जिल्ह्यात उद्योगधंद्यांचा फारसा विकास झाला नाही. लातूर येथील एक कापूस पिंजणी व दाबणीचा कारखाना, एक वनस्पती तुपाचा कारखाना आणि दोन तेलाच्या गिरण्या, औसा येथील कागद कारखाना व ढोकी येथील साखर कारखाना एवढेच मोठे उद्योग जिल्ह्यात आहेत.
हातमाग, लोकर विणणे, तेलघाण्या, कातडी कमाविणे व चामड्याचे काम, दोरखंड बनविणे, मातीची भांडी, साबण, बांबूकाम हे घरगुती उद्योगधंदे येथे आहेत. उदगीर येथे उत्तम प्रतीची कांबळी तयार होतात.
उदगीर व अहमदपूर येथे बिदरी हस्तकला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. धान्य, कापूस, तेल, चामडी, मिरच्या, गुरे, मेंढ्या, हाडे व शिंगे, तंबाखू व तारवाडाची साल ह्या वस्तूंची जिल्ह्यातून निर्यात होते.
मीठ, सुकवलेले मासे, मसाल्यांचे पदार्थ, तांबे व पितळ यांची भांडी, साखर, घासलेट, कापड, किराणामाल, नारळ इ. माल आयात होतो. लातूर ही मोठी बाजारपेठ असून उदगीर हे उंटांच्या व्यापाराकरिता, तर मालेगाव हे घोड्यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील देवनी जातीचे गाय-बैल भारतभर प्रसिद्ध आहेत.
वाहतूक
उस्मानाबाद रेल्वेसेवा आणि बससेवेने सगळया महत्वांच्या शहरांशी जोडला गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 आणि क्र. 211 हे या जिल्हयातुन गेले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ९- हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. २११- गदग-कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ हा उस्मानाबाद शहरातून जातो.
उस्मानाबाद शहर मध्य रेल्वेवर, लातूरर रोेड – मिरज या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला, नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत .
उस्मानाबाद जिह्यात एस. टी.ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत.
उस्मानाबाद बसस्थानकावरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हहीहाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते उस्मानाबाद येथून राज्यातील जिल्हा मुख्यालये, प्रमुख शहरे, पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत.
महत्त्वाची स्थळे
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावी झालेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून ग्रीक व रोमन संस्कृतींशी या भागाचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. सुप्रसिद्ध संत गोरा कुंभार इथलाच रहिवासी.
कुंथलगिरीची जैन लेणी तसेच उस्मानाबाद शहराजवळील चांभारलेणी व धाराशिवलेणी यांमधील शिल्पे येथील प्राचीन कलेची साक्ष देतात. परांडा, नळदुर्ग, औसा व उदगीर येथील किल्ले उल्लेखनीय आहेत.
उस्मानाबाद व निलंगा येथील दर्गे, परांडा व औसा येथील मशिदी तसेच निलंगा येथील नीलकंठेश्वर व माणकेश्वर येथील महादेव यांची मनोहर शिल्पकाम असलेली मंदिरे, समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी यांचा डोमगांव येथील मठ आणि महाराष्ट्राचे एक प्रमुख कुलदैवत असलेल्या भवानीमातेचे क्षेत्र तुळजापूर यांसाठी जिल्हा प्रसिद्ध आहे.
उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद या ठिकाणी हजरत ख्याजा शम्सुद्दीन गाझीचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
तुळजापूर
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे ठिकाण महाराष्ट्रचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी किंवा भवानी मातेच्या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध.
नळदुर्ग
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हे ठिकाण भुईकोट किल्यामुळे प्रसिद्ध आहे. ‘पाणी महल’ हे नळदुर्गाच्या किल्यातील प्रमुख आकर्षण आहे.
तेरणा
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा या ठिकाणी तेरणा हे ऐतिहासिक गाव हेबौद्धकालीन स्तूप व संत गोरा कुंभाराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
परांडा
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या ठिकाणी एकेकाळची निजामशाहीची राजधानी. याच बरोबर उस्मानाबाद येथील परंडा या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला व संतकवी हंसराज स्वामीचा यांचा मठ देखील आहे .
डोणगाव
उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणगाव या ठिकाणी रामदास स्वामीचे पट्टाशिष्य कल्याणस्वामी यांचा मठ व ख्वाजा बद्रुद्दीन साहेबांचा दर्गा यासाठी प्रसिद्ध.
उस्मानाबादचे गुलाबजाम फार प्रसीध्द आहेत आणि मांसाहारी पदार्थ आवडीने खाणा.यांकरता उस्मानाबादी शेळीचे चवदार मटन देखील प्रसीध्द आहे.
धन्यवाद!!!