Uttar Pradesh Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य आहे. आहे जर उत्तर प्रदेशहे राज्य भारताच्या उत्तर भागामध्ये स्थित आहे. उत्तर प्रदेश ही भूमी खुप सार्या देवी देवतांनी भरलेली आहे. अनेक देवी देवतांचा जन्म सुद्धा येथे झाला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण उत्तर प्रदेश राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
उत्तर प्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Uttar Pradesh Information In Marathi
वाराणसी ला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. उत्तर प्रदेशची राजधानी पहिल्यांदा अलाहाबाद होती. नंतर ती बदलून लखनऊ करण्यात आली. हेसुद्धा उत्तरप्रदेशमध्ये स्थित आहे. या शहराला जगातील सर्वात जुने शहर म्हणून ओळखले जाते. हे शहर मंदिरे आणि गंगा नदी साठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की हे शहर तीन हजार वर्षे जुने आहे.
उत्तरप्रदेश एकमेव असे राज्य आहे, ज्याच्या सीमा इतर नऊ राज्यांना मिळतात. नेपाळ या देशाला सुद्धा या राज्याची सीमा लागते. उत्तर प्रदेश आपल्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. येथे विविध प्रकारचे नृत्य, उत्सव, सभा, संगीत, नाटक, सिनेमा इत्यादी केले जातात.
उत्तर प्रदेश राज्याची स्थापना
उत्तर प्रदेश राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली होती. 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या गव्हर्नर जनरलने संयुक्त प्रांत (नावात बदल) आदेश 1950 पास केला तेव्हा उत्तर प्रदेश अस्तित्वात आला.
या अंतर्गत संयुक्त प्रांताला उत्तर प्रदेश असे नाव देण्यात आले. तेव्हापासूनचे सर्व बदल उत्तर प्रदेशने पाहिले आहेत. 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशचे विभाजन करून उत्तराखंडची निर्मितीही झाली.
इतिहास
उत्तर प्रदेशचा इतिहास अतिशय प्राचीन व मनोरंजक आहे. ब्रम्हर्षी किंवा मध्य प्रदेश असा वैदिक युगात उल्लेख आहे. भारद्वाज, गौतम, याज्ञवल्क्य, वशिष्ट, विश्वामित्र आणि वाल्मिक अशांसारख्या तपस्वी, ऋषीमुनींची ही पावनभूमी आहे.
रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांची ही भूमी भारतासाठी नेहमी प्रेरणादायक आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तरप्रदेशात जैन व बौद्ध धर्म स्थिरावला होता. अयोध्या, प्रयाग, वाराणसी, मथुरा ही उत्तर प्रदेशातील महत्त्वाची शिक्षणकेंद्रे व धार्मिक स्थळे आहेत.
मध्ययुगीन काळात उत्तर प्रदेशावर मुस्लीमांचे राज्य आलेउत्तर प्रदेशचा इतिहास सुमारे 4000 वर्षांचा आहे, जेव्हा येथे आर्य आले आणि वैदिक संस्कृती सुरू झाली, तेव्हापासूनचा इतिहास येथे सापडतो. आर्य सिंधू आणि सतलजच्या मैदानातून यमुना आणि गंगेच्या मैदानात गेले.
भूगोल
उत्तर प्रदेशाचे चार नैसर्गिक विभाग पडतात
(अ) उत्तरेकडील हिमालयाचा पर्वतीय प्रदेश हा एखाद्या प्रचंड भिंतीसारखा पूर्व पश्चिम पसरला आहे अगदी उत्तरेस सरासरी ६,१०० मी. उंचीच्या मुख्य हिमालयश्रेणी असून त्यात कामेट, त्रिशूल, नंदादेवी यांसारखी उत्तुंग शिखरे आहेत त्यांच्या अलीकडे सरासरी ३,७२० मी. उंचीच्या मध्य हिमालयाच्या श्रेणी आणि त्यांच्या दक्षिणेस सरासरी १,५५० मी. उंचीच्या बाह्य हिमालय किंवा शिवालिक पर्वतश्रेणी असून त्यांत नैनिताल, मसूरी, अलमोडा, रानीखेत यांसारखी गिरिस्थाने आहेत. शिवालिक रांगां मधील ‘दून’ नामक उत्तम हवा पाण्याच्या व सुपीक खोर्यांना उत्तर प्रदेशाचे उद्यान म्हणतात.
यांच्याही दक्षिणेस पसरलेल्या पायथा टेकड्या शिवालिक रांगांचेच फाटे आहेत व त्यांना लागूनच नद्यांनी वाहून आणलेल्या दगडवाळूचा ‘भाबर’ पट्टा पश्चिमेस सु. ३२ किमी. रुंद असून पूर्वेकडे अरुंद होत गेला आहे. त्याच्या खालून जलप्रवाह वाहतात.
(आ) तराई भाबर पट्ट्यातील भूमिगत प्रवाह ज्या भूप्रदेशात पुन्हा वर येतात, त्याचे नाव तराई असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे तो डबकी, सरोवरे, उंच गवत व दाट जंगलांनी व्यापलेला आहे. तराईमधील हवा दमट व मच्छरांच्या उपद्रवाने रोगट आहे.
त्यामुळे तेथे वस्ती कमी असून पिके काढण्यासाठी पर्वतप्रदेशातून व मैदानभागातून हंगामापुरते येणारे लोक कापण्या होताच परत जातात. तराई संपून गंगेचे मैदान ज्या सीमेवर सुरू होते त्या सीमेवर सहारनपूर, पीलीभीत, बहरइच, गोरखपूर अशी शहरे आहेत आणि त्यांच्या आधारावर तराईतील झाडी व दलदल कमी करून शेतीयोग्य जमीन वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
(इ) गंगेचे मैदान हा उत्तर प्रदेशाचा अधिकांश भाग आहे. गंगा व तिला मिळणार्या यमुना, रामगंगा, घागरा इ. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने हा सपाट, जलसमृद्ध व सुपीक विभाग बनलेला आहे.
सहारनपूरपासून अलाहाबादपर्यंत समुद्रसपाटीपासून २५० ते १२५ मी. उतरत आलेले व वार्षिक सरासरी १०० सेंमी. पावसाचे क्षेत्र हे गंगेचे वरचे मैदान असून यात मुख्यतः गंगा-यमुना दुआबाचा अंतर्भाव होतो.
गंगेचे मधले मैदान अलाहाबादपासून पूर्वेस बिहारची राजधानी पाटणापर्यंत पोहोचते. याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०० ते १५० सेंमी. असून घागरा, गंडक, शोण इ. उपनद्या गंगेत विपुल पाणी आणून ओततात; तथापि त्यांना महापूर येतात आणि त्यांचा गाळ साचून पात्रेही बदलत राहतात. त्यामुळे गंगेच्या मध्य मैदानात अनेक तुटक जलाशय, दलदली आणि खाजणे निर्माण झाली आहेत.
(ई) दक्षिणेचा पठारी प्रदेश : हा दोन प्रकारांचा आहे.एक झांशीभोवतालच्या मध्य प्रदेशाच्या बुंदेलखंड पठाराचा ‘नीस’ खडकाचा भाग आणि दुसरा त्याच्या पूर्वेस विंध्याचल श्रेणीचा शोण नदीच्या उत्तर-दक्षिणेचा प्राचीन खडकांचा भाग याच्या उत्तरेच्या मिर्झापूरवरून याला मिर्झापूर पठार म्हणतात. हा प्रदेश उंचसखल असून तुटक खडक, सुटे डोंगर व लहान लहान दर्या यांचा बनलेला आहे.
मुख्य हिमालय पर्वतप्रदेश अनेक जातींच्या प्राचीन खडकांचा, बाह्य हिमालय मागाहून वर आलेल्या नदीनिक्षेपांचा आणि पायथाटेकड्या वाळू-मुरुमाच्या आहेत. हिमालयाच्या रांगा घड्या पडलेल्या पर्वताच्या असून त्याला उंच ढकलणारी भूशक्ती अजून जागृत असल्याने त्या भागात भूकंपाचा संभव नेहमी असतो.
जास्त जाडीची दून खोरी हे नदीगाळाचे प्रदेश आहेत आणि गंगेचे मैदान हा तर ९०० मी. हून जास्त जाडीच्या गाळाचा थर आहे. जुन्या गाळाचे पुरांच्या पाण्यापासून सुरक्षित प्रदेश ते ‘बांगर’ व पुराखाली जाणारे ते ‘खादर’ अशा स्थानिक संज्ञा आहेत. अतिप्राचीन खडकांचा मिर्झापूर पठारप्रदेश अनेक नद्यांनी कोरून काढलेला आहे.
शोण नदीच्या उत्तरेकडचा भाग विंध्य पठाराच्या अवशिष्ट पर्वतांचा असून त्यात मुख्यतः सिकताश्म, थरांचे अनेक खडक व चुनखडक आहेत दक्षिणेकडचा भाग सातपुड्याच्या पूर्वरांगांतील अग्निजन्य व रूपांतरीत खडकांचा आहे. बुंदेलखंडातील खडक प्राचीन ग्रॅनाइट व नाईस जातीचे आहेत.
मृदा व खनिजे
दून खोऱ्यातील व गंगामैदानातील गाळमाती सुपीक आहे. नद्यांच्या किनार्यालगत खादर माती बारीक रेतीमिश्र असेल आणि बांगर भागात पाण्याचा निचरा नीट असेल तर दगड खड्यांच्या थरावर दुमट माती असते. रेताड, दुमट, चिकण आणि मिश्रजातींच्या मृदा राज्यात सर्वत्र आढळतात. पूर्वभागाच्या सखल प्रदेशात चिकण व काळी माती असून ती पाटाच्या पाण्यावर चांगली पिके देते.
बुंदेलखंड पठारभागाच्या आणि फत्तेगढ, कानपूर व अलाहाबाद जिल्ह्यांत सापडणार्या ‘काबर’, ‘राकर’ , ‘परवा’ , ‘मार’ अशा जातींच्या मृदा तुलनेत कोरड्या पण सुपीक असतात.
निर्जल भागातील रेह नावाची खार माती नापीक असते, ती गंगा-घागरा दुआबात अधिक प्रमाणात आढळते. चंबळ, बेटवा, यमुना, गोमती या नद्यांच्या खोर्यांत मातीची धूप होऊन मोठमोठ्या घळी व खड्डे तयार झाले आहेत.उत्तर प्रदेश अधिकांश नदीगाळाचा असल्यामुळे ती थोडीबहुत खनिजे सापडतात ती डोंगराळ भागात. नैनिताल, झांशी व मिर्झापूर जिल्ह्यांत थोडे लोहधातुक आढळले आहे.
अलीकडे जिप्सम गढवाल जिल्ह्यात, मॅग्नेसाइट, तांबे व शिसे अलमोडा व गढवाल, टेहरी-गढवाल वगैरे जिल्ह्यांत आणि फॉस्फोराइट गढवाल व डेहराडून जिल्ह्यांत मिळण्याची शक्यता दिसली आहे पण वाहतुकीच्या व इतर अडचणींमुळे ही खनिजे काढणे अद्याप नफ्यात पडत नाही.
खनिज तेलाचाही मोठा संचय हिमालयात असेल असे अनुमान आहे. चुनखडक व स्लेट (पाटीचा खडक) हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांत मिळतात. लोहधातुक व कनिष्ठ प्रतीचा कोळसा मिर्झापूर पठाराच्या सिंगरौली भागात उपलब्ध आहे, पण उत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासारखे नाही.
चुनखडक मात्र या क्षेत्रात भरपूर असून चुर्क येथे सिमेंटचा एक मोठा कारखाना चालत आहे त्याशिवाय चुन्याचे व इमारतींच्या सजावटीत उपयोगी अशा नानारंगी चुनखडींचेही उत्पादन बरेच होते. विंध्य पर्वतरांगेतील सिकताश्म बांधकामाच्या दगडांसाठी उपयुक्त असल्याने त्याचा वापर राज्यात पुष्कळ होतो व मिर्झापूर जिल्ह्यात त्याच्या अनेक खाणी आहेत.
मैदानी भागात रस्त्यांना उपयोगी मुरुम, चिकण माती व काचेसाठी लागणारी वाळू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. भारतातील सिलिका वाळूचे ८०% उत्पादन उत्तर प्रदेशात होते. लोणा आलेल्या जमिनीवरच्या खारापासून सोरा-उत्पादन होते. झांशी जिल्ह्याच्या चरखरी तालुक्यात पूर्वी हिरेही सापडले आहेत.
हवामान
या राज्याचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे आहे. उत्तरेतला हिमालय पर्वतप्रदेश तुलनेने थंड व जास्त पावसाचा, तेथे तपमान सरासरी १२·८० से. व वार्षिक सरासरी पर्जन्य १५० सेंमी. पेक्षा जास्त असतो. तराईतील पर्जन्यमान १०० ते २०० सेंमी. असून तेथे जुलै ऑगस्टमध्ये पाऊस जास्त पडतो पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस कमी होत जातो.
तपमान थंडीत १५·८० से. ते १८·३० से. व उन्हाळ्यात २६·७० से. हून अधिक असते. मैदानी भागातील हवामान उन्हाळ्यात कोरडे व गरम, पावसाळ्यात दमट व गरम आणि हिवाळ्यात थंड व कोरडे असते. उन्हाळ्यातील तपमान ४६० से. च्या वर जाते आणि सकाळी दहापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कढत पश्चिमवारे वाहतात.
अलाहाबादच्या पूर्वेकडील अधिक पावसाचा भाग भातासारख्या पिकांना अनुकूल, तर पश्चिमेकडचा भाग गहू, जव, बाजरी, ज्वारी अशा पिकांना योग्य आहे. थंडीच्या सुखद ऋतूत संपूर्ण प्रदेशात सुगीचा मोसम असतो.
कधीकधी हलका हिमपात होतो, तर कधी थंडीची लाट येऊन जाते. मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरावरून येतो. दक्षिणेच्या पठारी प्रदेशात सरासरी वार्षिक पर्जन्य ५० ते १०० सेंमी. असून थंडीतील तपमान १२·८० से. ते १८·३० से. च्या दरम्यान राहते. उन्हाळ्यात येथील खडकाळ उजाड जमीन अतिशय तप्त व कोरडी असते.
लोकसंख्या
उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त 23 कोटी लोकसंख्या असणारे राज्य आहे. येथे भारताची जवळजवळ 16.6 टक्के लोकसंख्या आहे. जर उत्तर प्रदेश एक देश असता तर तो जगातील सहावा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश बनला असता. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे.
लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. चपट्या नाकाचे व काळ्या रंगाचे द्राविड वंशीय, धारदार नाकांचे आणि गोरे आर्य वंशीय आणि गोल डोक्यांचे, गालांची हाडे उंच असणारे व पिवळसर वर्णाचे मंगोलॉईड अशा तीन प्रकारांचे आणि त्यांच्या संकराने झालेल्या असंख्य प्रकारांच्या मानववंशीयांचे नमुने उत्तर प्रदेशात आढळतात.
राज्यातले ८५% लोक हिंदू व बाकीचे अधिकांश मुसलमान आहेत. याशिवाय राज्यात शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध हेही थोड्याफार प्रमाणात आहेत. राज्यातील बहुसंख्य वस्ती ग्रामीण विभागात आहे.
शेती
भारताच्या शेतजमिनीपैकी अष्टमाशांवर शेतजमीन असलेल्या व एकूण शेती उत्पादनाचा षष्ठांश पुरविणार्या या राज्यात वर्षातून दोन पिके काढण्यात येतात. भात, मका, ज्वारी व काही डाळी ही खरीप पिके आणि गहू, जव, हरभरा व वाटाणा ही रब्बी पिके मुख्य आहेत.
लोकसंख्येच्या 75% लोक शेतीवर आहेत. बाकीची पिके पावसाच्या प्रमाणानुसार पश्चिम भागात निघतात. दुय्यम पिकांपैकी तराई भागात ताग, पर्वतीय प्रदेशात चहा व पश्चिम भागात कापूस निघतो. ऊस, अळशी, मोहरी, भुईमूग, तीळ, कापूस व ताग ही प्रमुख नगदी पिके आहेत. अधिक धान्योत्पादनासाठी तिसर्या योजनेत दोन लाख विहिरी खोदण्यात आल्या.
अलाहाबादच्या पूर्वेकडील अधिक पावसाचा भाग भातासारख्या पिकांना अनुकूल, तर पश्चिमेकडचा भाग गहू, जव, बाजरी, ज्वारी अशा पिकांना योग्य आहे. भारतातील एकूण ऊस उत्पादनामध्ये अर्धे ऊस उत्पादन उत्तर प्रदेश एकटे राज्य करते.
नद्या
राज्याची मुख्य नदी गंगा. तिला डाव्या अंगाने रामगंगा, गोमती, व घागरा आणि उजव्या बाजूने यमुना या नद्या मिळतात. टेहरीगढवालमध्ये गंगोत्रीला उगम पावली, तरी अलकानंदा-भागीरथी संगमापासून गंगा ही गंगा म्हणून सुरू होते, ती हरद्वारजवळ मैदानात उतरून राज्याच्या आग्नेयीस वाहत जाते.
यमुनेचा उगम गंगेच्या पश्चिमेस होऊन ती राज्याच्या पश्चिम सीमेवरून काही अंतर वाहून अलाहाबादजवळ गंगेला मिळते. दक्षिण पठारी भागातून यमुनेला चंबळ, सिंद, बेटवा व केन या नद्या मिळतात. मिर्झापूर जिल्ह्यातून शोण नदी पश्चिमपूर्व वाहते तिला मिळणार्या रिहांड नदीवरच्या धरणामुळे झालेला जलाशय अधिकांश उत्तर प्रदेशात येतो. त्याखेरीज मोठे जलसंचय या राज्यात नाहीत.
भाषा
उत्तर प्रदेशात हिंदी आणि उर्दु या मुख्य भाषा बोलल्या जात असल्या तरी काही घटकबोलीही या राज्यात बोलल्या जातात. त्यापैकी कोणत्या भाषा कोणते लोक बोलतात त्याचे कोष्टक खालील प्रमाणे :
भाषा व ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे : अगरिया – अगरिया, भोटीया – भोटीया, जंगली – राजी, थारू – थारू.
या व्यतिरिक्ता भोटीया, बुकसा, जाउन्सारी, राजी, थारू आदी आदिवासी लोक उत्तर प्रदेशात राहतात.
पोशाख
शेतकरी पुरुषांचा पोषाख धोतर, कुडते व पागोटे आणि स्त्रियांचा पोषाख रंगीबेरंगी घागरे, सदरे व ओढण्या असा असतो. स्थलपरत्वे दक्षिण पठारावर आणि उत्तरेच्या पर्वतप्रदेशात या पोषाखात फेरफार दिसतात.
भोजन
आहार आर्थिक कुवतीनुसार गव्हाची चपाती, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, डाळी व भाज्या असा असतो. तूप आणि मांसाहार परवडणारे थोडे, तसेच मांसाहार व मत्स्याहार धार्मिक प्रवृत्तीमुळे इतर प्रदेशांच्या मानाने बऱ्याच कमी प्रमाणावर असतो.
पूर्वेकडे अन्नात गव्हाऐवजी तांदुळाचा वापर अधिक होतो. उन्हाळ्यात आंबे व मोहाची फुले गरीब लोकांच्या अन्नास पूरक होतात. फार गरीब लोक एकदा संध्याकाळचे जेवण घेऊन दिवसाची वेळ चुरमुरे-फुटाण्यावर भागवतात. त्यांच्या अन्नात मक्याची भाकरीही असते.
वने आणि प्राणी
राज्याच्या भूमीपैकी १५·३% वनप्रदेश असून तो पर्वतीय प्रदेशाच्या ४७% व मैदानी प्रदेशाच्या फक्त ३% भाग व्यापतो. चोपन्नपैकी चौतीस जिल्ह्यांत ३% पेक्षा कमी प्रदेश वनाच्छादित आहे. पर्वतीय वने संपन्न व विविध वृक्षांची आहेतत्यांच्यापासून शाल, शिसवी, खैर, हालदू, तेंडू आणि इतर उपयुक्त लाकडांचा पुरवठा होतो.
