वडा पाव रेसिपी मराठी Vada Pav Recipe In Marathi

वडा पाव रेसिपी मराठी Vada Pav Recipe In Marathi  वडा पाव हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध नाश्ता आहे. वडा पाव हा मुंबईकरांच्या संस्कृतीचा एक भाग आहे असे मानले जाते. हे एक शाकाहारी फास्ट फूड डिश आहे. जो मूळ महाराष्ट्र राज्यातील आहे. पुणे ते मुंबई अशा अनेक शहरात लोक सकाळी नाष्टा म्हणून वडापाव खातात. यातील एक प्रकार म्हणजे बर्गर आहे. हे एक शुद्ध शाकाहारी खाद्य आहे. जे सर्व लोक आवडीने खातात. तसेच आता हा वडा पाव आपल्या सभोवताली शहरात किंवा गावात देखील मिळतो. काही लोकांना वडा पाव खा वाटतो. पण त्याचा गावात किंवा सभोवताली तो मिळू शकत नाही. त्याचसाठी आपण आज वडा पाव हे रेसिपी घेऊन आलो आहे, तर आपण मुंबई वडापाव सारखा स्वादिष्ट वडापाव आपल्या घरी अगदी सहज बनवू शकतो. त्यासाठी आपण हे रेसिपी पाहणार आहोत.

Vada Pav Recipe In Marathi

वडा पाव रेसिपी मराठी Vada Pav Recipe In Marathi

वाढीव :

वडा पाव आपण 6 लोकांकरिता बनवणार आहोत.

वडा पावच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

वडा पाव म्हटलं म्हणजे वेग वेगळ्या मसाले टाकून आलू सोबत मिश्रण तयार करावे लागते. तसेच पाव आणि आलू वडे तयार करावे लागतात. पाव वडा तयार करण्यासाठी 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिग टाईम :

वडापाव कूकींग करण्यासाठी एकूण 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

वडा पाव तयार करण्यासाठी साहित्य तयार करून मिश्रण करावे लागते. त्याला 30 मिनिट लागतात. आणि कूकिंग तयार करण्यासाठी 20 मिनिट लागतात. अशा टोटल पूर्ण 50 मिनिताट आपला वडा पाव तयार होतो.

रेसिपीचे प्रकार :

वडा पाव हा भारतातील सर्वाना आवडणारा व स्वादिष्ट पदार्थ आहे. जो महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई मधील फेमस वडा पाव, पुण्यातील पुणेरी वडा पाव सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. यामध्ये जास्त प्रकार नाहीत, याला वडापाव किवा पाव वडा म्हणून ओळखले जाते.

वडा पाव बनवण्यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे आहे :

1) एक पाव तेल.
2) अर्धा पाव बेसन.
3) पाच ते सहा आलू/ बटाटे मध्यम स्वरूपाचे.
4) एक चम्मच हळद.
5) एक चिमूट हिंग.
6) चार ते पाच हिरवी मिरची.
7) एक चम्मच लसूण अड्रक पेस्ट.
8) थोडी कोथिंबीर.
9) 1 चम्मच मिरची पावडर.
10) 10 ते 12 पाव.
11) थोडे मीठ.
12) कडीपत्ता.
13) पाच ते सहा चींचा.
14) अर्धा चम्मच सोडा.
15) थोडे पाणी.
16 ) गरम मसाला.

पाककृती :

