वडा सांबर मराठी Vada Sambar Recipe In Marathi वडा सांबर हे उडीद डाळ आणि वेग-वेगळ्या भाजीपाला पासून बनवले जातात. हा खायाला एकदम स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे. वडा सांबर हा एक पौष्टिक आहार आहे. यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. वडा सांबरचा उपयोग नाष्टा म्हणून केला जातो. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. वडा सांबर भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात, हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रीय पदार्थ आहे.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि मसालेदार वडा सांबर खायाला मिळते. काही लोकांना वडा सांबर खूप आवडते पण, त्याचा परिसरात स्वादिष्ट वडा सांबर मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट वडा सांबर कशे बनवतात यांची रेसिपी, आता आपण वडा सांबर रेसिपी पाहणार आहेत.
वडा सांबर मराठी Vada Sambar Recipe In Marathi
वडा सांबरचे प्रकार :
वडा सांबर हा एक पौष्टिक आहार आहे. हा एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहे. वडा सांबर वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. जसे वडा सांबर, आलू वडा सांबर, मूंग वडा सांबर, मेदू वडा सांबर, उडीद डाळ सांबर हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
वडा सांबर रेसिपी आपण 4 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
वडा सांबरच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
वडा सांबर तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
वडा सांबर कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
वडा सांबर बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावे लागतात, यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास वेळ लागतो.
वडा सांबरसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 वाट्या उडीद डाळ.
2) अर्धी वाटी तांदूळ.
3) 50 ग्रॅम खोबरे.
4) 50 ग्रॅम तूर डाळ.
5) 1 वांगे, आणि थोडी गोबी.
6) थोडा भोपळा.
7) थोडी चिंच, आणि गूळ.
8) थोडा कढीपत्ता.
9) 1 चमच मिरची पावडर.
10) 1 चमच हळद.
11) 2 चमचे सांबर मसाला.
12) तेल आणि मीठ.
13) थोडी कोथिंबीर.
14) 2 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
15) 1 कांदा.
पाककृती :
- सर्वात प्रथम वडे तयार करण्या अगोदरच्या रात्री उडीद डाळ आणि तांदूळ भिजू घाला, नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा उपयोग करा.
- पहिले सर्व भाजीपाला, जसे कोथिंबीर, वांगे, कढीपत्ता, गोबी, भोपळा स्वच्छ धुऊन घ्या,
आणि बारीक चिरून घ्या. - नंतर भिजवलेली उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या, आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा.
- आणि एका भांड्यात काढून घ्या, पेस्ट थोडा मध्यम असला पाहिजे, यामुळे वडे चांगले बनतात.
- याचबरोबर खोबरे सुध्दा मिक्सर मधून बारीक करून घ्या, बारीक खोबरे एका भांड्यात काढून घ्या.
- आता एका प्लेटमध्ये डाळीचा पेस्ट आणि बारीक खोबरे मिक्स करा. यामध्ये थोडी हळद, तिखट, आणि चवीनुसार थोडे मीठ टाका.
- आणि पूर्ण मिश्रण तयार करून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅस वरती कढई ठेवा, त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- आता आपण तयार केलेल वडेच मिश्रण घ्या, त्याचे लहान गोल गोळे तयार करा, आणि मध्यभागी एक छिद्र पाडून सपाट करा.
- अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्या, नंतर गरम तेलात एक-एक करून तळून घ्या.
- वळे दोन्ही बाजूने लालसर झाले पाहिजे, एका बाजूने झाले की, दुसऱ्या बाजूने परतवा.
- वळे चांगले झाले की, एका पेपरवरती काढून घ्या, म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल.
- अशा प्रकारे सर्व वळे तळून घ्या, आता आपण सांबर मसाला तयार करूया.
- सर्व भाज्या चिरून घ्या, नंतर एका कुकरमध्ये थोडी तूर डाळ, बारीक भोपळा, गोबी, वांगे टाकून 2 शिट्या होये पर्यत चांगले शिजू द्या.
- नंतर एक खोल तळाचे पॅन घ्या. त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, यामध्ये कांदा पेस्ट टाका, कांदा चांगला होऊ द्या, तो पर्यत परतवत रहा.
- नंतर यामध्ये लसन-अद्रक पेस्ट टाकून, चांगला लालसर होऊ द्या, नंतर यामध्ये थोडा कढीपत्ता टाका.
- हे सर्व चांगले झाले की, यामध्ये हळद, मिरची पावडर, आणि थोडा सांबर मसाला टाका, आणि 2 मिनिट होऊ द्या.
- नंतर शिजवलेली भाजी मॅश करून घ्या, आणि मसाला चांगला झाला की यामध्ये ही भाजी टाका.
- नंतर यामध्ये चवीनुसार थोडे मीठ टाकून, चांगली उकडी आली की थोडी बारीक कोथिंबीर टाका.
- नंतर चिंच आणि गुळाची थोडी खटाई बनवून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- आता आपले गरमा-गरम वळे आणि सांबर खाण्यासाठी तयार आहेत. आपण एका प्लेटमध्ये वडे आणि एका छोट्या वाटीत सांबर घेऊन वडा सांबर खाण्याचा आपण आनंद घेऊ शकतो.
वडा सांबरमध्ये असणारे घटक :
वडा सांबर हे वेग-वेगळ्या भाजीपाला आणि डाळी पासून बनवले जातात. यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, चरबी, फॅट, शुगर, मॅग्निशियॅम हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.
फायदे :
वडा सांबर खाल्ल्याने आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम साखरे घटक मिळतात.
यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.
यामध्ये असणारे व्हिटॅमिन, प्रथिने, चरबी फॅट आपल्या शरीराची वाढ करतात.
वडा सांबरमधील सर्व पौष्टिक घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
वडा सांबर आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
वडा सांबर हा एक पौष्टिक आहार आहे. यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
म्हणून वडा सांबर आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला वडा सांबर रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.