उत्तर हिमालय भागात बर्च, फर, स्प्रूस, ज्युनिपर, ब्लू पाइन, चीड व देवदार यांसारख्या मऊ लाकडाची दाट बने आहेत. विखुरलेल्या जंगलातून आणि मैदानी भागात मोहाची बरीच झाडे आहेत. मैदानात आंबे, पेरू, बोरे व पर्वतप्रदेशात सफरचंद, नास्पतीसारखी फळझाडे प्रामुख्याने आढळतात.
शेतीसाठी मैदानी भागात झालेल्या झाडतोडीमुळे होणारी जमिनीची धूप वाचवण्यासाठी वृक्षारोपणाचे शासकीय प्रयत्न सुरू झाले आहेत. प्राण्यांपैकी पर्वतप्रदेशात व तराईत वाघ, चित्ते, अस्वल, नीलगाय, हरिण व वानर पुष्कळ आहेत. मोर, रानकोंबडे, तीतर वगैरे रानपक्षी सर्वत्र आढळतात. पाणथळ प्रदेशात करकोचे, बगळे, बदके व ऋतुनुसार येणारे चक्रवाक, चातक असे विविध जातींचे पक्षी दृष्टीस पडतात.
उद्योगधंदे
उत्तर प्रदेश हे एक प्रमुख साखरउत्पादक राज्य आहे. येथील मुख्य कुटिरोद्योग हातमागाचा असून सुती व लोकरी कापड, पादत्राणे व चामड्याच्या वस्तू, आसवन्या व ऊर्ध्वपातन भट्ट्या, कागद, रसायने, काच व काचवस्तू यांचे कारखाने भरभराटीत आहेत.
उत्तर प्रदेशाच्या वैशिष्ट्यानुसार राज्यात वाराणसीस जरीकाम, फिरोझाबादभोवती 130 बांगडी कारखाने, मिर्झापुरास सतरंज्या व गालिचे, अलीगढला कुलुपे व लोखंडी हत्यारांचे उद्योग, मुरादाबादेस पितळी घडणकाम, शिवाय वेगवेगळ्या भागांत वनस्पती तूप, पॉवर अल्कोहोल, राळ, टरपेंटिन, रेशमी वस्त्रे, हस्तिदंतीकाम, चामड्याच्या वस्तू, अत्तरे, वाद्ये, बांबू व वेताच्या वस्तू, लाकूड, धातू, चिनीमाती, दगडी वस्तू, कंदिल लखनौ-सहारनपूर येथे कागद, खेळ, लाख, काडेपेट्या, बॉबिन, सिगारेट, प्लॅस्टिकच्या वस्तू अशा मालांचे लहानमोठे कारखाने विखुरलेले आहेत. खेळसामान तयार करण्याचे नवे हुन्नर बरेली व मीरत येथे निघाले आहेत.
कारखानदारीत प्रामुख्याने ७२ साखर कारखाने, ३१ कापड गिरण्या, २५ काचकारखाने, लोहमार्ग-कर्मशाला, शेतीची अवजारे, रेडिओ, विद्युत् उपकरणे, रसायने, सायकली इत्यादींचे बारीकसारीक यांत्रिकी कारखाने, कानपूरच्या रोलिंग मिल्स व लोखंडपोलाद कारखाने, लखनौचा उपकरण कारखाना यांचा समावेश होतो.
हरद्वारचा भारत इलेक्ट्रिकल्स, वाराणसीचा डिझेल रेल्वे एंजिनांचा कारखाना, नैनीचा त्रिवेणी स्ट्रक्चरल्स, बरेलीचा संश्लिष्ट रसायनांचा कारखाना, चुर्क व दल्ला येथील सरकारी सिमेंट कारखाने, गोरखपूरचा खत कारखाना, तुंडलाचा मांसशीतकरण कारखाना, लखनौचा हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, कानपूर येथील युरिया कारखाना, शिवाय अवजड अवजारांचे सहा कारखाने, हृषिकेशचा प्रतिजैविक पदार्थांचा कारखाना व इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स हे सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प चालू झाले आहेत.
उत्तर प्रदेशातून मुख्यतः गहू, डाळी, तेलबिया अशा शेतमालाची त्याचप्रमाणे साखर, लाकूड व इतर वन्य पदार्थ, तूप, तंबाखू, रंग-रोंगणे या वस्तूंची निर्यात आणि सुती, लोकरी व रेशमी कापड, यंत्रसामग्री, धातूंचा माल, अन्य तयार माल, मीठ व नित्य गरजेच्या जीवनोपयोगी वस्तूंची आयात होते. राज्यातल्या मुख्य बाजारपेठा कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी, मिर्झापूर, हापूर, मीरत, मुरादाबाद व गोरखपूर या आहेत.
वाहतूक
राज्यात देशातील सर्वात मोठ्या रस्त्यांच्या जाळ्यासह देशातील एक विशाल आणि बहुविध वाहतूक व्यवस्था आहे. उत्तर प्रदेश हे त्याच्या नऊ शेजारील राज्यांशी आणि भारताच्या इतर सर्व भागांशी राष्ट्रीय महामार्गांद्वारे चांगले जोडलेले आहे.
राज्यात एकूण 42 राष्ट्रीय महामार्ग आहेत, त्यांची लांबी 4,942 किमी आहे. उत्तर प्रदेशचे रेल्वे नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठे आहे, परंतु राज्याची सपाट स्थलाकृति आणि सर्वात मोठी लोकसंख्या असूनही, रेल्वेची घनता फक्त सहाव्या क्रमांकावर आहे. 2011 पर्यंत, राज्यात 8,546 किमी रेल्वे मार्ग आहेत.
उत्तर मध्य रेल्वे झोनचे मुख्यालय प्रयागराज येथे आहे आणि ईशान्य रेल्वे झोनचे मुख्यालय गोरखपूर येथे आहे. राज्यात तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. लखनौ येथे चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्येतील श्री राम लल्ला आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाराणसीमध्ये स्थित लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. याव्यतिरिक्त, आग्रा, प्रयागराज, कानपूर, गाझियाबाद, गोरखपूर आणि बरेली येथे देशांतर्गत विमानतळ आहेत.
लोककला
रामलीला ही लोककला पारंपरिक पद्धतीने उत्तर प्रदेशात सादर केली जाते. रामाच्या जीवनावर हे नाटक असते आणि ते पंधरा दिवस रात्रीच्या वेळी व्यासपीठावर सादर केले जाते. यात नाच आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.
ब्रज रासलीला हा असाच एक लोककलेचा प्रकार राज्यात सादर केला जातो. प्रेमाची देवता श्रीकृष्ण यांच्या जीवनावर ही कला सादर केली जाते.
चारकुला हा अजून एक लोकनृत्य प्रकार राज्यात सादर केला जातो. हा नृत्यप्रकार महिला समुहानेने सादर करतात. या नृत्यावेळी डोक्यावर जळते दिवे घेतले जातात व तोल सांभाळत नृत्य केले जाते. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमावर हे नृत्य असते. उत्तर प्रदेशातल्या ब्रज प्रांतात हे नृत्य लोकप्रिय आहे.
पर्यटन स्थळे
उत्तर प्रदेश मधील धार्मिक स्थळांना त्यांनी भेट देऊ शकता. त्यामध्ये कृष्ण जन्म भूमि मंदिर, जामा मस्जिद, कुसुम सरोवर, द्वारकाधीश मंदिर, कंस किला, राधा कुण्ड, गोवर्धन हिल, मथुरा संग्रहालय आहे.
याव्यतिरिक्त कटारनिया वन्यजीव अभयारण्य अतिशय सुंदर ठिकाण आहे. दुधवा व्याघ्र प्रकल्पाशी जोडले गेल्याने तुम्हाला येथे चिताही पाहायला मिळेल.उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्हा उच्च न्यायालय आणि विद्यापीठापेक्षा दोन नद्यांच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. येथे यमुना आणि गंगा यांचा संगम होतो.
महाराजा गंगाधर राव यांचे छत्र उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात आहे. हे राणी लक्ष्मीबाई यांनी 21 नोव्हेंबर 1853 रोजी बांधले होते.अलकनंदा हे ठिकाण नसून एक क्रूझ आहे. जी वाराणसीतील गंगा नदीत वाहते. ही वातानुकूलित क्रूझ आहे.
धन्यवाद!!!