 • वडापाव तयार करण्या अगोदर भाजीपाला जसे कोथिंबीर, आलू, मिरची, व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यावे.
 • नंतर चिंचा एका छोट्या प्लेट मध्ये भिजू घालून त्या नंतरचा कामासाठी बाजूला ठेऊन द्या. कांदा व कोथिंबीर बारीक कापून घ्यावे.
 • आलू एकाचे दोन कापून घ्यावे. नंतर एका खोल पात्रामध्ये थोडे पाणी घेऊन, आलू/बटाटे, गॅस वरती ठेऊन उकडण्यास ठेऊन द्या.
 • 10 मिनिट मध्ये आलू चांगले उकडल्या जातीन. चम्मचच्या सहायाने आलू झाले की नाही पाहून घा. जे चम्मच सहज आलू मध्ये गेला तर आपले आलू झाले समजावे. नाहीतर अजून थोडा वेळ होऊ द्याचे.
 • आलू झाल्यावर ते खाली कडून थंड होऊ द्या. नंतर त्याची बाहेरील साल काडून टाका, व त्यांना व्यवस्थित हाताने बारीक करा. म्हणजे सर्व मसाला त्यामध्ये बरोबर मिक्स होणार.
 • आता हे बारीक झालेलं आलू बाजूला ठेऊन द्या. जे आपल्याला नंतर उपयोगात येणार आहे. आता आपण मसाला तयार करणार आहोत.
 • बाजूला एक खोल पलाचा पॅन गॅस वरती ठेवा. आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाका.
 • तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडे मोहरी, हिंग, आणि थोडा कडीपत्ता टाका. तर चांगले होऊ द्या.
 • नंतर त्यामध्ये लसन अद्रक पेस्ट, हिरवी मिरची, व एक चम्मच धनिया पावडर टाकून. चांगले परतावा, आणि एक चम्मच हळद टाकून एक मिनिट परतवत राहा.
 • मसाला चांगला झाल्यावर त्यामध्ये व्यवस्थित बारीक केलेले आलू टाका, आणि पूर्ण मिक्स करून घ्या. म्हणजे मसाला पूर्ण एकजीव होणार आणि चवेनुसार त्यामध्ये मीठ टाका.
 • आता गॅस बंद करून टाका. आपला मसाला तयार आहे. आलुचे मिश्रण तयार झाले आहे, हे थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्यावे.
 • आता आपण आलु वडासाठी लागणारे बेसन तयार करणार आहोत. त्यासाठी एक खोल तळाची वाटी किंवा कटोरा घा.
 • यामध्ये अर्धा पाव बेसन टाका. एक चंमच हळद, एक चम्मच मिरची पावडर, एक चिमूट हिंग, अर्धा चम्मच सोडा, चवीनुसार मीठ घावे. याचे पूर्ण मिश्रण तयार करा.
 • यामध्ये आता आवश्यक तेवढे पाणी टाका, आणि पीठ एकदम गुळगुळीत बेसनाचे गोडे न राहता असे तयार करा. जे तुमचा हाताला चीपकेल येवढे पातळ तयार करा.
 • आता आलूचे मिश्रण घेऊन, त्याचे छोटे छोटे गोल आकाराचे गोळे तयार करा. व त्यांना थोडे सपाट पण करू शकता.
 • आता गॅस चालू करून त्यावर कडाई ठेवा, आणि त्यामध्ये तेल टाकून, गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले की नाही तपासून पाहावे.
 • आता तयार केलेले बेसन घ्या आणि तयार केलेले आलूचे गोळे बेसनात टाकून त्याचा लेप त्यांना व्यवस्थित लावा. आतील आलू दिसायला नको तेवढा लेप त्यांना लावा.
 • नंतर तेलात एक एक करून त्यावर लेप लाऊन तेलात सोडा व तळून घ्या. आलू वडे मध्यम गॅस वरती सोनेरी आणि कुरकुरीत होये पर्यत तळा.
 • सर्व आलू वळे तळून झाल्यावर त्यांना तेल शोषतील अशा पेपरवर ठेवा. म्हणजे ते जास्त तेलकट वाटणार नाही, आलु वळे आता बाजूला ठेऊन द्यावे.
 • आता गॅस बंद करून हिरवी मिरची तळून घ्यावी. ते फुटणार नाही यासाठी मिरची मधात थोडी कापून घ्यावी.
 • मिरचीला थोडे फुगे यापर्यत तळा आणि मग बाहेर कडून घ्यावी, मिरची तयार आहे.
 • चिंचेची आपण गोड खटाई तयार करावी. एक चमंच तेल टाकून त्यामध्ये थोडे जिरे व 2 चम्मच साखर टाका. थोडे झाल्यावर त्यामध्ये चींचेचे पाणी सोडून द्यावे. थोडी गरम झाली की आपली गोड खटाई तयार आहे.
 • अशाच प्रकारे आपण हिरवी मिरचीची चटणी तयार करू शकतो. त्यामध्ये गोड न टाकत, हिरवी मिरची टाकावी.
 • आता आपला वडा पाव पूर्णपणे तयार झाला आहे. पाव थोडेसे पॅन वरती गरम करून घ्यावे. आणि मधात कापून त्यामध्ये थोडी गोड खटाई व हिरवी चटणी लावा, आणि त्याचा मध्यभागी एक आलू वडा घाला आणि व्यवस्थित पकडुन खाण्यासाठी तयार झाला आहे. एक मिरची व थोडा कांदा टाकून आपण याला खाऊ शकतो.

वडा पावमध्ये पोषक घटक :

वडा पावसाठी लागणारे सामान आलू, अद्रक, हिरवी मिरची यामध्ये आपल्या शरीराला लागणारे पोषक घटक आहे. यातून मिळणारे पोषक घटक आपल्यासाठी फायद्याचे आहेत. आणि हे सर्व तेला पासून तयार होते तर आपल्याला तेलापासून फॅट मिळतात. जर आपल्या शरीरात फॅट कमी असेल तर हे घटक आपल्याला यातून मिळतात.

तोटे :

वडा पावमध्ये आलुचे प्रमाण जास्त असते, आणि आलू हे थंड असतात. त्यामुळे हातात किंवा पायात वात येऊ शकतो.

आणि वडा पाव जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्याला पोट दुःखी होय शकते. म्हणून ते कुचीतच खाल्ले पाहिजे.

यामध्ये सर्व पदार्थ तेलकट असतात. त्यामुळे आपल्या शरीरावर फॅटचे प्रमाण वाढते, आणि आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.

तर मित्रांनो, तुम्हाला वडा पाव रेसिपि विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment